इजिप्तचे_पिरॅमिड :-आदमी वक्त से डरता हैं और वक्त पिरॅमिड से डरता हैं !! 💙
इजिप्त आणि पिरॅमिड हा एक समीकरण बनलेला आहे.इजिप्त म्हटलं तर पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात ते भव्य पिरॅमिड.जगातील सर्वात रहस्यमयी वास्तू कोणती असेल तर ती वास्तू इजिप्तमध्ये असलेले पिरॅमिड आहेत जे अनेक वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण बनलेले आहे..हे पिरॅमिड जितके भव्य आणि विलक्षण आहेत तेवढेच याबद्दल असलेले कुतूहल आणि रहस्य सुद्धा कमालीचे विलक्षण आहे..आजपासून सुमारे ४०००-४५०० वर्षापूर्वी बांधले गेलेले हे पिरॅमिड आजसुद्धा स्वतःमध्ये खूप सारे रहस्य दडवून बसलेले आहेत ज्यांचा उलगडा अजूनही झालेला नाही.इजिप्तमध्ये पिरॅमिडला "मेर " म्हणतात पिरॅमिड हा शब्द ग्रीक शब्द पिरॅमिस या शब्दावरून रूढ झाला आहे याचा अर्थ गव्हाचा केक असा होतो पिरॅमिडचा आकार हा केकच्या तुकड्यासारखा असल्याने याला असे म्हणत असावे..ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोऱ्यात प्राचीन इजिप्त संस्कृती वसलेली होती.. साधारणपणे इ.स.पू. ३१५० च्या सुमारास पहिल्या फॅरोने (राजाने) उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते. पुढील ३,००० वर्षे याचा विकास होत गेला.या दरम्यान अनेक वंशाच्या फ़ॅरोनी (राजा) सत्ता धारण केली.. रोमन साम्राज्याने शेवटच्या फॅरोचा पराभव करून इजिप्तला आपला एक प्रांत करून घेतले.खोदकाम, बांधकाम, शेती यात प्रावीण्य मिळवलेली आणि स्थिर समाजरचना असलेली ही संस्कृती होती. ओझायरिस या मृत्यूच्या देवते शिवाय जवळपास दोन हजार देवतांची पूजा प्राचीन इजिप्तमध्ये केली जात होती. देवाच्या सेवेसाठी पुरोहित नेमलेले होते. मृत्यूनंतर मनुष्य वेगळ्या लोकात जातो तेथे त्याला नव्याने मिळणारे आयुष्य चिरंतन असते , असा प्राचीन इजिप्शियनांचा ठाम विश्वास होता..
इजिप्शियन संस्कृती मध्ये तेथील राजा स्वतःला फ़ॅरो म्हणजे सम्राट म्हणून घ्यायचा. त्याकाळी #मेंफिस इजिप्तची प्राचीन राजधानी होती. आत्मा शरीरा शिवाय राहू शकत नाही या समजुतीमुळे पिरॅमिडे बांधण्याची कल्पना रूढ झाली होती. बहुतेक फेअरोंनी (राजांनी) आपल्या मृत्यूनंतर आपल्या शवाची व्यवस्था व्हावी, म्हणून पिरॅमिडे बांधली आहेत व साहजिकच राजा-राणीची शरीरे ममीच्या स्वरूपात पिरॅमिडांमध्ये जतन करुन ठेवण्यात आली होती व यांच्यासोबत खाद्य, पेय पदार्थ, वस्त्रे,आभूषणे/दागिने, भांडी, वाद्य यंत्र, शस्त्र, जनावर आणि नौकर आणि नौकरांनी यांना सुद्धा दफन केल्याचा पुरावे आढळले आहेत कारण इजिप्शियनांच्या मते मृत्यू ही जीवनाची सुरुवात होती.मृत्यूनंतर फ़ॅरोच्या शवाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला ममीचे स्वरूप दिल्या जात असे.शवाला खराब होण्यावाचून वाचवण्यासाठी सर्वात प्रथम एक विशेष लेप पूर्ण मृत शरीरावर लावून त्याला पांढऱ्या कपड्याने बांधले जात असे आणि नंतर त्याला शवपेटीत ठेऊन दफन केल्या जात होते आणि यासाठीच पिरॅमिड बनवले गेले आहेत असा काही जणांचा मत आहे.
इजिप्त मध्ये सर्वात जुना आणि प्राचीन पिरॅमिड कैरोजवळ सकारा येथे बांधला गेला असून तो झोसर या तिसऱ्या वंशातील फ़ॅरोने इ. स. पू. २८०० च्या सुमारास बांधले होते त्याला झोसरचा पिरॅमिड किंवा स्टेप पिरॅमिड असेही म्हटल्या जाते.यानंतर येथील चौथ्या वंशातील खुफू, कॅफ्रे व मेंकूरे या तिन्ही फ़ॅरोनी वेगवेगळ्या कालखंडात गीझा येथे पिरॅमिड बांधले.यापैकी खुफु फ़ॅरोने बांधलेला पिरॅमिड हा प्राचीन ७ आश्चर्यापैकी व आजपर्यंत टिकलेल्या प्राचीन वास्तुपैकी एक आहे याला गीझाचा पिरॅमिड किंवा खुफुचा पिरॅमिड असेही म्हणतात.या सर्व पिरॅमिडच्या बांधकामात गणिताचा भाग फार मोठा आहे.उत्कृष्ट वास्तुशास्त्र आणि बेहतरीन शिल्पशास्त्राचा उत्तम नमुना इजिप्तचे हे भव्य पिरॅमिड होय.सुंदर रस्ते, इजिप्शियन चित्रलिपी, वास्तुशिल्पे, स्फिंक्स्, अबू सिम्बल आणि लक्झरची मंदिरे इत्यादी बरंच काही पाहताना/वाचताना आपण हैराण होतो.आजपर्यत इजिप्त/मिस्त्र मध्ये १३८ पिरॅमिडाचा शोध लागलेला आहे पण गीझा येथील असलेले ३ पिरॅमिड हे सर्वात प्रसिद्ध आहेत..
या पिरॅमिड बद्दल विचार केल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात ज्याची उत्तरे आज कोणालाही ठाऊक नाहीत किंवा व्यवस्थित कोणीही या प्रश्नांची उत्तरे देऊच शकत नाही.
हे पिरॅमिड नेमके का व कोणी बांधले ?? तेव्हा एवढे तंत्रज्ञान प्रगत नसून सुद्धा कश्याप्रकारे बांधले असतील ??याच जागेवर का बांधले असतील ??२ ते ३०टन वजनाचे एकएक असे २० ते २५ लाख ग्रॕनाइटचे दगड दूरवरून नाइल नदी मधून वाहून आणून, चौकोनी घडवून एकमेकांवर कसे चढवले असतील ?? खरंच २३ वर्षात हे पिरॅमिड बांधून पूर्ण झाले असतील का ??पिरॅमिड खरंच मानवांनी बांधले होते का की परग्रहावरील अंतराळातील लोकांनी ??पिरॅमिड उभारण्याच्या तंत्रातील गणित,भूभगशास्त्र,खगोलशास्त्र याबाबतचे ज्ञान त्यांना कुठून आले होते ?? इत्यादी इत्यादी असंख्य प्रश्न आज जगासमोर उभे आहेत ज्याची उत्तर सध्यातरी कोणाजवळच नाही..
तर चला आता आपण या लेखात गीझा येथील पिरॅमिड आणि त्याबद्दल असलेल्या तथ्याबद्दल जाणून घेऊया .........✍️
१)खुफुचा किंवा गीझाचा ग्रेट पिरॅमिड :- गीझाचा भव्य पिरॅमिड हा गीझा शहराच्या पश्चिम दिशेला ८ किमी अंतरावर असलेल्या ३ पिरॅमिड्सपैकी सर्वांत जुना व सर्वांत मोठा पिरॅमिड आहे व पुरातन काळातील सात आश्चर्यांपैकी अस्तित्वात असलेले हे एकमेव आश्चर्य आहे..हा पिरॅमिड इ.स. पूर्व २५६० साली खुफु या फ़ॅरोने बांधला होता व येथेच इजिप्तच्या चौथ्या घराण्यातील फ़ॅरो खुफुची कबर आहे. या ग्रेट पिरॅमिडचा वजन ५७ लाख ५० हजार टन एवढा असून हा पिरॅमिड बनवण्यासाठी २३ लाख दगडांचा वापर केला गेला होता व त्या एक एक दगडाचा वजन २७०० किलो पासून तर ७० हजार किलो पर्यत एवढा होता..हा पिरॅमिड जेव्हा बनवला गेला तेव्हा त्याची उंची ४८१ फूट एवढी होती पण शेकडो वर्षानंतर बदल्या वातावरणात, पाणी,तुफान,भूकंप इत्यादी कारणामुळे या पिरॅमिडची उंची वरच्या भागातून २६ फूट एवढी ढासळली आहे त्यामुळे सध्या या पिरॅमिड ची उंची फक्त ४५५ फूट एवढी आहे..३८०० वर्षापर्यत हा ग्रेट पिरॅमिड मानवनिर्मित सर्वात उंच स्मारक होता पण इ.स १३११ मध्ये लंडन येथे ४८२ फुुुुुटाचा लिंकन गीरजा घर बनल्यामुुळे ग्रेेेट पिरॅमिडचा हा रिकॉर्ड तुटला होता.
२)खाफ्रेचा पिरॅमिड :-हा पिरॅमिड खुफुचा मुलगा खाफ्रे याने आपल्या कबरीच्या रूपात बनविला होता.या पिरॅमिडची उंची ४४८ फूट एवढी आहे.
हा गीझा येथील दुसऱ्या क्रमांकाचा पिरॅमिड असून याच पिरॅमिडच्या समोर स्त्रीचे डोके असणारी व सिंहाचे शरीर असलेली अतिभव्य प्रसिद्ध पाषाणमूर्ती स्फिंक्स
आहे.काही जणांच्यामते या मूर्तीचा चेहरा राजा खाफ्रेच्या चेहऱ्याला दर्शवत असतो.ही मूर्ती ६६.३१ फूट असून २४० फूट लांबी असलेली आहे.
३)मेनकायरचा पिरॅमिड :-हा पिरॅमिड खाफ्रेचा उत्तराधिकारी असलेल्या मेनकायर याच्या कबरीच्या रुपात बनवलेला आहे.२१३ फूट एवढी उंची असलेला हा गीझा येथील सर्वात लहान पिरॅमिड आहे..या पिरॅमिडला १२ व्या शतकाच्या शेवटी गुर्दीश सुल्तान अल अजिस याने नष्ट करण्याचं प्रयत्न केले होते पण ८ महिने प्रयत्न करून सुद्धा त्याच्या हाती काहीच आलं नसल्याने त्याने शेवटी हार मानली होती.मेणकायरच्या पिरॅमिडवर एक मोठा गड्डा या आक्रमणाची साक्ष आज पर्यत देत आहे..
टीप-लेख फार मोठा असल्याने या लेखाचे २ भाग केले आहे त्यामुळे बाकीचे काही फॅक्ट पुढील लेखात जाणून घेऊया...
संदर्भ :-पृथ्वीवर माणूस उपराच,देव छे !!,National Geographic,Wikipedia आणि काही Youtube चॅनेल...✍️
©️ Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा