शेअर बाजार जुगार ?छे, बुद्धिबळाचा डाव ! 😎

मी जेव्हा Scam 1992 ही हर्षद मेहतावरील वेबसिरिज बघितली तेव्हा "शेअर बाजार " ही नेमकी काय भानगड आहे ?हे थोडंफार समजलं होतं.पूर्वी हर्षद मेहता आणि त्याने केलेल्या स्कॅम बद्दल वाचलेलं होतच.पण तेव्हा ह्या "शेअर बाजारबद्दल " कधी जास्त माहिती करून घेण्याचं प्रयत्न केलं नव्हतं.पण ही सिरीज बघून आपल्याला याबद्दल आयडिया असायला हवी.कुठल्याही गोष्टीचं असलेलं ज्ञान कधीही वाया जात नाही हे ठरवून याबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली.युट्यूब वरील काही व्हिडिओस बघून थोडं फार समजलं पण मला एकदम बेसिक पासून हे सर्वकाही समजून घ्यायचं असल्याने मी वेगवेगळे पर्याय शोधायला सुरुवात केली.युट्युब, Udemy वगैरे होतेच पण मला जवळचा पर्याय हवा होता.आता आपल्या सर्वांत जवळचा आणि विश्वासू पर्याय म्हणजे पुस्तकंच ते सुद्धा आपल्या माय मराठीतील.❤️ मग काय मराठीत उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांचा शोध घेतला आणि त्यापैकी हे एक पुस्तक निवडलं आणि वाचून काढलं.फक्त वाचलंच नाही तर समजून-उमजून घेऊन त्यावर अभ्यास केला.या पुस्तकातून माझ्या मनात असलेले शेअर बाजारासंबंधित सर्वकाही प्रश्नांची उत्तरे मला अगदी सो...