अंतिम अरण्य ♥️
निर्मल वर्मा लिखित 'अंतिम अरण्य'ही हिंदी भाषिक कादंबरी काही दिवसांपूर्वी वाचून पूर्ण केली.एका वेगळ्याच विश्वात जाऊन आल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.यातील कथानक आणि पात्रांनी मला त्यांच्या प्रेमात पाडायचं काम केलं.कळतं/नकळतपणे या कादंबरीने खूप काही शिकवलं.आजूबाजूला बघण्याची एक नवीन दृष्टी दिली.यातील काही संवादाने हृदयात घर केलं,तर अनेकवेळा मला अंतर्मुख करायचं काम सुद्धा केलं.वाचत असताना मी पूर्णपणे यामध्ये गुंतून गेलो होतो. यातील पात्रांशी एकरूप झालो होतो.हे कथानक जणू माझ्यासमोरच घडतोय असं मला वाटतं होतं.एकंदरीत यातील प्रत्येक पात्र माझ्याआजूबाजूला मला वावरताना दिसतं होतं.मी आतापर्यंत वाचलेल्या काही मोजक्या कादंबऱ्यापैकी एक उत्कृष्ट अशी कादंबरी वाचल्याची प्रचिती मला आली. 'सोनी लिव्ह'वरील 'निर्मल पाठक की घर वापसी'या वेबसिरीज मधून मला ह्याबद्दल कल्पना मिळाली होती.तेव्हापासुन मी ही कादंबरी वाचण्यासाठी कमालीचा उत्सुक होतो.'निर्मल वर्मा सरांची ही शेवटची आणि त्यांच्या इतर कादंबऱ्यापैकी उजवी असलेली ही कादंबरी फार अप्रतिम अशी आहे.जी प्रत्येक वाचका...