2022 आणि मी वाचलेली पुस्तके...♥️💙



2022 हा वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आयुष्य बदलणारा ठरला.स्वप्नात सुद्धा कधीही विचार न केलेल्या घडामोडी या वर्षी घडल्या.या वर्षाची सुरुवातचं 'स्वप्निल कोल्ते साहित्य पुरस्काराने' झाली तर शेवट हा ' BBC मराठी ' सारख्या प्रतिष्ठित माध्यमावर झटकळण्याने झाला.यामध्ये बारामती साहित्य कट्टा,सुजान साहित्य संमेलन,बुलढाणा आणि एकलव्यच्या वर्कशॉप मध्ये जाऊन वाचनाचे फायदे आणि महत्व पटवून देता आले,तर माझे वाचन अनुभव शेअर करता आले.या वर्षाने एकंदरीत खूप काही चांगलंच दिलं.हर्षल सारख्या जिवलग मित्रांसोबत कधीही न तुटणारी मैत्रीची पक्की बॉंडिंग याच वर्षी झाली, तर पुढे सोबत राहून अनेक नवीन प्लॅन तयार करून We Read पुन्हा नव्याने सुरू करता आला.

याच वर्षी असंख्य जिवाभावाच्या माणसांना भेटता,बोलता आलं,वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देता आली,विविध विषयाचा अभ्यास करता आलं,आयुष्यात प्रथमच उच्चशिक्षणासाठी परीक्षा देता आली आणि त्यामध्ये सफल सुद्धा होता आलं आणि महत्वाचं म्हणजे दरवर्षी प्रमाणे म्हणा किंवा त्यापेक्षा जास्त म्हणा यावर्षी सुद्धा चांगली पुस्तके वाचता आली आणि ती जगता आली..🖤💙

तर यावर्षी सर्वकाही सांभाळून
 मी वाचलेली पुस्तके..💙🥰

1)भुरा - शरद बाविस्कर
2)मी अलबर्ट एलिस -डॉ.अंजली जोशी 
3)वाट तुडवताना -उत्तम कांबळे
4)घाचर कोचर -विवेक शानभाग
5)डिप्रेशन -अच्युत गोडबोले
6)मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा (अनुवाद)-डेल कार्नेजी
7)पाडस (अनुवाद)-मार्जोरी किनन रॉलिंग्स 
8)एक होता कार्व्हर -वीणा गवाणकर (2nd Reading)
9)1984 -जॉर्ज आर्व्हल
10)अरण्यकांड -अनंत मनोहर
11)वॉल्डन (अनुवाद)-हेन्री डेव्हिड थोरो (4th Reading)
14)ऍनिमल फार्म -जॉर्ज आर्व्हल
15)शहीद भगतसिंग यांची जेल डायरी - शहीद भगतसिंग
16)मानवजातीची कथा -हेन्री थॉमस
17)हा,यह मुमकीन हैं (अनुवाद) -तारू जिंदल
18)द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फक
19)माचीवरला बुधा - गो.नि. दांडेकर (2nd Reading)
20)गौतम बुद्ध चरित्र -केळुसकर गुरुजी (2nd Reading)
21)काळे करडे स्ट्रोकस -प्रणव सखदेव
22)नर्मदे हर हर -जगन्नाथ कुंटे 
23)नाझी भस्मासुराचा उध्वस्त -वि.ग कानिटकर
24)वपुर्झा- वपु.काळे
25)मऱ्हाटा -पातशाह -केतन पुरी (2nd Reading)
26)महानायक -विश्वास पाटील (2nd reading)
27)तू भ्रमत आहासी वाया -वपु.काळे
38)पार्टनर- वपु.काळे
28)सिद्धार्थ - हरमन हेसे
29)फिडेल चे आणि क्रांती -अरुण साधू
30)हमीद -पु.ल देशपांडे
32))टू द लास्ट बुलेट- विनिता कामटे 
33)महात्म्याची अखेर - जगन फडणीस
34)गंगेमध्ये गगन वितळले
35) इकिगाई (अनुवाद) -फ्रान्सिस मिरेलस , हेक्टर गार्सिया 
36)अमृतवेल -वि.एस.खांडेकर
37)मजबुती का नाम गांधी -चंद्रकांत झटाले
39)शेकरा -रणजित देसाई
40)बहुत दूर कितना दूर होता हैं ? -मानव कौल (हिंदी)
41)माझा रशियाचा प्रवास - अण्णाभाऊ साठे
42)चौंडक -राजन गवस
43)प्रकाशवाटा -प्रकाश आमटे
44)टेड टॉक्स 
45)गांधी का मरत नाही ?-चंद्रकांत वानखेडे
46)आवरण (अनुवाद) -आर.एस भैरप्पा
47)खंडोबा - नितीन थोरात 
48)अरण्याचे अंतरंग -नितीन धामणकर
49)सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध -आ. ह साळुंखे(2nd)
50)अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट -आनंद विंगकर 
52)उचल्या -लक्ष्मण गायकवाड
53)तोत्तोचान (अनुवाद) -तेत्सुको कुरोयानागी
54)उष्ट -ओमप्रकाश वाल्मिकी
55)एमटी आयवा मारू -अनंत सामंत 
56)गोठण्यातल्या गोष्टी -हृषीकेश गुप्ते
57)अर्थसाक्षर व्हा - अभिजित कोलपकर
58)पावनखिंड -रणजित देसाई
59)व्यक्ती आणि वल्ली -पु.ल देशपांडे (2nd Reading)
60)वोल्गा ते गंगा (अनुवाद) -राहुल सांकृत्यायन
61)वाचणाऱ्याची रोजनिशी -सतीश काळसेकर
62)माझे प्रेमाचे प्रयोग - अमित मरकड दादा
63)द दा विंची कोड (अनुवाद )- डॅन ब्राऊन
64)एका कोळियाने (अनुवाद) -पुलं. देशपांडे
65)साखळीचे स्वातंत्र्य -गौरव सोमवंशी (2nd)
66)मोटारसायकल डायरीज -चे गवेरा
67)मनकल्लोळ भाग 1 (महत्वाचं) -अच्युत गोडबोले/निलांबर जोशी
68)इजिप्सी -रवि वाळेकर (भन्नाट♥️)
69)मनकल्लोळ  भाग 2 - अच्युत गोडबोले/निलांबर जोशी
70)डियर तुकोबा -विनायक होगाडे
71)द ओल्ड मॅन अँड द सी -हेमिंग्वे 
72)अक्षरदान दिवाळी अंक(गावोगावच्या जत्रा विशेष )
73)या सत्तेत जीव रमत नाही -नामदेव ढसाळ
74)लक्षणीय 51 - डॉ.अंजली जोशी
75)ज्याची हाती पुस्तक -जॉन फर्नांडिस (खूप खूप सुंदर पुस्तक ♥️)
76)चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून -डॉ.आ.ह साळुंखे
77)कोरलाईन - नील गेमन (अनुवादित)
78)सर्पतज्ञ रेमंड डिटमार्स -वीणा गवाणकर
79)कंट्या -गणेश बर्गे
80)वाचत सुटलो त्याची गोष्ट - निरंजन घाटे 
81)5960 आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा -Emanuel Vincent Sander
82)रारंग ढांग -प्रभाकर पेंढारकर
83)प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स -उज्जवला सहाणे
84)प्रतिभेच्या प्रतिमा -प्रतिभा भिडे
85)मी अंजना शिंदे -विशाल शिंदे
86)एका जंगलाची कथा -राजेंद्र ठोंबरे
87)फिन्द्री -सुनीता बोर्डे
88)जंगलाची डायरी -अतुल धामणकर
89)कास्ट मॅटर्स -सूरज एगंडे 
90)अंबालक्ष्मी -नितीन थोरात
91)महायुग -नितीन सोनवडकर
92)देवदासी आणि नग्नपूजा -उत्तम कांबळे
93)शिकार ते शेती -ह.अ भावे
94)द फ्री व्हाईस -रवीश् कुमार
95)पहिला नंबरकारी -अमिता नायडू
96)जैत रे जैत -गो.नी दांडेकर
97)मेड इन इंडिया - पुरुषोत्तम बोरकर(2nd)
98)पूर्णिया -अनिल अवचट
99)शेअर बाजार -रविंद देसाई
100)गोष्ट पैशापाण्याची -प्रफुल वानखेडे
101)पिवळा पिवळा पाचोळा -अनिल साबळे
 https://www.facebook.com/BooksWithMoin येथे वाचू शकता...🌱

©️Moin Humanist 🔥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼