पोस्ट्स

दलित साहित्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उपरा 💜

इमेज
लक्ष्मण माने लिखित उपरा हे दलित साहित्यात मोडणारे हृदयस्पर्शी पुस्तक जेव्हा दुसऱ्यांदा वाचलं तेव्हा हे पुस्तक पुन्हा नव्याने उमजले...काही अशा भयानक बाबी लक्षात आल्या ज्या पहिल्या वाचनात आल्या नव्हत्या.. शेकडो वर्षे बिऱ्हाड आपल्या पाठीवर घेऊन पोटासाठी गावोगावी फिरणाऱ्या मंडळीच दुःख आणि त्यांच्या समस्या आपल्या समोर या पुस्तकांमधून येत असतात...लेखकांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलेलं आहे..जात-धर्म,जातीवाद,अंधश्रद्धा,रूढी-परंपरा,उच-नीच,गरिबी,आंतरजातीय विवाह,महिलांसोबत आपली वागणूक ,जात-पंचायती मधी चालणारे ते न्यायनिवाडे इत्यादी ..हे पुस्तक वाचत असताना माझे किती वेळा डोळे पाणावले असतील हे मी शब्दात सांगू शकत नाही .पुस्तक वाचत असताना आपल्या मनामध्ये खूप वेदना होत असतात समाजाची चिड येते आणि समाजाकडे बघण्याचा एकंदरीत दृष्टिकोन बदलतो..वाचत असताना आपण सुद्धा याचाच एक भाग आहोत आणि या लोकांकडे कानाडोळा करून चालणार नाही याची प्रचिती मला आली.आज जरी एवढी भयानक परिस्थिती नसली तरीही जेव्हा सुद्धा पाठीवर आपला बिऱ्हाड घेऊन फिरणारी ही लोकं मला दिसतील तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्...