पोस्ट्स

Egypt लेबलसह पोस्ट दाखवत आहे

इजिप्तचे_पिरॅमिड :-आदमी वक्त से डरता हैं और वक्त पिरॅमिड से डरता हैं !! 💙

इमेज
इजिप्त आणि पिरॅमिड हा एक समीकरण बनलेला आहे.इजिप्त म्हटलं तर पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात ते भव्य पिरॅमिड.जगातील सर्वात रहस्यमयी वास्तू कोणती असेल तर ती वास्तू इजिप्तमध्ये असलेले पिरॅमिड आहेत जे अनेक वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण बनलेले आहे..हे पिरॅमिड जितके भव्य आणि विलक्षण आहेत तेवढेच याबद्दल असलेले कुतूहल आणि रहस्य सुद्धा कमालीचे विलक्षण आहे..आजपासून सुमारे ४०००-४५०० वर्षापूर्वी बांधले गेलेले हे पिरॅमिड आजसुद्धा स्वतःमध्ये खूप सारे रहस्य दडवून बसलेले आहेत ज्यांचा उलगडा अजूनही झालेला नाही.इजिप्तमध्ये पिरॅमिडला "मेर " म्हणतात पिरॅमिड हा शब्द ग्रीक शब्द पिरॅमिस या शब्दावरून रूढ झाला आहे याचा अर्थ गव्हाचा केक असा होतो पिरॅमिडचा आकार हा केकच्या तुकड्यासारखा असल्याने याला असे म्हणत असावे..ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोऱ्यात प्राचीन इजिप्त संस्कृती वसलेली होती.. साधारणपणे इ.स.पू. ३१५० च्या सुमारास पहिल्या फॅरोने (राजाने) उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते. पुढील ३,००० वर्षे याचा विकास होत गेला.या दरम्यान अनेक वंशाच्या फ़ॅरोनी (राजा)...