पोस्ट्स

वाचनाची सवय कशी लावावी? वाचन का करावं? आणि वाचनाचे फायदे काय? 💖💙

इमेज
आजच्या जगात वेळ असतो पण शांती नसते, मोबाईल असतो पण संवाद नसतो, शाळा असतात पण खरं शिक्षण हरवत चाललंय. या सगळ्या गोंधळात, एक साधं, शांत पण परिवर्तनशील उत्तर आहे नि ते म्हणजेच वाचन. पुस्तक हे फक्त 200-300 पानांचं वस्त्र नसतं, ते एक आयुष्य असतं. कुणीतरी जगलेलं, अनुभवलं नि प्रेमानं लिहून ठेवलंलेलं. आपण त्या आयुष्याशी जोडले जातो. पण अनेक जण म्हणतात की – मला वाचायची इच्छा होते, पण जमत नाही. मग प्रश्न पडतो की, वाचनाची सवय लावायची तरी कशी? तर माझ्या अनुभवाने उत्तर देतो .🌱 सुरुवात ही कायम लहानच असते. दिवसाला फक्त 10-15 मिनिटं एका छोट्याश्या पुस्तकासोबत घालवा. कधीही वेळ मिळाला नाही, असं होणार नाही. वेळ काढावा लागतो. जेवताना, बसमध्ये, झोपायच्या आधी कुठलीही 5-10 मिनिटं फोनऐवजी पुस्तकासोबत घालवा. सुरुवातीला पानं कमी समजतील, लक्ष विचलित होईल पण चिकाटी ठेवली तर ही सवय हळूहळू आपलं जगच बदलून टाकते. सुरुवातीला सोपं नि आपल्या आवडीचं वाचा. पौराणिक कथा, बालसाहित्य, थरारक गोष्टी, आत्मचरित्र, विज्ञानविषयक पुस्तकं… जे मनाला भिडेल ते निवडा. वाचन ही स्पर्धा नाही तर एक सुंदर मैत्री आहे. मोबाईलवर e-book, पीडीएफ व...

द सिक्रेट 💙🌱

इमेज
कधी असं वाटतं का की आपण कितीही मेहनत केली तरी गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत? आपण मनातून जे वाटतं, तेच सगळं आपल्या आयुष्यात घडत असतं, हे खरं खूप उशिरा उमगतं. Rhonda Byrne ह्या लेखिकेचं The Secret हे पुस्तक याच विचारांचं एक सोपं नि खोल जाणीव देणारं पुस्तक आहे. यामध्ये ‘Law of Attraction’ – म्हणजेच आपण जसं विचार करतो, तशा गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात या संकल्पनेवर खूप सहज नि मनापासून लिहिलं आहे. आपण जर सतत नकारात्मक विचार करत राहिलो ‘माझं काही होणार नाही, मी Failure आहे,’सगळं अवघड आहे वगैरे, तर जग सुद्धा आपल्याला तसंच वागवतं. पण जर आपण मनातून म्हणालो मी यशस्वी होणार, माझं स्वप्न पूर्ण होणार, चांगल्या गोष्टी माझ्या वाट्याला येणारच तर विश्वसुद्धा तसंच घडवून आणायला लागतं.  मी हे पुस्तक लॉकडाऊन काळात मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत वाचलं होतं. खूप प्रश्न होते, भीती होती, पुढचं काहीच स्पष्ट नव्हतं. पण हे पुस्तक वाचताना असा एक शांत विश्वास निर्माण झाला की, आपण जे रोज मनात ठेवतो तेच हळूहळू आपल्या आयुष्यात उमटतं. यात काही जादू नाही, पण विचारांची ताकद आहे. पुस्तकात खूप साध्या उद...

उसवण…🦋❤️

इमेज
‘उसवण’ ही देवीदास सौदागर यांची लहानशी पण फार मोठं काही सांगून जाणारी कादंबरी. मी ती प्रकाशित होताच वाचली होती नि त्यानंतर जेव्हा या कादंबरीला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा एकदा पुन्हा वाचली होती,पण वेळेअभावी तेव्हा याबद्दल माझा अनुभव लिहू शकलो नसल्याने आज लिहितोय जेणेकरून अजूनपर्यंत ज्यांनी वाचली नसेल ते ते वाचतील . जेव्हा मी ही 116 पेजेस असलेली कादंबरी वाचली तेव्हा सुरुवातीला वाटलं, साधीशी कहाणी असेल गावातल्या एका शिंपीची पण जसजसं पुढे जात गेलो, तसतसं हे पुस्तक माझ्या मनात खोल रुतत गेलं. विठू शिंपी नि त्याच्या छोट्याशा कुटुंबाची ही गोष्ट पण ही गोष्ट फक्त त्यांच्या घरापुरती राहात नाही तर ती आपल्याला संपूर्ण समाजाचं वास्तव दाखवून जाते. विठू हा एक साधा कष्टकरी गावात बसून गिऱ्हाईकाच्या अंगात फिटणारे कपडे शिवणारा माणूस. त्याचा व्यवसाय म्हणजे त्याचं जगणं. पण जसजसं रेडिमेड कपड्यांचं प्रमाण वाढत जातं तसतसं त्याचं काम कमी होत जातं. अन् इथून सुरू होते ‘उसवण’ म्हणजे आयुष्याची शिवलेली गोधडी तुटायला लागते. विठूची बायको गंगा, मुलगी नंदा नि मुलगा सुभाष हेही त्याच्याबरोबर या ...

रिच डॅड पुअर डॅड...🥰🌼

इमेज
अखेर हे पुस्तक मी पुन्हा दुसऱ्यांदा वाचलं नि यावेळी ते मला अधिक खोलवर समजलं. पहिल्यांदा वाचताना त्यातील काही गोष्टी नवीन वाटल्या होत्या पण दुसऱ्यांदा वाचताना प्रत्येक कल्पना जास्त स्पष्ट, समजण्यासारखी अन् थेट मनाला भिडणारी वाटली. लहान वयातच पैशांबद्दल योग्य समज असावी यासाठी हे पुस्तक फार उपयुक्त आहे. या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी सांगतात की त्यांचे दोन वडील होते एक ‘शिकलेले’ पण गरीब वडील (Poor Dad), जे कायम म्हणायचे की चांगलं शिक, चांगली नोकरी कर म्हणजे आयुष्य सुरक्षित होईल. नि दुसरे होते ‘बिजनेस’ वडील (Rich Dad), जे खूप शिकलेले नव्हते, पण पैसा नि गुंतवणूक याबद्दल शहाणे होते. या दोघांच्या विचारांमध्ये खूप फरक होता व लेखकाने लहानपणापासूनच या दोघांकडून वेगवेगळ्या शिकवणी घेतल्या. त्यामुळेच हे पुस्तक केवळ आर्थिक सल्ला देत नाही, तर आपल्याला विचार करण्याची नवी दिशा देते. या पुस्तकात लेखक सांगतो की गरीब नि मध्यमवर्गीय लोक नेहमी पैसा कमावण्यासाठी काम करतात पण श्रीमंत लोक पैसे त्यांच्या साठी काम करायला शिकतात. हे वाक्य ऐकायला साधं वाटेल, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. याचा अर्थ असा की, नुसते नो...

स्वतःचा शोध 🌸😊

इमेज
ओशो यांचं स्वतःचा शोध”हे पुस्तक मी नेहमी चाळत असतो नि प्रत्येक वेळी ते मला नव्याने उमजतं.💖 ओशो म्हणजे खूप वेगळे विचार सांगणारे एक मोठे गुरु . त्यांनी नेहमी सांगितलं की “तुम्ही स्वतःला ओळखा”, म्हणजेच आपण कोण आहोत, आपलं मन काय म्हणतंय, आपल्याला काय हवं आहे  हे समजून घ्या. हे पुस्तक वाचताना असं वाटतं की त्यांनी आपणांसाठीच हे सर्वकाही लिहिलंय. त्यांनी खूप साध्या शब्दांत खूप मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आपण रोज खूप गोष्टींबद्दल विचार करतो, पण स्वतःबद्दल फारसा विचार करत नाही. हे पुस्तक आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतं. आपण मनाने खूप व्यस्त असतो मोबाईल, टीव्ही, अभ्यास, स्पर्धा… पण थोडा वेळ शांत बसून स्वतःशी बोलणं खूप महत्वाचं असतं. हेच ओशो सांगतात. हे पुस्तक वाचताना एकदम शांत वाटतं. त्यांचे विचार असे आहेत की, आपल्याला वेगळ्या प्रकारे विचार करायला शिकवतात. ते सांगतात सत्य शोधा, पण ते कोणीतरी दुसऱ्याने सांगितलेलं नसावं, ते स्वतः अनुभवलेलं असावं.म्हणजेच आपल्याला गोष्टी अनुभवून समजून घ्यायच्या असतात, फक्त ऐकून किंवा वाचून नाही. हे पुस्तक म्हणजे एका शांत ज...

स्वतःचा शोध 🌸😊

इमेज
ओशो यांचं स्वतःचा शोध”हे पुस्तक मी नेहमी चाळत असतो नि प्रत्येक वेळी ते मला नव्याने उमजतं.💖 ओशो म्हणजे खूप वेगळे विचार सांगणारे एक मोठे गुरु . त्यांनी नेहमी सांगितलं की “तुम्ही स्वतःला ओळखा”, म्हणजेच आपण कोण आहोत, आपलं मन काय म्हणतंय, आपल्याला काय हवं आहे  हे समजून घ्या. हे पुस्तक वाचताना असं वाटतं की त्यांनी आपणांसाठीच हे सर्वकाही लिहिलंय. त्यांनी खूप साध्या शब्दांत खूप मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आपण रोज खूप गोष्टींबद्दल विचार करतो, पण स्वतःबद्दल फारसा विचार करत नाही. हे पुस्तक आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतं. आपण मनाने खूप व्यस्त असतो मोबाईल, टीव्ही, अभ्यास, स्पर्धा… पण थोडा वेळ शांत बसून स्वतःशी बोलणं खूप महत्वाचं असतं. हेच ओशो सांगतात. हे पुस्तक वाचताना एकदम शांत वाटतं. त्यांचे विचार असे आहेत की, आपल्याला वेगळ्या प्रकारे विचार करायला शिकवतात. ते सांगतात सत्य शोधा, पण ते कोणीतरी दुसऱ्याने सांगितलेलं नसावं, ते स्वतः अनुभवलेलं असावं.म्हणजेच आपल्याला गोष्टी अनुभवून समजून घ्यायच्या असतात, फक्त ऐकून किंवा वाचून नाही. हे पुस्तक म्हणजे एका शांत ज...

अरण्यकांड ....🌱🍂

इमेज
आज अनंत मनोहर सरांना जाऊन चार वर्षे झाली त्यांना भावपूर्ण आदरांजली.🌼💐 माझा एक ठाम विश्वास आहे की आपण पुस्तकं निवडत नाही तर पुस्तकं आपल्याला निवडतात. माझ्याबरोबर हे अनेक वेळा घडलं आहे. कधी आपण ठरवतो की हे पुस्तक वाचायचं, पण आपल्यासमोर काहीतरी वेगळंच येतं नि त्या पुस्तकात आपण हरवून जातो. ‘अरण्यकांड’ या कादंबरीबाबत असंच काहीसं घडलं. 2021 साली अनंत मनोहर सरांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या नावाबद्दल फारशी माहिती नव्हती. पण काही लेख वाचून त्यांच्या बद्दल कुतूहल निर्माण झालं. त्यांचं साहित्य मी वाचन यादीत टाकलं. मागे पुण्यात एका पुस्तकदालनात ‘अरण्यकांड’ दिसली, अनंत मनोहर यांचं नाव पाहून ती लगेच घेतली. वाचायला सुरुवात केली नि सुरुवातीला फक्त चाळायचं म्हणत घेतलेलं पुस्तक अक्षरशः मनात घर करून गेलं. जेव्हा वाचन पूर्ण झालं, तेव्हा असं वाटलं की एक विलक्षण प्रवास नुकताच संपला. ‘अरण्यकांड’ एक जिवंत अनुभव आहे. या कादंबरीत निसर्ग हा खरा नायक आहे. जंगलातील झाडं, वेली, गवत, प्राणी, पक्षी हे सगळं लेखकाने ज्या प्रकारे जिवंत केलं आहे, ते थक्क करणारं आहे. जंगलात रोज चालणारा संघर्ष, तग धरून रा...