चांगुलपणा ♥️🌼

मला अजिबात आठवत नाही की प्रत्यक्षात नि सोशल मीडियावर सुद्धा मी कोणासोबत कुठल्याही प्रकारचा वाद केला असेल, कोणाला चुकीचं बोललो असेल, धमकी किंवा शिव्या वगैरे दिल्या असतील. 

कोणासोबतही थोडं सुद्धा काहीही वाकडं नाही. आजपर्यंत भांडण-तंटे वगैरे पासून कायम चार हात लांबच राहिलोय. कोणासोबत मनभेद वगैरे सुद्धा केलेले नाही.

एखाद्याला गैरसमज झाले असतील किंवा कोणाला आपल्या काही गोष्टी आवडत नसल्या किंवा आपल्याला त्याच्या आवडल्या नाहीत, तर मी नेहमीच काही न बोलता, न दुखवता त्या व्यक्तीपासून लांब झालोय, मनात कुठलीही चुकीची भावना ठेवता.

कोणासोबतही कुठल्याही प्रकारचा वैर नाही. कोणाला कधी काही चुकीचं बोललो असेल तर लगेच माफी मागितली आहे, कारण कोणाला दुखवण्याचा अजिबात हेतू नसतो. 🌸

एवढं चांगलं वागून, कोणाला त्रास न देता जगलो तरीही काही जण न कारणाने जेव्हा तुमचा छुपा द्वेष करतात, तुमच्याबद्दल चुकीच्या भावना मनात ठेवून वाईट बोलत असतात तेव्हा थोडं दुःख स्वाभाविक असतो.

 कोणाला त्रास न देता, शांतपणे नि कोणाशी कुठलाही वाद न करता जीवन जगणे मला जास्त आवडते.कुठलीही कारणे नसताना असे वागणारे लोक प्रत्येकाच्या जीवनात असतात नि त्यांच्या नकारात्मकतेला आपण आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाने सामोरे जाऊ शकतो हे मी शिकतोय?

मी माझ्या चांगल्या वागण्यावर नि सकारात्मक दृष्टिकोनावर कायम राहूनच माझे जीवन अधिक आनंदी बनवायचं प्रयत्न करतोय.अशा परिस्थितींमध्ये स्वतःला समजावून घेणे नि स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये गुंतवून ठेवणे हे मला महत्वाचे वाटतं. प्रत्येक वेळी आपल्याला सगळ्यांशी चांगलेच वागावे लागेलच असे सुद्धा नाही, पण आपण आपली चांगुलपणाची भावना कायम अशी ठेवणे सुद्धा गरजेचं आहे.

प्रत्येक वेळी आपण इतरांच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपण त्यावर आपली प्रतिक्रिया कशी असेल हे ठरवू शकतो. नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्या आनंदावर नि मन शांतीवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.

बाकी आपण जसे आहोत, तसेच राहिलो पाहिजे, कारण शेवटी आपली खरी ओळख आपल्या चांगुलपणात आणि सकारात्मकतेत आहे हेच खरं...🌸🌼

©️Moin Humanist 🌸

टिप्पण्या

  1. अगदी बरोबर आपण आपला चांगुलपणा सोडायला नको. सकारात्मकतेने पुढे जायला हवे. 🌼

    उत्तर द्याहटवा
  2. मी पण नेहमी स्वतः ला आनंदि ठेवतो पण कुणास ठाऊक इतरांना माझं चांगुलपणा आवडत नाही काही ना काही बोलत असता वा आपण कसे वाईट हे दर्शवत असतात

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा