खुल्लम खुल्ला ❤️


कितीतरी दिवसांनी वाचायची इच्छा असलेलं हे पुस्तकं अखेर काल वाचून पूर्ण केलं.माझ्या आवडत्या अभिनेत्याने लिहलेले त्याचं हे आत्मकथन वाचण्याची कमालीची उत्सुकता अनेक दिवसांपासून होती ती काल पूर्ण झाली.कमालीचं अप्रतिम नि सुंदर असलेलं हे पुस्तकं आपल्याला भन्नाट फिल्मी दुनियेची सफर करून आणतो.'ऋषी कपूर' सरांनी आपला प्रवास ज्या मनमोकळ्यापणाने या पुस्तकात मांडला आहे तो खरंच भन्नाट होतं....हे पुस्तकं वाचत असताना आपल्याला जरा सुद्धा कंटाळा येतं नाही,आपण या पुस्तकाचा एक भाग होऊन हे सर्वकाही वाचत नि जगत राहतो.

2017 साली प्रकाशित झालेल्या या मूळ इंग्रजी पुस्तकाचा 'मीना कर्णिक'यांनी केलेला मराठी अनुवाद फार सुंदर झाला आहे.जे वाचताना आपण अनुवाद वाचतोय असं वाटतं नाही..

264 पृष्ठसंख्या असलेलं नि सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारं हे एक खूप इंटरेस्टिंग पुस्तकं आहे.'जे प्रत्येक सिनेप्रेमींनी नक्की वाचायला हवं..!

सुरुवातीपासून ऋषी कपूर हे माझे फार आवडते अभिनेते आहेत.त्यांचे कितीतरी चित्रपट नि विशेष त्यांच्या चित्रपटातील गाणी ही माझी प्रचंड आवडती आहे जी मी असंख्य वेळा ऐकत असतो...

मनाला आवडणाऱ्या नि भावणाऱ्या या अभिनेत्याबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटतं राहिलेलं आहे.राज कपूर नि ऋषी कपूर' हे दोन्ही कपूर खानदानातील पितापुत्र नि त्यांचा अभिनय मला मनापासून भावतो.'मागे राहुल रवैल लिखित'राज कपूर- दि मास्टर अँट वर्क 'हे पुस्तकं वाचून मी राज कपूर यांच्या प्रेमात पडलो होतो तर आता 'खुल्लम खुल्ला' वाचून ऋषी कपूरच्या.

या पुस्तकात लेखकांनी आपल्या आयुष्याचा प्रवास एकदम बिंदासपणे मांडलेला आहे.आपले वयक्तिक नि व्यवसायिक जीवन त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता वाचकांसमोर ठेवले आहेत.या पुस्तकातून ऋषी कपूर,त्यांच्या चित्रपट नि एकंदरीतच कपूर घराण्याबद्दल सुद्धा बरीच माहिती मिळते.कितीतरी आपल्या आवडत्या चित्रपट नि गाण्यांची पार्श्वभूमी समजते.ऋषी कपूर यांनी आपल्या आयुष्यातील वैयक्तिक किस्से, अनुभव आणि त्यांची वैभवशाली कारकीर्द आणि वैयक्तिक जीवनावरील प्रतिबिंब शेअर केल्यामुळे पुस्तक प्रामाणिक आणि स्पष्ट दृष्टिकोन देऊन जाते.

लेखकांनी ज्या प्रामाणिकपणाने चित्रपट उद्योग, त्यांचे नातेसंबंध आणि त्यांना सामोरे जावे लागलेल्या आव्हानांबद्दल अंतर्दृष्टी देऊन त्यांचा प्रवास कथन केला आहे त्याबद्दल आपल्याला कौतुक वाटतो.. 

एकूणच, "खुल्लम खुल्ला" हे ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी आणि बॉलीवूडच्या गुंतागुंतींमध्ये रस असणार्‍या दोघांसाठीही वाचनीय आहे.🤗🌾

©️Moin Humanist❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼