द अल्केमिस्ट 💜

काहीच दिवसांपूर्वी द अलकेमिस्ट (किमयागार) या आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर ठरलेल्या पाउलो कोएलो लिखित मुळ पोर्तुगीज भाषी पुस्तकाचा मराठी अनुवाद दुसऱ्यांदा वाचून समाप्त केला..८०+ जास्त भाषेत अनुवाद झालेल्या या पुस्तकाला करोडो वाचकांनी पसंती दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी मी नितीन कोतापल्ले यांनी मराठी अनुवाद केलेलं पुस्तक वाचलं होतं तर आता डॉ.शुचिता नांदापरकर यांनी अनुवाद केलेलं व मंजुळ प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक वाचलं फरक फक्त एवढाच...मला दोन्ही अनुवाद सुद्धा भावले आणि सुंदर वाटले...जेव्हा मी हे पुस्तक प्रथम वाचलं होतं तेव्हा माझी वैचारिक प्रगल्भता आणि बारीक बारीक गोष्टी समजून घेण्याची समज तेव्हा एवढी नव्हती.यामुळे तेव्हा मी फक्त वाचायचं म्हणून वाचलं होतं पण यातून आपल्याला नेमकी शिकवण काय मिळाली हे कळालं नव्हतं..पण जेव्हा मी आता हे पुस्तक वाचलं तेव्हा खरंच मी त्यामध्येच हरवून गेलो होतो.

पुस्तकातील सॅन्टिआगोसोबत जणू मी प्रवास करून आलो असा मला भास होत होता..छोट्या छोट्या बेसिक बेसिक काही अश्या बाबी मला दुसऱ्या वाचनात जाणवल्या ज्या पहिल्या वाचनात समजल्या किंवा उमजल्या नव्हत्या...
हे बेस्ट सेलर पुस्तक आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते..आणि कळत नकळत अश्या खूप साऱ्या गोष्टींवर विचार करायला भाग पाडते.काल्पनिक कथा असून सुद्धा या पुस्तकातील गोष्ट आपल्याला खूप काही शिकवून जाते आणि आपण पुस्तक वाचत असताना यामध्ये एकंदरीत हरवून जातो.. ओम शांती ओम या चित्रपटातील एक डायलॉग "अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है म्हणजेच "जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते तेव्हा सगळं जग तुमच्या मदतीला ती मिळवून देण्ययसाठी धावून येते "या एका वाक्यावरच हे पूर्ण पुस्तक आधारित आहे...
प्रत्येक जणं स्वप्न पाहत असतो पण त्यावर जास्त विचार न करता तो सोडून देत असतो पण आयुष्यात आपल्याला अनेक वेळा शकुन दिसत असतात आपण त्या शकुणाला ओळखून आपलं भविष्य मात्र सुधारू शकतो असा सोपा गाभा या पुस्तकाचा आहे..कधी कधी जी गोष्ट आपल्याला खूप लांब आहे असे वाटते ती प्रत्यक्षात ती आपल्या खूप जवळ असते गरज आहे फक्त ती ओळखण्याची..जे सुद्धा आपल्या स्वप्नांचा पाठलाग कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही तेच खरे अलकेमिस्ट होय.
कहाणी आहे स्पेन मधील सॅन्टिआगो नामक एका तरुण मेंढपाळाची. त्याला प्रवासाची,भटकंती करायची खूप आवड व यासाठीच तर तो स्व:इच्छेने मेंढपाळ बनलेला असतो..त्याच्या पालकांना त्याला धर्मगुरू बनवायचंं होतं पण याची तशी इच्छा मात्र नसते..
तो एक जाडजुड पुस्तक आपल्याजवळ नेहमी ठेवत असतो आणि नेहमी वाचत असतो. याबद्दल तो म्हणतो की "जाडजुड पुस्तकचं वाचायला पाहिजे,ती खूप दिवस वाचता येते आणि उशाला घ्यायला ही बरी असतात "
त्याला पुस्तक वाचण्याची खूप आवड असते म्हणजे तो सुद्धा आपल्यासारखाच वाचनवेडा असतो..एके दिवशी एका बंद पडलेल्या उध्वस्त चर्च मध्ये तो रात्री मुक्काम करतो त्याला येथे एकच स्वप्न २ वेळा पडतो..यामुळे तो अस्वस्थ होतो व त्या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी एका वृद्ध महिलेकडे जातो..ही महिला याला स्वप्नाचा अर्थ समजावून सांगते व इजिप्त मध्ये पिरॅमिड जवळच्या खजिन्याबद्दल माहिती देते व त्या खजिन्याचा १० वा हिस्सा तिला देण्यासाठी याच्याकडून वचन घेते ..याला त्या म्हातारी वर अजिबात विश्वास होत नाही व तो पुन्हा आपल्या कामाला लागतो..येथून पुढे स्वप्नांवर विश्वास ठेवायचा नाही असा तो निर्णय घेतो.. पण एके दिवशी त्याला बाजारात एक अनोळखी म्हातारा भेटतो व तो सुद्धा याला त्याच खजिन्याबद्दल सांगतो आता या मुलाचा त्या म्हाताऱ्या वर विश्वास बसतो. तो आपल्या सर्व मेंढ्या एका मेंढपाळ्याला विकून ६ मेंढ्या या वृद्ध माणसाला भेट देऊन तो आफ्रिकेला जान्यासाठी निघतो..आफ्रिकेला पोहचल्यावर त्याचे पैसे चोरीला जातात व तो पुन्हा अस्वस्थ होतो त्याला काहीच समजत नाही व तो खूप रडतो.पुढचा मार्ग त्याला सुचत नाही..
रात्री एका बाजारातच झोप घेतो व सकाळी इकडे तिकडे फिरतो तेवढ्यातच याला उंच भागावर एक काच सामनाची दुकान दिसते. तो दुकानात काम करायला सुरुवात करतो.येथे १ वर्ष काम करून पैसे जमा करतो व परत मायदेशी जाऊन मेंढ्या विकत घेण्याचं निर्णय घेतो..पण मध्ये तो काही कारणाने हा निर्णय बदलतो व पिरॅमिड येथे जाऊन खजिना शोधायचं ठरवून एका काफ़िल्यासोबत प्रवास सुरु करतो.. प्रवासाच्या मध्येच त्यांना त्यांचा मुक्काम पुढे चाललेल्या युद्धामुळे मरूद्यान येथे थांबवावा लागतो.त्यांचा काफ़िला अनेक दिवस येथेच थांबतो येथे त्याला फातिमा नावाची मुलगी भेटते.तो तिच्याशी लग्न करण्याच ठरवून येथेच राहण्याचं निर्णय घेतो..पण अचानक येथे त्याला एक किमयागार भेटतो व तो पुन्हा त्याला खजिन्याचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो,प्रेरणा देतो..
तो पिरॅमिड पर्यत जातो का ?
तिथपर्यंत तो कसं पोहोचतो ??
तेथे जाण्यासाठी तो कोणकोणत्या समस्यांचा सामना करतो ??
तेथे त्याला खजिना मिळतो का ??
तो परत मायदेशी येतो का ??
फातिमा सोबत त्याच लग्न होतो का ??
या व इतर असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुस्तकातच मिळेल त्यामुळे अजूनपर्यंत हे पुस्तक वाचलं नसेल तर नक्की वाचा आणि एक बेहतरीन अनुभवाचा आनंद घ्या असे मी आपणास सुचवेन..

मला आवडलेला विचार :- एक निर्णय घेणं ही अनेक निर्णय घेण्याची सुरुवात असते.जेव्हा माणूस एखादा निर्णय घेतो तेव्हा तो एका प्रचंड शक्तिशाली प्रवाहात उडी घेत असतो.हा प्रवाह त्याला त्यानं कधीच न पाहिलेल्या स्थळांना घेऊन जातो..So काहीही झालं तरी थांबायचं नाही बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे करायचंच…समस्या आणि अडचणींना लात मारून आपल्या स्वप्नांच्या गाडीला दे धक्का म्हणत चालत राहायचं..❣️

माझा आवडता प्रसंग आणि संवाद :-
सँन्तियागो प्रेयसी फातिमाला : मी मोहिमेवर निघालोय.मी नक्कीच परतणार आहे हे सांगण्यासाठीच मी आलोय.मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..

कारण…

फातिमा :- 'काहीही बोलू नकोस.प्रेम करण्यासाठी कुठलही कारण लागत नाही.आपण एकमेकांवर प्रेम करतो.कारण आपलं एकेमेकांवर प्रेम आहे.
वाळवंट आमच्यापासूनसुध्दा आमचे पुरुष दूरदूर नेतं.ते नेहमीच परत येतात असे नाही.आम्हाला हे माहीत आहे.आम्हाला आता त्याची सवय झाली आहे.जे कधीच परतत नाहीत ते ढगांचा भाग बनतात.द-याखो-यांमध्ये,घळ्यांमध्ये राहणा-या प्राण्यांचा भाग बनतात.जमिनीखालून येणा-या पाण्याचा भाग बनतात.ते प्रत्येक गोष्टीचा भाग बनतात.ते विश्वाचा आत्माच बनतात.
मी वाळवंटातली स्त्री आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.वाळूच्या ढिगा-यांचे आकार बदलवणारा वारा जसा मुक्त वाहतो तसंच माझ्याही नव-यानं सगळीकडं मुक्त संचार करावा आणि जर कधी वेळ आलीच तर तो ढगांचा,
द-याखो-यांमधल्या प्राण्यांचा आणि वाळवंटातल्या पाण्याचा भाग बनलेलं मी स्वीकारीन..❣️

©️ Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼