वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष-नेल्सन मंडेला….🌺🌱

आज 18 जुलै… सर नेल्सन मंडेला यांची जयंती त्यानिमित विनम्र अभिवादन …💖

मागे कॉलेजमध्ये सदानंद बोरसे यांनी लिहलेल ‘मंडेला’हे चरित्र वाचलं नि भारावून गेलो.नेल्सन मंडेला यांच्याबद्दल वाचलेलं ते पहिलचं पुस्तक ठरलं नि पुन्हा या अवलिया पुन्हा कोठे काय मिळते का याच मी शोध घेत होतो नि तेवढ्यातेच अतुल कहाते यांनी लिहलेलं चरित्र ‘वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष-नेल्सन मंडेला’ हे 220 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक हातात आलं नि मी ते मागे एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलं सुद्धा नि आज मंडेला दिनानिमित याबद्दल दोन शब्द लिहितोय…

नेल्सन मंडेला… एक साधा, शांत, काळ्या रंगाचा एक माणूस. पण त्याचं जीवन असं आहे की त्याने जगाचा इतिहासच बदलून टाकला. दक्षिण आफ्रिकेत काळ्या नि गोऱ्या लोकांमध्ये मोठा लढा चालत होता. केवळ त्वचेच्या रंगावरून काळ्यांना काम नाकारलं जायचं, बसायची जागा मिळायची नाही, शाळा, हॉस्पिटल, अगदी टॉयलेटही वेगवेगळं. हा अन्याय सहन न होता मंडेला लहानपणापासूनच विचार करायला लागले की “हे सगळं चुकीचं आहे… याविरुद्ध काहीतरी करायलाच हवं.मंडेलांनी कायदा शिकला, जनतेसाठी लढायला सुरुवात केली. त्यांनी लोकांना संघटित केलं. पण सरकारनं त्यांना अडवायला सुरुवात केली. मग काय… 27 वर्षं त्यांना तुरुंगात डांबलं गेलं. पण मंडेला ना कोसळले, ना रागावले. उलट, त्यांनी तुरुंगातच आपला आत्मा अजून मजबूत केला. पुस्तकं वाचली, मनाशी संवाद केला नि शांततेनं, विचारपूर्वक पुढचं पाऊल कसं टाकायचं याची तयारी केली.

जेव्हा ते तुरुंगातून बाहेर आले तेव्हा सगळ्या देशाने त्यांचं स्वागत केलं. लोकं म्हणत होते, “हा माणूस आपल्याला नव्याने जगायला शिकवेल नि खरंच तेच झालं. मंडेला  ी दिली. जे लोक त्यांना तुरुंगात टाकले होते, त्यांच्याशीही शांतपणे बोलले. त्यांनी सूड घेतला नाही. त्याउलट, सगळ्यांना एकत्र आणून देश घडवायला सुरुवात केली. त्यामुळे ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती झाले.

हे पुस्तक वाचताना असं वाटतं की आपण एका सच्च्या हिरोची गोष्ट वाचतोय. पण हा हिरो कोणत्याही सुपरपॉवरशिवाय फक्त सत्य, संयम नि प्रेमाच्या बळावर लढला. अतुल कहाते यांनी हे पुस्तक अगदी सोप्या भाषेत लिहिलं आहे. त्यामुळे लहान वाचकांनाही हे सहज समजतं. नि विशेष म्हणजे यामध्ये फक्त माहिती नाही, तर मंडेलांच्या विचारांचा प्रकाश जाणवतो.मंडेलांचं जीवन आपल्याला शिकवतं कि कितीही अंधार असला तरी जर तुमचं मन उजळ असेल, तर तुम्ही प्रकाशाचा रस्ता दाखवू शकता.
त्यांनी दाखवलं की “शांतीनं लढलं तरी क्रांती घडते.”
आजच्या जगात जेव्हा लहान कारणांसाठी राग, भांडणं नि तिरस्कार वाढत आहे, तेव्हा मंडेलांसारखी माणसं आपल्याला आठवायला हवीत. त्यांचं आयुष्य एक जिवंत शिकवण आहे.

प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं. कारण माझ्यामते हे “माणूस म्हणून चांगलं कसं जगायचं” याचं उत्तर आहे.
एवढचं…🌱
©️Moin Humanist 💙

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼