न पाठवलेलं पत्र....! ❤️
दोन दिवसांपूर्वी कितीतरी दिवसांनी विशलिस्ट मध्ये असलेलं हे पुस्तक अखेर वाचून पूर्ण केलं नि त्यामध्येच हरवून गेलो.
मी हे पुस्तक अजूनपर्यंत का वाचलं नाही, या गोष्टीचा मला पश्चात्ताप झाला. पूर्वीच कधी मी हे पुस्तक वाचलं असतं तर ज्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात मला काही काळ त्रास सहन करावा लागला तो लागला नसता.'ज्या दुःखद अवस्थेतून मला जावे लागले त्या अवस्थेत कदाचित मी गेलोच नसतो.असं माझं मत झालं.
हे पुस्तकं मला किती आवडलं अन् भावलं हे मी शब्दांत सांगू शकतं नाही.या पुस्तकाच्या प्रत्येक पानांतून मी खूप काही शिकून आलो नि आता ते सर्वकाही आयुष्यात उतरवण्याचं प्रयत्न करणार आहे.या पुस्तकाने मला जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन दिला.'वेगवेगळ्या गोष्टीकडे बघण्याचा नजरिया पूर्णपणे बदलून टाकलं.'ज्या छोट्या छोट्या गोष्टीकडे कधी विशेष लक्ष दिलं नव्हतं त्या विविध गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला नि विचार करायला भाग मला या पुस्तकाने पाडले.
माझ्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या या पुस्तकाचं नाव आहे 'Unposted Letter' याचं मराठी अनुवाद
'न पाठवलेलं पत्र' या नावाने आलेलं असून 'महात्रया रा'या लेखकाने हे अप्रतिम नि सुंदर असं पुस्तकं लिहिलं आहे. 188 पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात लेखकांना वाचकांनी विचारलेल्या एकूण 45 प्रश्नांची उत्तरे लेखकांनी दिली आहेत जी फार महत्वपूर्ण नि उत्कृष्ट आहेत.'प्रत्येक उत्तरातून आपल्याला एकेक तत्वज्ञान मिळतं जातो जो वेगळ्या पद्धतीने विचार करायला नि वेगळ्या दृष्टीकोनातून बघायला प्रेरीत करतो.आपल्या मानवी मनाला पडणाऱ्या असंख्य विविध प्रश्नांची अर्थपूर्ण उत्तरे आपल्याला लेखक 'महात्रया' देतात.
ह्या पुस्तकाद्वारे लेखक वाचकाच्या मनात नि अंत:करणात शिरून मनाचा ठाव घेतात.मानवी मनाच्या विविध भावनांवर लेखक भाष्य करतात नि आपल्याला बरंच काही देऊन जातात.जे आपल्याला आयुष्य जगताना खूप उपयोगी पडेल.'कोणतेही पान उघडा नि वाचा त्या पानांवर आपल्याला जीवनाशी निगडित तत्त्वज्ञान तर मनात आलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतो.
'आज' हा त्याचा तुम्हाला उपहार आहे.'
या पहिल्या उत्तरापासून सुरू होणारा हा आयुष्याला कलाटणी देणारा प्रवास कधी
'परिवर्तनावर लक्ष ठेवलं आणि ते पुरेसा काळ टिकवलं तर संस्कृती निर्माण होते..!
या उत्तरावर येऊन समाप्त होतो हे आपल्याला कळतं सुद्धा नाही.शेवटपर्यंत पूर्णपणे आपण या पुस्तकात हरवून जातो.जणू आपण लेखकासोबत संवाद साधतोय असं आपल्याला वाटून जातं.'आपण आपल्या मनाला भेडसावणारा प्रश्न विचारावं अन् लेखकांनी त्या प्रश्नाचं सुंदर नि हृदयाला स्पर्श करून जाणारा अर्थपूर्ण उत्तर द्यावं' असंच हे पुस्तक आहे.
खरंच ! हे पुस्तकं वाचताना अक्षरशः लेखकासोबत संवाद करून आल्याची भावनाच मनात उत्पन्न होते.एकदा वाचून ठेऊन देण्यासारखं हे पुस्तकं अजिबात नाही.'वेळोवेळी हे पुस्तकं हातात घ्यावं नि वेगवेगळ्या परिस्थितीत असताना हे पुस्तक वाचावं.दरवेळी आयुष्याला नवीन आयाम हे पुस्तक देऊन जाईल एवढं नक्की...!
तसं तर हे संपूर्ण पुस्तकचं हायलाईट करून ठेवण्यासारखं आहे,पण तरीही मला आवडलेले निवडक विचार इथे शेअर करतोय जे तुम्हाला हे पुस्तक वाचायला प्रेरीत करेन...!
1)भावनिक आरोग्याचं रहस्य काय, तर ज्या व्यक्तीनं आपल्याला दुखावलं असेल, तर जेव्हा दुखवलं असेल तेव्हा त्या व्यक्तीला आपण दुखावलं गेल्याचं सांगणं.. नाहीतर ही अपूर्ण चक्रं भविष्यात पुन्हा केव्हातरी उमटतील आणि तुमच्या चांगल्या काळाचाही नाश करतील.
2)आपण उत्तर बनू शकलो नाही, तरी किमान सांत्वना बनू शकतो. आपण मदत भले नाही करू शकलो, तरी इजा निदान पोचवायला नको. आपण प्रश्न सोडवू शकलो नाही - हरकत नाही, निदान प्रश्न निर्माण करायला नको. आपण गतिवर्धक बनू शकलो नाही, तरी गतिरोधक नक्कीच बनायला नको.
3)अखेर भाग्य म्हणजे तरी काय? ज्या संधी तुमच्या बाजूनं जात असतात - त्यांच्यातला आणि त्या साधण्याच्या तुमच्या जागरूकतेमधला मीलनबिंदू.
4))आपण अगदी शेवटच्या माणसाबद्दलसुद्धा सहानुभाव बाळगू या. दुसऱ्याच्या डोळ्यांतले अश्रू पाहून आपल्याही डोळ्यांत थोडंसं चुरचुरू दे. आपण अलिप्तपणा टाकून देऊ. त्यामुळे जगात काही परिवर्तन घडेल. आपण आपली भूमिका पार पाडू शकू.
5)आपली प्रगल्भता आपल्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अनुभवाच्या एक टप्पा खालीच असते.
6)आपण कितीही ज्ञानवंत असलो किंवा आपण कितीही आयुष्य पाहिलं असलं किंवा आपल्या क्षेत्रात आपण सर्वोत्तम असलो - आपण अगदी आयुष्याचा ज्ञानकोष असलो तरी त्याला महत्त्व नसतं. कोणतातरी धक्का, कुठलातरी - उतार, कोणतीतरी ठेच... वळणावर कायम उभी असतात. चालू असलेला ओघ, आयुष्य अकस्मात अडवतं. ठीकठाक चाललेली लय बिघडवतं.
7)आयुष्य मृत्यू लांबणीवर टाकू शकणार नाही. त्यामुळे आयुष्य लांबणीवर नको टाकायला.
8)एखादी गोष्ट जर केव्हातरी करायला हवीच असेल तर ती आजच करून ताण टाळू का नये ? जर एखादी गोष्ट करण्याची अधिक चांगली पद्धत अस्तित्वात असेल, तर पाय ओढत राहण्यापेक्षा ती इतरांच्या आधी स्वीकारून अग्रेसर राहण्याचा आनंद का लुटू नये? एखादी गोष्ट वाईट असेल तर तिचा त्याग आजच का करू नये? नवीन वर्ष सुरू होण्याची वाट का पाहायची? एक दिवससुद्धा कशासाठी थांबायचं?
9)निर्भयपणानं जगणं म्हणजेच जगणं.
तुमच्यापाशी लपवण्यासारखं काही नसतं, तेव्हा तुमच्यापाशी टाळण्यासारखंही काही नसतं.
खरं स्वातंत्र्य पारदर्शक जगण्यामधेच लाभतं.
माणूस स्वत:ची सर्वात चांगली भलावण करू शकतो ती हे जाहीर करून : "मी म्हणजे उघडं पुस्तक आहे.
10)आपला हेतू कितीही उदात्त असला, तरी कधीकधी इतरांना - विशेषत: त्यांनी न मागता, अनाहूत सल्ला दिला तर ते अवमानकारक वाटतं आणि सन्मानाच्या - वागणुकीची गरज मार्गदर्शनाच्या गरजेपेक्षा जास्त महत्त्वाची असते.
©️Moin Humanist🌱❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा