My Neighbor Totoro ❤️🌼
मी हल्ली Studio Ghibli च्या चित्रपटांच्या जाम प्रेमात बुडालो आहे. चित्रपट बघताना ते केवळ Animation नसून, एक फीलिंग, एक अनुभव वाटतात. माझा हा प्रवास सुरू झाला Grave of the Fireflies पासून. या चित्रपटाने मला हादरून सोडलं. युद्ध, उपासमारी नि दोन भावंडांचं नातं सगळं इतकं वास्तवदर्शी की डोळ्यांत पाणी आलं नि अजून सुद्धा Scene डोळ्यासमोरून जातं नाहीत.त्या नंतर रात्री बघितलेला Spirited Away हा एकदम वेगळाच अनुभव होता पूर्णपणे: जादूई, कल्पनारम्य नि तरीही खोलवर भिडणारा तर यानंतर आज मी बघितला गोंडस चित्रपट 'My Neighbor Totoro' ❤️ मुळात खरं सांगायचं तर, कॉलेजच्या assignments नि रोजच्या दगदगीमुळे डोकं सुन्न झालं होतं. सततची धावपळ, प्रेझेंटेशन्स, Submission,Writing नि Academic Reading या सगळ्यांमध्ये मनाला कुठेच शांती मिळत नव्हती. अशा वेळी "Studio Ghibli चे चित्रपट बघितल्यावर असं वाटलं, जसं कुणीतरी मला एका शांत झाडाच्या सावलीखाली बसवलंय. My Neighbor Totoro चित्रपटाची कथा खूपच साधी आहे, पण त्या साधेपणामध्येच खरी जादू आहे. दोन बहिणी Satsuki नि Mei आपल्या वडिलांसोबत एका ग्रामीण...