5960आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा 💙
काही दिवसांपूर्वी Emanuel Vincent Sander दादाचं 5960 हे नवकोरं कथासंग्रह वाचून पूर्ण केलं.अनेक दिवसांपासून काहीतरी वेगळं आणि चाकोरी बाहेरचं वाचायचं होतं.आणि
अशातच हे पुस्तक प्रकाशित झालं.लेखकांच्या काही वेगवेगळ्या कथा त्यांच्या ब्लॉगवर वाचल्या असल्याने या पुस्तकांत नक्कीचं काहीतरी वेगळं आणि भन्नाट असेल याची खात्री होती.पुस्तकाचं नाव आणि मुखपृष्ठ बघूनच पुस्तक वाचायचं ठरवलं.वाचकाला स्वतःचं भान हरवून लावून एक वेगळ्याच फँटसी च्या विश्वात नेणाऱ्या या कथा डोकं सुन्न करतात..वाचताना आपण या विश्वात राहत नसून फॅन्टसी/कल्पनेच्या एका दुसऱ्याच विश्वात/काळात जाऊन आल्याची फीलिंग येते.यातील प्रत्येक कथा वाचत असताना धक्क्यावर धक्का मिळत राहतो.आपण विचार सुद्धा करू शकत नाही असा एक आगळावेगळा ट्विस्ट यातील प्रत्येक कथेत जाणवतो.वाचून पूर्ण केल्यावर काहीतरी Different वाचलंय याचा आनंद मिळतो तर गणेश मतकरी आपल्या प्रस्तावनेत म्हणतात ते अगदी पटून जातो.
ते म्हणतात :-
या कथांचा उगम जरी भयात असला, तरी या कथाचक्राचा अंतिम हेतू भयनिर्मिती नाही.अनेक विक्षिप्त , चमत्कृतीपूर्ण कल्पनांना एकत्र जोडत विविध साहित्यप्रकाराच्या आधारांसह हा प्रवास पुढे चालला आहे.या सर्व कथांमधून सलग कथानक तयार होत नसलं,तरीही त्या एका कथाचक्राचा भाग आहेत असं म्हणता येईल .हे कथाचक्र या एका पुस्तकात मावणारं नाही,त्याचा खरा आकार त्यापलीकडे पसरला असल्याचं आपल्याला जाणवू शकतं , आणि ते लक्षात घेतलं ,तर या कथासंग्रहाला ' Work in Progress ' असं म्हणता येईल..
लेखकांची कल्पनाशक्ती बेजोड आहे.त्यांनी प्रत्येक कथेत वापरलेली फॅन्टसी वाचायला फार मजा येते.आपल्याला आयडिया असते की हे कधीही घडलेलं नाही किंवा हे सर्वकाही काल्पनिक आहे.पण तरीही आपण शेवटपर्यंत यातील वेगवेगळ्या कथेशी गुंतून राहतो.जे वाचत असताना आपल्याला आजूबाजूचा भान राहत नाही.आपण या कथेचा एक हिस्सा बनून जातो.सर्वकाही आपल्यासमोर घडतंय असा भास आपल्याला होतो.आणि आपण सुद्धा ते एन्जॉय करतो.एकूण 8 कथा आणि 168 पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकाने माझं एकंदरीत जबरदस्त मनोरंजन केलं.
इतर काही साहित्यप्रकारांबरोबरच , फँटसी , हा असाच वाळीत टाकण्यात आलेला प्रकार. मराठी बालसाहित्यात त्याचं अस्तित्व ढोबळपणे जाणवतं , पण प्रौढांसाठी लिहिलेल्या साहित्यात त्याला जागा अशी नाहीच . गेल्या काही वर्षात "मार्केज ते मुराकामी" आणि त्यांच्या आजूबाजूचे काही महत्वाचे आंतरराष्ट्रीय लेखक , यांच्या साहित्याला आपल्याकडे येत गेलेल्या प्रतिष्ठेने वास्तव आणि फॅन्टसी या दोन्हीमधले काही घटक घेणारा मॅजिक रिअलिझम आपल्याकडे थोडाफार प्रवेश करून राहिला आहे .आणि त्या निमित्ताने का होईना , पण वास्तवाची चौकट पूर्ण निकालात न काढताही त्या चौकटीपलीकडलं काहीबाही आपल्याकडे येऊ पहातय . इमॅन्यूएल व्हिन्सेंट सँडरचा ' 5960 ' हा संग्रह , अशा चौकटीपलीकडल्या साहित्याशीच नातं सांगतो..
गणेश मतकरी यांनी आपल्या प्रस्तवानेत वरील पॅरा तंतोतंत खरं आणि पटणारं आहे.मराठी साहित्यात हा प्रकार आतापर्यंत तरी वाचनात,ऐकण्यात आलेलं नाही.जे.के रोलिंगच्या हॅरी पॉटर सारखं काल्पनिक विश्वाच कथन मराठी साहित्यात वाचायला मिळायला हवं.त्यासाठी हे असलं वेगळ्या धाटणीतलं लिखाण होणं गरजेचं आहे.
emuneal दादाचं हा प्रयोग मराठी साहित्यात नव्यानेच होतोय असं म्हणावं लागेल.आणि या प्रयोगाला सहकार्य आणि जोरदार पाठिंबा देणे आपलं कर्तव्य असणारं आहे.बाकी विशेष प्रौढासाठी असल्याने या पुस्तकात कथेतील प्रसंगाला अनुसरून त्या त्या ठिकाणी अश्लील शब्द आणि शिव्यांचा वापर केलेला आहे.
हे वेगळं सांगायला नको..
तर एक वेगळा प्रयोग मराठी साहित्यात होतोय.त्याच स्वागत करूया.आणि नवीन पुस्तकांना,लेखकांना प्राधान्य देऊया..
©Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा