We Read यादी ❤️💛


यादीतील कोणतेही पुस्तकं हवं असल्यास मला
https://wa.me/7066495828 या व्हाट्सअप्प नंबरवर लगेच कळवून पत्ता पाठवावा....♥️💛

__________________________________________
1)आणखी काही प्रश्न -अनिल अवचट
मुळ किंमत - 200₹
We read Price - 185₹घरपोच.(शिपिंग फ्री)

2)जॉर्ज ऑर्वेल ~ विशाखा पाटील
मुळ किंमत - 400₹
We read Price - 365₹घरपोच.(शिपिंग फ्री)

जॉर्ज ऑर्वेल ‘१९८४’ आणि ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुद्ध आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिरस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक.
हळव्या मनाचा बाप. हा मनस्वी लेखक कसा जगला? त्याचे सार्वकालिक ठरलेले विचार कोणत्या विलक्षण अनुभवांच्या मुशीतून घडले? कोणत्या विचारांचं बीज पेरत होता तो? त्याच्या आयुष्याची आणि साहित्याची ही कहाणी.

3)भुरा -शरद बाविस्कर (10 वी आवृत्ती)
मुळ किंमत - 500₹
We read किंमत - 425₹ घरपोच (शिपिंग फ्री)

धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या, भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या, तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या, 'भुरा' ही आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स, अल्थुझर, ग्राम्शी , महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन.

4)ताई मी कलेक्टर व्हयनू -राजेश पाटील
मुळ किंमत - 200₹
We read Price - 185₹घरपोच.

5) भंगार -अशोक जाधव
Paperback/New
मुळ किंमत - 200
We read Price - 185₹घरपोच.

मराठी साहित्यात यापूर्वी ‘बलुतं’, ‘उपरा’, ‘उचल्या’, ‘कोल्हाट्याचं पोर’, ‘अक्करमाशी’ अशी अनेक आत्मचरित्रं आली. त्यांनी आपापल्यापरीने डोंबारी, कैकाडी, कोल्हाटी अशा समाजांच्या व्यथा वेशीवर टांगल्या आहेत. ‘भंगार’ हे आत्मचरित्र गोसावी समाजाचं चित्र आपल्यापुढं ठेवतं. गोसावी समाजाचं भटकं जीवन, तीन दगडांची चूल, तीन थामल्यांवर (काठ्यांवर) उभी पालं, भंगार गोळा करण्यातील मरण यातना, कोंडाळ्याचे तीन भागीदार (माणूस, कुत्रं नि डुक्कर), जातपंचायतीचा बडेजाव, स्त्रीचं अस्तित्वहीन जगणं. मुलांचं जन्मत: नि जन्मभर वंचित जगणं, हे सारं शब्दबद्ध करणारं ‘भंगार’ वाचकाला गोसावी समाजाचं भंगारपण समजून घ्यायला भाग पाडतं...

6) पैशाचे मानसशास्त्र -मार्गन हाऊजेल
Paperback/New
मुळ किंमत - 250
We read Price - 220 घरपोच.

पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोकं पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक १९ गोष्टी सांगत आहेत, शिवाय आयुष्यातील महत्वाच्या विषयांपैकी एक अशा 'पैसा' या विषयावर महत्वाचे धडे देत आहेत.

7)वाट तुडवताना -उत्तम कांबळे
Paperback/new
मुळ किंमत - 250
We read Price - 225 घरपोच.(शिपिंग फ्री)

वाट तुडवताना' हे रूढ अर्थाने आत्मकथन आहे; पण आत्मचरित्राची समग्रता त्यात नाही. अर्थात लेखकालाही ते अभिप्रेत नाही. श्री. उत्तम कांबळे यांच्या विद्याजीवनाची जडणघडण ज्यातून कळते, असे हे विशिष्ट क्षेत्रीय आत्मकथन आहे. .....

8)कॉसमॉस - अनुवाद (प्रणव सखदेव)
मुळ किंमत - 450₹
We read Price - 375₹घरपोच.(शिपिंग फ्री)

9)प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन -विवेक बिंद्रा
मुळ किंमत - 200
We read Price - 200 घरपोच.(शिपिंग फ्री)

आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडत प्रत्येकालाच झळाळत्या यशाची वाट दाखवणारं पुस्तक
या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल ?
• कामातली अनावश्यक दिरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष्य केंद्रीत कसं करावं ?
अतिरिक्त ताणतणाव कमी करून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य संतुलन कसं साधावं?
प्रभावी नियोजनाच्या साहाय्यानं आपली कार्यक्षमता कशी वाढवावी ?
वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासह अपेक्षित ध्येयपूर्ती कशी साध्य करावी ? 'सर्वांत मोठी पाच उद्दिष्टं' आणि 'सर्वांत लहान पाच उद्दिष्ट म्हणजे नेमकं काय ?

10)भंडारभोग आणि चौंडक' - राजन गवस
मुळ किंमत - 420₹
We Read - 375₹ घरपोच (शिपिंग फ्री)

रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी... याच रूढीपरंपरांचा आणखी एक बळी म्हणजे जोग्या! ग्रामीण भागात असे देवीला वाहिलेले किती तरी जोगते आढळतात. यांचं जीवन देवदासीपेक्षाही भयावह...! देवदासी झुलवा लावू शकते. एखाद्या पुरुषाची रखेल म्हणून राहू शकते. ती मेली, तर प्रेताला माणसं जमतात. कुणाच्या तरी बांधाला जागा मिळते; पण जोगत्याच्या तिरडीला माणूसच मिळणं कठीण... त्याचा स्पर्शही इंगळीसारखा... त्याच्या नशिबी फक्त अंधार... तोही पुरुषासारखा पुरुष असतो; पण रूढीपरंपरांच्या ओझ्यानं त्याला सगळंच गमवावं लागतं तर,
आपल्या समाजातील देव, धर्म, अनिष्ट रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी. `जोगतीण देवाची, मालकी गावाची` ही आपल्या बोलीतील म्हण तिच्या जगण्याचं सार सांगते. देवाच्या नावावर समाजातील राक्षसी वृत्तींनी निर्माण केलेल्या प्रथेच्या बळी ठरलेल्या देवदासी स्त्रियांची होरपळ `चौंडकं` ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते. स्त्रीदु:खाचा नेमका वेध, बोलीची सर्व सामर्थ्य पचवून राजन गवस यांनी `चौंडकं`मध्ये घेतला आहे. `सुली`च्या व्यक्तिरेखेतून एक ठसठशीत वेदना आपल्यासमोर येते. देवदासीच्या जगण्यातील सर्व दु:ख आणि तिच्या समस्यांचा वेध घेणारी कादंबरी म्हणून `चौंडकं`ची नोंद विशेषत्वानं करावी लागेल.

11)पर्व -डॉ.एस.एल. भैरप्पा
मुळ किंमत - 550₹
We read Price - 485₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक.

12)हसरे दुःख - भा.द खेर
मुळ किंमत - 500₹
We read Price - 450₹घरपोच.(शिपिंग फ्री)

माझं आयुष्यच नाटयमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो. आपल्या हस-या मुखवटयातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी. '

13)मृत्यू पाहिलेली माणसे -गौरी कानेटकर
मुळ किंमत - 200₹
We read Price - 185 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

14)त्याने गांधींना का मारलं - अशोक कुमार पांडेय
New/paperback
मुळ किंमत - 300₹
We read Price - 250₹ घरपोच.

हे पुस्तक स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा
आणि हिंसा या तत्त्वज्ञानांच्या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या
सामाजिक-राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या
हत्येमागची कारणं समोर आणतं. त्याबरोबरच
गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी
जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. हे पुस्तक
गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत
नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या
वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं.

15)तेल नावाचं वर्तमान -गिरीश कुबेर
मुळ किंमत :-325₹
We read Price :-295₹घरपोच (शिपिंग फ्री)

गेली अनेक दशकं तेलाच्या विहिरींतून आणि तेलवाहिन्यांतून बरंच ‘काळं सोनं' वाहून गेलं. पण गेल्या दीड-दोन दशकांत घडलेल्या उलथापालथींमुळे तेल एका नव्या वळणावर स्थिरावलं. तापलेल्या वसुंधरेची चिंता वाहणाऱ्या पर्यावरणजाणिवांनी तेलाच्या उपयुक्ततेलाच आव्हान दिलं. इतकी शतकं तेलावर पोसल्या गेलेल्या, औद्योगिक प्रगतीची फळं चाखणाऱ्या, निसर्गावर मात करू पाहणाऱ्या या माणूस नावाच्या प्राण्याच्या यापुढच्या जगण्याचा आधार वसुंधरेच्या गर्भातून निघणारं हे खनिज तेल असेल का? तेलाच्या रक्तरंजित इतिहासानंतर तितक्याच रक्तरंजित वर्तमानाचा वेध.

16)डोंगरी ते दुबई - हुसैन झैदी
मुळ किंमत -495₹
We read किंमत - 395₹ घरपोच (शिपिंग फ्री)

मुंबईवर ६० वर्षे आपला प्रभाव पाडणारे गुंडाच्या टोळ्यांचे डॉन होते. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम हे होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांची तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे.

17)पहिला नंबरकारी -अमिता नायडू
Paperback/new
मुळ किंमत - 350₹
We read Price - 300? घरपोच.(शिपिंग फ्री)

खून, चोरी, घरफोडी, लूट, खंडणी, किडनॅपिंग, बलात्कार यासारख्या गुन्ह्यांमध्ये जेव्हा अल्पवयीन मुलं सापडतात तेव्हा काय असते सामान्यांची प्रतिक्रिया ? १६-१७ वर्षाच्या मुलाला फाशी द्या, त्यांना कडक शिक्षा द्या ही आणि अशीच ना? या दबावामुळे मुलांच्या कायद्यातही बदल केले जातात.

18)आदिवासी बोधकथा -एक पुनकर्थन :-
प्रदीप प्रभू/सिराझ बलसारा
Paperback/New
मुळ किंमत - 250₹
We read Price - 215₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

हे पुस्तक खरंच खूप जबरदस्त आणि अप्रतिम आहे.यातील प्रत्येक कथा उत्कृष्ट असून यामध्ये दिलेली वारली चित्रं तर खूप भन्नाट आहेत..गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया वारली चित्र काढत असतं. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपध्दती चित्रित केलेली आढळते.जीवनाचा सह-आनंद लुटलेला दिसतो.आदिवासी समाजातून बहरलेलं तत्वज्ञान यामध्ये सापडतो,त्यांची निसर्गाप्रति असलेली कृतज्ञता आणि प्राणिमात्रांवरचं प्रेम यामध्ये आपल्याला दिसतो.

19) मोठी माणसं -नरेंद्र चपळगावकर
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळात आपल्या समाजजीवनावर अनेक व्यक्तींनी प्रभाव टाकला, त्यातील काहींची ही व्यक्तिचित्रे . त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे राजकीय विचार, त्यांच्या कार्यपद्वती आणि त्यांच्या जीवननिष्ठाही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे.

20)श्रीमानयोगी -रणजित देसाई
मुळ किंमत -570₹
We read- 485₹घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)

श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अतिशय उत्कृष्ट कादंबरी आहे. या कादंबरीचे एकूण अकरा भाग आहेत आणि प्रत्येक भागात अनेक प्रकरणं आहेत. पूर्ण कादंबरीत कुठेही घटनांच्या तारखा आणि साल न दिल्याने वाचणे सुसह्य होते. श्रीमान योगी...हे नक्की चरित्रलेखन आहे की आत्मकथन असा पानोपानी प्रश्र्न पडावा इतक्या मधूर आणि आत्मीय शब्दसंपन्नतेत सखोल मांडणी तेही भावनीक ओल कुठेही हलू न देता.

21)महामाया निळावंती -सुमेध
मुळ किंमत - 350₹
We read किंमत - 325 घरपोच (शिपिंग फ्री)

22)आर्टिफिशियल इंटेलिजन्स -अच्युत गोडबोले
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)

आर्टिफिशियल इंटेलिजन्स १९५० च्या दशकांपासून बघितलं गेलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वप्न अनेक खाच खळगे पार करत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, नॅचरल लँग्वेज अशा अनेक तंत्रज्ञानांच्या मदतीनं आता पूर्णत्वास येतंय. कला क्षेत्रासकट सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालायला ते आता सज्ज झालंय. या कल्पनेमागचा इतिहास, वेगवेगळ्या तंत्रज्ञानांची ओळख, त्याचे उपयोग, त्याचे भविष्यात होणारे विपरीत परिणाम, UBI या सगळ्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’

23)अनर्थ -अच्युत गोडबोले
मुळ किंमत - 280₹
We read Price - 255₹घरपोच.(शिपिंग फ्री)

24)झाडाझडती - विश्वास पाटील
मुळ किंमत - 425₹
We read Price - 385₹घरपोच.(शिपिंग फ्री)

तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्याे हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कादंबरी. '

25)नास्तिकयात्रा -सुनील दांडेकर
मुळ किंमत -350₹
We read किंमत - 325₹ घरपोच (शिपिंग फ्री)

या पुस्तकाचा उद्देश
तुम्हाला काही पटविण्याचा वा विकण्याचा नाही,
तर काही विचार तुमच्यासमोर तपासायला ठेवण्याचा आहे.
कोणत्याही विचारसरणीबद्दल तुम्हाला साशंक बनवण्याचा आहे.
मग तो विचार विज्ञानातला असो वा देवाधर्माचा !
देव आणि धर्म याबाबतीत आधुनिक विज्ञानाने
जे प्रश्न उपस्थित केले आहेत
आणि अनेक क्षेत्रांमधील अनेक प्रश्नांची
विज्ञानाने जी समर्पक उत्तरे दिली आहेत,
त्यांचा गोषवारा वाचकापर्यंत पोहचविणारी
तर्कवादाच्या दिशेने टाकलेली पाच पावले म्हणजे
नास्तिकयात्रा

26)बिग बिलियन स्टार्टअप - मिहीर दलाल
मुळ किंमत :-300₹
We read Price :-250₹घरपोच (शिपिंग फ्री)

ई - कॉमर्स , उद्योजकता आणि आपल्या खरेदीच्या सवयी आणि जीवनशैलीला संपूर्णतः नवं स्वरूप देणाऱ्या भारताच्या सर्वात मोठ्या स्टार्टअपचा विश्वासार्ह वृत्तान्त . आय . आय . टी . पदवीधर सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल ह्या दोघांनी बंगलोरमधील एका घरातून चालू केलेलं ' फ्लिपकार्ट पुढे भारतातील सर्वात मोठं ई - कॉमर्स स्टार्टअप बनलं .

27)एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
मुळ किंमत -250₹
We read किंमत - 225₹ घरपोच (शिपिंग फ्री)

अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे,
एका विचित्र वळणावर
सारी मानवजात येऊन ठेपली आहे.
आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच
पर्याय उरलेले आहेत.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्या
आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर
हताशपणे वाटचाल करायची
किंवा परत मागे फिरून कार्व्हरने
दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या
संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण
या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा.
भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया
घालायचा असेल तर
प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच
हवे असे पुस्तक.

28)दस्तावेज -आनंद विंगकर
मुळ किंमत -750₹
We read किंमत - 675₹ घरपोच (शिपिंग फ्री)

28)पारधी -गिरीश प्रभुणे
मुळ किंमत - 450₹
We read Price - 400₹घरपोच.(शिपिंग फ्री)

समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि ख-याखु-या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या एका अन्यायग्रस्त जमातीची ही आक्रोशकथा आहे... त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोय-यांच्या उत्कर्षासाठी झटणा-या एका तळमळीच्या कार्यकर्त्याने ही मांडलेली कैफियत आहे...

29)मी संदर्भ पोखरतोय -पवन नालट
मुळ किंमत - 280₹
We read Price - 250₹घरपोच (शिपिंग फ्री)

मला माहीत होतं थडग्यांवर जीव लावणारी माणसं सर्वच धर्मांत असतात माणसांवर जीव लावणारी माणसं सापडत नाहीत कुठेही! धर्मानं बांधल्या होत्या कधीच्याच कबरी माणसाचं अस्तित्व खोल पुरून कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रकोरीमधून माणसांच्या विचारांना विचारांनी तिलांजली देणारी माणसं विवेकाचा कत्लेआम करत असतात दररोज...

30)कुतूहलापोटी -अनिल अवचट
मुळ किंमत - 200₹
We read Price - 185₹घरपोच
#stronglyrecommended

माणसाचा जन्म हे एक मोठे कुतूहल आहे. जन्मानंतरही अनेक गोष्टींबद्दल प्रश्न उभे राहतात. त्याबद्दल आश्चर्य वाटत राहते. लेखक, कलावंत अनिल अवचट यांनाही कित्येक गोष्टींबद्दल मनात प्रश्न निर्माण होतात. त्याचे उत्तर शोधण्याच्या ध्यासातून त्यांना खूप वेगळी, अद्भुत माहिती हाती येते. हीच माहिती त्यांनी 'कुतूहलापोटी'मधून वाचकांना सांगितली आहे.

31)शोध -मुरलीधर खैरनार
मुळ किंमत - 600₹
We read Price - 555₹घरपोच(शिपिंग फ्री)

32)झांबळ -समीर गायकवाड
मुळ किंमत - 280₹
We Read - 255 घरपोच (शिपिंग फ्री)

भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत.
काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत
आहे. याच तोलामोलाची माणसं या कथांत
भेटतील, ही माणसं अनेकाथांनी घनदाट होती.
त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी
जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता,
त्यांची नाती अतुट मायेची होती आणि मुख्य
म्हणजे अंधाराच्या उंबऱ्यावरच्या प्रकाशखुणा
त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या
अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातल
वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं.

33)गढीवरून -राजा गायकवाड
मुळ किंमत -300₹
We Read - 255₹ घरपोच (शिपिंग फ्री)

कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत.

34)सलोख्याचे प्रदेश -सबा नक्वी
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)

भारतात अनेक जाती - धर्मांचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा वेगळ्या असतात. तरी 'अनेकतात एकता' म्हणतो त्याप्रमाणे येथील प्रमुख हिंदू व मुस्लीमांच्या परंपरा, सण, उत्सव, एकत्र साजरे होतात.
अशा काही ठिकाणी भेट देऊन तेथील समजाचे चित्रण सवा नक्वी यांनी 'सलोख्याचे प्रदेश' मधून दाखविले आहे.

35)न्याय – मायकल सॅंडेल
#Recommended
मुळ किंमत - 400₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)

36)छावा -शिवाजी सावंत
मुळ किंमत - 750₹
We read Price - 675₹घरपोच

आजतागायत संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या वर्णनाची मोहिनी कायम राहिली आहे. संभाजीराजांचे तामसी, अविचारी रूप पुसून टाकून संवेदनशील, हळवं, करारी आणि देशप्रेमी रूप या चरित्रातून दृगोचर होतं. 'संभाजीराजे खरच व्यसनांध असते, तर शेवटच्या कठोर साजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते. कारण ती साजाच तेवढी क्रूर आणि अमानवी होती, ' असं सावंत दाखवून देतात.

37)शिकता शिकविता -निलेश निमकर
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹घरपोच

38)नर्मदे हर हर -जगन्नाथ कुंटे
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹घरपोच

39)लॉर्ड्स ऑफ द डेक्कन – अनिरुद्ध कणिसेट्टी
मुळ किंमत - 500₹
We Read -455₹घरपोच (शिपिंग फ्री)

40)अवणी T1 -नवाब शफाअत अली खान
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹घरपोच

41)अखेरचे शिलेदार -पी.साईनाथ
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

42)बा भीमा (कॉमिक्स)
185₹घरपोच (शिपिंग फ्री)

43)केदारनाथ 17 जून -डॉ.प्रकाश कोयाडे
मुळ किंमत - 390₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)

44)मरण स्वस्त होत आहे -बाबुराव बागुल
मुळ किंमत - 150₹
We Read -150₹घरपोच (शिपिंग फ्री)

45)बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी 1&2 -सागर शिंगणे
We read किंमत - 175₹घरपोच (शिपिंग फ्री))

46)रिवर्क -जेसन फ्राईड
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹ घरपोच (शिपिंग फ्री)

47)बाबासाहेबांच्या 21 ग्रंथाचे सार -वैभवकुमार शिंदे
मुळ किंमत - 280₹
We Read -250₹घरपोच (शिपिंग फ्री)

48)डॉ.बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर
मुळ किंमत - 900₹
We read Price - 785 ₹घरपोच(शिपिंग फ्री)

एवढी तेवढी प्रतिकूलता कोणाच्याही वाट्याला कधीमधी येते. पण जन्माबरोबरच प्रतिकूलता डोंगरासारखी पुढ्यात हजर असलेल्या माणसाने काय करावे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात प्रतिकूलतेने जे तांडव घातले ते पचवून बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले, चैतन्याने लक्षलक्ष उजळून निघाले. ती दीप्ती अशी अभिनव होती की तिने बाबासाहेबांच्या कोटीकोटी बांधवांना जागृत करून ‘मदायत्तं तु पौरुषं’चा मंत्र त्यांच्या प्राणांत भरला आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले.

49)वोल्गा ते गंगा -राहुल सांकुत्यान
मुळ किंमत - 350₹
We read किंमत - 325₹घरपोच (शिपिंग फ्री)

50)नपेक्षा -अशोक शहाणे
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225घरपोच (शिपिंग फ्री)

51)मित्रांना शत्रू करू नका- डॉ.आ ह साळुंखे
आणि चार्वाक -सुरेश व्दादशीर
मुळ किंमत - 250₹
We Read -225₹घरपोच (शिपिंग फ्री)

52)फॅक्चर्ड फ्रीडम -कोबाड गांधी
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

53)बळीवंश -डॉ.आ ह साळुंखे आणि
सेपियन्स – मानव जातीचा अनोखा इतिहास- युव्हाल नोआ हरारी
मुळ किंमत - 1000₹
We Read किंमत -850₹ घरपोच (शिपिंग फ्री)

54)संताजी घोरपडे -रवि मोरे
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

55)औरंगजेब -यदुनाथ सरकार(मराठी)
मुळ किंमत - 550₹
We read किंमत - 500₹घरपोच (शिपिंग फ्री)

56)फुलेल तेव्हा बघू -विनोदकुमार शुक्ल
मुळ किंमत - 300₹
We read किंमत - 255घरपोच (शिपिंग फ्री)

57)प्रकाशवाटा -प्रकाश आमटे
मुळ किंमत - 200₹
We read Price - 185₹घरपोच.(शिपिंग फ्री)

58)धर्म आणि समलैंगिकता -देवदत्त पट्टनायक
(अनुवाद -सोनाली नवांगुळ)
मुळ किंमत - 220₹
We read Price - 200₹घरपोच

59)लर्न टू अर्न- पीटर लिंच
मुळ किंमत - 370₹
We Read -345₹घरपोच (शिपिंग फ्री)

60)अर्थाच्या शोधात -व्हीकटर फ्रँकलन
मुळ किंमत - 200₹
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)

61)महात्मा जोतीराव फुले – धनंजय कीर
मुळ किंमत - 475₹
We read किंमत - 425₹घरपोच (शिपिंग फ्री)

62)एकलव्य -विजय देवडे
मुळ किंमत - 390₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)

63)अर्थसाक्षर व्हा - अभिजित कोलपकर CA
मुळ किंमत - 400₹
We read Price - 355₹घरपोच.(शिपिंग फ्री)

आपण कमावलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करुन समाधानी आयुष्य जगायचे असेल तर हे पुस्तक उपयोगी आहे.
तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करुन विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करुन तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे याचे उत्तम मार्गदर्शन ’अर्थसाक्षर व्हा’ मधे वाचायला मिळते

64)मेळाघाटावरील मोहोर, डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे
मुळ किंमत - 350₹
We Read किंमत -325₹घरपोच (शिपिंग फ्री)

एका आगळ्या समाजपरिवर्तनाच्या प्रयोगाची ही कहाणी मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश. येथे तापी-खापरा-सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव बैरागड. दारिद्रयानं पोखरलेलं, आजारानं ग्रासलेलं, अज्ञानात पिचलेलं हे छोटं गाव . १९९० च्या आसपास डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे येथे आले.

65)इंडियाज मोस्ट फिअरलेस
मुळ किंमत -280₹
We Read किंमत -245₹घरपोच (शिपिंग फ्री)

66)स्टार्टअपविषयी सर्व काही -अनंत सरदेशमुख
Binding: पेपरबॅक
मुळ किंमत -300₹
We Read किंमत -275₹घरपोच (शिपिंग फ्री)

स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, इथपासून स्टार्टअप उद्योजकांची अपेक्षित गुणवत्ता, उद्योगकल्पनेचा शोध, उद्योगाची आखणी, भांडवलउभारणी, स्टार्टअपची रचना आणि व्यवस्थापन, स्टार्टअपचा वाढविस्तार अशी चौफेर नि समग्र मांडणी करणारं मराठीतलं एकमेव सोपं आणि माहितीपूर्ण पुस्तक... स्टार्टअपविषयी सर्व काही अनंत सरदेशमुख यांचे ‘स्टार्टअपविषयी सर्व काही' हे पुस्तक माहितीपूर्ण, बोधप्रद व स्फूर्तिदायक आहे. रंजक संवादातून विषयाची प्रस्तुती, एका बैठकीत पुस्तकाचे पूर्ण वाचन करायला लावते.

67)नाझी भस्मासुराचा उदयास्त -वि.ग कानिटकर
Paperback/New
मुळ किंमत - 525₹
We read Price - 485₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता
अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख
सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते?
हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच
डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा
अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.

68)आंबेडकर जीवन आणि वारसा -शशी थरूर
मुळ किंमत - 300₹
We read किंमत - 255₹ घरपोच (शिपिंग फ्री)

69)झुंड -बाबाराव मुसळे
मुळ किंमत -580₹
We Read - 455₹ घरपोच (शिपिंग फ्री)

70)हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ – भालचंद्र नेमाडे
मुळ किंमत - 750₹
We read किंमत - 675₹ घरपोच (शिपिंग फ्री)

71)सोयरीक घराशी | अंजली कीर्तने
मुळ किंमत - 350₹
We read किंमत - 325₹ घरपोच (शिपिंग फ्री)

72)जातिव्यवस्थेचे उच्चाटन-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मुळ किंमत - 300₹
WE Read :- 255₹घरपोच (शिपिंग फ्री)

73)सेपियन्स -युवाल नोवा हरारी
Paperback/New
मुळ किंमत - 500
We read Price - 400 घरपोच.(शिपिंग फ्री)

१ लाख वर्षांपूर्वी माणसाच्या कमीत कमी
६ जाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे.आपण होमो सेपिअन्स
आपण पृथ्वीवर अधिसत्ता कशी स्थापन केली?
आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरं आणि
राज्य कशी स्थापन केली?
देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा
विश्वास ठेवायला लागलो?
आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपलं जग कसं असेल?
माणसाची विचारपद्धती, त्याचं वर्तन, त्याची बलस्थानं आणि त्याचा
भविष्यकाळ यांबद्दलच्या आपल्या सगळ्या समजुतींना आव्हान देणारं
विचारप्रवर्तक पुस्तक... सेपिअन्स!

74)राजश्री शाहू छत्रपती – धनंजय कीर
मुळ किंमत - 725₹
We read Price - 755₹घरपोच(शिपिंग फ्री)

धनंजय कीर ह्यांनी लिहिलेले हे शाहू छत्रपतींचे चरित्र आहे. व्यक्ती वादग्रस्त आणि ज्या समाजात ती वावरली तो समाजही वादळी. या दोघांचे वस्तुनिष्ठ आणि अभिनिवेशरहित चित्रण करणे अवघड. पण किरांकडे चरित्र लेखनाची किमया आहे. ‘नामूलं लिख्यते’ ही धारणा आहे आणि चरित्रविषयांप्रमाणे रूप घेणारी लेखनकला आहे. त्यामुळे हे चरित्र वाचनीय झाले आहे. समाजक्रांतीचा प्रेषित असणारा मनुष्यच महान ठरतो, हे कीरांच्या चरित्रलेखनाचे सूत्र आहे. सावरकर, आंबेडकर, फुले यांच्या चरित्र-परंपरेतील, शाहू छत्रपती हे एक पुढचे पाऊल आहे.

75)ऑन द फिल्ड -प्रगती बाणखेले
मुळ किंमत - 240₹
WE Read :- 200₹घरपोच (शिपिंग फ्री)

76)मोई कुन आमी कुन ?
मुळ किंमत - 200₹
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)

77)माझे प्रेमाचे प्रयोग -अमित मरकड
मुळ किंमत-250₹
We Read - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)

हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपणं, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक. '

78)संघर्षाची मशाल हाती -नरसय्या आडम
मुळ किंमत -400₹
We Read किंमत -355₹ घरपोच (शिपिंग फ्री)

79)इजिप्सी -रवि वाळेकर
मुळ किंमत - 750
We Read किंमत -650 घरपोच (शिपिंग फ्री)

80)अवघा देहचि वृक्ष जाहला - वीणा गवाणकर
Binding: पेपरबॅक
मुळ किंमत -250₹
We Read किंमत -250₹घरपोच (शिपिंग फ्री)

"माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनंच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या संजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखलं गेलं पाहिजे... खनिज, वनस्पती, प्राणी, माणूस... सर्वांमध्ये! " हे विचार आहेत रिचर्ड बेकर यांचे. वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चणार्‍या पर्यावरणरक्षकाची ही प्रेरणादायी चरितकहाणी...

81)फॉरेस्ट बाथिंग
मुळ किंमत-250₹
We Read -225₹घरपोच (शिपिंग फ्री)

82)प्रिय इंदिरा -पंडित जवाहरलाल नेहरू
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

83)अग्निपंख -डॉ.एपीजे अब्दुल कलाम
Binding: Paperback
पृष्ठ संख्या - 195
मुळ किंमत - 220₹
We Read किंमत -220₹ घरपोच (शिपिंग फ्री)

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे. '

84)मी देशाला काय देऊ शकतो - एपीजे अब्दुल कलाम
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 215घरपोच (शिपिंग फ्री)

85)अंबालक्ष्मी -नितीन थोरात
मुळ किंमत - 280₹
We Read -250₹घरपोच (शिपिंग फ्री)

86)हू किल्ड करकरे - हसन मुश्रीफ
Binding: पेपरबॅक
पृष्ठ संख्या -344
मुळ किंमत - 425
We Read किंमत -385 घरपोच (शिपिंग फ्री)

87)अखेरची लढाई
मुळ किंमत - 240₹
We read किंमत - 190₹घरपोच (शिपिंग फ्री)

अखेरची लढाई ही कादंबरी सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणीसांच्या जीवनातील विविध घटना-प्रसंगांवर आधारित आहे. नाना फडणीस उणीपुरी दोन तपे पेशवाईच्या कारभारात होते. सवाई माधवराव पेशव्यांच्या माता-पित्याचे अकाली निधन झाल्यानंतर पेशवाईचा वारस म्हणून त्यांनी सवाई माधवरावांची डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. त्यांचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ केला.

88)असा झाला पुणे करार -प्रभाकर ओव्हाळ आणि माझी आत्मकथा -डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मुळ किंमत - 225₹ घरपोच (शिपिंग फ्री)

पुणे करार' युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील एक ऐतिहासिक संघर्ष पर्व! .....त्यातील नाट्यमय घडामोडींवर आधारित, जळजळीत वास्तवाचा वेध घेणारी... एक अनोखी कादंबरी! प्रभाकर ओव्हाळ यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली...!
'प्रभाकर ओव्हाळ हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि अभ्यासक! उपेक्षित, शोषित, पीडित समाजाची सुखदुःखे त्यांच्या जीवनचरित्रातून, वैचारिक लेखनातून... कथा-कादंबऱ्यांतून आत्मियतेने टिपणारे... संवेदनशील लेखक.

89)वाचत सुटलो त्याची गोष्ट -निरंजन घाटे
Paperback/New
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

90)मऱ्हाटा पातशाह -केतन कैलास पुरी
Paperback/New
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

अजिबात कसली अलंकारिक भाषा नाही कि जड शब्दाची सद्दी नाही. सहजसोपी आणि प्रत्येकाला समजेल अशा भाषेनं शिरसवाडी समृद्ध आहे.शिरसवाडी म्हणजे डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या गावाची आणि गावातल्या साध्याभोळ्या लोकांची निर्मळ गोष्ट. प्रत्येकानं वाचावा आणि आपल्या घरातल्या ग्रंथालयात जपून ठेवावा, असा हा ऐवज आहे.
शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या चित्राची निर्मिती ज्या प्रसंगी झाली, त्याचे केलेले वर्णन.. एका उत्कृष्ट चित्रकाराकडून.. एक असा व्यक्ती जो शिवाजी महाराजांना भेटला, त्यांची चित्रे काढली.. पण आजही इतिहासाच्या पानांमध्ये हरवला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे घेतलेला मागोवा म्हणजेच “मन्हाटा पातशाह”….

91) आंबेडकर अनुयायांच्या नजरेतून
Paperback/new
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹घरपोच.(शिपिंग फ्री)

प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या डॉ . भी . रा . आंबेडकर यांच्याजवळ जाण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे . आंबेडकरांना जन्मभर साथ केलेला आणि त्यांच्या सोबतच अस्ताला गेलेल्या क्षणभंगुरतेचे पुनरुज्जीवन हा यामागचा उद्देश आहे .

92)प्रतिपश्चंद्र -डॉ.प्रकाश कोयाडे
मुळ किंमत - 390₹
We read Price - 355₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!. इतिहासावर प्रेम करणाऱ्याने ही कादंबरी वाचावी.

93)

94)वासुनाका -भाऊ पाध्ये
Paperback/new
मुळ किंमत - 200
We read Price - 200 घरपोच.(शिपिंग फ्री)

95)द ओडेसा फाईल -फ्रेडरिक
Paperback/new
मुळ किंमत - 380₹
We read Price - 325₹घरपोच.(शिपिंग फ्री)

सॉलोमन टाउबर या ज्यू व्यक्तीने लिहिलेल्या डायरीत छळ छावणीत हिटलरच्या एस. एस. संघटनेकडून ज्यूंवर केल्या गेलेल्या अनन्वित अत्याचारांचे, विशेषत: रोशमन या एस.एस. अधिकाऱ्याच्या क्रूरतेचे वर्णन असते. सॉलोमन आत्महत्या करतो आणि ती डायरी पोलिसांच्या हाती लागते. नंतर तरुण जर्मन पत्रकार पीटर मिलरच्या हाती ती डायरी लागते. ती डायरी वाचून मिलर रोशमनचा शोध घ्यायचा, असं ठरवतो. जेव्हा मिलर ती डायरी वाचतो तेव्हा तो खूप अस्वस्थ होतो. ज्यूंच्या हत्याकांडाबरोबरच त्या डायरीतील आणखी एक बाब त्याला रोशमन या क्रूरकम्र्याचा शोध घ्यायला प्रवृत्त करते. ती बाब कोणती याचं रहस्य कथानकाच्या शेवटी उलगडतं. रोशमनला शोधण्यासाठी मिलरला कोणत्या दिव्यातून जावं लागतं, याची कहाणी ‘द ओडेसा फाईल’ या कादंबरीतून चित्रित केली आहे. मिलरचा या शोध मोहिमेच्या दरम्यानचा प्रवास चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक आहे. तो प्रवास वाचकाला खिळवून ठेवतो. तो अनुभवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.

96)गोष्ट पैश्यापाण्याची- प्रफुल्ल वानखेडे
Paperback/new
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹घरपोच.(शिपिंग फ्री)

आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे.

97)रावण :-राजा राक्षसांचा - शरद तांदळे
Paperback/new
मुळ किंमत - 380
We read Price - 320 घरपोच.(शिपिंग फ्री)

रावण राजा राक्षसांचा ही रामायणातील पराक्रमी, विद्वान,वेदपंडीत,कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कथा आहे.
आजवरची पुराण, कथा,साहित्य,कला यामधून रावणाला दुर्गुणी,अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेल. परंतु रावणसंहिता,कुमारतंत्र,सामवेदातील ऋचा,शिवतांडवस्स्तोत्र,वीणा,बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली.येवढा विद्वान कित्तेक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला?
सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव,असुर आणि कित्तेक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाची वेध घेणारी कादंबरी रावण राजा राक्षसांचा.

98)द आंत्रप्रन्योर - शरद तांदळे
Paperback/new
मुळ किंमत - 250
We read Price - 220 घरपोच.(शिपिंग फ्री)

द आंत्रप्रन्योर हे पुस्तक माणसाला विशेषता तरुणांना स्वताची औकात दाखऊन देणारं पुस्तक आहे. शरद तांदळे सरांनी त्यांचा जीवन प्रवास मंडला आहे. ते वाचतांना असे वाटले की माझा आणि त्यांचा जीवन प्रवास सारखाच आहे.

99)शिरसवाडी आणि कंट्या -गणेश बर्गे
मुळ किंमत - 500₹
We read Price - 425₹घरपोच.(शिपिंग फ्री)

100)रफ स्केचस -सुभाष अवचट
मुळ किंमत - 400₹
We read Price - 355₹घरपोच.(शिपिंग फ्री)

101)कास्ट मॅटर्स -सूरज एगंडे
Paperback/New
मुळ किंमत - 460₹
We read Price - 385₹घरपोच.(शिपिंग फ्री)

या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेले पहिल्या पिढीचे दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतात. दररोज नरकयातना भोगावा लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरीही यात आढळते. दलितांमधील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात. जोवर दलित सत्ता मिळवण्यासाठीच्या लढ्यात नेतृत्वस्थानी नसतील आणि ब्राह्मणवादाविरोधात ब्राह्मण उभे राहणार नाहीत, तोवर जातीचं अस्तित्व राहणार असल्याची मांडणी एंगडे करतात.

~ We Read ♥️
https://chat.whatsapp.com/J58KV2PCm97CRz4L8K7v8o

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼