फिन्द्री ♥️
सुनीता बोर्डे ताई लिखित 'फिन्द्री' ही कादंबरी वाचली नव्हे तर अनुभवली.एकंदरीत ही अप्रतिम अशी कादंबरी मी जगून आलो आणि सध्या सुद्धा या कादंबरीच्याच सानिध्यात वावरतोय.किमान एक आठवडा तरी लागेल मला यातून बाहेर येण्यासाठी. या प्रवासाने मी समृद्ध झालो,अंतमूर्ख झालो.खूप काही शिकुन तर कितीतरी प्रेरणा घेऊन आलो.फिन्द्रीतील संगीताच्या आईचे म्हणजेच 'मिरुआई'चे बोट धरून स्त्रीचं दुःख जाणून घेत असतानाच प्रचंड महत्वाचा तत्वज्ञान शिकून आलो.या प्रवासात मी पुर्णपणे हरवून गेलो,यामध्ये मला पावलोपावली बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार अनुभवायला मिळाले.यातून कितीतरी पटीने ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली ती शब्दांत मुळीच सांगता येणारी नाही.या प्रवासाने मला पावलोपावली रडवलं,एकंदरीत अंतर्मुख करून आतून विचार करायला भाग पाडलं.जिद्द,मेहनत,इच्छाशक्ती,संघर्ष इत्यादी शब्दाची व्याख्या मला 'मिरुआई' आणि 'संगीच्या' आयुष्याचा खडतर प्रवास वाचून समजली. प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली ही कादंबरी.लेखिकेने ज्याप्रमाणे एका नकोशी असलेल्या मुलीची आणि त्याची आईची दुःख आणि संघर्षपूर्ण असलेली गाथा या कादंबरीतून व...