पोस्ट्स

फकिरा मराठी पुस्तकं अनुभव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फकिरा ♥️

इमेज
काही दिवसांपूर्वी 'अण्णाभाऊ साठे'यांच्या अजरामर लेखणीतून निर्माण झालेली 'फकिरा'ही कादंबरी चौथ्यांदा वाचून पूर्ण केली नि त्या कादंबरीचाच एक भाग झालो.ही कादंबरी मी वाचली नाही तर अक्षरशः जगून नि अनुभवून आलो.अण्णाभाऊ नि त्यांच्या लिखाणाला खरंच तोड नाही.'वाचावं नि फक्त वाचतचं जावं असं अफाट साहित्य त्यांनी मराठी साहित्याला दिलं आहे जे वर्षानुवर्षे वाचकांच्या हृदयात फिट्ट असेल. 35 कादंबऱ्या,13 कथासंग्रह,8 पटकथा,1 प्रवासवर्णन,3 नाटके,10 पोवाडे व 14 लोकनाट्ये आणि 12 उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ दर्जेदार लिखाण करून आपल्या समाजाला आरसा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे.आपल्या साहित्यातून त्यांनी उपेक्षित समाजाचं संघर्षमय जीवन वाचकांसमोर मांडला असून पावलोपावली शोषणाविरुद्ध आवाज त्यांनी उठवला आहे. फकिरा ही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली अप्रतिम अशी कादंबरी आहे.'1959 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला 1961 मध्ये 'महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार' मिळाला असून अण्णाभाऊंनी  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंझार लेखणीस' ही कादंबरी अर्पण केली आहे. वि. स. खांडेक...