जिना इसी का नाम हैं....! ♥️
काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी गावातुन चंद्रशेखर सरांच्या मिसेस चा कॉल आला.सर हे CRPF मध्ये कार्यरत असून ते नेहमीच We Read मधून पुस्तके बोलावत असतात.आमची ओळख ही पुस्तकामुळेच झाली आहे.सरांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायू चा झटका आला होता.त्यांना कोणीतरी सुलतानपूर येथील Dr.R. N Lahoti यांच्या प्रसिद्ध 'श्रीराम हॉस्पिटल' बद्दल कल्पना दिली होती.तेव्हा त्यांच्या कुटुंबाला सरांनी सरळ मला कॉल करायचं सांगितलं.त्यांना बोलता येत नसल्याने त्यांच्या पत्नी बोलत होत्या.त्यांनी मला विचारपूस केली.त्यांना सर्वकाही व्यवस्थित माहिती देऊन तुम्ही इकडे कधीही बिंदास येऊ शकता आपलाच घर आहे इथे म्हणालो.ते आज 7 मार्च 2024 रोजी हॉस्पिटलमध्ये आले होते.रात्री निघताना नि सकाळी पोहोचल्यावर त्यांनी मला कॉल केला.
मी सकाळीच फैजानला पाठवून त्यांच्यासोबत राहायचं सांगितलं.
मला थोडं ठीक वाटतं नव्हतं त्यामुळे मी थोडा उशिरा जायचं ठरवलं.दुपारी मग सरळ टिफिन घेऊनच गेलो.काकु नि सरांना प्रथमच भेटत होतो.मी जाताच त्या इमोशनल झाल्या,त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं.त्यांना भेटून बोलून हॉस्पिटलमध्ये आत सरांना भेटायला गेलो.सर बेडवर झोपलेले होते.त्यांना उठता, बोलता येत नव्हतं.मला बघून त्यांनी हातात हात दिलं, डोक्यावरून हात फिरवलं. माझ्या डोळ्यांत पाणी होतं.
सरांचा सी.टी स्कॅन करून रिपोर्ट घेऊन त्यांच्या मुलांसोबत काकूंनी स्वतः न जाता मला डॉक्टरांकडे पाठवलं.मी जाऊन आलो व्यवस्थित विचारपूस करून गोळ्या घेतल्या.डॉक्टरांनी एक महिन्याचा कोर्स देऊन सरांना डिस्चार्ज दिला.
हॉस्पिटल बाहेर आलो..आजूबाजूच्या परिसरात जेवण न करता मी त्यांना 'स्टडी बंकर' मध्ये घेऊन आलो.घरी येऊन फ्रेश व्हायला गरम पाणी दिलं. सर्व फ्रेश झाले नि मग आम्ही सोबतच जेवण केलं.काकांना गाडीतच जेवण द्यावं लागलं त्यांची कमालीची इच्छा असताना सुद्धा त्यांना स्टडी बंकर मध्ये आत घेऊन येता आलं नाही.पण पुढच्या भेटीत नक्कीच आत येतील या आशेवर आम्ही मनाला दिलासा दिला.
सर्वांनी जेवण करून चहा घेतली नि ते परतीला निघाले.रजा घेताना कमालीचं इमोशनल व्हायला झालं.काकांनी या परिस्थितीत सुद्धा माझ्या आवडीचं एक पुस्तकं त्यांना द्यायचं सांगितलं.मी त्यांना माझ्या आवडीचं मारुती चितमपल्ली सरांचं 'शब्दाचं धन'हे पुस्तकं भेट दिलं. सरांनी त्या पुस्तकावर माझी "Moin Humanist'अशी sign घेतली नि मला आशिर्वाद रुपी मी नाही म्हणत असताना सुद्धा हातात 500₹ रुपये टेकवले नि मी ते मोठ्या प्रेमाने स्वीकारले.
सर लवकरच एकदम ठीक होतील हा विश्वास आहे.आमची पुस्तकांनी जुडलेली नाळ आज अजून जास्त घट्ट झाली...
कधीही न भेटता,बोलता सुद्धा आपण कोणाला जवळचं वाटावं,आपल्याबद्दल आपल्या कुटूंबाला कोणी भरभरून बोलावं..हक्काने विश्वासाने आपल्याला अर्ध्या रात्री कॉल करावं हे असं एखाद्याला का वाटावं ? कारणच एकच ती म्हणजे माणुसकी.
माणसाने माणसाच्या कामी यावं,दुखात सहभागी व्हावं बस एवढंच....आपण सर्व एकच आहोत नि येथे आपल्यालाच एकमेकांच्या अडीअडचणीत सहभाग घ्यावा लागणार आहे...एखाद्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी रक्ताचं नातं असणेच गरजेचं नाही..
माणूस असणे एवढंच पुरेसं असतं... नाही का ?✨♥️
आता हे सर्वकाही शेअर करण्याचा उद्देश मी किती चांगला नि भारी काम केलं व करतोय वगैरे हे दाखवायचं नसून किंवा कोणाची तारीफ मिळवणे वगैरे नसून फक्त सर्वाना हेच सांगायचं आहे की,माणूस बनून जगा,वागा नि रहा...
सोशल मीडिया वीर खूप आहेत आपण प्रत्यक्षात चांगके जगुया....दोन चांगले स्टेट्स ठेऊन,चांगली पुस्तके वाचून नि चांगल्या पोस्ट शेअर करून हे सर्वकाही होणार नाही...
आपल्याला खरोखर तसं जगावे लागणार आहे.
मी माझ्यापरीने प्रयत्न करतोय तुम्ही तुमच्या परीने करा...तुम्ही आम्ही मिळून आपण होऊ नि जग सुंदर बनवू...! ♥️😊🤗
©️Moin Humanist♥️✨
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा