पोस्ट्स

गणेश बर्गे मराठी पुस्तक अनुभव ❤️ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कंट्या 💙

इमेज
काल गणेश बर्गे सरांची नवी कोरी कादंबरी कंट्या हातात आली आणि कितीतरी दिवसांनी असलेली उत्सुकता संपली.कारण जेव्हा पासून शिरसवाडी वाचून पूर्ण केली होती तेव्हापासूनचं गणेश सरांच्या लिखाणाच्या प्रेमात पडलो होतो. आता आतुरता होती ती सरांच्या नवीन पुस्तकाची.जेव्हा पासून समजलं होतं की कंट्या नामक नवीन कादंबरी येत आहे तेव्हापासून कंट्याची उत्सुकता होतीच.कारण गणेश बर्गे हा लेखक मातीशी नाळ जुडवून ठेवलेला आहे.तो प्रत्येकाला आपला वाटतो.त्याच्या लिखाणात आपलं प्रतिबिंब कोठेतरी बघायला मिळतो.त्यांच्या लिखाणात कोठेही अति जाणवत नाही किंवा ते फेक वाटतं नाही.त्यांनी जगलेलं, अनुभवलेलं आपल्या लिखाणात उतरवलेलं असतं.जे बघितलं,अनुभवलं तेच लिहलं असा सोप्पा नियम या लेखकाचा असतो.या कादंबरीत सुद्धा ट्रक,ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्या अवतीभोवतीचं जग आणि यांच जगणं लेखकांनी खूपच शानदार पद्धतीने रंगवलं आहे.कारण त्यांनी काही वर्षे हा जीवन स्वतः अनुभवलेला होता.एकदम Down To Earth राहून प्रेमाने पुस्तक वाचल्याची विचारपूस करणारा आणि पुस्तक आवडलं नाही तर पैसे परत करणारा हा शेतकरी लेखक खरंच निराळाच म्हणावा लागेल..❤️ तर अखेर उत्सु...