अजातशत्रू 💜
तुम्हाला विश्वास होणार नाही पण मी काही दिवसांपूर्वी चक्क भूतकाळात जाऊन आलोय आणि आता सुद्धा मनाने तेथेच वावरत आहे..आता मी भूतकाळात जाऊन आलोय म्हटल्यावर हा प्रश्न तुम्ही मला नक्कीच विचारणार की मी भूतकाळात कितव्या शतकात जाऊन आलोय ?? तर मी इ.स.पूर्व सहाव्या शतकात म्हणजेच २५०० वर्षांपूर्वी जाऊन आलोय आणि ते सुद्धा त्याकाळातील मगध साम्राज्याचे संस्थापक बिंबिसार यांच्या साम्राज्यात..कशाप्रकारे तर मी हा टाईम ट्रॅव्हल केलंय नुकत्याच प्रकाशित झालेल्या व सुमेध दादा लिखित #अजातशत्रू या भन्नाट,रोमांचकारी आणि अफलातून कादंबरीतून..स्टोरी टेल प्रकाशित #अजातशत्रू ही कादंबरी प्रत्येक बाबतीत लाजवाब असून याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. दिढ दिवसांत वाचून पूर्ण केलेली १९० पृष्ठसंख्या असलेली ही कादंबरी एकदा हातात घेतल्यावर शेवटपर्यत आपण खाली ठेवूच शकत नाही एवढी ही कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते.. मराठी वाचकवर्ग फक्त काहीच विशेष पुस्तकांना चिटकून बसलेला आहे असा आरोप नेहमी होताना दिसतो..जुन्या काही विशिष्ट पुस्तकांनाच आपण पसंती देत असतो.सारख्या सारख्या त्याच पुस्तकांवर चर्चा करतो पण आज...