पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पिवळा पिवळा पाचोळा 💙

इमेज
दोन दिवसांपूर्वी अनिल साबळे यांचा हा अप्रतिम असा कथासंग्रह एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलं. कितीतरी दिवसांनी विशलिस्ट मध्ये समाविष्ट असलेलं हे पुस्तकं वाचायची इच्छा होतीच आणि ती वर्षाच्या शेवटी अखेर पूर्ण झाली.पुस्तक हाती येताच मी ह्या पुस्तकाला सर्वप्रथम निहाळलं.खूप कमी अशी पुस्तके असतात,जी वाचायच्या आधीच वाचक त्याच्या प्रेमात पडतो आणि हा कथासंग्रह त्या मोजक्या पुस्तकांपैकीच एक आहे.कारण या पुस्तकाचं निर्मितीमूल्यचं फार उच्च दर्जाचा असून भन्नाट प्रिंटिंग,हार्डकवरवर असलेला देखणा मुखपृष्ठ, सुंदर बुकमार्क,आतील चित्रं आणि विविध रंगीत पानं व आतमध्ये दिलेले फॉन्टस सर्वकाही भारी जमून आलं आहे.पुस्तकं हातात घेतल्यावर पुस्तकाचं मुखपृष्ठ आपलं विशेष लक्ष वेधून घेतं, तर यातील प्रत्येक कथा वाचकाला एकाच वेगळ्याच विश्वात घेऊन जायचं काम करते. हे पुस्तक वाचत असताना मी पूर्णपणे यामध्ये हरवून गेलो होतो.यातील मुख्य पात्र असलेल्या मुलांच बोट धरून मी त्याच्या सोबत गावशिवार,रान डोंगर हिंडून आल्याचा भास मला झाला.यातील प्रत्येक कथेने मला गुंतवून ठेवलं.एकदा हातात घेतल्यावर सुरुवातीच्या 'घोरपड या कथे...

2022 आणि मी वाचलेली पुस्तके...♥️💙

इमेज
2022 हा वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आयुष्य बदलणारा ठरला.स्वप्नात सुद्धा कधीही विचार न केलेल्या घडामोडी या वर्षी घडल्या.या वर्षाची सुरुवातचं 'स्वप्निल कोल्ते साहित्य पुरस्काराने' झाली तर शेवट हा ' BBC मराठी ' सारख्या प्रतिष्ठित माध्यमावर झटकळण्याने झाला.यामध्ये बारामती साहित्य कट्टा,सुजान साहित्य संमेलन,बुलढाणा आणि एकलव्यच्या वर्कशॉप मध्ये जाऊन वाचनाचे फायदे आणि महत्व पटवून देता आले,तर माझे वाचन अनुभव शेअर करता आले.या वर्षाने एकंदरीत खूप काही चांगलंच दिलं.हर्षल सारख्या जिवलग मित्रांसोबत कधीही न तुटणारी मैत्रीची पक्की बॉंडिंग याच वर्षी झाली, तर पुढे सोबत राहून अनेक नवीन प्लॅन तयार करून We Read पुन्हा नव्याने सुरू करता आला. याच वर्षी असंख्य जिवाभावाच्या माणसांना भेटता,बोलता आलं,वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देता आली,विविध विषयाचा अभ्यास करता आलं,आयुष्यात प्रथमच उच्चशिक्षणासाठी परीक्षा देता आली आणि त्यामध्ये सफल सुद्धा होता आलं आणि महत्वाचं म्हणजे दरवर्षी प्रमाणे म्हणा किंवा त्यापेक्षा जास्त म्हणा यावर्षी सुद्धा चांगली पुस्तके वाचता आली आणि ती जगता आली..🖤💙 त...

महायुग ♥️

इमेज
काही दिवसांपूर्वी एका आगळ्या वेगळ्या प्रवासाला जाऊन आलो.भूतकाळ आणि भविष्य काळात चक्कर मारून आलो असं वाटतंय.काही पुस्तके अशी असतात,जी तुम्हाला घरी बसल्या बसल्या एका वेगळ्याच विश्वाची सफर करून आणत असतात आणि 'महायुग'ही कादंबरी त्यापैकीच एक आहे.या रोचक आणि खिळवून ठेवणाऱ्या कादंबरीने मला एक सुंदर आणि भन्नाट अनुभव दिला,जो सहजासहजी विसरता येणारा नाही.'महायुग' ही कथा फिक्शन फोकलोर म्हणजेचं काल्पनिक पौराणिक दंतकथेवर आधारित आहे.नॉवेला शैलीत मोडणाऱ्या या कादंबरीचा विषय फारच इंटरेस्टिंग असून वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवतं.पौराणिक कथेमधील सत्ययुग,त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग आणि 1987 सालातील दोन युवक ह्यांची सांगड घालून मांडलेली ही काल्पनिक कथा वाचून आपण थक्क होऊन जातो.वाचकाच्या मनावर ताबा घेणाऱ्या या कादंबरीचा कथानक कमालीचा भन्नाट आहे.शेवटपर्यंत कमालीची उत्सुकता ताणून ठेवणाऱ्या या कादंबरीची सहज आणि सोप्पी भाषा या कादंबरीची खासियत आहे,जी कधीही कोठेही वाचकाला बोअर करत नाही.छोट्या छोट्या गोष्टींवर विशेष लक्ष देऊन लेखकांनी वाचकाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिल...

फिन्द्री ♥️

इमेज
सुनीता बोर्डे ताई लिखित 'फिन्द्री' ही कादंबरी वाचली नव्हे तर अनुभवली.एकंदरीत ही अप्रतिम अशी कादंबरी मी जगून आलो आणि सध्या सुद्धा या कादंबरीच्याच सानिध्यात वावरतोय.किमान एक आठवडा तरी लागेल मला यातून बाहेर येण्यासाठी. या प्रवासाने मी समृद्ध झालो,अंतमूर्ख झालो.खूप काही शिकुन तर कितीतरी प्रेरणा घेऊन आलो.फिन्द्रीतील संगीताच्या आईचे म्हणजेच 'मिरुआई'चे बोट धरून स्त्रीचं दुःख जाणून घेत असतानाच प्रचंड महत्वाचा तत्वज्ञान शिकून आलो.या प्रवासात मी पुर्णपणे हरवून गेलो,यामध्ये मला पावलोपावली बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार अनुभवायला मिळाले.यातून कितीतरी पटीने ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली ती शब्दांत मुळीच सांगता येणारी नाही.या प्रवासाने मला पावलोपावली रडवलं,एकंदरीत अंतर्मुख करून आतून विचार करायला भाग पाडलं.जिद्द,मेहनत,इच्छाशक्ती,संघर्ष इत्यादी शब्दाची व्याख्या मला 'मिरुआई' आणि 'संगीच्या' आयुष्याचा खडतर प्रवास वाचून समजली. प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली ही कादंबरी.लेखिकेने ज्याप्रमाणे एका नकोशी असलेल्या मुलीची आणि त्याची आईची दुःख आणि संघर्षपूर्ण असलेली गाथा या कादंबरीतून व...

ज्याच्या हाती पुस्तक ♥️

इमेज
वाचक या नात्याने आपण पुस्तकांचा आतला आवाज हृदयाचे कान करून ऐकू या. निदान दिवसाकाठी एक-दोन पाने वाचण्याचा नियमित वसा घेऊ या. वर्षाकाठी तीन-चार पुस्तके विकत घेऊन वाचू या. आपल्या पाल्यांना पुस्तकांची ओढ लावू या. ग्रंथखरेदीसाठी, ग्रंथवाचनासाठी, ग्रंथाभ्यासासाठी, ग्रंथचर्चेसाठी व ग्रंथभेट देण्यासाठी वेळ राखून ठेवू या.                               ~ जॉर्ज गोन्सालविस🖤 काही दिवसांपूर्वी 'जॉर्ज गोन्सालविस' लिखित "ज्याच्या हाती पुस्तक"हे पुस्तक प्रेमावर लिहलेलं आगळ वेगळं पुस्तक वाचून पूर्ण केलं.अतिशय सुंदर आणि रसाळ भाषेत लिहलेलं,हे पुस्तकं प्रत्येक पुस्तकप्रेमींनी वाचायला व आपल्या संग्रही ठेवायला हवं.हे पुस्तक वाचून माझा पुस्तकांवर प्रेम अजून कितीतरी पटीने वाढलं.पुस्तक आणि वाचनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन मिळाला.पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून तर प्रस्तवानेकडे बघण्याची एक नवीन दृष्टी मिळाली.या पुस्तकात पुस्तक प्रेमावर दिलेल्या कविता मनात घर करून गेल्या.या पुस्तकाचा प्रवासा मला एक अफाट आणि सुंदर अनुभव देऊन गेला. ...

आपल्या लाडक्या पुस्तकांची काळजी नेमकी कशी घ्यावी ?♥️

इमेज
पुस्तकं म्हणजे आपला जीव की प्राण. पुस्तके हेच आपले खरे मित्र आहेत.जशी आपण आपल्या इतर वस्तूंची योग्य ती काळजी घेत असतो, तशीच आपल्याला आपल्या पुस्तकांची सुद्धा घ्यावी लागेल. फक्त पुस्तके संग्रही करून आणि वाचूनच काही फायदा नाही,तर पुस्तकांची योग्य काळजी घेणे हे सुद्धा तेवढेच जरुरीचे आहे असे मला वाटते,म्हणूनच मी एका आईप्रमाणे माझ्या पुस्तकांची काळजी घेत असतो.पुस्तकांना काहीही हानी  पोहोचणार नाही याची मी नेहमी काळजी घेत असतो,कारण येणाऱ्या पिढीच्या हातात मला माझा हा खजिना सुपूर्द करायचा आहे.उद्या मी नसणार पण माझी पुस्तके ही योग्य त्या हातात नक्कीच असतील हा माझा ठाम विश्वास आहे. पुस्तके खरेदी करून वाचण्यात जो आनंद मिळतो,तो इतर कशातच मिळतं नाही हा माझा ठाम मत आहे..पुस्तक संग्रही करून आपला छोटासा तरी एक वयक्तिक ग्रंथालय असावा,हा प्रत्येक पुस्तक प्रेमीचं एक विशेष स्वप्न असतोचं.आपल्या ग्रंथालयात बसून पुस्तके वाचण्यात जो सुकून आहे दुसरा कशातच नाही. प्रत्येक पुस्तक प्रेमी आपला हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी दर्जेदार आणि वाचनीय पुस्तके खरेदी करून संग्रही करत असतो,आणि ती वाचत असतो.आता पुस...

गोष्ट पैशापाण्याची ❤️

इमेज
 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी' ~जगतगुरु तुकोबा 🌿 प्रफुल वानखेडे सर लिखित "गोष्ट पैशापाण्याची" हे अर्थसाक्षरतेवरील 183 पृष्ठसंख्या असलेलं 'बेस्ट सेलर' पुस्तक काही दिवसांपूर्वी एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलं.फक्त वाचलंच नाही तर नेहमीप्रमाणे समजून,उमजून घेऊन यातील "पैशापाण्याच्या महत्वपूर्ण गोष्टी' डोक्यात घट्ट करून घेतल्या,ज्या मला पुढे नक्कीच कामी येतील.कितीतरी किचकट प्रश्नांची सोपी उत्तरे या पुस्तकातून मला मिळाली.खऱ्या अर्थाने मला या पुस्तकाने खूपच जास्त प्रभावित केले,यातील पुस्तकांना,माणुसकीला नेहमी प्राधान्य देणाऱ्या बाबी मला फार जवळच्या वाटल्या.जे विचार आपण सुरुवातीपासूनच Follow करतोय तेच विचार या पुस्तकातून मला वाचायला मिळाले आणि आपण योग्य मार्गावर मार्गक्रमण करतोय ही खात्री पटली. वाचकाला खऱ्या विश्वात नेणारं व वास्तविकतेचे दर्शन करून देणार हे पुस्तकं  मराठी माणसांना अर्थसाक्षरतेचे महत्वपूर्ण धडे देण्याचं काम करतो.पैसे आणि पुस्तके या दोन्हीचे महत्व उलगडून सांगणार हे पुस्तकं प्रत्येकाने वाचायलाच हवे व यावर विचार विमर्...

गढीवरून ❤️

इमेज
2021 साली वाचलेलं शेवटचं एक वाचनीय पुस्तक.वर्षांचा शेवट या अप्रतिम आणि भन्नाट पुस्तकाने झाला याचा फार आनंद आहे.फेसबुक वरील गढीवरून या टायटल खाली येणारे राजा गायकवाड सरांचे लेख फार अप्रतिम असतात. आजच्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या खुसखुशीत, विनोदी,मार्मिक आणि डोळ्यात अंजन घालून जाणाऱ्या या लेखांचा एक मोठा चाहता वर्ग आहे.त्यापैकी मी सुद्धा एक.फेसबुकवर प्रचंड गाजलेल्या याच  लेखांचा एकत्रित संग्रह म्हणजे गढीवरून हे पुस्तक.राजा सरांचे अफलातून लेख एकाच ठिकाणी पुस्तक रूपातून वाचायला मिळणे म्हणजे वाचकांसाठी एक मोठी पर्वणीच होय.जेव्हा गढीवरून नामक कथासंग्रह येतोय याबद्दल माहिती मिळाली तेव्हा प्रचंड आनंद झाला.मुखपृष्ठ बघून तर फार भारी वाटलं.आजपर्यंत फक्त कल्पनेत रंगवलेला तंबूशेट अपेक्षेप्रमाणेच फार आवडून गेला.जेव्हा पुस्तक प्रकाशित झालं तेव्हाच मागवून वाचायचं होतं पण काही कारणाने ते राहूनच गेलं.मग पुढे विशेष मराठी साहित्य संमेलनातून आवर्जून हे पुस्तक मैत्री प्रकाशनाच्या स्टॉलवरून खरेदी केलं आणि ते सुद्धा दस्तरखुद्द राजा गायकवाड सरांच्या सहीसोबत.जेव्हा तो आनंद झाला तो मी व्यक्त करू शकत ना...