रुक जाना नहीं.....! ♥️🌾


सुरुवातीपासूनच खूप काही शिकायचं होतं,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखं उच्चशिक्षित व्हायचं स्वप्न होतं.सातवी नंतर 12 वी पर्यत शिक्षण पूर्ण केलं.बारावीत असताना Upsc करायचं निर्णय घेतलं नि तयारीसाठी पुणे गाठायचं ठरवलं.पुण्याला जाऊन एका चांगल्या कॉलेजमध्ये पदवीसाठी प्रवेश घ्यायचं नि Cse चे क्लासेस करायचे.

Degree+Upsc करायचं हा निर्णय बेस्ट होता...!

पुण्याला गेलो,क्लासेस नि कॉलेज बघितले.चाणक्य मंडळ या क्लासेस मध्ये 'Foundation Course'साठी Admission घेतलं.पण काही कारणाने मला पुणे सोडावं लागलं.एक अनुभव मला फार अस्वस्थ करून गेला.या अनुभवामुळे मला पुण्यात राहण्याची इच्छाच राहिली नाही.त्याकाळी आयुष्यात प्रथमच पुण्याला गेलो होतो.कोणीही ओळखीचं विशेष नसल्याने पुढे काय करावं समजतं नव्हतं म्हणून डिपॉझिट साठी ठेवलेल्या सर्व पैशांची  'ABC' चौकातुन पुस्तके घेतली आणि गावी परत आलो.

गावी परतल्यावर घरी राहूनच अभ्यास करायचं ठरवलं.
''गावात राहून अभ्यास होतं नाही'' या समजाला आपण छेद द्यायचं.अभ्यास करायची इच्छाशक्ती नि नियत असली तर अभ्यास कोठेही होतो हा विश्वास मला होता.गल्लीत अभ्यासाला पुण्यासारखं वातावरण मिळणारं नाही हे ठाऊक होतं पण 'मेहनत करायची तयारी असली आणि जिद्द असली तर माणूस कोठेही काहीही करू शकतो 'या वाक्याला केंद्रित करून या बाजूला बंद पडलेल्या खोलीत स्वतःचा विश्व निर्माण करायचं ठरवलं.घराच्या बाजूला काकांची जीर्ण अवस्थेत असलेली बंद पडलेली खोली होती,तीची थोडी डागडुजी करून त्यातच अभ्यासाचा 'श्री गणेशा' केला. माझा छोटासा विश्व मी यामध्ये थाटला.यामध्ये मी संग्रही केलेली लाडकी पुस्तके आणि भिंतीवर चिटकवलेल्या आपल्या महामानवांच्या फोटोशिवाय इतर काहीही नव्हतं.

ही खोली म्हणजेच आपला पहिला वहिला स्टडी बंकर.....!✨

आता या रूमला नाव काय द्यावं ?हा विचार करत असतानाच एक कल्पना सुचली 'महायुद्धाबद्दल वाचत असताना 'बंकर'हा नाव अनेक वेळा ऐकलं होतं. त्यामुळे या ज्याप्रमाणे युध्दाच्या काळात तो 'बंकर' सैनिकांना बॉम्ब हल्ल्यापासून सुरक्षित ठेवतं होतं.त्याचं प्रकारे ही रुम मला आजूबाजूच्या नकारात्मक वातावरण व चुकीच्या गोष्टींपासून सुरक्षित ठेवणारी आणि माझं रक्षण करणारी ठरणारं होती. त्यामुळे मी याला 'स्टडी बंकर ' हे नाव दिलं.

आता गावात राहूनच अभ्यास करायचं म्हटल्यावर मी आजूबाजूला पदवीसाठी चांगले कॉलेजस बघितले पण मला हवं तसं कॉलेज मिळालं नसल्याने अन् माझं पूर्ण फोकस Upsc वर असल्याने मी 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातुन'पदवी घ्यायची ठरवली नि बी.ए च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊन B. A + Cse च्या अभ्यासाला सुरुवात केली.

Ncert ची पुस्तके ऑनलाइन बोलावून + Study IQ चा 3 वर्षाचा एक Pendrive कोर्स खरेदी करून जोमाने अभ्यासाला लागलो.

ऑगस्ट 2017 ते सप्टेंबर 2019 या काळात 2 वर्षे प्रचंड अभ्यास केलं नि प्रचंड वाचन केलं.'अवांतर वाचनाची साथ या काळात सुद्धा सोडली नव्हतीच.अभ्यास/वाचनाने खूप काही शिकलो,अनुभवलं.घरात बसूनच देश,विदेश फिरून आलो.इतिहासाच्या समुद्रात बुडी मारून आलो.पण अभ्यासाकडे लक्ष देता देता आरोग्याकडे दुर्लक्ष झालं आणि आरोग्य बिघडलं आणि ते सतत बिघडतच गेलं.आरोग्याला हलक्यात घेण्याची मला फार मोठी किंमत मोजावी लागली.आरोग्य नि त्यानंतर सततच्या आजारपणामुळे मी नैराश्याच्या खाईत लोटल्या गेलो.

याबद्दल मी विस्तृत पहिल्या भागात लिहलं आहे ते नक्कीच वाचा...✨

2021 च्या  नोव्हेंबर मध्ये मनापासून पुस्तकांवर केलेल्या प्रेम नि Lockdown काळात केलेल्या पुस्तक प्रसारामुळे मला शरद तांदळे सरांनी 'स्वप्निल कोलते साहित्य पुरस्कार"जाहीर केला नि येथूनच माझा आयुष्य बदलायला सुरुवात झाली.
मला सर्वांत जास्त गरज होती तेव्हाच एक पुश मिळालं..प्रोत्साहन,शुभेच्छा,पाठिंबा,ओळख,प्रेम आणि आपुलकी मिळाली.भविष्यात आता कधीही कोठेही न थांबता लढायची,भिडायची मला हिम्मत मिळाली.

फेब्रुवारी 2022 मध्ये ' भुरा ' वाचलं.भुराने अजूनच जास्त हिम्मत नि प्रेरणा दिली आणि आयुष्याला कलाटणी देऊन स्वप्ने बघायला आणि ती पूर्ण करायला शिकवलं. आता मात्र थांबायचं नाही उच्चशिक्षित होऊन मोठी मजल मारायची हे ठरवलं आणि पुन्हा ताकदीने अभ्यासाला लागलो..1 मार्च 2022 ला चैत्यभूमी ला गेलो आणि परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून नवीन प्रवासाला सुरुवात केली.

2022 मध्ये परत एकदा Cse चं अभ्यास सुरू केलं नि यासोबतच पुढील शिक्षणाबद्दल सुद्धा गंभीरतेने विचार करायला सुरुवात केली.लाडक्या पुस्तकामुळेच मला योग्य वेळी जेव्हा मला खऱ्या अर्थाने ज्याची गरज होती तसा एक जीवाभावाचा मित्र मिळाला हर्षल च्या रुपात.या मित्राने या काळात मला कमालीची साथ तर दिलीच पण अनेक अर्थाने माझं आयुष्य बदलायचं काम केलं.माझ्या मनातील विझलेली उच्चशिक्षणाची ती आग या मित्राने नव्याने पेटवली.मला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवून माझ्या पाठीवर हाथ ठेऊन "मै हूं ना " म्हणत मला कायम सोबत असण्याचं वचन दिलं. हर्षलमुळे ही उच्चशिक्षित होण्याची प्रेरणा कितीतरी पटीने वाढली.हर्षलने नेहमीच मला प्रोत्साहन देऊन पुढे जाण्यासाठी पाठिंबा दिला.अर्ध्यरात्री माझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्यामुळेच 2022 च्या सप्टेंबर महिन्यात आयुष्यात प्रथमच मास्टर्स साठी Cuet ची राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणारी परीक्षा दिली.हवे तेवढे मार्क्स सुद्धा मिळाले पण काही घरगुती नि डॉक्युमेंट्स च्या अडीचणीमुळे त्यावर्षी मास्टर्स साठी मला प्रवेश घेता आला नाही.

2 ऑक्टोबर 2022 ला मी हर्षलला सोबत घेऊन We Read नव्याने सुरू केला.त्याआधी जुलै मध्ये आम्ही पुण्याला महात्मा फुले वाड्यावर जाऊन जोतिबा नि आई सावित्रीला अभिवादन करून आलो होतो तेव्हाच We Read ची पुढील रूपरेषा आम्ही आखली होती.ऑक्टोबर मध्ये We Read सुरू झालं नि बघता बघता त्याचा दिवसागणिक व्याप वाढतंच गेला.मी पूर्णपणे यामध्ये गुंतून गेलो.वाचन,अभ्यास,दुकान+We Read हेच माझं जीवन बनून गेलं.सकाळ ते रात्र कशी व्हायची हेच मला समजायचं नाही.ग्रुपवर वाचनीय पोस्ट करणे,आलेले पुस्तकांचे ऑर्डर्स घेणे,वाचकांना वेळोवेळी Reply देणे,कॉलवर बोलणे,स्टडी बंकर मध्ये भेटायला येणाऱ्या वाचकांना भेटणे,वेळ मिळेल तसं प्रवास करणे,विविध वाचनासंबंधीत सेशन्स घेणे,वाचन करणे नि पुस्तकांची पॅकिंग करणे नि ती पाठवणे यातच माझं वेळ जायचा.यासोबतच शनिवारी/रविवारी मी ' Talk To Your Humanist Friend 'मध्ये असंख्य जणांना बोलत होतोच.

गंभीरपणे अभ्यास करायचं होतं पण ते व्यवस्थित जमतं नव्हतं.वाचन नियमित सुरू होता पण गंभीरपणे अभ्यासाला वेळ फार कमी मिळतं होतं.We Read मध्ये मी पूर्णपणे गुंतून गेलो होतो.डिसेंबर मध्ये अनपेक्षितपणे ' BBC Marathi 'वर झळकलो नि त्यामुळे अजूनच जास्त प्रकाश झोतात आलो.यामुळे We Read ला मिळणारा प्रतिसाद सुद्धा खूप वाढला नि वाढतच गेला.

2022 हा वर्ष समाप्त होऊन 2023 लागला.यावर्षी मी पुन्हा गंभीरपणे CSE चा अभ्यास करायचं ठरवलं नि अभ्यासाला लागलो.We Read+दुकान सांभाळत जमेल तसं अभ्यास केला.जून मध्ये पुन्हा Cuet दिली पण यावेळी अवघ्या काही मार्कानी मी मला हवं असलेल्या कोर्स नि कॉलेजसाठी पात्र ठरलो नाही.पण मी हार मानणारा कोठे होतो ? म्हटलं यावर्षी नाही पुढच्या वर्षी पुन्हा देऊया.'चांगल्या कॉलेजात शिकायचं म्हणजे शिकायचंच हे ठरवलं होतं. चांगल्या कॉलेजात जायचं नि 2 वर्षे ' Quality Education' घ्यायचं ठरवलं.एका चांगल्या महत्वपूर्ण विषयात मास्टर्स करायचं नि ते शिकलेलं भविष्यात We Read मध्ये Implement करायचं निर्णय घेतला.

'वाचन क्षेत्रात जमेल तेवढं चांगलं काम करायचं,वाचन चळवळ उभी करायची नि जास्तीत जास्त जणांना वाचनाची आवड लावायची हा निर्णय घेतला.We Read मध्ये आलेले अनुभव नि त्याला शिक्षणाची जोड देऊन भविष्यात वेगळं काहीतरी करायचं ठरवलं.

2024 मध्ये काहीही करून एका चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन चांगल्या विषयात मास्टर्स करायचं निर्णय घेतला.यावर्षी विविध कॉलेजच्या Entrance द्यायचं ठरवलं नि हर्षलच्या मार्गदर्शनात तयारीला लागलो.हर्षलने Tiss मधून ' पब्लिक पॉलिसी 'मध्ये मास्टर्स केलं असल्याने त्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं. पब्लिक पॉलिसीचे महत्व,गरज नि भवितव्य चांगल्याप्रकारे समजले होते.हे किती महत्वाचं विषय आहे याबद्दल पुरेशी कल्पना मला आली होती.

डिसेंबर 2023 मध्ये सहजच चर्चा करताना ' कौटिल्य स्कुल ऑफ पब्लिक पॉलिसी 'चा विषय निघाला.तेव्हा नुकतंच सुधीर दादांचा यामध्ये Selection झालं होतं तर प्रशांत राठोड दादाने यातून मास्टर्स पूर्ण केला होता.हर्षलने लगेच या दोन्ही मित्रांशी चर्चा केली नि मला याबद्दल विचार करायचं सांगितलं.मी सर्व प्रोसेस बघितली नि  एकंदरीत तयारीला लागलो नि यातून मास्टर्स करायचं निर्णय घेतला.आधी सांगितल्याप्रमाणे पब्लिक पॉलिसीचे महत्व मला चांगल्याप्रकारे ठाऊक होते.

मी Apply केलं.✨

हर्षल नि मी मिळून सर्वकाही तयारी केली.योग्य प्रश्नांची उत्तरे लिहिली.प्रवीण निकम दादा नि विशाल ठाकरे दादांनी एका शब्दांवर LOR द्यायचं ठरवलं नि मी फॉर्म Submit केलं.

काही दिवसांत माझी Application Select झाली नि interview साठी 12 फेब्रुवारी हि डेट देण्यात आली.12 फेब्रुवारी ला माझा ऑनलाइन Interview झाला.जो माझ्या आयुष्यातील पहिला interview होता.आयुष्यात प्रथमच एवढी इंग्रजी मी बोलली असेल नि ती सुद्धा सय्यद अकबरुद्दीन सर नि इतर दिग्गज मंडळीसमोर.मी माझी पहिली उपलब्धी हिच समजतो.व्यवस्थितरित्या मुलाखत झाली.विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे दिली.प्रामाणिकपणे जे काही ते सर्वकाही सत्य सांगितलं.मला का शिकायचं याबद्दल व्यक्त झालो.आत्मविश्वास, चेहऱ्यावरील स्माईल नि प्रामाणिकता मी कोठेही कमी होऊ दिली नाही.

आता select होईल की नाही याची मला खात्री नव्हती. 50/50 चान्सेस वाटतं होते. झालं तर ठीक नाही झालं तर पुढे ......
पण हार मात्र मानायची नाही हे ठरवलं होतंच...!

19 फेब्रुवारी ला पुण्याला गेलो नि शरद पवार सरांना भेटलो ही आयुष्यातील एक फार महत्वपूर्ण अनपेक्षित नि सुखद घटना होती.

 22 फेब्रुवारी ला Result आला नि हर्षलने माझी निवड झाल्याची गुड न्यूज दिली नि एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली.

एका मुक्तविद्यापीठातून 'बी.ए' ची पदवी घेतलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यासाठी एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये मध्ये निवड होणे ही फार मोठी गोष्ट आहे. मी जे स्वप्न बघितलं होतं त्या स्वप्नाच्या पुर्ततेकडे हा पहिला पाऊल आहे...🌾♥️

To Be Continued.......♥️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼