We Read saturday ची 21 वी वाचनीय 70 पुस्तकांची यादी 💙
We Read saturday Special
21 वी वाचनीय 85 पुस्तकांची यादी 💙
https://wa.me/7066495828
http://moinhumanist24.blogspot.com/2023/10/we-read-saturday-21-70.html
यादीत जमेल तेवढं सातत्य ठेवण्याचं प्रयत्न करतोय...तसं आता यादी जाहीर करायची गरज राहिली नाही कारण Without यादी जाहीर करताच पुस्तकाची मागणी दिवसागणिक वाढली नि वाढतं आहे पण तरीही काही वाचकांसाठी आपण यादी जाहीर करत असतो नि करत राहणार आहोत...♥️🌱
टीप - यादी पूर्ण वाचावी....!🖤
संपर्क : - https://wa.me/7066495828 ♥️
__________________________________________
1) न पाठवलेलं पत्र~ महात्रया रा 🖤
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
'न पाठवलेलं पत्र' हे पुस्तक वाचल्यावर, आपल्या आयुष्यात दुःख असो की सुख, मनात राग असो की मत्सर, पदरी यश असो किंवा अपयश जीवनातील अशा अनेक घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. पुस्तकातील एक एक पान म्हणजे जीवनातील एक एक तत्व आहे.
थोडक्यात कुटुंबातील लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.
2)सेपियन्स -युवाल नोवा हरारी
Paperback/New
मुळ किंमत - 500
We read Price - 420 घरपोच.(शिपिंग फ्री)
१ लाख वर्षांपूर्वी माणसाच्या कमीत कमी
६ जाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे.आपण होमो सेपिअन्स
आपण पृथ्वीवर अधिसत्ता कशी स्थापन केली?
आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरं आणि
राज्य कशी स्थापन केली?
देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा
विश्वास ठेवायला लागलो?
आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपलं जग कसं असेल?
माणसाची विचारपद्धती, त्याचं वर्तन, त्याची बलस्थानं आणि त्याचा
भविष्यकाळ यांबद्दलच्या आपल्या सगळ्या समजुतींना आव्हान देणारं
विचारप्रवर्तक पुस्तक... सेपिअन्स!
3)द $ 100 स्टार्टअप क्रिस गुलिब्यू
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करायचा ठरवतो तेव्हा भांडवलाचा प्रश्न समोर उभा ठाकतो. व्यवसाय करण्यासाठी मोठं भांडवल गरजेच असतं असा एक समज लोकप्रिय आहे. तो बऱ्याच अंशी खरा आहे पण $१०० स्टार्टअप हे अंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं पुस्तक या लोकप्रिय विचाराला डावलून, “कमी गुंतवणूकीमधून व्यवसाय” हा एक नवा विचार मांडत.
4)या जागा राखीव आहेत~ अभिनव चंद्रचूड 🌱❤️
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
चंद्रचूड यांनी भारतातील आरक्षणाचा तात्त्विक, न्यायक्षेत्रीय व राजकीय पाया स्पष्ट करून सांगितला आहे, इतकंच नव्हे तर या व्यवस्थेचा सखोल वेध घेऊन ती प्रत्यक्षात कशी कार्यरत असते याचंही विवरण त्यांनी केलं आहे. [...] हे पुस्तक अवघड संकल्पना उदाहरणांच्या आधारे उलगडून मांडतं, त्यामुळे क्लिष्ट संज्ञांचं सर्वसामान्य वाचकाला सुलभपणे आकलन होतं.
5) काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? - शेषराव मोरे
मुळ किंमत-900₹
We read-795₹घरपोच(शिपिंग फ्री)
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:। मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली, तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो (आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो). फाळणीचे मूलकारण कोणते होते? जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी? फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची राहणार होती? राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता? त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता? अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण झाले असते काय? हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते? ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला असता!’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते? आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते... मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे नाव का घ्यावे लागले? अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा, फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ. '
6)काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद -आनंद हर्डीकर * प्रा. फकरुद्दीन बेन्नूर * डॉ. अलीम वकील * अब्दुल कादर मुकादम * श्री. मा. भावे * डॉ. के. रं. शिरवाडकर *. विश्वास दांडेकर * डॉ. सदानंद मोरे * रमेश पतंगे *. दिलीप करंबेळकर * डॉ. माधव गोडबोले * प्रदीप रावत '
375₹घरपोच(शिपिंग फ्री)
शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न : देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का? लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच गांधींनी फाळणी मान्य केली होती का? बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने उठवलेली हूल होती का? जिनांना पाकिस्तान नको होते; तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का? आणि सर्वांत कळीची समस्या. हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन शक्य आहे का? या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे...
7)झेन~साधं सरळ जीवन जगण्याची कला &
झेन आणि आनंदी राहण्याची कला ~क्रिस प्रेन्टिस 🌱
एकूण 2 पुस्तके ♥️
485₹घरपोच(शिपिंग फ्री)
थोडस थांबून विचार करा आणि रोजच्या सवयींत, दृष्टिकोनात बदल करून प्रसन्नता अनुभवा ।
शुनम्यो मसुनो प्रख्यात बौद्ध संन्यासी आहेत. त्यांनी कित्येक शतकांपूर्वीच्या ज्ञानाची (झेन ज्ञानप्रणालीच्या साराची) आधुनिक जीवनासाठी स्पष्ट, व्यावहारिक आणि सहजतेने अवलंबता येतील, अशा नियमांत मांडणी केली आहे. शंभर दिवसांकरिता प्रतिदिन एक नियम अमलात आणण्याचा ते सल्ला देतात.
&
आपणच आहोत पुढील प्रत्येक क्षणाचे निर्माणकर्ता...
"कोणतंही कार्य करताना विशिष्ट एकाग्रतेनं, शांत आणि सहज मनानं करणं याला झेन पद्धत म्हणतात. यामुळे ज्ञानाचा अनुभव येतो आणि त्या माध्यमातून प्रसन्नता लाभते. "
8)मला व्हायचंय Upsc टॉपर ~निशांत जैन
मुळ किंमत-300₹
We Read-255₹ घरपोच(शिपिंग फ्री)
परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरील सर्वांगीण आणि व्यापक तयारीसाठी सविस्तर मार्गदर्शन.
परीक्षेच्या तयारीदरम्यान आवश्यक; परंतु काहीशा दुर्लक्षित पैलूंवर विस्तृत चर्चा.
स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्यासाठी कशी करावी आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण?
नेहमी सकारात्मक विचारांच्या सान्निध्यात कसं राहावं? स्वत:ला सतत प्रेरित कसं करावं?
• परीक्षेसाठी काय वाचावं, काय वाचू नये? अभ्यास नेमका कसा करावा?
परीक्षेच्या नव्या पॅटर्नला यशस्वीपणे सामोरं जाण्यासाठी कशी असावी रणनीती?
• त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांच्या काही प्रेरणादायी कहाण्या खास वाचकांसाठी
9)प्रभावी नियोजन नि वेळेचे व्यवस्थापन -विवेक बिंद्रा
195₹घरपोच(शिपिंग फ्री)
वेळेचे व्यवस्थापन म्हणजे काय ??
वेळेचे व्यवस्थापन आणि नियोजन कसे करावे ??
कामातली अनावश्यक दिरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष केंद्रीत कसं करावं ?
अतिरिक्त ताणतणाव कमी करून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य संतुलन कसं साधावं ?
प्रभावी नियोजनाच्या साहाय्यानं आपली कार्यक्षमता कशी वाढवावी ?
वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासह अपेक्षित ध्येयपूर्ती कशी साध्य करावी ? '
सर्वांत मोठी पाच उद्दिष्ट ' आणि ' सर्वांत लहान पाच उद्दिष्ट म्हणजे नेमकं काय ?
स्वतःच्या ध्येयापासून न भरकटण्यासाठी या संकल्पनांचा वापर कसा करावा ?
कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्यासाठी आपल्या दैनंदिन कामाचा आणि पर्यायानं आयुष्यातील उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम कसा ठरवावा ?
यशाकडे आत्मविश्वासानं वाटचाल करण्यासाठी उत्तम आणि प्रभावी वेळापत्रक कसं बनवावं ?
D4 फॉर्म्युला आणि 80:20 हा सिद्धांत म्हणजे काय ??
महत्वपूर्ण Exercise कोणते आणि ते कसे करावे ??
10)मन:शक्ती वाढवा~गौर गोपाल दास
235₹घरपोच(शिपिंग फ्री)
हा प्रवास सहज समजण्यासाठी पुस्तकाचे चार विभाग केले आहेत. 'मी आणि माझ मन' या पहिल्या विभागात आपण आपल्या स्वतःच्या भावनांबद्दल बोलणार आहोत. 'इतर आणि माझं मन' या दुसऱ्या विभागात इतरांचा आपल्या भावनांवर कसा परिणाम होऊ शकतो, हे आपण पाहणार आहोत. 'मी आणि इतरांचं मन' या तिसऱ्या विभागात आपल्या कृतिप्रति संवेदनशील होत इतरांच्या मानसिक आरोग्याचं रक्षण आपण कसं करू शकतो, हे जाणून घेता येईल. 'विश्व आणि माझं मन' या चौथ्या विभागातून निसर्गाचे नियम आपल्या मानसिक स्थितीवर कसा परिणाम करतात, आपली मानसिक अवस्था विकसित होण्यासाठी आपण आध्यात्मिक स्तरावर कसा विकास करू शकतो, हे लक्षात येईल.❤️
11)गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण – मनू एस. पिल्लई
मुळ किंमत-400₹
355₹ घरपोच (शिपिंग फ्री)
जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू
मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत-एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर
गाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्र
संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत – या पुस्तकातले
विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या
खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील
कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून
टाकल्या आहेत.
12)प्रेरणा द साउंड ऑफ सायलेनस -उज्वला सहाणे
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
आपल्या कर्णबधिर मुलीला घडवताना तिच्या पालकांनी केलेल्या संघर्षाची गाथा आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळते.प्रेरणाच्या कुटुंबाने व गुरूने प्रेरणा सहाणे ला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रेरणा सहाणे दीक्षित बनवण्यापर्यतचा प्रवास या पुस्तकात देण्यात आला आहे.सहाणे कुटुंबाचा इथपर्यंतचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.पावलोपावली त्यांना संघर्ष करावा लागला.समाजाशी,व्यवस्थेशी,परिस्थिशी आणि आयुष्याशी झगडावं लागलं.अनोनात मानसिक,शारीरिक कष्ट करावे लागले.अनेक समस्यांचा सामना करावा लागला.अनेक दुःख सोसावे लागले.पण तरीही हा कुटुंब काही मागे हटला नाही.आलेल्या संकटांना शिंगावर घेत आपल्या वाटेवर मार्गक्रमण करत राहिला.आत्मविश्वास, जिद्द,इच्छा आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते.कोणताही संकट आपल्या जिद्दीसमोर छोटा आहे.हा महत्वपूर्ण संदेश आपल्याला सहाणे कुटुंब आपल्या प्रवासातून नकळतपणे देऊन जातो.
13)केदारनाथ 17 जून -डॉ.प्रकाश कोयाडे
355₹घरपोच(शिपिंग फ्री)
जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ
येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत,
म्हणूनच आपण मरायचं नाही..."
"आपल्याला जिवंत रहावंच लागेल!"
एका सत्य घटनेवर आधारीत कादंबरी...केदारनाथ १७ जून !
14)अखेरचे शिलेदार -पी साईनाथ
मुळ किंमत-350₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
अखेरचे शिलेदार' या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय,
मुस्लीम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतांतली, विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पाश्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत; तर काही नास्तिक. काही डावे, काही गांधीवादी; तर काही आंबेडकरवादी.
15)माझे सत्याचे प्रयोग-महात्मा गांधी
225₹ घरपोच(शिपिंग फ्री)
माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे. गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत. या पुस्तकात लहानपणापासून १९२१ पर्यंतचे गांधीजींचे आयुष्य रेखाटले गेले आहे.
16)रिच डॅड पुअर डॅड -रॉबर्ट कियोसाकी
मुळ किंमत-499₹
445₹ घरपोच (शिपिंग फ्री)
गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशांसाठी काम करतात. जीवन तुमच्याशी बोलत नाही, ते तुम्हाला धक्का देतं. प्रत्येक धक्का ही सूचना असते की यातून काही शिक, धडा घे, बदल.
तुमची समस्या तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतःला बदलू शकता, शिकू शकता, जास्त समजदार बनू शकता.
17)सलोख्याचे प्रदेश -सबा नक्वी
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
भारतात अनेक जाती - धर्मांचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा वेगळ्या असतात. तरी 'अनेकतात एकता' म्हणतो त्याप्रमाणे येथील प्रमुख हिंदू व मुस्लीमांच्या परंपरा, सण, उत्सव, एकत्र साजरे होतात.
अशा काही ठिकाणी भेट देऊन तेथील समजाचे चित्रण सवा नक्वी यांनी 'सलोख्याचे प्रदेश' मधून दाखविले आहे.
18)सेंद्रिय शेती
मुळ किंमत - 800₹
We read किंमत - 700₹ घरपोच (शिपिंग फ्री)
भारताच्या परंपरागत शेतीच्या अभ्यासातून कळते, जगातील सर्वश्रेष्ठ शेतीप्रणाली भारतामध्येच आहे. त्या ज्ञानाचा शोध घेत, प्रत्यक्ष प्रयोगातून पडताळा पाहात गोव्याचे शेतीतज्ज्ञ डॉ. क्लॉड अल्वारिस यांनी एक संघटना उभी केली - ‘ऑरगॅनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडिया’. या संघटनेचे चार हजार स्वयंप्रेरित सभासद आहेत. सेंद्रिय शेतीचे विविध पैलू, रसायनमुक्त शेतीचे फायदे जिज्ञासूंना आणि सामान्यजनांनाही कळावे, म्हणून क्लॉड यांनी एक पुस्तक तयार केले - ‘ऑरगॅनिक फार्मिंग सोर्सबुक’. महाराष्ट्रातील पुढारलेल्या, जागरूक, प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला अरुण डिके आणि अरविंद दाभोळकर या तज्ज्ञांनी. कृषिक्षेत्राबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावा, असा मौल्यवान संदर्भग्रंथ '
19) लोकांचे संविधान~रोहित डे
मुळ किंमत-500₹
425₹घरपोच (शिपिंग फ्री)
या पुस्तकात चार प्रकरणं आहेत आणि त्यांना त्या-त्या क्षेत्रात प्रबळ ठरलेल्या अग्रगण्य खटल्याचं नाव दिलं आहे. प्रचलित कायदेशीर निवाड्याच्या औपचारिक शिस्तीला आणि लोकाभिमुख कायदाविषयक लेखनाच्या प्रकाराला मानवंदना म्हणून प्रकरणांना अशी शीर्षकं दिली आहेत. अर्ल स्टॅन्ली गार्डनर यांनी पेरी मॅसन या मध्यवर्ती पात्राला घेऊन लिहिलेल्या कायदा क्षेत्रातील रहस्यकथा किंवा जॉन मॉर्टिमर यांनी लिहिलेल्या न्यायालयीन नाट्यांवर आधारित कादंबऱ्या अजूनही भारतात लोकप्रिय आहेत. खालिद लतिफ गौबा व कैलाशनाथ काटजू यांच्यासारख्या वकिलांनी प्रसिद्ध खटल्यांविषयी लिहिलेली विषयाधीनतेकडे कलणारी पुस्तकं खूप विक्री ठरली आहेत.
20)डेझर्टर -विजय देवधर
मुळ किंमत-425₹
We read -345₹ With शिपिंग घरपोच.
गंथर बान्हमान यांच्या 'आय डेझर्टेड रोमेल' या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे.
हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी
झाले आहे. बान्हमान यांचे स्वानुभव आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ असलेले हे कथानक आहे.
21)हां ये मुमकिन हे -डॉ. तरु जिंदल
340₹घरपोच (शिपिंग फ्री)
प्रसूती कक्षाच्या आत बसलेली कुत्री, शेजारीच पसरलेला बायो-मेडिकल कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, बाळंत स्त्रियांना टाके घालणाऱ्या तिथल्याच झाडूवाल्या, स्टाफरुममध्ये एकमेकींच्या हातांना मेंदी लावणाऱ्या लेडी डॉक्टर्स…
हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल !
भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा… हां, ये मुमकिन है ।
22)महात्मा जोतीराव फुले यांनी लिहलेले एकूण 3 ग्रंथ आता We Read मध्ये उपलब्ध.....! 🌱❤️
1.शेतकऱ्यांचा आसूड
2.गुलामगिरी
3.सार्वजनिक सत्यधर्म
मुळ किंमत-450₹
We Read- 385₹ घरपोच(शिपिंग फ्री)
23)द हंग्री टाइड-अमिताव घोष
मुळ किंमत - 550₹
We read Price - 450₹घरपोच.(शिपिंग फ्री)
हंग्री टाइड ही कलकत्ता आणि बंगालच्या उपसागरातील बेटांच्या विशाल द्वीपसमूहातील एक समृद्ध गाथा आहे. बेटांचा हा विशाल द्वीपसमूहच अमिताव घोष यांच्या नवीन कादंबरीची मांडणी करतो. सुंदरबनमध्ये समुद्राच्या भरती १०० मैलांपेक्षा जास्त अंतरापर्यंत पोहोचतात आणि दररोज हजारो हेक्टर जंगल नाहीसे होते आणि काही तासांनंतर पुन्हा उगवते. याच पार्श्वभूमीवर दुर्मीळ डॉल्फिनच्या शोधात आलेली पियाली, तिला डॉल्फिन शोधण्यात सहाय्यक ठरणारा फोकीर, कनाई या प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कादंबरी घडते.खारफुटीच्या जंगलातली समृद्ध जलसंपदा, वाघोबाच्या भीतीनं आदिवासी जीवनात उदयाला आलेल्या लोककथा आणि जंगल भयाचं आव्हान पेलतही निसर्गावर मनमुराद प्रेम करणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. जी सुंदरबनच्या जंगलातून अनहद प्रवास घडवते.
24)संघर्षाची मशाल हाती -नरसय्या आडम
मुळ किंमत-400₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
नरसय्या आडम म्हणजेच आडम मास्तरांशी माझा दीर्घकाळ परिचय आहे. आधी कामगार कार्यकर्ता, नंतर सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आणि पुढे तीन वेळा आमदार म्हणून मी त्यांना पाहिलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
25)इंडियाज मोस्ट फिअरलेस
आधुनिक लष्करातील शूरवीरांच्या सत्य कहाण्या, २०१६ मध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्समध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेल्या मेजरच्या कथानावर आधारित कथेसह.
मुळ किंमत -280₹
We Read किंमत -245₹घरपोच (शिपिंग फ्री)
26)एकलव्य -विजय देवडे
मुळ किंमत - 380₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)
दुमदुमत्या आसमंताला निठेपुढं झुकायला लावणारा, स्वअध्ययनान धनुर्विद्या मिळवणारा, कुळभेदाच्या जाचक भिंतींना तोडून सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणारा निषाधराजा एकलव्य!
महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित बदललं गेलं असतं. एकलव्यानं गुरुदक्षिणेत अंगठा गुरू द्रोणाचार्य यांना दिला, त्याच्या निष्ठेनं सर्वांना भुरळ घातली. अशी गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग, निष्ठा व समर्पणाच्या जोरावर परत पर्वतासारखा उभा राहून एकलव्यानं आदर्श निर्माण केला.
27)निवडक मुलाखती -भालचंद्र नेमाडे
225₹ घरपोच (शिपिंग फ्री)
आपल्यासारख्यांना वाचकांशी संवाद वगैरे साधण्याचा काय मार्ग उपलब्ध असतो? महाराष्ट्रातली एकजात वर्तमानपत्रादी कोणाच्या हाताशी किंवा हातात किंवा हातची आहेत, एकदा वाचकांशी जवळचे संबंध प्रस्थापित व्हायला लागले, की आपोआप पत्रव्यवहार, भेटीगाठी, चर्चा अपुर्या पडायला लागतात. मग गावोगाव पसरलेले आपले वाचक मनात वेळोवेळी उद्भवणारे वैयक्तिक प्रश्न समाईक करायला उत्सुक असतात. इथे एकाच भाषेतल्या समूहमनातल्य सार्वजनिक चिंता व्यक्त व्हायला लागतात. मुलाखत हा काही वाड:मयप्रकार नाही की समीक्षाही नाही. प्रश्न विचारणार्या मुलाखतकारांच्या भागीदारीनं हा एक रचनाप्रकार होऊ शकतो. मुळात हा एक सांस्कृतिक नाट्यसंवाद असतो.
28)अर्ली इंडियन्स ~टोनी जोसेफ
मुळ किंमत-399₹
We Read -345₹घरपोच (शिपिंग फ्री)
आपण भारतीय कोण आहोत ?
आपण कुठून आलो आहोत ?
या गहन प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी पत्रकार टोनी जोसेफ आपल्याला ६५,००० वर्ष मागे म्हणजे जेव्हा आधुनिक मानवांचा किंवा बुद्धिमान मानवांचा पहिला समूह आफ्रिकेतून भारतीय उपखंडामध्ये प्रवेशला त्या कालात घेऊन जातात . अगदी अलीकडेच उपलब्ध झालेल्या डीएनएच्या पुराव्यांचे दाखले देत त्यांनी भारतामध्ये झालेल्या आधुनिक मानव समूहांच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या स्थलांतरांचा पाठपुरावा केला आहे . त्यामध्ये इसवी सनपूर्व ७००० ते इसवी सनपूर्व ३००० दरम्यान इराणच्या प्रदेशातले शेतकरी समूह तसेच इसवी सनपूर्व २००० ते इसवी सनपूर्व १००० दरम्यान मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून आलेले पशुपालक आणि इतर स्थलांतरितांचा समावेश आहे . जनुकीय शास्त्रातील आणि याविषयीच्या अन्य संशोधनांतील निष्कर्षांच्या आधारे आपला भूतकाळ उलगडत जाताना जोसेफ भारतीय इतिहासातील काही विवादात्मक आणि खळबळजनक प्रश्नांकडे आपलं लक्ष वेधतात.
29)स्वयंघोषित देशभक्ताचे वास्तव -चंद्रकांत झटाले
255₹घरपोच(शिपिंग फ्री)
खऱ्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून स्वयंघोषित देशभक्तांनी आज देशभक्तीची व्याख्याच पूर्णपणे बदलून टोकली आहे. अशा कट्टरवादी स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव पुराव्यांसह मांडण्याचा हा प्रयत्न..
30)सुखी माणसाचा सदरा-करुणा गोखले
&
प्रश्न मनाचे -डॉ.नरेंद्र नि हमीद दाभोलकर 🌱
एकूण 2 पुस्तके
375₹घरपोच(शिपिंग फ्री)
The Conquest of Happiness या पुस्तकातून थोर तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल पटवून देतात की, दु:खी राहण्यात निसर्गत: काहीही श्रेष्ठत्व दडलेले नाही. प्राप्त परिस्थितीत जो जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, तो खरा सुज्ञ. हे पुस्तक एक आश्वासन देते की, सात्त्विक सुख अप्राप्य नाही. दंतकथेत सांगतात, तेवढा सुखी माणसाचा सदरा दुर्मिळ नाही. हाती आलेल्या धाग्यांमधून प्रत्येक माणूस असा सदरा विणू शकतो. पण तो स्वत:चा स्वत:ला विणावा लागतो. विणकरात, हंसाचा नीर-क्षीर विवेक व गवळण पक्ष्याची जिद्द मात्र हवी. '
&
मन म्हणजे काय? कुठे असते ते? कसे घडते ते? काय असते मनात? काय चालते मनात? मनाचे आरोग्य म्हणजे नेमके काय? कसे राखायचे हे आरोग्य? कसे रोखायचे औदासीन्य वा स्किझोफ्रीनियासारखे मनोविकार? काय असतात मनोविकारांवरचे उपचार? मनाचा अन् व्यक्तीच्या स्वभावाचा काय संबंध?
31)भगतसिंहाची जेल डायरी
संपादन -अभिजित भालेराव 🖤
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
ही डायरी म्हणजे एक प्रकारचे कोडे आहे. संदर्भासहित वाचल्यास भगतसिंहांचा संदेश आपण सहज समजून घेऊ शकतो. देशासाठी ते फासावर चढले, त्यांचे आणि साथीदारांचे हे बलिदान अतुलनीय तर आहेच पण त्याशिवाय भगतसिंह एक फार मोठे काम करून गेले. ते स्वतंत्र भारताचे, स्वतंत्र जगाचे एक सुंदर स्वप्न या डायरीमध्ये रंगवून गेले. ते रंग आपल्याला उमजले तर आणि तरच फासावर चढताना भगतसिंहांच्या ओठावर असलेल्या स्मितहास्याचे रहस्य आपल्याला समजेल. फाशीच्या तक्ताला विचारांचे व्यासपीठ बनविणारा असा नरवीर जगात दुसरा झाला नाही. महाकवी पाश म्हणतात, "भगतसिंह फासावर चढण्यापूर्वी क्रांतिकारी लेनिनचे पुस्तक वाचत होते, जाता जाता ते पुस्तकाचे एक पान मुडपून गेले. आजच्या पिढीला तिथून पुढे वाचण्याची गरज आहे."
32)तेलगी स्कॅम -संजय सिंह
255₹घरपोच.(शिपिंग फ्री)
एका पत्रकाराच्या हाती एक रिपोर्ट लागतो. वरवर कंटाळवाणा वाटणारा हा अहवाल. पण त्याची ब्रेकिंग न्यूज होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. असं काय असतं या अहवालात? हा अहवाल असतो, तेलगीच्या महाघोटाळ्याचा. एका रात्रीत डान्सबारमध्ये कोटभर रुपये उधळणारा तेलगी. त्याच रात्री सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर येतो. आणि तपास यंत्रणेचीही मती गुंग होते. राजकारण आणि प्रशासनातली बडी धेंडं त्याला सामील असल्याची चर्चा सुरू होते.
33)अखेरचे शिलेदार -पी.साईनाथ
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
भारतीय स्वातंत्र्यलढ्याची धुरा नक्की कोणाच्या खांद्यावर होती? शेतकरी, कष्टकरी, गृहिणी, कारागीर, रानावनात वनोपज गोळा करणारे किंवा असेच इतर लाखो सामान्य लोक इंग्रज राजवटीपुढे टाच रोवून उभे राहिले. यांतले कुणी ना पुढे मंत्री झाले, ना राज्यपाल किंवा राष्ट्रपती. त्यांची वर्णी फार मोठ्या शासकीय पदांवरही कधी लागली नाही. या सगळ्यांमध्ये एक समान धागा होता: इंग्रज साम्राज्य आणि राजवटीला असलेला कडवा विरोध.
34)लॉर्ड्स ऑफ द डेक्कन – अनिरुद्ध कणिसेट्टी
मुळ किंमत - 500₹
We Read -455₹घरपोच (शिपिंग फ्री)
भारतीय इतिहास लेखनामध्ये दक्षिण भारताच्या इतिहास लेखनावर अन्याय झाल्याचे अनेक इतिहासकारांनी दाखवून दिले आहे. येथील इतिहास लेखन ‘उत्तरकेंद्री’ असल्याचाही आरोप होतो. वासाहतिक काळातील गरजेतून ब्रिटिशांनी भारतीय ऐतिहासिक वाटचालीवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासकारांनी जो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला त्यातून ‘उत्तरकेंद्री’ मांडणी झालेली दिसते. पुढे भारतीय इतिहास लेखनावर तोच प्रभाव टिकून राहिला. भारतीय इतिहासाच्या अशा मांडणीला काही प्रमाणात दुरुस्त करण्याचा प्रयत्न अलीकडचे इतिहासकार करताना दिसतात. त्यापैकी मनू पिल्लै व अनिरुद्ध कनिसेट्टी यांचे लिखाण महत्त्वाचे आहे. याच मालिकेतील अनिरुद्ध कनिसेट्टी यांचे ‘लॉर्ड्स ऑफ द डेक्कन’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
35)संताजी घोरपडे -रवि मोरे
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
संताजी घोरपडे यांनी रामचंद्रपंत अमात्य यांना लिहलेले पत्र स्वामींच्या आज्ञेव्यतिरिक्त आम्ही काहीच नव्हतो. विश्वासाची जाती म्हणावी तरी स्वामींची आणी आमची शफत तुळशीबेलाच्या 'श्री' वरील आहे. स्वामींचे मांडीवर आम्ही उसे ठेऊन निजावे, आमचे मांडीवर स्वामींनी उसे ठेवावे, शरीर मात्र भिन्न. आत्मा एकच. आम्ही कोणे गोष्टीस अंतर पडलो नाही. आम्ही ऐसे सेवक नव्हे जे स्वामींचे स्मरण न करता आधी आपला बहुमान घेऊ. याचा पर्याय कागदी काय म्हणून लिहावा. स्वामीं वडील. हे यश येते ते स्वामींचेच पुण्येकरून येते. आमचा अभिमान सर्व गोष्टीचा स्वामींशी. पूर्वीपासून स्वामींनीच गौरविले; तेथे वखाचेच काय म्हणून लिहावे. पूर्वीपासून अंगीकार आमचा स्वामींनी केला आणी आम्हास बंधू म्हणविलें. हाच भाव सिद्धी पावला पाहिजे. स्वामीं व्यतिरिक्त आम्ही काही नाही. जैसी पूर्वी आज्ञेप्रमाणे वर्तणूक केली तैसीच करू
36)अर्थसाक्षर व्हा - अभिजित कोलपकर CA
मुळ किंमत - 400₹
We read Price - 355₹घरपोच.(शिपिंग फ्री)
आपण कमावलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करुन समाधानी आयुष्य जगायचे असेल तर हे पुस्तक उपयोगी आहे.
तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करुन विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करुन तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे याचे उत्तम मार्गदर्शन ’अर्थसाक्षर व्हा’ मधे वाचायला मिळते
37)चाणक्य नीती
195₹घरपोच(शिपिंग फ्री)
आचार्य चाणक्यांनी त्यांचे विचार चाणक्य नीती या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. या पुस्तकात आचार्य यांनी व्यावहारिक जीवन आणि गृहजीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
38)अवघा देहचि वृक्ष जाहला - वीणा गवाणकर
We Read -250₹घरपोच (शिपिंग फ्री)
"माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनंच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या संजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखलं गेलं पाहिजे... खनिज, वनस्पती, प्राणी, माणूस... सर्वांमध्ये! " हे विचार आहेत रिचर्ड बेकर यांचे. वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चणार्या पर्यावरणरक्षकाची ही प्रेरणादायी चरितकहाणी...
39)डहाण~ अनिल साबळे
मुळ किंमत - 450₹
We read किंमत - 405₹ घरपोच (शिपिंग फ्री)
आश्रमशाळेतल्या निरागस मुलांच्या वाट्याला आलेले वंचनांचे जग अनिल साबळे यांनी या कादंबरीत साकारले आहे. एखाद्या अनाम चित्रकाराने गुहेत रेखाटलेल्या चित्रासारखा गहिरेपणा इथे शब्दांना आला आहे. लैगिक शोषणाच्या विळख्यात अडकणाच्या मुली, आत्महत्येसारखं टोकाच पाऊल उचलणारी मुलं, निकृष्ट प्रतीचे अन्न, अस्वच्छता, असुरक्षितता असं सारं काही निमुटपणे सोसणारे आणि आपलं शोषण होत आहे हेही धड न उमजणारे कोवळे जीव या कारदंबरीत आपल्याला प्रत्येक पानावर आढळतात.
'डहाण' म्हणजे व्रण, जखमेची खूण, ही कादंबरी वाचल्यानंतर आपल्या संवेदनेवरही एक अमीट असा व्रण खोलवर उमटला आहे अशी अनुभूती वाचकाला नक्कीच येईल.
40)आश्वासक -रवींद्र साळवे
185₹घरपोच(शिपिंग फ्री)
'आश्वासक' हा एक आत्मविश्वासी व बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा एक गुणवत्तापूर्ण उल्लेख करणारा शब्द आहे. आपल्या जीवनातील एखादा असंभव वाटणारा निर्धार अत्यंत जिद्दीने, कुशलतेने तसेच अपरंपरागत पध्दतीने यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांना सामान्यपणे 'आश्वासक ' म्हटले जाते. या पुस्तकात मळलेल्या वाटेने न जाता जाणीवपूर्वक व प्रचंड आत्मविश्वासाने नवीन पायवाट निर्माण करणारे पन्नास 'आश्वासक' रवींद्र साळवे यांनी रेखाटलेले आहेत.
41)माणूस 'असा' का वागतो ?-अंजली चिपलकट्टी
मुळ किंमत-550₹
We Read- 495₹ घरपोच(शिपिंग फ्री)
माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का ? मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे - आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे – माणूस असा का वागतो ?
42)फुकटचेच सल्ले~डॉ.रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
185₹ घरपोच (शिपिंग फ्री)
वाचाल तर वाचाल, असे आम्हाला शिकवले गेले होते. म्हणून आम्ही वाचत गेलो आणि वाचलेले जे काही होते त्यामुळेच संपन्नपणे वाढलो. अलीकडेही ‘वॉचाल' तर बिघडाल असे पोटतिडकीने सांगूनही वाचनावर बहिष्कार का टाकला जात आहे, याचा उलगडा होऊ शकत नाही. अनुत्तरित प्रश्नांवर खूप चिंतन करून उत्तर शोधायचे असते म्हणून आम्ही त्या शोधात वेळोवेळी जे काही लिहीत गेलो त्यातील काही लिखाण ‘फुकटचे सल्ले' म्हणून या पुस्तकात एकत्रितपणे दिले आहे.हे सल्ले फुकटचे असले तरी त्यांना अनुभवांचा आधार आहे. म्हणून ते महत्त्वाचे ठरतात. तेव्हा सदरचे पुस्तक विकत घेऊन आमचे हे फुकटचे सल्ले आपल्या जीवनात उपयोगात आणाल अशी आशा आहे.
43)साद घालतो कालाहारी -मार्क आणि डेलिया ओवेनस
मुळ किंमत-530₹
475₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली.
44)न्याय – मायकल सॅंडेल
मुळ किंमत-400₹
We read -330₹ With शिपिंग घरपोच
खोट बोलण हे नेहमीच वाईट असतं का?
व्यक्तिस्वातंत्र्याला काही मर्यादा असली पाहिजे का?
अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याचा खून करावा लागल्याचं समर्थन करता येऊ शकेल का?
मुक्त बाजरपेठ खरंच मुक्त आहे का?
विषमता कमी करण्यासाठी ठरावीक लोकांवर कर आकारणं न्याय्य आहे का?
45)त्याने गांधींना का मारलं - अशोक कुमार पांडेय
New/paperback
मुळ किंमत - 300₹
We read Price - 250₹ घरपोच.
हे पुस्तक स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा
आणि हिंसा या तत्त्वज्ञानांच्या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या
सामाजिक-राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या
हत्येमागची कारणं समोर आणतं. त्याबरोबरच
गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी
जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. हे पुस्तक
गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत
नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या
वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं.
46)भारताची कुळकथा ~डॉ.मधुकर धावलीकर
मुळ किंमत-450₹
400₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'भारताचा इतिहास सुरू कधी होतो? महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे? इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर? साम्राज्यांच्या उभारणीच्या अन् पतनाच्या आधारावर? धार्मिक प्रभावांच्या पायावर? की साहित्यातील वर्णनांच्या कल्पनांवर? पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा '
47)ऋणानुबंध -यशवंतराव चव्हाण
295₹घरपोच (शिपिंग फ्री)
भेटलेल्या व्यक्ती, भावलेली स्थळं, घडलेल्या घटना…
यशवंतराव चव्हाण
मानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधाऱ्यांचे बोट धरून चालणे आले, थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले.
हा प्रवास कधी ’एकला चलो रे’ च्या चालीवर तर कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला.
प्रवासात कधी चढउतार तर कधी ऊनपाऊस, तर कधी आशा – निराशेचे क्षणही.
सुखदु:खाच्या या संमिश्र वाटचालीत नियतीचा हातही वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो.
48)पारधी -गिरीश प्रभुणे
मुळ किंमत - 450₹
We read Price - 400₹घरपोच.(शिपिंग फ्री)
समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि ख-याखु-या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या एका अन्यायग्रस्त जमातीची ही आक्रोशकथा आहे... त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोय-यांच्या उत्कर्षासाठी झटणा-या एका तळमळीच्या कार्यकर्त्याने ही मांडलेली कैफियत आहे...
49)हसरे दुःख - भा.द खेर
मुळ किंमत - 500₹
We read Price - 450₹घरपोच.(शिपिंग फ्री)
माझं आयुष्यच नाटयमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो. आपल्या हस-या मुखवटयातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी. '
50)मोठी माणसं -नरेंद्र चपळगावकर
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळात आपल्या समाजजीवनावर अनेक व्यक्तींनी प्रभाव टाकला, त्यातील काहींची ही व्यक्तिचित्रे . त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे राजकीय विचार, त्यांच्या कार्यपद्वती आणि त्यांच्या जीवननिष्ठाही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे.
51)भुरा -शरद बाविस्कर (11 वी आवृत्ती)
मुळ किंमत - 500₹
We read किंमत - 425₹ घरपोच (शिपिंग फ्री)
धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या, भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या, तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या, 'भुरा' ही आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स, अल्थुझर, ग्राम्शी , महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन.
52)अवकाळी पावसाच्या दरम्यान ची गोष्ट
-आनंद विंगकर
मुळ किंमत-200₹
We read -185₹ With शिपिंग घरपोच
कवी आनंद विंगकर यांची 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ही कादंबरी एक अकस्मात घडलेली घटना आणि एक अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होते. अस्मानी संकटामागच्या मानवी हस्तक्षेपांचं भान देत, अकस्मात उद्भवलेल्या घटनांच्या मालिकांची अपरिहार्य शोकात्म परिणती दिग्दर्शित करत त्या वातावरणातील बदलते मानवी भाव, मानवी जीजीविषा, कणखरपणा यांचा गंभीर प्रत्यय देते. रंजकतेच्या पारंपरिक कुप्रथांचा त्याग करूनही ही कादंबरी अत्यंत वेधक उतरली आहे. कारण लेखकाचं वृत्तिगांभीर्य आणि भावनात्मक ताटस्थ्य. आत्महत्या करणारं शेतकरी जोडपं, त्यांची थोरली लेक, तिचा प्रियकर यांची चरित्रं आणि एकूण कथानकाचं वाहतेपण प्रभावी आहेच, खेरीज ग्रामसमाजातील व्यवहार, परस्परसंबंधांचे ताणेबाणे यांच्यातील अस्सलतेमुळे ही कादंबरी अधिक मोठा आवाका धारण करते. कादंबरी वाचून संपवताना आपण ती वाचण्याआधीचे उरत नाही, हे तिचं महत्त्वाचं यश आहे.
53)नास्तिकासोबत गांधी (मराठी)
175₹ घरपोच (शिपिंग फ्री)
आस्तिकता आणि नास्तिकता दोन परस्पर विरोधी मताची माणसे एकमेकांशी चर्चा करत आहेत. परस्परांना तपासून बघत आहेत. मात्र या चर्चेत खंडनमंडन किंवा वादावादीचा खणखणाट नाही. चर्चेच्या ओघात दोघेही एकमेकाला समजून घेतात आणि दोघांमधील नाते अधिकाधिक दृढ होत जाते. गांधीजींच्या निधनानंतर तीन वर्षांनी गोरांनी या आठवणी लिहिल्या आणि तत्कालीन गांधीवादी विचारवंत किशोरीलाल मधुबाला यांनी प्रस्तावनेत या आगळ्यावेगळ्या संबंधाची वैचारिक उकल केली.
54)आदिवासी बोधकथा -एक पुनकर्थन :-
प्रदीप प्रभू/सिराझ बलसारा
Paperback/New
मुळ किंमत - 250₹
We read Price - 215₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
हे पुस्तक खरंच खूप जबरदस्त आणि अप्रतिम आहे.यातील प्रत्येक कथा उत्कृष्ट असून यामध्ये दिलेली वारली चित्रं तर खूप भन्नाट आहेत..गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया वारली चित्र काढत असतं. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपध्दती चित्रित केलेली आढळते.जीवनाचा सह-आनंद लुटलेला दिसतो.आदिवासी समाजातून बहरलेलं तत्वज्ञान यामध्ये सापडतो,त्यांची निसर्गाप्रति असलेली कृतज्ञता आणि प्राणिमात्रांवरचं प्रेम यामध्ये आपल्याला दिसतो.
55)डियर तुकोबा~विनायक होगाडे
225₹ घरपोच(शिपिंग फ्री)
'तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन रुपात लेखकांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज ते आपल्या मनात विचारांचे हिंदोळ-कल्लोळ मातविणारे आहे. चारशेंवर वर्षांआधी तुकोबांनी आपल्यात पेरलेली सांस्कृतिक जनुके आजही आपल्यात वाहती असल्याने तुकोबा समकालीनच आहेत, हे ढळढळीत सत्य होय. म्हणूनच होगाडे यांनी काळाची काही मोडतोड, खेचाखेच केली आहे असे अजिबातही वाटत नाही. आज ज्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि मानसिक स्थितीत एक समूह म्हणून आपण जगत आहोत, त्या वर्तमानात तुकोबांची अशी आठवण होणे, करणे आवश्यकच आहे, हे होगाडे यांनी फार प्रत्ययकारी प्रकारे केले आहे. आधीच्या कविता आणि अखेरीचे स्फुट यांच्या बळावर ही 'ट्रायल' फार सामर्थ्याने उभी करून होगाडे यांनी फार वेधक आणि महत्वाचे सांस्कृतिक जागरण मांडले आहे.
56)रफ स्केचस -सुभाष अवचट
मुळ किंमत - 400₹
We read- 355₹घरपोच.(शिपिंग फ्री)
कॅनव्हास रंगवताना अनेक क्षण असे येतात ज्यांचं वर्णन करता येत नाही. त्याचं रियलायझेशन त्या चित्रात दडलेलं असतं. अशा जगण्यात, अशा क्रिएटिव्हिटीमध्येच डोळस निर्वाणाचे आभास दडलेले असतात. त्याची चाहूल खेड्यातल्या तुमच्या बालपणात मिळत जाते. बुद्धाची शिकवण काय आहे हे शोधत गेल्यास तुम्हाला परफेक्ट शांती आणि आनंद मिळतो. खेड्यात पायवाटांवरती शांतता चोहीकडे पसरलेली दिसते. झाडांच्या सावलीला टेकलेले शेतकरी एकही शब्द न बोलता मजेत बसलेले दिसतात. चावडीवर बसलेले गावकरी आनंदाने गप्पा मारताना दिसतात. शेतात रापलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर असाच एकात्मिक आनंद पसरलेला दिसतो..
57)मऱ्हाटा पातशाह -केतन कैलास पुरी
Paperback/New
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
अजिबात कसली अलंकारिक भाषा नाही कि जड शब्दाची सद्दी नाही. सहजसोपी आणि प्रत्येकाला समजेल अशा भाषेनं शिरसवाडी समृद्ध आहे.शिरसवाडी म्हणजे डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या गावाची आणि गावातल्या साध्याभोळ्या लोकांची निर्मळ गोष्ट. प्रत्येकानं वाचावा आणि आपल्या घरातल्या ग्रंथालयात जपून ठेवावा, असा हा ऐवज आहे.
शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या चित्राची निर्मिती ज्या प्रसंगी झाली, त्याचे केलेले वर्णन.. एका उत्कृष्ट चित्रकाराकडून.. एक असा व्यक्ती जो शिवाजी महाराजांना भेटला, त्यांची चित्रे काढली.. पण आजही इतिहासाच्या पानांमध्ये हरवला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे घेतलेला मागोवा म्हणजेच “मन्हाटा पातशाह”….
58)माइन काम्फ ~ हिटलर 🌱
255₹घरपोच(शिपिंग फ्री)
1924 मध्ये दोन भागांत लिहिण्यात आलेले 'माइन काम्फ' हे हिटलरचे गाजलेले पुस्तक! समाजवादी जर्मन राज्याच्या निर्माणासाठी हिटलरने प्रचंड मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी त्याला अटक झाली आणि म्युनिक येथील पीपल्स कोर्ट येथे त्याच्यावर खटलाही दाखल करण्यात आला. त्या तेरा महिन्यांच्या तुरुंगवासात हिटलरने या पुस्तकाचा पहिला भाग, तर सुटका झाल्यावर दुसरा भाग लिहिला.
हे पुस्तक म्हणजे गेल्या शतकातील अत्यंत हुशार क्रूरकर्मा असलेल्या नेत्याच्या राजकीय विचारसरणीची, त्याच्या श्रद्धा व प्रेरणांची आणि जर्मनीला एक महान राष्ट्र तसेच नाझींना तिसरे राईश बनवण्याच्या त्याच्या संघर्षाची एक चित्तरकथाच होय.
59)डॉ.बाबासाहेब आंबेडकर: अनुभव आणि आठवणी
~ नानक चंद रत्तू
250₹ घरपोच(शिपिंग फ्री)
ट्रकभर ग्रंथसंग्रह विकत घेणारा जगातील बाबासाहेब आंबेडकर हा पहिला माणूस असावा . ही खरेदी केलेली पुस्तके आपल्या राजगृहात न नेता आपले अतीजवळचे अपत्य असलेल्या सिध्दार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जमा केली आजही त्या अमृततुल्य ज्ञानरुपी सागरात बरेच विद्यार्थी , अभ्यासक , विचारवंत , ग्रंथप्रेमी मंडळी पोहून त्याचा मनस्वी आनंद व आस्वाद घेत असतील आणि आहे.
60)पैशाचे मानसशास्त्र ~ मॉर्गन हाऊजेल
225₹घरपोच(शिपिंग फ्री)
पैसा आणि संपत्तीनिर्मिती यांबद्दलचे गैरसमज दूर करत आर्थिक वर्तनातील सुधारणांसाठी सल्ले देणारे हे पुस्तक यशस्वी आणि परिपक्व गुंतवणूकदार कसे बनता येईल, हेही सांगते…
आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीबाबत गाजलेली बहुसंख्य पुस्तके अमेरिकेतील लेखकांची आहेत. सर्वाधिक विक्री होणाऱ्या या पुस्तकांच्या यादीत एका नव्या पुस्तकाची भर पडली आहे. ते पुस्तक म्हणजे- मॉर्गन हाउजेल लिखित ‘द सायकोलॉजी ऑफ मनी : टाइमलेस लेसन्स ऑन वेल्थ, ग्रीड अॅण्ड हॅप्पीनेस’! मॉर्गन हाउजेल हे ‘द कॉलॅबोरेटिव्ह फंड’ या उद्यमशील फंडाचे निधी व्यवस्थापक (भागीदार) आहेत. प्रकाशनानंतर पहिल्या आठवड्यापासूनच ‘बेस्ट सेलर्स’ यादीत असलेले आणि वेगवेगळ्या भाषांत भाषांतरित झालेले त्यांचे हे पुस्तक भारतीय गुंतवणूकदारांना परिपक्व गुंतवणूकदार होण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल.
61)नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवन राजकारण आणि संघर्ष – कृष्णा बोस
मुळ किंमत-400₹
We read -355₹ With शिपिंग घरपोच
नेताजींवर पायाभूत संशोधन करणाऱ्या बोस कुटुंबातील
नामांकित सदस्य कृष्णा बोस यांच्या लेखणीतून उतरलेला
सुभाषचंद्र बोस यांचा संपूर्ण जीवनेतिहास.
बोस कुटुंबातील सदस्य आणि आदरणीय विदुषी कृष्णा बोस यांनी सहा दशकांच्या
कालावधीत लिहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन, राजकारण आणि संघर्ष या
ग्रंथातून बोस यांच्या लहानपणापासून ते ऑगस्ट १९४५ मध्ये झालेल्या नश्वर अंतापर्यंत
त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. यामध्ये एक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक या
जोडीला ‘एक माणूस’ म्हणून ते कसे होते हे अगदी ठळकपणे दिसून येतं.
62)कास्ट मॅटर्स -सूरज एगंडे
Paperback/New
मुळ किंमत - 460₹
We read Price - 385₹घरपोच.(शिपिंग फ्री)
या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेले पहिल्या पिढीचे दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतात. दररोज नरकयातना भोगावा लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरीही यात आढळते. दलितांमधील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात. जोवर दलित सत्ता मिळवण्यासाठीच्या लढ्यात नेतृत्वस्थानी नसतील आणि ब्राह्मणवादाविरोधात ब्राह्मण उभे राहणार नाहीत, तोवर जातीचं अस्तित्व राहणार असल्याची मांडणी एंगडे करतात.
63)अवणी T1 -नवाब शफाअत अली खान
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹घरपोच
ज्यावेळी अवनीचा बंदोबस्त करण्याची बातमी आली त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून याचा निषेध झाला, सोशल मीडियावर तर याचा प्रचंड प्रमाणात विरोध दर्शवला व संताप ही. कारण, अवणीचा बंदोबस्त म्हणजे तिचा अंत होता. याचे कारणही तसेच होते. कारण एक सामान्य वाघीण ज्यावेळी नरभक्षक होते त्यावेळी तीची दहशत अनेकांच्या जीवावर बेतते, त्यामध्ये मुख्य म्हणजे शेतकरी आणि खेड्यापाड्यात राहणारे सामान्य नागरिक. महाराष्ट्रातील अनेकांप्रमाणे मलाही या बातमीचा प्रचंड संताप आला होता, कारण वाघ हा असा प्राणी/ प्रजाती आहे जिचे रक्षण करणे गरजेचे आहे. अगदी विलुप्त होण्याच्या मार्गावर ही प्रजाती आहे. मग अशावेळी एका वाघिणीला मारणे हे कितपत योग्य आहे? हा प्रश्न मलाही अनेकांप्रमाणे पडला होता.
64)साखळीचे स्वातंत्र्य -गौरव सोमवंशी
255₹घरपोच(शिपिंग फ्री)
बिटकाॅईनची निर्मिती कशी झाली ?कोणी व का केली ?
बिटकाॅईन आणि ब्लाॅकचेन म्हणजे नेमकं काय ?हे दोन्ही एकच आहेत का वेगवेगळे ? हा नेमका प्रकार तरी काय आहे? याचा आपल्या दैनंदिन जीवनात काय आणि कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो?हा तंत्रज्ञान कितपत विश्वासू आहे ?या तंत्रज्ञानाचे इतिहास आणि भविष्य काय ? या इतर वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे लेखकाने अगदी विस्तृत आणि सुंदरपद्धतीने अनेक सोपी,रोचक उदाहरणे देऊन दिलेली आहे.ज्यामुळे हे पुस्तकं फारच वाचनीय बनते.कुठलाही ज्ञान कधीही केव्हाही वाया जात नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा ज्ञान आपल्या जवळ असायला हवं आणि भविष्याचा विचार करता तंत्रज्ञानाचा ज्ञान तर प्रत्येकाला असायलाच हवं तशाच एका तंत्रज्ञानापैकी या एका तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणे हे फार महत्वाचे आहे.इंग्रजी मध्ये तर याबद्दल असंख्य पुस्तके, लिहिली गेली आहेत पण मराठीत तरी हवं तसं पुस्तक याबद्दल नव्हतं जे सहज आणि सोप्या भाषेत आपल्याला याबद्दल माहिती देईल.आणि ही कमी हे पुस्तक कमी करून आपली ओळख नवीन तंत्रज्ञानाशी करून देते.
65)घोस्ट रायटर -आशिष महाबळ
मुळ किंमत-250₹
We read -215₹ With शिपिंग घरपोच
विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात.
66)बाईमाणूस - करुणा गोखले
260₹घरपोच(शिपिंग फ्री)
'समान मानव माना स्त्रीला असे कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात. वास्तवात मात्र किमान मानव माना स्त्रीला अशी विनवणी करावी लागते. Man is a rational being. माणूस सुज्ञ, तर्कनिष्ठ असतो असे अँरिस्टॉटलने म्हणून ठेवले आहे. परंतु स्त्रीविषयी विचार करताना, तिच्याशी वागताना मात्र तो तसा राहत नाही. म्हणून तर मानवी हक्कांची सनद लिहिली गेली, तेव्हा त्यात स्त्रीला कुठलेच हक्क दिले गेले नाहीत. कालांतराने स्त्रियांनीच सुज्ञ होऊन, तर्कनिष्ठ राहून आपणसुध्दा आधी मानव आहोत हे सांगण्यास सुरुवात केली. त्यांचे हे सांगणे म्हणजेच स्त्रीमुक्तिवाद. किमान तो तरी सुज्ञपणे आणि तकनिष्ठ राहून समजून घ्यावा यासाठी हा पुस्तक प्रपंच.
67)भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ~डॉ.बाबासाहेब आंबेडकर
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रामायण-महाभारत हे ग्रंथ वाचून समाधान झाले नाही तेव्हा ते बुद्धांकडे वळले. बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील. मानवासाठी कल्याणकारी असणाऱ्या या धर्मात उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही. समानता हेच तत्त्व या धम्मात व्यापून आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे या धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथातून विस्तृतपणे मांडलेले आहे. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. सबंध मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा हा एक प्रमाण ग्रंथ म्हणता येईल.
68)असा झाला पुणे करार -प्रभाकर ओव्हाळ आणि माझी आत्मकथा -डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मुळ किंमत - 255₹ घरपोच (शिपिंग फ्री)
पुणे करार' युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील एक ऐतिहासिक संघर्ष पर्व! .....त्यातील नाट्यमय घडामोडींवर आधारित, जळजळीत वास्तवाचा वेध घेणारी... एक अनोखी कादंबरी! प्रभाकर ओव्हाळ यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली...!
'प्रभाकर ओव्हाळ हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि अभ्यासक! उपेक्षित, शोषित, पीडित समाजाची सुखदुःखे त्यांच्या जीवनचरित्रातून, वैचारिक लेखनातून... कथा-कादंबऱ्यांतून आत्मियतेने टिपणारे... संवेदनशील लेखक.
69)ऐसा ज्ञानसागरु : बखर मुंबई विद्यापीठाची – अरुण टिकेकर
575₹घरपोच (शिपिंग फ्री)
दीडशे वर्षापूर्वी कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथील विद्यापीठे स्थापन झाली. त्यापूर्वी मुंबई ही देशाची अनभिषिक्त आर्थिक राजधानी झाली होती. मुंबई हे शहर जगाची पूर्वेकडील व्यापारपेठ होती. उद्यमामुळे झालेली आर्थिक प्रगती आणि नामवंत गुरुशिष्यांच्या जोड्यांनी केलेली वैचारिक प्रगती यांच्या सहयोगातून मुंबईत सुधारणा पर्वास प्रारंभ झाला. हाच तो बहुचर्चित प्रबोधन-काळ १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना होणे, आणि सर बार्टल फ्रिअरसारख्या धाडसी गव्हर्नरने किल्ल्याची तटबंदी तोडण्याचा १८६० साली निर्णय घेणे हे मुंबई शहराच्या वाढीसाठी उपयुक्त ठरलेले दोन महत्त्वाचे निर्णय. यापुढील विद्यापीठाची आणि शहराची वाढ समांतरच होणार होती. ती कशी झाली, त्यामुळे समाजाचे प्रबोधन होऊन मुंबईने देशस्तरावर सर्वच क्षेत्रांचे नेतृत्व कसे मिळवले… हा सारा रोमहर्षक इतिहास या पानांवर ग्रथित आहे. मुंबईसंबंधी प्रकरण, नंतर विद्यापीठाच्या विकासाच्या आलेखाची काही प्रकरणे असा आकृतिबंध लेखकाने स्वीकारल्याने १९व्या शतकातील शैक्षणिक आणि अन्य घडामोडी आपल्यासमोर घडत आहेत असा आभास होतो, इतका वाचक गुंगून जातो. वाचनीयता हा या इतिहास-लेखनाचा विशेष मानावा लागेल. किंबहुना पक्के संशोधन वाचनीय असू शकत नाही, या गैरसमजाला या ग्रंथाने पुन्हा एकवार छेद दिला आहे.
70)हिपोक्रॅटिसची शपथ – डॉ. चंद्रकांत शंकर वागळे
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांत वैद्यकाचा इतिहास आवर्जून शिकवला जातोच असे नाही. या विषयावर भारतात फारच कमी लिखाण झाले आहे. मराठीतही काही लेखकांनी स्फुट स्वरूपाचे लेखन केले आहे. वैद्यकीय अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या विषयावर डॉ. चंद्रकांत वागळे यांनी बराच अभ्यास करून ‘वैद्यकाची यशोगाथा’ आणि ‘आत्मा ते जनुक’ ही दोन पुस्तके लिहिली. ‘हिपोक्रॅटिसची शपथ’ या पुस्तकात वैद्यकातील महत्त्वाचे चर्चाविषय आणि अजरामर संशोधनकार्य करूनही प्रकाशझोतात नसलेल्या पाश्चात्त्य आणि काही भारतीय संशोधकांची ओळख डॉ. वागळे यांनी करून दिली आहे. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरचे वर्तन कसे असावे याबद्दल प्रत्येक वैद्यकप्रणालीतील पूर्वसुरींनी काही नीतिनियम, बंधने, काही सूचना आपल्या लेखनातून मांडल्या आहेत. चरक, सुश्रुत या भारतीय आचार्यांनी आपापल्या संहितांमध्ये तर ग्रीसमधल्या हिपोक्रॅटिस या रोगोपचारकाने वैद्यक व्यावसायिकांनी पाळावयाची आचारसंहिता स्पष्टपणे नोंदवून ठेवली आहे. विशेषतः वैद्यकीय व्यावसायिकांना नीतिमत्तेची जाणीव करून देऊन वैद्यकाला उदात्त पातळीवर नेण्याचे कार्य हिपोक्रॅटिसने केले. हिपोक्रॅटिस आणि इतर संशोधकांनी वैद्यकशास्त्राची दिलेली नीतिमत्तेची ही आचारसंहिता या पुस्तकातून वाचकांसमोर येते. त्याचबरोबर वैद्यकाच्या इतिहासाचा माहितीपूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न ह्या छोटेखानी पुस्तकातून डॉक्टर वागळे यांनी केला आहे. या पुस्तकामुळे वैद्यकशास्त्राकडे बघण्याचा एक सजग दृष्टिकोन वाचकांना मिळेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा