सामाजिक परिवर्तनाच्या प्रतीकासमोर 🌼♥️
काल हैदराबाद येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट पुतळ्याला भेट देण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली.❤️
हा खरोखरच एक सुंदर क्षण होता, कारण मी अनेक दिवसांपासून या Statue ला भेट देण्याचं स्वप्न पाहत होतो. बाबासाहेबांशी असलेली माझी नाळ इतकी गहिरी आहे की त्याचं स्मरण करणं हा माझ्यासाठी एक महत्वाचा भावनिक क्षण असतो.
आपल्या We Read ला काल 2 ऑक्टोबर रोजी दोन वर्षं पूर्ण झाली नि मी कालचा दिवस छान एन्जॉय करायचं ठरवलं. अशा विशेष दिवशी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करणं मला नेहमीच गरजेचं वाटतं कारण आयुष्यात जे काही चांगलं करायचं आहे, ते बाबासाहेबांच्या शिकवणीला समोर ठेवूनच शक्य आहे असं मला वाटतं,कारण या जुगारी मुलाला पुस्तकांच वेड लावणारा हा
सर्वप्रथम सकाळी उठून महात्मा गांधी नि शास्त्रीजींना अभिवादन केल नि सुधीर दादासोबत दुपारी हैदराबादला जायचं ठरवलं नि दुपारी निघालो 'Statue of B. R. Ambedkar, Hyderabad साठी.
बाबासाहेबांचं माझ्या आयुष्यातलं स्थान इतकं खोलं आहे की त्याचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज मला आता वाटतं नाही. त्यांचे विचार, त्यांचा लढा नि त्यांची माणुसकी हेच माझं प्रेरणास्थान आहे. त्यांच्या विचारांच्या आधारावरच मी आयुष्याचं प्रवास करायचं प्रयत्न करतोय नि त्यांचं बोट धरूनच चालतोय.
आजपर्यंत मी अनेकवेळा चैत्यभूमी नि दिक्षाभूमीला भेट दिली आहे, कारण त्या जागांचा बाबासाहेबांशी थेट संबंध आहे. त्या जागेचं पावित्र्य अनुभवताना बाबासाहेबांचा साक्षात सानिध्य लाभल्यासारखं वाटतं असतं. पण कालचा अनुभव थोडा वेगळा होता.या वेळी मी प्रथमच हैदराबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याला भेट दिली. तो पुतळा पाहताना माझ्या मनात आलेल्या फिलिंग्स शब्दांत सांगणं अवघड आहे. ती एक विलक्षण भावना होती नि आहे.बा भीमा पुतळ्यात नसून त्यांच्या पुस्तकांत आहे, हे ठाऊक असून सुद्धा काही गोष्टी हृदयाशी जुडलेल्या असतात नि त्याबद्दल फक्त हृद्यानेच विचार केलेलंच चांगलं असतं असं मला वाटतं नि मी काही बाबतीत तेच करतो.
हे खरं आहे की आजवर अनेकवेळा मी बाबासाहेबांच्या पुतळ्यांसमोर उभा राहिलो आहे, त्यांचं स्मरण केलं आहे. पण कालचा मोईन काहीसा वेगळा होता. आजपर्यंतचा मोईन हा फक्त एक वाचक म्हणून त्यांच्यासमोर उभा राहिला होता,एक जो त्यांच्या विचारांचा अभ्यासक होता. पण कालचा मोईन हा एका प्रतिष्ठित विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी म्हणून त्यांच्या समोर उभा होता.
हा बदल खूप मोठा आहे नि माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. एका मोठ्या यशाची जाणीव देणारा हा क्षण होता, जिथं मी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अजून एक पाऊल पुढं टाकलं आहे.
आपल्या We Read ला दोन वर्षं पूर्ण होत असताना, या महत्वाच्या दिवशी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर उभं राहून त्यांना अभिवादन करणं हा माझ्यासाठी एक प्रेरणादायी नि आत्मविश्वास देणारा क्षण होता. या क्षणाने मला पुन्हा एकदा आठवण करून दिली की माझं आयुष्य बाबासाहेबांच्या विचारांच्या मार्गदर्शनानेच घडत आहे नि यापुढेही हेच विचार मला प्रेरणा देतील एवढं नक्की.♥️
वरील Statue जवळील सुंदर अनुभव डोळ्यात साठवून आम्ही परतीला निघालो, पण त्याआधी हैदराबाद शहरातील Paradise नामक एका हॉटेलमध्ये मस्त जेवण करून We Read चा दोन वर्षांचा उत्सव साजरा केला.हॉस्टेलला परत येताना सोबत केक घेऊन आलो नि हा विशेष दिवस कॉलेजच्या नवीन मित्रांसोबत सुद्धा साजरा करण्याचं ठरवलं. हॉस्टेलवर येताच व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज टाकला, सर्वांना 10:30 ला यायचं सांगितलं.बरेच मित्र आलेत नि सर्वांनी मिळून एकत्रितपणे केक कट केला.
हा क्षण नि अनुभव सुद्धा फारच खास होता.
सर्व मित्रांनी शुभेच्छा दिल्या नि फार प्रेम दाखवलं. हा अनुभव फार इमोशनल करणारा होता ,कारण मला हे पूर्णपणे अनपेक्षित होतं एवढंच..😊❤️
बस्स बाकी आता पुढच्या वाटचालीसाठी उत्सुकता आहे नि खात्री आहे की आपली वाचनाची नि माणुसकीची परंपरा अशीच वाढत राहील..🌼
जय भीम ❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा