प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन 💜
मी जास्त सेल्फ हेल्प पुस्तके वाचत नाही किंवा मला ती जास्त आवडत नाही…सेल्फ म्हणजे स्वतःची स्वतः मदत करणे आणि ही पुस्तके आपल्याला ती शिकवत असतात.. मी आजपर्यंत मोजकीच या प्रकारातील पुस्तके वाचली आहे पण ती सुद्धा कुठली प्रेरणा घ्यायला वगैरे नाही तर फक्त महत्वपुर्ण काही टिप्स घ्यायला..ही पुस्तके वाचून काही वेळ आपल्याला फुल प्रेरणा मिळते,आयुष्यात सर्वकाही खूप खूप सोपं आहे असं वाटायला लागते,आता या पुस्तकांत सांगितलेलं आहे तसं केलं तर यश आपलंच आहे अस वाटायला लागते..
अशी पुस्तके लिहून आजपर्यंत शेकडो लेखक करोडपती झालेली आहेत पण ही अशी पुस्तके वाचुन फक्त या पुस्तकाच्याच भरवश्यावर राहणाऱ्या व्यक्तींनी आपला फ़क्त वेळ वाया घालवला आहे असे मला वाटते आणि अनेक जण प्रकारातले माझ्या नजरेत आहेत...ही पुस्तके एक औषधी सारखी काम करत असतात.ही आपल्याला बरे करते परंतु त्याचे परिणाम केवळ तात्पुरते असतात..एखाद्या सेल्फ हेल्प पुस्तकाच्या भरवश्यावर राहून तुम्ही कधीही यशस्वी होऊच शकत नाही त्यासाठी तुम्हाला योग्य ती कृती सुद्धा करावी लागेलच....वरी सांगितल्या प्रमाणे मी फक्त आजपर्यंत मोजकीच सेल्फ पुस्तके वाचली आहेत आणि त्यातील मोजकीच मला आवडली व त्यातून मी माझ्या कामाच्या काही टिप्स घेऊन त्याप्रमाणे कृती केली आणि मला त्याचा योग्य तो फायदा सुद्धा झाला..मी वाचलेली काही मोजकीच पुस्तके खालीलप्रमाणे..
१)द सिक्रेट
२)अतिपरिणामकारक लोकांच्या ७ सवयी
३)द पावर ऑफ युअर सबकोणशीयश माईंड
४)विचार करा आणि श्रीमंत व्हा
५)रिच डॅड पुअर डॅड
६)द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फ़क
७)इकिगाई
८)ईचीगो इची
९)सर्वात कठीण काम सर्वात आधी करा
१०)बुद्धा एट वर्क
११)मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा
आणि नुकतेच मराठीत अनुवाद झालेले विवेक बिंद्रा लिखित वेळेचे नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन..
आता वरील प्रत्येक पुस्तकातून मी माझ्या कामाच्या काही चांगल्या गोष्टी घेतल्या आणि बाकी सोडून दिल्या आणि यासोबत योग्य ती कृती सुद्धा केली व मला याचा खूप फायदा सुद्धा झाला...आता या सर्व पुस्तकातून मला सर्वांत जास्त कोणतं पुस्तक जर आवडलं असेल तर ते विवेक बिंद्रा लिखित वेळेचे नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन हे होय जे मी काही दिवसांपूर्वीच वाचून संपवले आणि मला या पुस्तकाने खूप प्रभावित केले.मी वेळेच्या व्यवस्थापनासाठी आणि नियोजनासाठी ज्या काही टिप्स शोधत होतो त्या मला सर्वकाही या पुस्तकात मिळाल्या आणि माझ्या अनेक प्रश्नांची योग्य ती उत्तरे सुद्धा मला मिळाली...
उदाहरण :-
वेळेचे व्यवस्थापन म्हणजे काय ??
वेळेचे व्यवस्थापन आणि नियोजन कसे करावे ??
कामातली अनावश्यक दिरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष केंद्रीत कसं करावं ?
अतिरिक्त ताणतणाव कमी करून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य संतुलन कसं साधावं ?
प्रभावी नियोजनाच्या साहाय्यानं आपली कार्यक्षमता कशी वाढवावी ?
वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासह अपेक्षित ध्येयपूर्ती कशी साध्य करावी ? '
सर्वांत मोठी पाच उद्दिष्ट ' आणि ' सर्वांत लहान पाच उद्दिष्ट म्हणजे नेमकं काय ?
स्वतःच्या ध्येयापासून न भरकटण्यासाठी या संकल्पनांचा वापर कसा करावा ?
कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्यासाठी आपल्या दैनंदिन कामाचा आणि पर्यायानं आयुष्यातील उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम कसा ठरवावा ?
यशाकडे आत्मविश्वासानं वाटचाल करण्यासाठी उत्तम आणि प्रभावी वेळापत्रक कसं बनवावं ?
D4 फॉर्म्युला आणि 80:20 हा सिद्धांत म्हणजे काय ??
महत्वपूर्ण Exercise कोणते आणि ते कसे करावे ??
इत्यादी अनेक महत्वपूर्ण गोष्टी मला या पुस्तकातून शिकायला मिळाल्या.विवेक बिंद्रा यांनी ज्याप्रकारे छोट्या छोट्या गोष्टी एकदम साध्या आणि सोप्या भाषेत समजून सांगितल्या आहेत जे समजून घ्यायला खूप सोपी जातात.प्रणव कुलकर्णी यांनी अनुवाद सुद्धा एवढा उत्कृष्ट केला आहे की विचारूच नका आपल्याला आपल्या समोर बसून कोणी सोप्या भाषेत समजून देतोय असा भास आपल्याला हे पुस्तक वाचत असताना येतो..मधूश्री प्रकाशनाने एवढ्या छान छान पुस्तकांना मराठीत आणण्याचा जे कार्य सुरू केला आहे तो खरंच उत्कृष्ट असून त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद..
लेखकांनी जाणून घेतलेल्या व आत्मसात केलेल्या ज्या काही अनेकविध संकल्पनांच्या ज्ञानामुळे लेखकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले त्या साऱ्या ज्ञानाची शिदोरी लेखकांनी आपल्यासमोर खुली केली आहे..
या पुस्तकाची अनुक्रमणिका वाचूनच तुम्हाला या पुस्तकात नेमकं काय असेल याची प्रचिती येते.आणि अनुक्रमणिका वाचूनच तुम्ही जाम खुश होता कारणं जे काही प्रश्न आपल्या मनात असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुस्तकात नक्कीच मिळतील याची असलेली खात्री पक्की होते..१५८ पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकातून एकूण ८ भाग आहेत ज्याच्या प्रत्येक भागात आपल्याला काहीतरी नवीन आणि उत्कृष्ट सल्ला,मार्गदर्शन मिळत असतो..या पुस्तकात मला सर्वांत जास्त जर कोणती गोष्ट आवडली असेल तर ती ही की इतर काही पुस्तकाप्रमाणे या पुस्तकात काय करायचं फक्त हेच सांगितलं नसून तर ते कशाप्रकारे करायचं हे सुद्धा एकदम सोप्या उदाहरणासहित सांगितलं आहे...प्रत्येक भागाच्या सुरुवातीला व मध्यभागात ब्रायन ट्रेसी,डेव्हिड थोरो,स्टीफन कोवे,चार्ल्स बक्स्टन इत्यादी अनेक थोर व्यक्तींचे खूपच उत्कृष्ट कोट्स आपल्याला वाचायला मिळतात जे सुरुवातीलाच प्रेरणा देऊन जातात व पुढे नेमकं काय असेल याची कल्पना देऊन जातात..बाकी खाली मी पुस्तकाची अनुक्रमणिका देत आहे जी तुम्हाला हे पुस्तक वाचायला प्रेरीत करेल..
अनुक्रम
१. कमी वेळात कसं करावं जास्तीत जास्त काम ?
उपलब्ध वेळ आणि उद्दिष्टांचं गणित जुळवताना ..
सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेणं फायदेशीरच ! तंदुरूस्त राहण्याचं महत्त्व ' सर्वात मोठी पाच उद्दिष्टं ' आणि " सर्वांत लहान पाच उद्दिष्ट ' म्हणजे काय ? ती कशी ठरवावी ?
२. वेळेचं व्यवस्थापन आणि आपण ! आयुष्यातील उद्दिष्टांचा वेध घेताना प्रभावी नियोजनाची मूलभूत सूत्र प्राधान्यक्रमाचा जादुई मंत्र कामाची टाळाटाळ आणि चालढकल ' टाळणच योग्य ! अडथळ्यांची शर्यत कशी जिंकावी ?
३. आयुष्यात जिंकायचं असेल तर ध्येय ठरवण्यास पर्याय नाही ! तुम्हाला काय आवडेल ? तुमच्या हाती वेळेचं नियंत्रण की वेळेच्या हाती तुमचं ? उद्दिष्ट ठरवण्याचे फायदे वैयक्तिक उद्दिष्टांची आखणी आयुष्यातली दीर्घकालीन उद्दिष्टं ठरवताना ... पाच ध्येय ठरवण्यासाठी मूलभूत ; पण प्रभावी सूत्रं प्रत्येक यश साजरं करायला शिका !
४. प्रभावी नियोजनाच ' नियोजन करताना ... नियोजन म्हणजे नेमकं काय ? वेळ खर्च करू नका ; तो गुंतवा .. नियोजन करण्याचे फायदे नियोजन करण्याचं कौशल्य आणि आपण ! उत्कृष्ट नियोजन करण्याची तंत्र आणि मंत्र
५. वेळेच्या वापराकडे बारकाईनं लक्ष देताना ... ' अॅक्टिव्हिटी डायरी ' म्हणजे काय ? ' अॅक्टिव्हिटी डायरी ' कशी लिहावी ?
६. ध्येयांचा प्राधान्यक्रम साकारताना ... प्राधान्यक्रमाची आवश्यकता योग्य पद्धतीनं प्राधान्यक्रम ठरवण्याचा 40 फॉर्म्युला
७. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे प्राधान्यक्रमाचं व्यवस्थापन ! प्राधान्यक्रम ठरवण्याची विविध तत्रं तुलनात्मक विश्लेषण पद्धती ग्रीड विश्लेषण पद्धती आपल्या गरजेनुसार निवडा प्राधान्यक्रम ठरवण्याचं तंत्र.
८ . सर्वोत्तम कार्यक्षमतेकडे झेप कार्यक्षमता कमी करणारे अडथळे ; त्यांच्यावर मात कशी करावी ? अव्यवस्थितपणाचा ' पसारा ' फोनवरच्या अनावश्यक संभाषणांचा रतीब ! गरजेनुसार नाही म्हणण्यास ' नाकारण्याचा ' स्वभाव कामातली चालढकल कामाचं डोंगराएवढं ओझं आगंतुकांच आगमन इंटरनेट नावाचं ' जाळं ' मल्टिटास्किंगची मोहमाया मीटिंग्स एके मीटिंग्स स्मार्टफोनचा अतिवापर ! प्रशिक्षण पूर्ण : आता प्रत्यक्ष मैदान ! ' द सिक्स वीक चॅलेंज !
©️ Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा