अॅनिमल फार्म 💜
जॉर्ज ऑर्वेल यांची बहुचर्चित आणि गाजलेली कादंबरी "अॅनिमल फार्म "👍 दोन दिवसांपूर्वी वाचून पूर्ण केली आणि एकंदरीत या कादंबरीच्या प्रेमात पडलो.मनापासून विचार करायला भाग पाडणाऱ्या या कादंबरीबद्दल जेवढं ऐकलं,वाचलं होतं त्याप्रमाणेच ही कादंबरी उत्कृष्ट आहे.१९४५ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी खरंच आजच्या काळात सुद्धा तेवढीच प्रासंगिक आहे. अभिजात कलाकृतींचे हेच वैशिष्ट्य आहे की ते बदलत्या काळ आणि संदर्भानुसार नवे अर्थ घेऊन यांची प्रासंगिकता टिकवून ठेवते.आणि वेगवेगळ्या काळात ती अधिक अर्थपूर्णही बनते. अॅनिमल फार्म सुद्धा ही एक अशीच कलाकृती आहे.. या कादंबरीला टाईम मॅगझिनने इंग्रजी भाषेतील 100 सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक म्हणून निवडले (1923 ते 2005) आणि मॉडर्न लायब्ररीच्या 20 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट कादंबर्यांच्या यादीत ३१ व्या स्थानावर तर बीबीसीच्या द बिग रीड सर्वेक्षणात 46 व्या क्रमांकावर आहे ही कादंबरी आहे. यासोबतच 1996 मध्ये पूर्वलक्षी ह्यूगो पुरस्कार जिंकला आहेत आणि एकूण पाश्चात्य जगाच्या निवडीतील उत्कृष्ट पुस्तकांपैकी एक ही कादंबरी आहे.. ही कादंबरी व्यंगा...