काहूर 💜

काही दिवसांपूर्वी चेतन दादा लिखित काहूर या आगळ्या वेगळ्या विषयावरील भन्नाट कादंबरीचा अप्रतिम प्रवास संपला होता पण तेव्हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नव्हतो त्यामुळे ग्रुप वर अनुभव शेअर केला नव्हता.. जेव्हा ही कादंबरी वाचून संपवली होती तेव्हा मी एकंदरीत विचारात गुंतलो होतो...कादंबरी समाप्त झाल्यापासून मी जणू काहूरच्या विश्वात जगतोय-वावरतोय. त्यातील पात्र माझ्या नजरेसमोरून जाता जात नाहीत..प्रत्येक पात्राशी मी स्वतःला Relate करतोय जणू का मी सुद्धा त्यातीलच एक भाग आहे अशी प्रचिती मला येत आहे...फोटोफ्रेम पासून सुरू होणारा या कादंबरीचा एकंदरीत प्रवास कॅम्पफायर ला जाऊन संपतो आणि आपल्याला निःशब्द करून सोडतो..या काल्पनिक विकसित केलेल्या जगात आपण वाचत असताना जणू जगतोय असं आपल्याला वाटत राहते..

मी एखादी अप्रतिम भन्नाट भावनिक रोमांचित वेबसिरीजच बघून संपवली असा मला भास होतोय आणि भविष्यात एखादी सुंदर वेबसिरीज या कादंबरीवर १००% निघेल या मला पूर्ण विश्वास आहे...१९६ पृष्ठाची ही कादंबरी आपल्याला कधीही कोठेही जरासं सुद्धा बोअर करत नाही यातच लेखकाचं यश आहे.एकदा हाती घेतल्यावर मुखपृष्ठापासून तर शेवटच्या पृष्ठापर्यत वाचून संपवल्यापर्यत खालीच ठेऊच शकत नाही अशी ही एक कादंबरी आहे..प्रत्येक क्षणी आता पुढे काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला लागलेली असते.वाचत असताना पुढचं पेज पलटन्याची आपण घाई करतो एवढं आपण या कादंबरीत गुंतून जातो..
वाचन सुरू केल्यावर जो पर्यत आपण ही कादंबरी वाचून संपवत नाही तोपर्यत दुसऱ्या कोणत्याही गोष्टींत आपलं मन लागत नाही एवढं या कादंबरीचं Hangover आपल्यावर चढत असतो आणि कादंबरी वाचून समाप्त झाल्यानंतर सुद्धा तो अनेक कालावधीसाठी आपल्या मनावर चढलेला असतोच..सिद्धार्थ,अमर,विशाल,गणेश,अनघा,निलेश आणि डॉ.रोहन हे पात्र आपल्या नजरेसमोरून लवकर काही केल्या हटत नाही..कादंबरीचा विषय,स्टोरी ही खूप वेगळी आणि जबरदस्त असून मी आजपर्यंत वाचलेल्या इतर कादंबऱ्यातून ही कादंबरी वेगळी ठरते..ही कादंबरी आपल्याला खूप काही न कळत शिकवुन जाते.नैराश्य किंवा मानसिक आजार कशाप्रकारे वरून धडधाकट दिसणाऱ्या माणसाला आतून खात असतो, त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाला बदलत आणि संपवत जातो.हा आजार आपल्याला समाजात दिसणाऱ्या वावरणाऱ्या अनेकांना असू शकतो.याची लक्षणे लवकरात लवकर ओळखून त्यावर उपचार करायला हवे अन्यथा यातून नैराश्य आणि इतर अनेक मानसिक आजार होऊ शकतात आणि यातून आत्महत्येसारखा टोकाचा पाऊल आपोआप उचल्या जाऊ शकतो.या गंभीर विषयावर ही कादंबरी भाष्य करते आणि आपल्याला विचार करायला भाग पाडते..ही कादंबरी वाचून आपण आपल्या जवळच्या अशा काही विशेष लोकांना समजू शकलो ज्यांना या आजाराची काही लक्षणे आहेत आणि त्यांना जपू शकलो तर या कादंबरीच सार्थक झालं असे लेखक आणि प्रकाशकाला वाटते..
बाकी कादंबरीच्या कथेला मला हाथ लावायचं नाही कारण या कादंबरीबद्दल काहीही लिहणे म्हणजे Spoiler देणे होय.त्यामुळे कादंबरीतील कथेबद्दल मी जाणून बुजून काहीही लिहीत नाही.तुम्ही या कादंबरीच्या प्रवासाला स्वतः जाऊन याचा अनुभव घ्यावा अशी अपेक्षा आहे..तुम्हाला हा प्रवास आवडेल आणि तुम्हाला खूप काही शिकवेल एवढं मात्र मी खात्रीने सांगू शकतो...त्यामुळे सर्वांनी काहूर ही अप्रतिम कादंबरी वाचायला हवीच एवढंच सांगेन...शेवटी लेखकाच्या शब्दातच काहूर बद्दल
"आपलं मन म्हणजे एक समुद्र आहे. या समुद्राच्या मध्यवर्ती रोज हजारो भूकंप होत असतात. त्या भुकंपामुळे तयार झालेल्या लाटा रोज किना -याला येऊन आदळत. या लाटा म्हणजेच आपल्या मनातील भावना ... पण कधीतरी मोठा हादरा बसतो . त्यातून तयार होतो तो त्सुनामी म्हणजेच ह्या भावनांचा उद्रेक..जो सर्व संपवतो....
अशाच वेगवेगळ्या भावनांच मिश्रण आणि उद्रेक यांचा अनुभव देतं तेच "#काहूर...!!

©️ Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼