एक एकर ♥️


रात्री आवडते लेखक : 'व्यंकटेश माडगूळकर' यांचा हा अप्रतिम असा छोटेखानी लेखसंग्रह एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलं.'अवघ्या 63 पृष्ठसंख्या असलेल्या या संग्रहात एकूण 7 वेगवेगळे सुंदर, मनमोहक आणि माहितीपूर्ण लेख दिलेले आहेत.जे फार वाचणीय असून वाचकाला आपल्या प्रेमात पाडायचं काम करतात.'विविध मासिक/अंकात पूर्वप्रसिद्धी मिळालेले हे सात वाचनीय लेख या छोटूश्या पुस्तकातून वाचकाच्या भेटीला येतात.'यातील प्रत्येक लेख फारच इंटरेस्टिंग असून जे वाचतचं राहावंसं असं वाटून जातं.

'हे पुस्तक संपूच नये असं वाटून जातं.🌱
__________________________________________


1)एक एकर ~ या लेखात स्वतःच्या 'एक एकर' शेतीविषयी व येथील विविध झाडांवर लिहलेलं आहे.येथे बांधलेल्या 'फार्महाऊस' आणि येथे त्यांना आलेल्या वेगवेगळ्या सुंदर अनुभवांवर हा लेख आहे.

2)वनविद्या ~ लेखकांनी स्वतः केलेली जंगल सफारी व त्यांचे अनुभव यामध्ये दिले आहेत.विविध प्राण्यांच्या शिकारीची पद्धत आणि प्राण्यांची कुटुंबपद्धतीबद्दल रोचक माहिती यातून मिळते.'वन्य प्राणीजीवनाचे निरीक्षण करण्यासाठी जाताना कोणती पथ्ये पाळावीत याबद्दल मार्गदर्शन सुद्धा यात केलेलं आहे.'वनविद्या'नावाप्रमाणेच या लेखातून अरण्यातील छोट्या मोठ्या पण महत्वपूर्ण टिपा आपल्याला यातून वाचायला मिळतात.

3)रानातली रेखाटनं ~ जंगल भ्रमंती करत असताना त्या स्थळावर प्रसंगी उभे राहून लेखकांनी काही चित्र रेखाटली आहेत.सुंदर रेखाटने बघायला आणि त्यामागील कथा यातून वाचायला मिळते.

4)अन्नासाठी दाही दिशा ~ जंगलातले प्राणी-पक्षी रोजचं अन्न मिळवण्यासाठी जो आटापिटा करतात त्याबद्दल या लेखातून वाचायला मिळते."वाघापासून- छोट्या पक्षीपर्यत यांना रोज पोटभरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टाची माहिती यातून आपल्या समोर येते.

5) शंभर वर्षे वयाचं मासिक ~ 1888 साली प्रकाशित झालेल्या 'नॅशनल जिऑग्राफिक'या मासिकाबद्दल लेखकांनी यामध्ये माहिती दिली आहे.लेखकांच्या संग्रही असलेल्या ढीगभर अंकातून समोर असलेल्या अंकातून आलेल्या लेखांबद्दल त्यांना जे भावलं ते त्यांनी यातून आपल्याला सांगितलं आहे.या लेखातून खुळखुळ्या सापांबद्दल विविध माहिती आपल्या समोर येते.

6)गोष्ट - मैत्रीची आणि वैराची  ~या लेखांतून मुंगूस आणि सापाचे वैर कसे सुरु झाले ?याबद्दलची
गोष्ट सांगितली आहे. जी खूप मनोरंजक आहे.

7)अतिथी अभ्यागत ~या लेखात लेखकांनी त्यांच्या घरी येणाऱ्या विविध 'पाहुण्यांबद्दल'आपले अनुभव सांगितले आहेत.हे अतिथी म्हणजेच 'कोळी,चिमणी,गोगलगाय,बेडूक,झुरळ,वटवाघूळ,कीटक इत्यादी होय.🌱

हे ते सात लेख असून या प्रत्येक लेखातून आपल्याला काहीतरी नवीन आणि भन्नाट असं काही वाचायला मिळतं.'याबद्दल अधिक जास्त लिहणे उचित ठरणार नाही त्यामुळे वाचकांनी हे पुस्तकं वाचून आनंद घ्यावा.♥️

पुस्तकातील आवडलेलं काही....♥️

★वाघ नाहीसा झाला तर तो निर्माण करणं माणसाच्या हाती नाही. नाहीसा झालेला वन्य प्राणी जन्माला यायचा म्हणजे एक आकाश जाऊन दुसरं जन्माला यावं लागतं.

★माणसानं आपल्या आयुष्यात केलेल्या कोणत्याही बऱ्यावाईट कृत्यापेक्षा त्यानं लावलेले वृक्ष जास्त काळ टिकतात.

★संस्मरणीय असं वाईट कृत्य हातून घडावं, अशी सत्ता किंवा सामर्थ्य माझ्यापाशी कधीच नव्हतं. बरी म्हणावीत अशी भाविक कृत्ये मात्र हातून पार पडली आहेत. पण आज मला वाटतं, माझ्या गाजलेल्या पुस्तकांपेक्षा मी लावलेले आणि जोपासलेले आंबा आणि चिंच यासारखे महावृक्षच जास्त काळ टिकतील.

नक्की वाचा चुकवू नका....💛

©️Moin Humanist🌱

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼