पोस्ट्स

काहूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

काहूर 💜

इमेज
काही दिवसांपूर्वी चेतन दादा लिखित काहूर या आगळ्या वेगळ्या विषयावरील भन्नाट कादंबरीचा अप्रतिम प्रवास संपला होता पण तेव्हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नव्हतो त्यामुळे ग्रुप वर अनुभव शेअर केला नव्हता.. जेव्हा ही कादंबरी वाचून संपवली होती तेव्हा मी एकंदरीत विचारात गुंतलो होतो...कादंबरी समाप्त झाल्यापासून मी जणू काहूरच्या विश्वात जगतोय-वावरतोय. त्यातील पात्र माझ्या नजरेसमोरून जाता जात नाहीत..प्रत्येक पात्राशी मी स्वतःला Relate करतोय जणू का मी सुद्धा त्यातीलच एक भाग आहे अशी प्रचिती मला येत आहे...फोटोफ्रेम पासून सुरू होणारा या कादंबरीचा एकंदरीत प्रवास कॅम्पफायर ला जाऊन संपतो आणि आपल्याला निःशब्द करून सोडतो..या काल्पनिक विकसित केलेल्या जगात आपण वाचत असताना जणू जगतोय असं आपल्याला वाटत राहते.. मी एखादी अप्रतिम भन्नाट भावनिक रोमांचित वेबसिरीजच बघून संपवली असा मला भास होतोय आणि भविष्यात एखादी सुंदर वेबसिरीज या कादंबरीवर १००% निघेल या मला पूर्ण विश्वास आहे...१९६ पृष्ठाची ही कादंबरी आपल्याला कधीही कोठेही जरासं सुद्धा बोअर करत नाही यातच लेखकाचं यश आहे.एकदा हाती घेतल्यावर मुखपृष्ठापासून तर शेवट...