डायरी वगैरे 🌿🖤
1.आपल्या स्वार्थासाठी कोणासोबतही 'मैत्री' किंवा 'प्रेम' करू नका.आपल्या काम नि मतलबपूर्ती मैत्री किंवा प्रेम करायचं आणि मग त्या व्यक्तीला अर्ध्यात सोडून द्यायचं हे असलं अजिबात करू नका.सुरुवातीला प्रेमळ बाता मारून त्याला भुलवायचं, आपलं स्वार्थ पूर्ण करायचं आणि मग निघून जायचं हे फार वाईट आहे.कोणालाही कोणाच्याही भावनेसोबत खेळण्याचा अधिकार अजिबात नाही.तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीसोबत टाईमपास प्रेम/मैत्री करत असाल तर त्याला सरळ सरळ सांगून द्या.तेव्हा त्याला तेवढं दुःख होणार नाही जेवढं पुढे होईल.तुम्ही जरी त्या व्यक्तीला विशेष मानत नसाल पण तो मनापासून तुम्हाला आपला मानत असतो. तुमच्या आयुष्यात त्याला किंमत नसते पण त्याच्या आयुष्यात तुम्हाला खूप किंमत असते..कोणालाही स्वप्न दाखवू नका,एकट्याला तुमची सोबत देऊ नका आणि जर देत असाल तर कृपया करून त्याचा साथ शेवटपर्यंत सोडू नका.ती व्यक्ती तुमच्यासाठी टाईमपास असेल पण त्याच्या साठी तुम्ही टाईमपास नसता. एकवेळ आर्थिक लुबाडणूक करा पण भावनिक लुबाडणूक करू नका.हे त्याला सहन होणार नाही.तो/ती आतून तुटून जाईल.पुन्हा कोणावर विश्वास करायला तो 1000 व...