पोस्ट्स

थोरो लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वॉल्डनकाठी विचार विहार 💜

इमेज
हेन्री डेव्हीड थोरो म्हणजे निव्वळ थोर आणि अफलातून माणूस हा माझा ठाम मत आहे.माझे गुरू.निसर्ग,पर्यावरणाच्या बाबतीत त्यांच्या विचारांचा मी जबरदस्त चाहता आणि त्यांचा डायहार्ड फॅन आहे. सर्वात प्रथम जर कोण्या विचारवंताने निसर्ग/पर्यावरणाचा विचार केला असेल आणि आपल्या विचारांवर अंमल केला असेल तर तो आपल्या थोरो गुरुजींनीच.२ वर्ष २ महिने २ दिवस कंकाॅर्डजवळच्या वॉल्डन नामक तळ्याकाठी जंगल/रानात एकट्याने वास्तव्य करून तेथे त्यांनी काय केले,कोणता व्यवसाय केला,त्यांना एकटेपणा वाटला नाही का ?? इत्यादी काही कुतूहल असलेल्या प्रश्नाचे उत्तरे त्यांनी वॉल्डन या पुस्तकात दिले आहे.आपले तेथील अनुभव सांगता सांगताच जीवनातील अनेक समस्यांविषयीचे आपले विचारही त्यांनी या पुस्तकात व्यक्त केले आहेत जे वाचून आपण विचारांच्या चक्रात गुंतून गेल्याशिवाय राहत नाही. आपल्या रानात राहायला जाण्याबद्दल थोरो गुरूजी म्हणतात, 'मी रानात राहायला गेलो तो अशासाठी, की जीवन हेतुपुरःसर जगावे, जीवनाच्या मूलभूत तथ्यांना सामोरे जावे, जे इतरांना शिकवायचे ते आपल्या स्वतःला शिकता येते की नाही ते पाहावे, आणि मरतेवेळी आपण जगलोच न...

केपकॉड 💜

इमेज
सुरुवातीला जेव्हा मला थोरो गुरुजींच्या बद्दल माहिती हवी होती तेव्हा इंटरनेट वर विशेष अशी काहीही माहिती मराठीत उपलब्ध नव्हती..दुर्गा भागवत यांनी अनुवाद केलेली दोन्ही दुर्मिळ पुस्तके मिळत नव्हती.जयंत कुलकर्णी यांनी अनुवाद केलेलं वॉल्डन तेव्हा आलं नव्हतं.मग अशातच एकेदिवशी अनिल अवचट सरांच एक पुस्तक हाती लागलं "शिकविले ज्यांनी "त्यामध्ये थोरोचे विश्व हा प्रकरण थोरोबद्दल होता त्या एका लेखाने मला थोरो गुरुजींबद्दल निवडक पण महत्वपूर्ण माहिती मराठीत मिळाली.मग यानंतर काही दिवसांनी मधूश्री प्रकाशन तर्फे वॉल्डन मराठीत आलं याचं अनुवाद जयंती कुलकर्णी यांनी अप्रतिम केलं होतं. वॉल्डन हाती लागताच मी ते वाचून संपवल आणि भारावून गेलो.वॉल्डन नंतर मी थोरोंचा डाय हार्ड चाहता झालो.थोरो गुरुजी आणि त्यांच्या भन्नाट विचारांबद्दल अधिक वाचनाची मला जिज्ञासा निर्माण झाली.त्यामुळे मी इतर काही पुस्तकांचा शोध घ्यायला सुरुवात केली पण अपेक्षेप्रमाणे काहीच सापडलं नाही.आणि एकेदिवशी अशातच वर्णमुद्रा प्रकाशनतर्फे थोरो गुरुजीं यांच प्रवासवर्णपर पुस्तक केपकॉड चं मराठी अनुवाद आलं तेव्हा मला जेवढा आनंद झाला तो मी शब्दा...

द लिजेंड ऑफ थोरो 💜

इमेज
थोरो हा नाव मी पूर्वी कोठेतरी वाचलं आणि ऐकलं होतं. तेव्हापासूनच मला त्यांच्या बाबतीत वाचायचं होत आणि खूप खूप जाणून घ्यायचं होत..मी त्यांच्या साहित्याचा शोध घ्यायला सुरुवात केली पण त्यांच सर्व साहित्य हा इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने मी निराश झालो होतो कारण मला विशेष हे मराठीत हवे होते.अशातच मला १९६५ साली त्यांच्या ‘वॉल्डन’ या पुस्तकाचा दुर्गा भागवत मॅम यांनी केलेल्या ‘वॉल्डनकाठी विचारविहार’ या नावाच्या अनुवादाबद्दल माहिती मिळाली.मी हे पुस्तक खूप शोधलं पण कोठेही मिळालं नाही..यामुळे मी काही इंटरनेट वर उपलब्ध असणारे काही आर्टिकल्स वाचले तर युट्युबर उपलब्ध असलेले काही व्हिडिओस बघितले पण हवी तेवढी माहिती मला काही मिळाली नाही.अशातच मागच्या वर्षी जुलै महिन्यात फेसबुकवर Vishal दादाची थोरोबद्दल एक अप्रतिम आणि शानदार पोस्ट बघितली.त्या पोस्टमध्ये थोरोचे एकंदरीत जे विचार ऍड केले होते ते वाचून तर मी कमालीचा आनंदीत झालो मी ती पोस्ट सेव सुद्धा करून ठेवली.आणि येथूनच काही काळासाठी तरी माझ्या डोक्यातून Exit केलेल्या थोरोने माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा शानदार Entry केली.मी पुन्हा दुर्गा भागवत यांच्या पुस्...