न पाठवलेलं पत्र....! ❤️
दोन दिवसांपूर्वी कितीतरी दिवसांनी विशलिस्ट मध्ये असलेलं हे पुस्तक अखेर वाचून पूर्ण केलं नि त्यामध्येच हरवून गेलो. मी हे पुस्तक अजूनपर्यंत का वाचलं नाही, या गोष्टीचा मला पश्चात्ताप झाला. पूर्वीच कधी मी हे पुस्तक वाचलं असतं तर ज्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात मला काही काळ त्रास सहन करावा लागला तो लागला नसता.'ज्या दुःखद अवस्थेतून मला जावे लागले त्या अवस्थेत कदाचित मी गेलोच नसतो.असं माझं मत झालं. हे पुस्तकं मला किती आवडलं अन् भावलं हे मी शब्दांत सांगू शकतं नाही.या पुस्तकाच्या प्रत्येक पानांतून मी खूप काही शिकून आलो नि आता ते सर्वकाही आयुष्यात उतरवण्याचं प्रयत्न करणार आहे.या पुस्तकाने मला जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन दिला.'वेगवेगळ्या गोष्टीकडे बघण्याचा नजरिया पूर्णपणे बदलून टाकलं.'ज्या छोट्या छोट्या गोष्टीकडे कधी विशेष लक्ष दिलं नव्हतं त्या विविध गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला नि विचार करायला भाग मला या पुस्तकाने पाडले. माझ्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या या पुस्तकाचं नाव आहे 'Unposted Letter' याचं मराठी अनुवाद 'न पाठवलेलं पत्र' य...