स्वतःचा शोध 🌸😊
ओशो यांचं स्वतःचा शोध”हे पुस्तक मी नेहमी चाळत असतो नि प्रत्येक वेळी ते मला नव्याने उमजतं.💖
ओशो म्हणजे खूप वेगळे विचार सांगणारे एक मोठे गुरु . त्यांनी नेहमी सांगितलं की “तुम्ही स्वतःला ओळखा”, म्हणजेच आपण कोण आहोत, आपलं मन काय म्हणतंय, आपल्याला काय हवं आहे हे समजून घ्या. हे पुस्तक वाचताना असं वाटतं की त्यांनी आपणांसाठीच हे सर्वकाही लिहिलंय. त्यांनी खूप साध्या शब्दांत खूप मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आपण रोज खूप गोष्टींबद्दल विचार करतो, पण स्वतःबद्दल फारसा विचार करत नाही. हे पुस्तक आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतं. आपण मनाने खूप व्यस्त असतो मोबाईल, टीव्ही, अभ्यास, स्पर्धा… पण थोडा वेळ शांत बसून स्वतःशी बोलणं खूप महत्वाचं असतं. हेच ओशो सांगतात.
हे पुस्तक वाचताना एकदम शांत वाटतं. त्यांचे विचार असे आहेत की, आपल्याला वेगळ्या प्रकारे विचार करायला शिकवतात. ते सांगतात सत्य शोधा, पण ते कोणीतरी दुसऱ्याने सांगितलेलं नसावं, ते स्वतः अनुभवलेलं असावं.म्हणजेच आपल्याला गोष्टी अनुभवून समजून घ्यायच्या असतात, फक्त ऐकून किंवा वाचून नाही. हे पुस्तक म्हणजे एका शांत जागेत बसून स्वतःच्या मनात डोकावण्यासारखं आहे.
ओशो म्हणतात की प्रत्येक माणूस वेगळा आहे. कुणाशी तुलना करू नका. आपली वाट स्वतः तयार करा. ही खूप साधी गोष्ट वाटते, पण ती खरंच मनाला स्पर्शून जाते. त्यांनी असेही सांगितलंय की माणूस जेव्हा खरा आनंदी होतो, तो तेव्हाच जेव्हा तो स्वतःला समजून घेतो.
ओशोंनी खूप आधीपासून या गोष्टी सांगितल्या आहेत, पण त्या आजसुद्धा तितक्याच उपयोगी आहेत. त्यांनी धर्म, समाज, भीती या सगळ्या गोष्टींपलीकडे जाऊन माणूस ‘स्वतः’ म्हणून कसा जगू शकतो, हे शिकवलं आहे.
जर तुम्ही तुमच्याबद्दल थोडं समजून घ्यायचं ठरवलं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा. यात खूप सुंदर विचार आहेत जे फक्त वाचायला नाही, तर आयुष्यात अनुभवायला हवेत.
❤️ आवर्जून वाचा.
©️ Moin Humanist 💚
टीप :- हे पुस्तक घरपोच सवलतीत मिळवण्यासाठी We Read ला संपर्क करू शकता. 9518398168 किंवा https://wa.me/7066495828 या व्हाट्सअप्प नंबर वर पुस्तकाचं नाव नि आपला पत्ता पाठवा...🌼❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा