पूर्णिया ❤️
अनिल अवचट हे माझ्या आवडीच्या लेखकाच्या यादीतील अग्रणी लेखक आहेत. त्यांनी लिहलेलं सर्वकाही मला आवर्जून वाचायचं आहे.त्यांच्या लेखणीत एक प्रकारची जणू जादू आहे जी वाचकांवर एक प्रकारची मोहिनी घालत असते.त्यांनी लिहलेलं प्रत्येक पुस्तक एक वेगळ्या विषयावरचं आणि धाटनीतील असतं. जे वाचतं असताना कोठेही कंटाळा येत नाही.अतिशय ग्राउंड लेव्हल वर जाऊन समोर जो चित्र दिसेल तो जशाच तसच "आंखों देखा हाल " लिहिणारा हा लेखक खरंच थोर होता.माणसं,मोर,रिपोर्टिंगचे दिवस,लाकूड कोरताना,वनात..जनात,वाघ्या मुरळी,वेध,शिकविले ज्यांनी,संभ्रम,,सुनंदाला आठवताना,स्वतःविषयी,सृष्टी-दृष्टी हमीद इत्यादी इत्यादी त्यांच प्रत्येक पुस्तक हे अफलातून असतं. ज्यातून काहीतरी भारी शिकायला मिळायची गॅरंटी फिक्स असते.
सर्वप्रथम "शिकविले ज्यांनी" हा त्यांचा कथा/लेख संग्रह वाचून मी त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडलो होतो.सुरुवातीला हेन्री डेव्हीड थोरो बद्दल विशेष माहिती मला त्यांच्या या पुस्तकातुन मला मिळाली होती.तेव्हापासून हा लेखक मला अधिकच जवळचा वाटू लागला आहे.या वर्षाच्या सुरुवातीलाच जेव्हा ते गेले तेव्हा मनापासून वाईट वाटलं.त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांचा माझा अनुभव मला त्यांना कळवायचं होतं.
असो ।
तर मागे काही दिवसापूर्वी अनिल अवचट सरांचा पहिलं पुस्तक रूपातलं अपत्य 'पुर्निया' हे छोटंस पुस्तक हाती लागलं.जे 1969 साली प्रकाशित झालं होतं.अवघ्या 66 पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात लेखकांनी बिहार राज्यातील पुर्निया या जिल्ह्यातील विदारक परिस्थितीच वर्णन केलेलं आहे.दुष्काळ असताना लेखक तेथे गेले होते.त्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं.त्यांना तेथे आलेले तेथील अनुभव व तेथे त्यांनी बघितलेलं,अनुभवलेलं सर्वकाही या पुस्तकात थोडक्यात मांडलेलं आहे.जे वाचत असताना अस्वस्थ व्हायला होतं.बिहारची व तेथील लोकांची दुःखद करूण कहाणी आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते.आजपर्यंत नकाशात बघितलेल्या बिहारमधील खरी हकीकत या पुस्तकातून कळायला मदत होते.
अनिल अवचट म्हणतात :-
ही नुसती बिहारची हकीकत नाही . सगळ्या उत्तर भारताची , खरं तर आपणा सगळ्यांची आहे . काही करता येईल का ? निसर्ग आणि गरीब यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य करता येईल का ? यांचा विकास झाला , तरच देशाचा विकास झाला , असं म्हणूयात का आपण ? शहराकडे बावणारे असहाय माणसांचे लोंढे हे प्रगतीचे लक्षण मानायचे की कसले ? हे सगळे प्रश्न या पुस्तकाने माझ्यासमोर उभे केले . ते या पिढीला वाचकांपुढेही उभे राहिले , तर मी समजेन , चला , अजून आशेला जागा आहे .
©️Moin Humanist ✍️
मी वाचलेली पुस्तके 😘
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा