महायुग ♥️


काही दिवसांपूर्वी एका आगळ्या वेगळ्या प्रवासाला जाऊन आलो.भूतकाळ आणि भविष्य काळात चक्कर मारून आलो असं वाटतंय.काही पुस्तके अशी असतात,जी तुम्हाला घरी बसल्या बसल्या एका वेगळ्याच विश्वाची सफर करून आणत असतात आणि 'महायुग'ही कादंबरी त्यापैकीच एक आहे.या रोचक आणि खिळवून ठेवणाऱ्या कादंबरीने मला एक सुंदर आणि भन्नाट अनुभव दिला,जो सहजासहजी विसरता येणारा नाही.'महायुग' ही कथा फिक्शन फोकलोर म्हणजेचं काल्पनिक पौराणिक दंतकथेवर आधारित आहे.नॉवेला शैलीत मोडणाऱ्या या कादंबरीचा विषय फारच इंटरेस्टिंग असून वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवतं.पौराणिक कथेमधील सत्ययुग,त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग आणि 1987 सालातील दोन युवक ह्यांची सांगड घालून मांडलेली ही काल्पनिक कथा वाचून आपण थक्क होऊन जातो.वाचकाच्या मनावर ताबा घेणाऱ्या या कादंबरीचा कथानक कमालीचा भन्नाट आहे.शेवटपर्यंत कमालीची उत्सुकता ताणून ठेवणाऱ्या या कादंबरीची सहज आणि सोप्पी भाषा या कादंबरीची खासियत आहे,जी कधीही कोठेही वाचकाला बोअर करत नाही.छोट्या छोट्या गोष्टींवर विशेष लक्ष देऊन लेखकांनी वाचकाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली आहे.
पौराणिक कथेला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन गुंफलेली ही कथा खूपच वाचनीय झाली आहे.

आजपर्यंत पौराणिक दंतकथा आपण ऐकत आणि वाचत आलोय,पण कधी खरंच त्या काळात आपण 'समय यात्रा' करून आपल्या डोळ्यांनी ते बघून आणि अनुभवून आलो तर ?उदाहरण; आपण आजपर्यंत महाभारत आणि रामायण वाचली ,ऐकली आणि टीव्हीवर बघितली आहे.पण खरंच कधी आपण भविष्यात टाईम ट्रॅव्हलिंग करून त्या भूतकाळात गेलो आणि ते जग अनुभवून आलो तर ? तेव्हा खरंच आपल्या मनाची अवस्था काय असेल ?विचार करूनच भारी वाटतं ना ?तर सेम याच कन्सेप्टवर ही कादंबरी आधारित असून, जी आपल्याला हा अनुभव देऊन जाते.सत्ययुग,त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग या चार युगाची सफर घडवून आणते,तर भविष्यकाळात इ.स 3200 मध्ये सुद्धा घेऊन जाते.हे सर्वकाही वाचताना लेखकांच्या कल्पनाशक्ती आणि अभ्यासाचा हेवा वाटतो.ज्यापद्धतीने लेखकांनी ही कथा गुंफली आहे ती खरंच खूप काही शिकवून जाते.यामधील भविष्याचं विदारक चित्रं वाचताना फारच विचित्र वाटतं आणि दुःख होतो.जरी हे सर्वकाही काल्पनिक असलं तरी सध्या मानवाच्या हाताने निसर्गाचा होणारा भयानक नुकसान बघता हा चित्र भविष्यात खरा होईल यामध्ये काही शंका वाटतं नाही.

साल 1987 मुंबईत राहणारे आणि सामान्य जीवन जगणारे दोन युवक. विष्णुपुराणातील चार युगांच्या कडीत सापडतात आणि त्यांचं आयुष्य हे एका स्रोताद्वारे वेगळ्याचं अविश्वसनीय जगाला जाऊन भिडतं .विष्णुपुराणातील उल्लेखाप्रमाणे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग.हे चार युग मिळून एक 'महायुग' निर्मिती होते.ह्याचं महायुगाच्या केंद्रबिंदूत हे दोन युवक अशा प्रकारे विलीन होतात की त्यांची श्रद्धा हया जगाच्या अत्युच्च शिखरावर जाऊन पोहचते आणि त्यांचा तसेचं ह्या 'महायुग' पर्वाचा शेवट एकचं ठरतो. काल्पनिक जगाची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगळी आहे;पण एखाद्याला हेचं काल्पनिक जग वयक्तिक आयुष्यात अनुभवायला मिळालं तर त्याची काय गफलत होईल? ती व्यक्ती त्या काल्पनिक जगात रमेल का त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल? त्यातून बाहेर पडणं खरंच एवढ सोप्प असलं तर ठिक;पण ते जर अभिमन्यूच्या चक्रव्यूहापेक्षा शंभर पटीने कठीण निघालं तर..?

इत्यादी असंख्य वेगवेगळ्या प्रश्नांची
 उत्तरे मिळवण्यासाठी नक्की नक्की वाचा..🖤

लेखक म्हणतात :- कृपया हि कथा कोणतीही वैचारिक, धार्मिक किंवा सामाजिक चौकट नं बांधता केवळं मनोरंजन म्हणून वाचावी.🌿

©️Moin Humanist🖤
मी वाचलेली पुस्तके ♥️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼