We Read दिपावली Special ❤️काही निवडक भन्नाट पुस्तकांची यादी क्रमांक :- 24 ❤️🌿
We Read दिपावली Special ❤️
80 पुस्तकांची यादी क्रमांक :- 24 ❤️
We Read कुटुंबातील सर्वांना दिपावलीच्या मनापासून खूप शुभेच्छा🌿🌱💙
पूर्ण यादी वाचूनच पुस्तके निवडावी ही विनंती...🌿
संपूर्ण यादी दिसतं नसेल तर खालील लिंक वर क्लीक करा...!🌾
https://moinhumanist24.blogspot.com/2023/11/we-read-special-24.html?m=1
__________________________________________
1)भुरा -शरद बाविस्कर (12 वी आवृत्ती)
मुळ किंमत - 500₹
We read किंमत - 430₹ घरपोच (शिपिंग फ्री)
धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या, भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या, तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या, 'भुरा' ही आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स, अल्थुझर, ग्राम्शी , महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन.
2)विटामिन जिंदगी ~ललित कुमार
पृष्ठसंख्या -216
मुळ किंमत -280
We Read किंमत -255₹घरपोच(शिपिंग फ्री)
ही कहाणी आहे एका दुर्दम्य इच्छाशक्तीची. वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओनं एक पाय निकामी केला, पण पोलिओ त्या मुलाच्या इच्छाशक्तीवर प्रहार करू शकला नाही. आयुष्यानं दिलेलं हे आव्हान त्या मुलानं पेललं. आणि आपल्या समस्येला संधीत रूपांतरित केलं. त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ही यशोगाधा. शरीराला जशी व्हिटामिन्सची गरज असते, तशीच मनाला आशा, प्रेरणा आणि साहसासारख्या व्हिटामिन्सची गरज असते. हेच व्हिटामिन्स ललित कुमार यांचं हे पुस्तक आपल्याला पुरवतं.
3)नाथ हा माझा~कांचन घाणेकर
पृष्ठसंख्या -436
मुळ किंमत -395
We Read किंमत -355₹घरपोच(शिपिंग फ्री)
हे व्यक्तिचरित्राच्या धाटणीत लिहिलं गेलेलं विलक्षण आत्मकथन आहे. एका डॉक्टरचं वैद्यकीय पेशाला बगल देत सिनेमाच्या रूपेरी पडद्याला आपलंसं करणं आणि त्यासाठीचा त्याचा संघर्ष यांचं पारदर्शी चित्रण कांचन घाणेकर यांनी मांडलं आहे. तीस वर्षीय डॉ.काशिनाथ घाणेकर आणि त्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेली पंधरा वर्षीय कांचन यांची ही प्रीतीगाथा आहे. कांचन आणि डॉ. घाणेकर यांच्यात दोन दशकं फुललेल्या प्रेमाच्या अंकुराची ही गोष्ट बहुआयामी स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि तथाकथित चौकटीबाहेरच्या नात्यांबाबतची सामाजिक मानसिकता यावरही प्रकाश टाकते.एका नायकाच्या जडणघडणीचा काळ ते उतरणीचा काळ, त्यातली घालमेल, तडफड यांचं हृदयस्पर्शी चित्रण यात अनुभवायला मिळतं. डॉ. घाणेकर यांचं हे चरित्र मराठी सिनेसृष्टीलाही प्रेरणादायी ठरलं. या पुस्तकावर आधारित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून 2018 सालचा हा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे.
4)द पार्लमेंटरी सिस्टम~अरुण शौरी
पृष्ठसंख्या -256
मुळ किंमत -295
We Read किंमत -255₹घरपोच(शिपिंग फ्री)
शासनव्यवस्थेचा दर्जा आणखी किती खाली गेला म्हणजे आपण `होय, आपल्याला दुसरी एखादी प्रणाली स्वीकारली पाहिजे` असे म्हणणार आहोत? अशी पर्यायी प्रणाली कशी असू शकेल? पण प्रणाली बदलण्याचा निर्णय घेणे, हे सध्याची प्रणाली बदलल्यामुळे ज्यांचे सर्वांत जास्त नुकसान होणार आहे त्याच्यांच हातात आहे, मग हा बदल होणार कसा?
5)पु. ल. चांदणे स्मरणाचे~ मंगला गोडबोले
पृष्ठसंख्या -320
मुळ किंमत -430₹
We Read किंमत -385₹घरपोच(शिपिंग फ्री)
तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला... अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला... मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा... हा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे! पुलंचं असणं... पुलंचं नसणं... ह्याचं ज्यांना अगत्य आहे, त्या सर्वांसाठी सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी पुलंना शोभेशा शैलीत घेतलेला वेध पुलंच्या जीवनाचा, त्यांच्या काळाचा, काळावर त्यांनी उमटवलेल्या अमिट नाममुद्रेचा ! पु.ल. चांदणे स्मरणाचे '
6)सुसाट जॉर्ज~ निळू दामले
पृष्ठसंख्या -206
We Read किंमत -245₹घरपोच(शिपिंग फ्री)
'जॉर्ज फर्नांडिस! भारताच्या राजकारणातील एक वादळी अन् बहुरंगी व्यक्तिमत्त्व. रेल्वेरुळांवर पोलिसांचा मार खाणारे जॉर्ज. उद्योगपतींना चळचळा कापायला लावणारे जॉर्ज. स.का.पाटलांना धूळ चारणारे ‘जायंट किलर जॉर्ज. चुटकीसरशी मुंबई बंद करणारे बंदसम्राट जॉर्ज. भारतीय रेल्वेच्या चाकांना थांबवणारे जॉर्ज.
मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडणारे जॉर्ज. सरकारचं समर्थन अन् विरोध सारख्याच कुशलतेनं करणारे संसदपटू जॉर्ज. इंदिराजींपासून अटलजींपर्यंत अनेकांबरोबर सहा दशकं राजकारणात वावरलेल्या - स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या - राजकीय नेत्याचं प्रोफाईल'
7)ओपनहायमर~ माणिक कोतवाल
पृष्ठसंख्या -360
We Read किंमत -275₹घरपोच(शिपिंग फ्री)
तो होता एक यशस्वी वैज्ञानिक. अणुबाँबच्या निर्मितीत त्याने हिरीरीने भाग घेतला, पण हायड्रोजनबाँबच्या निर्मितीला मात्र विरोध दर्शवला... मग राजसत्तेने त्याला शत्रू मानले, सरकारने त्याला जवळजवळ आयुष्यातूनच उठवले... जे. रॉबर्ट ओपेनहायमर त्याचे नाव! तरल कल्पनाशक्ती आणि विकृत वासना, लौकिक संपन्नता आणि मानसिक विषण्णता... अशा अनेक विरोधाभासांचा धनी ठरलेल्या एका लोकविलक्षण माणसाची, त्याच्या गुणदोषांची, त्याच्या सुखदु:खांची ही शोकात्म संघर्षकथा. '
8)शेअर बाजार~अतुल कहाते
पृष्ठसंख्या -504
मुळ किंमत -750₹
We Read किंमत -645₹घरपोच(शिपिंग फ्री)
शेअर बाजाराविषयी सर्वांगीण माहिती देणारं हे पुस्तक आहे. चांगला गुंतवणूकदार होण्यासाठीचं तसंच शेअर बाजाराच्या उगमाविषयीचं विवेचन सुरुवातीला केलं आहे. नंतर शेअर बाजाराच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामगिरी करणार्या तसेच सट्टेबाजी करणार्या व्यक्तींच्या अनुषंगाने शेअरबाजार हा विषय विस्तृतपणे मांडला आहे. त्या त्या व्यक्तीचं काय वैशिष्ट्य होतं, हे सांगताना त्याचे स्वभावविशेष आणि त्याचं खासगी जीवन याकडेही लक्ष वेधलं आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअरबाजाराकडे आकृष्ट करणं, शेअरदलालांना प्रशिक्षण देणं, ही होती चार्ल्स मेरिलची वैशिष्ट्यं. अभ्यासाच्या जोरावर शेअरबाजाराविषयी अचूक भाकितं करणं, ही होती एडसन गोल्डची खासीयत. तर, अशा व्यक्तींच्या माहितीमधून शेअर बाजाराचे विविध पैलू, विविध देशांची चलनं, शेअर बाजाराचा अर्थकारणाशी असलेला संबंध इ. बाबी उलगडतात. आवश्यकतेनुसार कोष्टकं दिली आहेत. शेवटी संदर्भसूची जोडली आहे. शेअर बाजाराविषयीचं साध्या-सोप्या भाषेतील रोचक पुस्तक❤️💙
9)बाईमाणूस ~ करुणा गोखले
पृष्ठसंख्या -224
We Read किंमत -245₹घरपोच(शिपिंग फ्री)
'समान मानव माना स्त्रीला असे कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात. वास्तवात मात्र किमान मानव माना स्त्रीला अशी विनवणी करावी लागते. Man is a rational being. माणूस सुज्ञ, तर्कनिष्ठ असतो असे अँरिस्टॉटलने म्हणून ठेवले आहे. परंतु स्त्रीविषयी विचार करताना, तिच्याशी वागताना मात्र तो तसा राहत नाही. म्हणून तर मानवी हक्कांची सनद लिहिली गेली, तेव्हा त्यात स्त्रीला कुठलेच हक्क दिले गेले नाहीत. कालांतराने स्त्रियांनीच सुज्ञ होऊन, तर्कनिष्ठ राहून आपणसुध्दा आधी मानव आहोत हे सांगण्यास सुरुवात केली. त्यांचे हे सांगणे म्हणजेच स्त्रीमुक्तिवाद. किमान तो तरी सुज्ञपणे आणि तकनिष्ठ राहून समजून घ्यावा यासाठी हा पुस्तक प्रपंच. '
10)पुतिन - महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान
~ गिरीश कुबेर
पृष्ठसंख्या -286
मुळ किंमत -350₹
We Read किंमत -325₹घरपोच(शिपिंग फ्री)
सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्नायकी. रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले. ते बहुतांशी फसले; तथापि व्लादिमीर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला. पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही. यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारून पुतिननी देशाची सारी सत्तासूत्रं आपल्या हातात घेतली. विरोधकांचा काटा काढताना त्यांनी कसलाही विधिनिषेध बाळगला नाही. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन देशविदेशांत त्यांनी जी पावलं उचलली, ती खूप वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही प्रदीर्घ काळ टिकली तरी कशी, हा भल्याभल्या राजकीय निरीक्षकांची सत्त्वपरीक्षा पाहणारा एक महत्त्वाचा प्रश्न. त्या कटूप्रश्नाची एका व्यासंगी आणि गोष्टीवेल्हाळ पत्रकारानं करून दाखवलेली ही उकल... आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या असंख्य भल्याबु-या कंगो-यांसह करून दिलेली ही ओळख... '
11)गावगाडा ~ द दि पुंडे
पृष्ठसंख्या -474
मुळ किंमत -500
We Read किंमत -455₹घरपोच(शिपिंग फ्री)
त्रिंबक नारायण आत्रे यांनी 1915 साली लिहिलेल्या गावगाडा या बहुचर्चित ग्रंथाची ही शताब्दी आवृत्ती. त्यांनी स्वत: या ग्रंथाचे वर्णन ‘Notes on Rural Sociology and Village Problems with special reference to Agriculture असे केलेले आहे. या आपल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या आर्थिक व्यवहारातील शेतक-याचे केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती आणि तत्कालीन गावगाडयाची कोसळू लागलेली अवस्था इत्यादींची साधार, सप्रमाण चिकित्सा केलेली आहे. या विशेष आवृत्तीमध्ये लेखक आत्रे यांच्या गावगाडा ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीची मूळ संहिता, त्यावरील महत्त्वाची अशी समकालीन समीक्षा, धनंजयराव गाडगीळ, स. ह. देशपांडे व सुमा चिटणीस या अभ्यासकांनी स्वातंत्र्योत्तर काळात केलेली सामाजिक-आर्थिक चिकित्सा आणि ग्रंथशताब्दीच्या निमित्ताने मुद्दाम लिहवून घेतलेले मिलिंद बोकील व नीरज हातेकर – राजन पडवळ यांचे लेख, तसाच सदानंद मोरे यांचाही लेख समाविष्ट आहे. संपादक द. दि. पुंडे यांची सुदीर्घ विवेचक प्रस्तावना आणि परिशिष्ट यांतूनही आत्रे यांच्या ग्रंथाचे अंतरंग उलगडून घेण्यास साहाय्य होणार आहे. आत्रेरचित गावगाडाची ही शताब्दी आवृत्ती ग्रामीण अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कृषिविज्ञान इत्यादी क्षेत्रांतील अभ्यासकांना तर उपयुक्त आहेच; पण त्याशिवाय गावप्रशासनात गुंतलेल्या सर्व प्रशासकीय अधिका-यांना तसेच जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांमधील जबाबदार कार्यकर्त्यांनाही विशेष मार्गदर्शक ठरणारी आहे. '
12)शब्दांच धन+केशराचा पाऊस+आनंददायी बगळे
~मारुती चितमपल्ली 🌿
एकूण 3 पुस्तके...!
मुळ किंमत -640₹
We Read किंमत -585₹घरपोच(शिपिंग फ्री)
13)बखर शिक्षणाची ~हेरंब कुलकर्णी
पृष्ठसंख्या -158
We Read किंमत -200₹घरपोच(शिपिंग फ्री)
'शिक्षकांनी, पालकांनी वाचले पाहिजे, असा उपदेश सारेच करतात; पण नेमके काय वाचावे, हे सांगितले जात नाही. सुदैवाने मराठीत केवळ शिक्षणासंबंधी आणि शिक्षकांना प्रेरणा देतील अशी किती तरी पुस्तके आहेत. त्यातली अनेक परभाषेतून अनुवादित झाली आहेत. मात्र अशा पुस्तकांची केवळ नावे सांगितल्याने ती वाचावीशी वाटत नाहीत; त्या पुस्तकात काय आहे हे समजले, तर मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. पिक्चरचा ट्रेलर बघितला की, पूर्ण पिक्चर बघावासा वाटतो ना, अगदी तसे. मराठीतल्या शिक्षणविषयक निवडक पुस्तकांचा ओघवत्या शैलीत परिचय करून देणारे हे पुस्तकांविषयीचे पुस्तक! केवळ शिक्षकांनीच नव्हे, तर पालकांनीही वाचावे असे. शिक्षणविषयक जाणीव समृद्ध करणारे '
14)काळ्यानिळ्या रेषा ~ राजू बाविस्कर
पृष्ठसंख्या -392
मुळ किंमत -550₹
We Read किंमत -495₹घरपोच(शिपिंग फ्री)
‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो.
15)गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण – मनू एस. पिल्लई
मुळ किंमत-400₹
355₹ घरपोच (शिपिंग फ्री)
जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू
मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत-एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर
गाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्र
संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत – या पुस्तकातले
विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या
खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील
कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून
टाकल्या आहेत.
16)माणूस 'असा' का वागतो ?-अंजली चिपलकट्टी
पृष्ठसंख्या -430
मुळ किंमत -550₹
We Read किंमत -495₹घरपोच(शिपिंग फ्री)
नैतिकता अन् सामाजिक विषमता, धर्मभावना आणि आध्यात्मिकता, प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय, अनुपालन, धर्म-जात भेदाभेद, कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा... माणसाच्या वर्तनाचे असे अनेकविध पैलू. उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स, मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञान अशा विविध ज्ञानशाखांच्या मिलाफातून माणसाच्या वर्तनाचा अभ्यास चालू आहे. स्वत:चे सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. सहकार्य, परोपकार, साहचर्य हे गुण माणसाच्या उत्क्रांतीत महत्त्वाचे ठरले आहेत. माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का ? मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे - आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे – माणूस असा का वागतो ?
17)बाराला दहा कमी…!
पृष्ठसंख्या -370
मुळ किंमत -350₹
We Read किंमत -325₹घरपोच(शिपिंग फ्री)
'सामान्य स्फोटकं, अण्वस्त्रं, रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रं यांचे शोध लावून आणि उपयोग करून माणसानं पृथ्वीच्या या सुंदर क्रीडांगणाचं भयंकर रणांगण केलं आहे! गेल्या शंभर वर्षातली माणसाच्या कार्यकतृत्वाची कहाणी प्रतिभावान पण परधर्जिण्या संशोधकांची, आपल्यापुरतं पाहणा-या स्पर्धांध शासनांची; संशोधनासाठी नव्यानं उभारलेल्या नगरींची आणि बाँबखाली चिरडून गेलेल्या हिरोशिमा-नागासाकी या नरकपुरींची; प्रत्यक्ष युध्दांची-कावेबाज कारस्थानांची; काही प्रकाशपानं आहेत. काळोखात काजळायचं की प्रकाशात उजळायचं, हे आपल्यालाच ठरवायचं आहे... वेळ थोडाच आहे... पण एक मार्गदर्शक मंत्र आहे- नो मोअर हिरोशिमाज्! '
18)प्रयोगातून विज्ञान-माधुरी शानभाग
पृष्ठसंख्या -342
मुळ किंमत -400₹
We Read किंमत -355₹घरपोच(शिपिंग फ्री)
शाळेमध्ये विज्ञान हा विषय अभ्यासाचा असतो.
या पुस्तकात हाच विषय छंद म्हणून येतो. निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं. मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं. विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता निर्माण करतं. आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण पुस्तक केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या शिक्षकांसाठी आणि शिक्षकांमधल्या पालकांसाठीही आहे. '
19)चौघीजनी ~कॅथरिन ओवेन्स पिअर
पृष्ठसंख्या -584
मुळ किंमत -525₹
We Read किंमत -455₹घरपोच(शिपिंग फ्री)
मुग्ध शैशवातली कोवळी सुखदु:खे ..... लुइसा मे अलकॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची ‘लिटल् वुइमेन’ ही कादंबरी अठराशे अडुसष्ट साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच तिला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. हॉलिवुडने तिच्यावर दोन वेळा चित्रपटही काढले आहेत. ‘लिटल् वुइमेन’ ही अमेरिकेतल्या ‘मार्च’ कुटुंबाची – विशेषत: त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि अॅमी या चार बहिणींची – कहाणी आहे. या व्यक्तिरेखा लेखिकेने आपण व आपल्या बहिणी यांच्यावरूनच बहुतांशी रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा प्रेमळ नातू लॉरी यांनी या कथेत आणखी अनोखे रंग भरले आहेत. हे एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंबचित्र आहे. एकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे परस्परांवरील उत्कट प्रेम, त्यांच्या आशाआकांक्षा, कोवळी सुखदु:खे, भविष्याची स्वप्ने याचे हे कधी विनोदी, तर कधी हृदयस्पर्शी असे चित्रण आपल्या साध्या सच्चेपणामुळे वाचकाला थेट अखेरपर्यंत गुंतवून ठेवते...
20)सबकु सलाम बोलो~गजानन देशमुख
पृष्ठसंख्या -332
मुळ किंमत -400₹
We Read किंमत -375₹घरपोच(शिपिंग फ्री)
'सबकु सलाम बोलो' हे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे सर्व दुनियेचा निरोप घेऊन स्वर्गारोहण करण्यापूर्वी काढलेले उद्गार आहेत. माझ्या दृष्टीने राजर्षी शाहूंचा हा उद्गार म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल त्यांना वाटणाऱ्या कृतार्थतेचा आविष्कार आहे. ज्या बहुजन समाजाच्या, मागासलेल्या समाजाच्या उद्धारासाठी राजर्षी शाहू हयातभर अन्यायाशी लढत राहिले, त्या समाजाचाच ते शेवटीही विचार करीत होते. असाही त्याचा अर्थ होतो. गजानन इंदुशंकर देशमुख यांनी या शाहू चरित्राचे नाव ठेवण्यामागे एक प्रकारची काव्यात्मक कल्पकता दाखवली आहे.
21)वाचणाऱ्याची रोजनिशी~सतीश काळसेकर
पृष्ठसंख्या -292
मुळ किंमत -350₹
We Read किंमत -335₹घरपोच(शिपिंग फ्री)
या पुस्तकामधील प्रत्येक लेख हा पूर्वी 'वाड्•मयवृत्त' आणि 'साप्ताहिक साधना' मध्ये पूर्वप्रकाशित झाला असून डिसेंबर 2003 ते जानेवारी 2009 प्रत्येक प्रकाशित झालेल्या सर्व लेखनाचे एकत्रित संग्रह "वाचणाऱ्याची रोजनिशी" या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात.काही वर्षांत ग्रंथ निर्मितीचा वेग प्रचंड वाढला आहे. पण यातली नेमकी कुठली पुस्तके वाचावीत असा प्रश्न आपल्याला पडतो. या पार्श्वभूमीवर कुणाचं तरी मार्गदर्शन मिळालं तर बेस्ट होईल.आणि त्यातच हे असलं मार्गदर्शन सतीश काळसेकरांसारख्या अफाट व्यासंगी अवलियाकडून मिळत असेल तर किती भारी.सतीश काळसेकर या माणसाचं अफाट वाचन आणि त्याला साजेसं लिखाण प्रत्येक वाचकाला आपल्या प्रेमात पाडणारा आहे.त्यांचा वाचन आणि पुस्तक प्रेम व पुस्तक संग्रहाबद्दल वाचून आपल्याला हेवा वाटतो.त्यांचा एकंदरीत वाचन प्रवास,पुस्तक संग्रह,पुस्तक प्रेम आणि वाचनामागची भूमिका माझ्यासारख्या असंख्य पुस्तक प्रेमींना कायमस्वरूपी प्रेरणा देणारी आहे.
22)काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? - शेषराव मोरे
मुळ किंमत-900₹
We read-795₹घरपोच(शिपिंग फ्री)
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:। मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली, तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो (आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो). फाळणीचे मूलकारण कोणते होते? जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी? फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची राहणार होती? राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता? त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता? अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण झाले असते काय? हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते? ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला असता!’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते? आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते... मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे नाव का घ्यावे लागले? अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा, फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ.
23)गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण – मनू एस. पिल्लई
मुळ किंमत-400₹
355₹ घरपोच (शिपिंग फ्री)
जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू
मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत-एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर
गाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्र
संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत – या पुस्तकातले
विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या
खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील
कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून
टाकल्या आहेत.
24)मुसाफिर~अच्युत गोडबोले
मुळ किंमत-450₹
405₹ घरपोच (शिपिंग फ्री)
‘मुसाफिर’ हे आत्मचरित्र जनमानसांत एक नवी लाट निर्माण करणारं ठरेल याची मला खात्री आहे. मानसशााावरच्या ‘मनात’ या पुस्तकानं मराठी पुस्तकजगतात एक मैलाचा दगड म्हणून ही गोष्ट सिद्ध केलीच आहे. मी नेहमीच अच्य्ुतच्या लिखाणानं, त्याच्या कुतूहलानं, वैविध्यपूर्ण विषयात असलेला त्याचा रस यानं आणि त्याच्या ज्ञानानं स्तिमित होतो. त्याचं सगळं व्यक्तित्व अफाट आहे... कुठे शहाद्याचे आदिवासी... आणि कुठे ते अमेरिकेतले सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रमुख मालक. ‘मुसाफिर’ म्हणजे... दहा दिवसांत सगळं तुरुंगविश्व उलगडणार्या लेखकाची किती भेदक आणि व्यापक नजर... तीच गोष्ट वेश्यांच्या वस्तीबाबत... थक्क करणारं लिखाण
25)पीसीओएस~अमित शिंदे
मुळ किंमत-250₹
230₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'पीसीओएस' हा तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसाधारण आजार आहे. भारतात गेल्या दहा वर्षांत हा आजार एखाद्या साथीसारखा पसरला आहे. मासिक पाळीच्या तक्रारी आणि वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या अनेक पेशंट्समध्ये अनपेक्षितपणे 'पीसीओएस'चे निदान होते.
'पीसीओएस' हा खरे तर एक लक्षणसमुचय आहे. अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व, चेहऱ्यावर अनावश्यक केस उगवणे, मुरूम (तारुण्यपीटिका), वजन वाढणे, डोक्यावरचे केस गळणे इत्यादी. अनेक लक्षणे 'पीसीओएस'मध्ये एकत्रित आढळतात.
26)‘मी का नाही ~पारू नाईक
150₹ घरपोच (शिपिंग फ्री)
मी का नाही?’ हा प्रश्न विचारू धजणा-या तृतीयपंथी समाजाची ही कहाणी! या कादंबरीची नायिका असलेल्या नाझच्या वाट्यालाही हे दु:ख येते. पण तिचे वडील सोडून सगळे कुटुंब, विशेषत: तिची आई तिला भक्कम पाठबळ देते. या पाठबळाच्या जोरावर नाझ ‘हिजडा समाज’ स्थापन करते. यातून ती या समाजाला स्वावलंबी आणि सुसंघटित तर करतेच; पण प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांचे प्रश्नही सोडवते. हिजडा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक चळवळ उभारते. समाजात पदोपदी होणारा अपमान, टिंगलटवाळी यांना दाद न देता निर्भीडपणे स्वत:च्या प्रश्नांसाठी न्यायालयापर्यंत धडक मारते. ‘मी का नाही’ हा एक शोध आहे. तो किती भेदक आहे, हे कादंबरी वाचताना उमगत जाते. त्याचे उत्तर शोधताना वाचक अस्वस्थ तर होतोच; पण निरुत्तरही होतो!
27)इन्शाअल्लाह~| अभिराम भडकमकर
मुळ किंमत - 350₹
325₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
'दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली. वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली. जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता. कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का? त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी. इन्शाअल्लाह'
28)परीघ-सुधा मूर्ती
225₹घरपोच(शिपिंग फ्री)
ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना जवळ पैसा असला काय किंवा नसला काय, काहीच फरक पडत नाही. पैशामुळे ख-याखु-या मानवी संबंधाचे दर्शन घडते. पैशामुळे मानवाच्या स्वभावात, वागण्यात, नाते संबंधात, तसेच राजकिय, सामाजिक विश्वात कसे बदल होतात, त्याचे सविस्तर आणि भयानक वास्तव दाखवणारे चित्रण.
29)अर्ली इंडियन्स ~टोनी जोसेफ
मुळ किंमत-399₹
We Read -345₹घरपोच (शिपिंग फ्री)
आपण भारतीय कोण आहोत ?
आपण कुठून आलो आहोत ?
या गहन प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी पत्रकार टोनी जोसेफ आपल्याला ६५,००० वर्ष मागे म्हणजे जेव्हा आधुनिक मानवांचा किंवा बुद्धिमान मानवांचा पहिला समूह आफ्रिकेतून भारतीय उपखंडामध्ये प्रवेशला त्या कालात घेऊन जातात . अगदी अलीकडेच उपलब्ध झालेल्या डीएनएच्या पुराव्यांचे दाखले देत त्यांनी भारतामध्ये झालेल्या आधुनिक मानव समूहांच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या स्थलांतरांचा पाठपुरावा केला आहे . त्यामध्ये इसवी सनपूर्व ७००० ते इसवी सनपूर्व ३००० दरम्यान इराणच्या प्रदेशातले शेतकरी समूह तसेच इसवी सनपूर्व २००० ते इसवी सनपूर्व १००० दरम्यान मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून आलेले पशुपालक आणि इतर स्थलांतरितांचा समावेश आहे . जनुकीय शास्त्रातील आणि याविषयीच्या अन्य संशोधनांतील निष्कर्षांच्या आधारे आपला भूतकाळ उलगडत जाताना जोसेफ भारतीय इतिहासातील काही विवादात्मक आणि खळबळजनक प्रश्नांकडे आपलं लक्ष वेधतात.
30)शूद्र पूर्वी कोण होते ?+अस्पृश्य मूळचे कोण
एकूण 2 पुस्तके
मुळ किंमत -250₹
We Read -225₹घरपोच(शिपिंग फ्री)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. या ग्रंथाचे प्रकाशन इ.स.१९४६ मध्ये झाले होते. हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी भारतातील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना अर्पण केला आहे. हा एक शोधग्रंथ आहे ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेलेले आहे.
&
पुस्तकात अस्पृश्य मुळचे कोण, या प्रश्नाचा सर्व बाजुंनी शोध घेण्याचा प्रयत्न तर करण्यात आलेला आहेच, परंतु त्यासोबतच त्या प्रश्नांशी संबंधीत अन्य बाबींचाही सांगोपांग उहापोह झालेला आहे.
31)निवडक मुलाखती -भालचंद्र नेमाडे
225₹ घरपोच (शिपिंग फ्री)
आपल्यासारख्यांना वाचकांशी संवाद वगैरे साधण्याचा काय मार्ग उपलब्ध असतो? महाराष्ट्रातली एकजात वर्तमानपत्रादी कोणाच्या हाताशी किंवा हातात किंवा हातची आहेत, एकदा वाचकांशी जवळचे संबंध प्रस्थापित व्हायला लागले, की आपोआप पत्रव्यवहार, भेटीगाठी, चर्चा अपुर्या पडायला लागतात. मग गावोगाव पसरलेले आपले वाचक मनात वेळोवेळी उद्भवणारे वैयक्तिक प्रश्न समाईक करायला उत्सुक असतात. इथे एकाच भाषेतल्या समूहमनातल्य सार्वजनिक चिंता व्यक्त व्हायला लागतात. मुलाखत हा काही वाड:मयप्रकार नाही की समीक्षाही नाही. प्रश्न विचारणार्या मुलाखतकारांच्या भागीदारीनं हा एक रचनाप्रकार होऊ शकतो. मुळात हा एक सांस्कृतिक नाट्यसंवाद असतो.
32)तेलगी स्कॅम -संजय सिंह
255₹घरपोच.(शिपिंग फ्री)
एका पत्रकाराच्या हाती एक रिपोर्ट लागतो. वरवर कंटाळवाणा वाटणारा हा अहवाल. पण त्याची ब्रेकिंग न्यूज होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. असं काय असतं या अहवालात? हा अहवाल असतो, तेलगीच्या महाघोटाळ्याचा. एका रात्रीत डान्सबारमध्ये कोटभर रुपये उधळणारा तेलगी. त्याच रात्री सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर येतो. आणि तपास यंत्रणेचीही मती गुंग होते. राजकारण आणि प्रशासनातली बडी धेंडं त्याला सामील असल्याची चर्चा सुरू होते.
33)लॉर्ड्स ऑफ द डेक्कन – अनिरुद्ध कणिसेट्टी
मुळ किंमत - 500₹
We Read -455₹घरपोच (शिपिंग फ्री)
भारतीय इतिहास लेखनामध्ये दक्षिण भारताच्या इतिहास लेखनावर अन्याय झाल्याचे अनेक इतिहासकारांनी दाखवून दिले आहे. येथील इतिहास लेखन ‘उत्तरकेंद्री’ असल्याचाही आरोप होतो. वासाहतिक काळातील गरजेतून ब्रिटिशांनी भारतीय ऐतिहासिक वाटचालीवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासकारांनी जो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला त्यातून ‘उत्तरकेंद्री’ मांडणी झालेली दिसते. पुढे भारतीय इतिहास लेखनावर तोच प्रभाव टिकून राहिला. भारतीय इतिहासाच्या अशा मांडणीला काही प्रमाणात दुरुस्त करण्याचा प्रयत्न अलीकडचे इतिहासकार करताना दिसतात. त्यापैकी मनू पिल्लै व अनिरुद्ध कनिसेट्टी यांचे लिखाण महत्त्वाचे आहे. याच मालिकेतील अनिरुद्ध कनिसेट्टी यांचे ‘लॉर्ड्स ऑफ द डेक्कन’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
34)संताजी घोरपडे -रवि मोरे
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
संताजी घोरपडे यांनी रामचंद्रपंत अमात्य यांना लिहलेले पत्र स्वामींच्या आज्ञेव्यतिरिक्त आम्ही काहीच नव्हतो. विश्वासाची जाती म्हणावी तरी स्वामींची आणी आमची शफत तुळशीबेलाच्या 'श्री' वरील आहे. स्वामींचे मांडीवर आम्ही उसे ठेऊन निजावे, आमचे मांडीवर स्वामींनी उसे ठेवावे, शरीर मात्र भिन्न. आत्मा एकच. आम्ही कोणे गोष्टीस अंतर पडलो नाही. आम्ही ऐसे सेवक नव्हे जे स्वामींचे स्मरण न करता आधी आपला बहुमान घेऊ. याचा पर्याय कागदी काय म्हणून लिहावा. स्वामीं वडील. हे यश येते ते स्वामींचेच पुण्येकरून येते. आमचा अभिमान सर्व गोष्टीचा स्वामींशी. पूर्वीपासून स्वामींनीच गौरविले; तेथे वखाचेच काय म्हणून लिहावे. पूर्वीपासून अंगीकार आमचा स्वामींनी केला आणी आम्हास बंधू म्हणविलें. हाच भाव सिद्धी पावला पाहिजे. स्वामीं व्यतिरिक्त आम्ही काही नाही. जैसी पूर्वी आज्ञेप्रमाणे वर्तणूक केली तैसीच करू
35)अर्थसाक्षर व्हा - अभिजित कोलपकर CA
मुळ किंमत - 400₹
We read Price - 360₹घरपोच.(शिपिंग फ्री)
आपण कमावलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करुन समाधानी आयुष्य जगायचे असेल तर हे पुस्तक उपयोगी आहे.
तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करुन विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करुन तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे याचे उत्तम मार्गदर्शन ’अर्थसाक्षर व्हा’ मधे वाचायला मिळते.
36)आश्वासक -रवींद्र साळवे
185₹घरपोच(शिपिंग फ्री)
'आश्वासक' हा एक आत्मविश्वासी व बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा एक गुणवत्तापूर्ण उल्लेख करणारा शब्द आहे. आपल्या जीवनातील एखादा असंभव वाटणारा निर्धार अत्यंत जिद्दीने, कुशलतेने तसेच अपरंपरागत पध्दतीने यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांना सामान्यपणे 'आश्वासक ' म्हटले जाते. या पुस्तकात मळलेल्या वाटेने न जाता जाणीवपूर्वक व प्रचंड आत्मविश्वासाने नवीन पायवाट निर्माण करणारे पन्नास 'आश्वासक' रवींद्र साळवे यांनी रेखाटलेले आहेत.
37)फुकटचेच सल्ले~डॉ.रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
185₹ घरपोच (शिपिंग फ्री)
वाचाल तर वाचाल, असे आम्हाला शिकवले गेले होते. म्हणून आम्ही वाचत गेलो आणि वाचलेले जे काही होते त्यामुळेच संपन्नपणे वाढलो. अलीकडेही ‘वॉचाल' तर बिघडाल असे पोटतिडकीने सांगूनही वाचनावर बहिष्कार का टाकला जात आहे, याचा उलगडा होऊ शकत नाही. अनुत्तरित प्रश्नांवर खूप चिंतन करून उत्तर शोधायचे असते म्हणून आम्ही त्या शोधात वेळोवेळी जे काही लिहीत गेलो त्यातील काही लिखाण ‘फुकटचे सल्ले' म्हणून या पुस्तकात एकत्रितपणे दिले आहे.हे सल्ले फुकटचे असले तरी त्यांना अनुभवांचा आधार आहे. म्हणून ते महत्त्वाचे ठरतात. तेव्हा सदरचे पुस्तक विकत घेऊन आमचे हे फुकटचे सल्ले आपल्या जीवनात उपयोगात आणाल अशी आशा आहे.
38)संविधानाचा जागल्या माझ्या आठवणी
We read -285₹ With शिपिंग घरपोच
संकटग्रस्तांचा विश्वास संपादन करणे ही मानवी हक्क - रक्षणार्थ लढणार्यांसाठी सर्वात अवघड परीक्षा असते. गुजरातच्या शोकात्मिकेत हालअपेष्टा ज्यांच्या वाट्यास आल्या त्यांच्यासाठी तीस्ता हे शक्तीस्थान आहे. _ आसमा जहॉंगीर.
39)न्याय – मायकल सॅंडेल
मुळ किंमत-400₹
We read -330₹ With शिपिंग घरपोच
खोट बोलण हे नेहमीच वाईट असतं का?
व्यक्तिस्वातंत्र्याला काही मर्यादा असली पाहिजे का?
अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याचा खून करावा लागल्याचं समर्थन करता येऊ शकेल का?
मुक्त बाजरपेठ खरंच मुक्त आहे का?
विषमता कमी करण्यासाठी ठरावीक लोकांवर कर आकारणं न्याय्य आहे का?
40)त्याने गांधींना का मारलं - अशोक कुमार पांडेय
New/paperback
मुळ किंमत - 300₹
We read Price - 250₹ घरपोच.
हे पुस्तक स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा
आणि हिंसा या तत्त्वज्ञानांच्या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या
सामाजिक-राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या
हत्येमागची कारणं समोर आणतं. त्याबरोबरच
गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी
जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. हे पुस्तक
गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत
नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या
वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं.
41)भारताची कुळकथा ~डॉ.मधुकर धावलीकर
मुळ किंमत-450₹
400₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'भारताचा इतिहास सुरू कधी होतो? महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे? इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर? साम्राज्यांच्या उभारणीच्या अन् पतनाच्या आधारावर? धार्मिक प्रभावांच्या पायावर? की साहित्यातील वर्णनांच्या कल्पनांवर? पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा '
42)ऋणानुबंध -यशवंतराव चव्हाण
295₹घरपोच (शिपिंग फ्री)
मानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधाऱ्यांचे बोट धरून चालणे आले, थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले.
हा प्रवास कधी ’एकला चलो रे’ च्या चालीवर तर कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला.
प्रवासात कधी चढउतार तर कधी ऊनपाऊस, तर कधी आशा – निराशेचे क्षणही.
सुखदु:खाच्या या संमिश्र वाटचालीत नियतीचा हातही वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो.
43)पारधी -गिरीश प्रभुणे
मुळ किंमत - 450₹
We read Price - 400₹घरपोच.(शिपिंग फ्री)
समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि ख-याखु-या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या एका अन्यायग्रस्त जमातीची ही आक्रोशकथा आहे... त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोय-यांच्या उत्कर्षासाठी झटणा-या एका तळमळीच्या कार्यकर्त्याने ही मांडलेली कैफियत आहे...
44)हसरे दुःख - भा.द खेर
मुळ किंमत - 500₹
We read Price - 455₹घरपोच.(शिपिंग फ्री)
माझं आयुष्यच नाटयमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो. आपल्या हस-या मुखवटयातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी. '
45)मोठी माणसं -नरेंद्र चपळगावकर
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळात आपल्या समाजजीवनावर अनेक व्यक्तींनी प्रभाव टाकला, त्यातील काहींची ही व्यक्तिचित्रे . त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे राजकीय विचार, त्यांच्या कार्यपद्वती आणि त्यांच्या जीवननिष्ठाही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे.
46)बखर संस्थानाची~ सुनीत पोतनीस
पृष्ठसंख्या -392
मुळ किंमत -600
We Read किंमत -550₹घरपोच(शिपिंग फ्री)
स्वातंत्र्यपूर्व काळच्या हिंदुस्थानातील संस्थाने आणि संस्थानिक म्हणजे ब्रिटीशराजच्या इतिहासातील बहुरंगी पाने. कुणाचा इंग्रजांना टोकाचा विरोध, तर कुणी इंग्रजांचे पराकोटीचे लांगूलचालन करणारे. या संस्थानिकांच्या एकमेकांमधील स्पर्धा, त्यांचे विक्षिप्त छंद, विलासी आयुष्य, विचित्र सवयी या साऱ्यांच्या कहाण्या, आख्यायिका अन् दंतकथा बनल्या. एका टोकाला फंदफितुरी, कटकारस्थाने; तर दुसऱ्या टोकाला कला-क्रीडा-साहित्य यांना उदार आश्रय. एकीकडे प्रजेचा पुत्रवत सांभाळ करणारे प्रजाहितदक्ष राज्यकर्ते, दुसरीकडे प्रजेची पिळवणूक करणारे लहरी कुशासक. अशा अनेकविध रंगांनी रंगलेली, महत्त्वपूर्ण संस्थानांच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचा वेध घेणारी, तरीही कथा-कादंबरीसारखी रंजक असणारी बखर संस्थानांची
47)अवकाळी पावसाच्या दरम्यान ची गोष्ट
-आनंद विंगकर
मुळ किंमत-200₹
We read -185₹ With शिपिंग घरपोच
कवी आनंद विंगकर यांची 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ही कादंबरी एक अकस्मात घडलेली घटना आणि एक अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होते. अस्मानी संकटामागच्या मानवी हस्तक्षेपांचं भान देत, अकस्मात उद्भवलेल्या घटनांच्या मालिकांची अपरिहार्य शोकात्म परिणती दिग्दर्शित करत त्या वातावरणातील बदलते मानवी भाव, मानवी जीजीविषा, कणखरपणा यांचा गंभीर प्रत्यय देते. रंजकतेच्या पारंपरिक कुप्रथांचा त्याग करूनही ही कादंबरी अत्यंत वेधक उतरली आहे. कारण लेखकाचं वृत्तिगांभीर्य आणि भावनात्मक ताटस्थ्य. आत्महत्या करणारं शेतकरी जोडपं, त्यांची थोरली लेक, तिचा प्रियकर यांची चरित्रं आणि एकूण कथानकाचं वाहतेपण प्रभावी आहेच, खेरीज ग्रामसमाजातील व्यवहार, परस्परसंबंधांचे ताणेबाणे यांच्यातील अस्सलतेमुळे ही कादंबरी अधिक मोठा आवाका धारण करते. कादंबरी वाचून संपवताना आपण ती वाचण्याआधीचे उरत नाही, हे तिचं महत्त्वाचं यश आहे.
48)नास्तिकासोबत गांधी (मराठी)
175₹ घरपोच (शिपिंग फ्री)
आस्तिकता आणि नास्तिकता दोन परस्पर विरोधी मताची माणसे एकमेकांशी चर्चा करत आहेत. परस्परांना तपासून बघत आहेत. मात्र या चर्चेत खंडनमंडन किंवा वादावादीचा खणखणाट नाही. चर्चेच्या ओघात दोघेही एकमेकाला समजून घेतात आणि दोघांमधील नाते अधिकाधिक दृढ होत जाते. गांधीजींच्या निधनानंतर तीन वर्षांनी गोरांनी या आठवणी लिहिल्या आणि तत्कालीन गांधीवादी विचारवंत किशोरीलाल मधुबाला यांनी प्रस्तावनेत या आगळ्यावेगळ्या संबंधाची वैचारिक उकल केली.
49)आदिवासी बोधकथा -एक पुनकर्थन :-
प्रदीप प्रभू/सिराझ बलसारा
Paperback/New
मुळ किंमत - 250₹
We read Price - 215₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
हे पुस्तक खरंच खूप जबरदस्त आणि अप्रतिम आहे.यातील प्रत्येक कथा उत्कृष्ट असून यामध्ये दिलेली वारली चित्रं तर खूप भन्नाट आहेत..गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया वारली चित्र काढत असतं. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपध्दती चित्रित केलेली आढळते.जीवनाचा सह-आनंद लुटलेला दिसतो.आदिवासी समाजातून बहरलेलं तत्वज्ञान यामध्ये सापडतो,त्यांची निसर्गाप्रति असलेली कृतज्ञता आणि प्राणिमात्रांवरचं प्रेम यामध्ये आपल्याला दिसतो.
50)माइन काम्फ ~ हिटलर 🌱
255₹घरपोच(शिपिंग फ्री)
1924 मध्ये दोन भागांत लिहिण्यात आलेले 'माइन काम्फ' हे हिटलरचे गाजलेले पुस्तक! समाजवादी जर्मन राज्याच्या निर्माणासाठी हिटलरने प्रचंड मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी त्याला अटक झाली आणि म्युनिक येथील पीपल्स कोर्ट येथे त्याच्यावर खटलाही दाखल करण्यात आला. त्या तेरा महिन्यांच्या तुरुंगवासात हिटलरने या पुस्तकाचा पहिला भाग, तर सुटका झाल्यावर दुसरा भाग लिहिला.
हे पुस्तक म्हणजे गेल्या शतकातील अत्यंत हुशार क्रूरकर्मा असलेल्या नेत्याच्या राजकीय विचारसरणीची, त्याच्या श्रद्धा व प्रेरणांची आणि जर्मनीला एक महान राष्ट्र तसेच नाझींना तिसरे राईश बनवण्याच्या त्याच्या संघर्षाची एक चित्तरकथाच होय.
51)डॉ.बाबासाहेब आंबेडकर: अनुभव आणि आठवणी
~ नानक चंद रत्तू
250₹ घरपोच(शिपिंग फ्री)
ट्रकभर ग्रंथसंग्रह विकत घेणारा जगातील बाबासाहेब आंबेडकर हा पहिला माणूस असावा . ही खरेदी केलेली पुस्तके आपल्या राजगृहात न नेता आपले अतीजवळचे अपत्य असलेल्या सिध्दार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जमा केली आजही त्या अमृततुल्य ज्ञानरुपी सागरात बरेच विद्यार्थी , अभ्यासक , विचारवंत , ग्रंथप्रेमी मंडळी पोहून त्याचा मनस्वी आनंद व आस्वाद घेत असतील आणि आहे.
52)पैशाचे मानसशास्त्र ~ मॉर्गन हाऊजेल
225₹घरपोच(शिपिंग फ्री)
पैसा आणि संपत्तीनिर्मिती यांबद्दलचे गैरसमज दूर करत आर्थिक वर्तनातील सुधारणांसाठी सल्ले देणारे हे पुस्तक यशस्वी आणि परिपक्व गुंतवणूकदार कसे बनता येईल, हेही सांगते…
आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीबाबत गाजलेली बहुसंख्य पुस्तके अमेरिकेतील लेखकांची आहेत. सर्वाधिक विक्री होणाऱ्या या पुस्तकांच्या यादीत एका नव्या पुस्तकाची भर पडली आहे. ते पुस्तक म्हणजे- मॉर्गन हाउजेल लिखित ‘द सायकोलॉजी ऑफ मनी : टाइमलेस लेसन्स ऑन वेल्थ, ग्रीड अॅण्ड हॅप्पीनेस’! मॉर्गन हाउजेल हे ‘द कॉलॅबोरेटिव्ह फंड’ या उद्यमशील फंडाचे निधी व्यवस्थापक (भागीदार) आहेत. प्रकाशनानंतर पहिल्या आठवड्यापासूनच ‘बेस्ट सेलर्स’ यादीत असलेले आणि वेगवेगळ्या भाषांत भाषांतरित झालेले त्यांचे हे पुस्तक भारतीय गुंतवणूकदारांना परिपक्व गुंतवणूकदार होण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल.
53)साखळीचे स्वातंत्र्य -गौरव सोमवंशी
255₹घरपोच(शिपिंग फ्री)
बिटकाॅईनची निर्मिती कशी झाली ?कोणी व का केली ?
बिटकाॅईन आणि ब्लाॅकचेन म्हणजे नेमकं काय ?हे दोन्ही एकच आहेत का वेगवेगळे ? हा नेमका प्रकार तरी काय आहे? याचा आपल्या दैनंदिन जीवनात काय आणि कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो?हा तंत्रज्ञान कितपत विश्वासू आहे ?या तंत्रज्ञानाचे इतिहास आणि भविष्य काय ? या इतर वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे लेखकाने अगदी विस्तृत आणि सुंदरपद्धतीने अनेक सोपी,रोचक उदाहरणे देऊन दिलेली आहे.ज्यामुळे हे पुस्तकं फारच वाचनीय बनते.कुठलाही ज्ञान कधीही केव्हाही वाया जात नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा ज्ञान आपल्या जवळ असायला हवं आणि भविष्याचा विचार करता तंत्रज्ञानाचा ज्ञान तर प्रत्येकाला असायलाच हवं तशाच एका तंत्रज्ञानापैकी या एका तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणे हे फार महत्वाचे आहे.इंग्रजी मध्ये तर याबद्दल असंख्य पुस्तके, लिहिली गेली आहेत पण मराठीत तरी हवं तसं पुस्तक याबद्दल नव्हतं जे सहज आणि सोप्या भाषेत आपल्याला याबद्दल माहिती देईल.आणि ही कमी हे पुस्तक कमी करून आपली ओळख नवीन तंत्रज्ञानाशी करून देते.
54)घोस्ट रायटर -आशिष महाबळ
मुळ किंमत-250₹
We read -215₹ With शिपिंग घरपोच
विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात.
55)We Read 'दिपावली विशेष'..!
विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी 5 महत्वपूर्ण पुस्तकाचा सेट...
मुळ किंमत~785₹
We Read किंमत- 675₹घरपोच(शिपिंग फ्री)
★अभ्यास कसा करावा ~ अनंत अभंग
'दहावी-बारावीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा – सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरूकिल्ली. मराठी,हिंदी,इंग्रजी या तीनही भाषा, निबंधलेखनाचा विशेष विभाग, विज्ञान विभाग, इतिहास-भूगोल विभाग या सा-या विषयांचा पाठ्यपुस्तकांच्या आधारे आढावा. स्वत:चा स्वत: अभ्यास-तोही कमी वेळात जास्तीत जास्त आणि कंटाळा न येऊ देता कसा करावा ? गेली दोन तपे शेकडो विद्यार्थ्यांसाठी राबवलेली पध्दत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सा-यांनाच उपयुक्त अभ्यासतंत्र.
★करिअर कसं निवडावं? ~ डॉ. श्रीराम गीत
'आयुष्याचे ध्येय ठरवताना... कधी कधी स्वतःची आवडच ठाऊक नसते. नव्या संधी कुठे उपलब्ध आहेत, हेही ठाऊक नसते. त्यामुळे आपले ध्येय काय आहे, हेही स्वतःला ठरवता येत नसते. या उलट... कधी कधी स्वतःची आवड स्वतःला पक्की ठाऊक असते. नव्या संधी कुठे खुणावत आहेत, हेही ठाऊक असते. आपले ध्येय काय आहे हेही मनाशी पक्के ठरलेले असते. पण ध्येयप्राप्तीचा नेमका मार्ग मात्र ठाउक नसतो. अशा वेळी गरज असते अनुभवी मार्गदर्शकाची. अशा वेळी गरज असते या पुस्तकाची. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करणारे हे पुस्तक त्यांच्या पालकांनाही नव्या वाटा दाखवील. '
★अचूक दिशा, सुयोग्य मार्ग - भाग-1&2 ~सुरेश वांदिले
'पालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो, करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल, तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे. असंख्य क्षेत्रे तुमच्या पाल्याच्या कर्तृत्वाला आवाहन करीत आहेत. आपल्या पाल्याचा कल प्रामुख्याने विज्ञानेतर विषयाकडे असेल, तर त्याला उपलब्ध होऊ शकणाऱ्या असंख्य अभ्यासक्रमांची माहिती करून घेण्यासाठी अवश्य वाचले पाहिजे, असे पुस्तक... '
★शिष्यवृत्ती हवी आहे? ~ सुरेश वांदिले
'खूप शिकायचंय, चांगल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश घ्यायचाय, पुढे संशोधन करायचंय, पण या संस्थेत प्रवेश मिळेल काय? प्रवेश मिळाला, तर खर्च झेपेल काय? असे प्रश्न गुणवंत मुलांना आणि पालकांना पडत असतात. पण आता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांनी महत्त्वाकांक्षी तरुण- तरुणींना त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. '
56)केदारनाथ 17 जून -डॉ.प्रकाश कोयाडे
355₹घरपोच(शिपिंग फ्री)
जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ
येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत,
म्हणूनच आपण मरायचं नाही..."
"आपल्याला जिवंत रहावंच लागेल!"
एका सत्य घटनेवर आधारीत कादंबरी...केदारनाथ १७ जून !
57)लोकांचे संविधान~रोहित डे
मुळ किंमत-500₹
425₹घरपोच (शिपिंग फ्री)
या पुस्तकात चार प्रकरणं आहेत आणि त्यांना त्या-त्या क्षेत्रात प्रबळ ठरलेल्या अग्रगण्य खटल्याचं नाव दिलं आहे. प्रचलित कायदेशीर निवाड्याच्या औपचारिक शिस्तीला आणि लोकाभिमुख कायदाविषयक लेखनाच्या प्रकाराला मानवंदना म्हणून प्रकरणांना अशी शीर्षकं दिली आहेत. अर्ल स्टॅन्ली गार्डनर यांनी पेरी मॅसन या मध्यवर्ती पात्राला घेऊन लिहिलेल्या कायदा क्षेत्रातील रहस्यकथा किंवा जॉन मॉर्टिमर यांनी लिहिलेल्या न्यायालयीन नाट्यांवर आधारित कादंबऱ्या अजूनही भारतात लोकप्रिय आहेत. खालिद लतिफ गौबा व कैलाशनाथ काटजू यांच्यासारख्या वकिलांनी प्रसिद्ध खटल्यांविषयी लिहिलेली विषयाधीनतेकडे कलणारी पुस्तकं खूप विक्री ठरली आहेत.
57)डेझर्टर -विजय देवधर
मुळ किंमत-425₹
We read -345₹ With शिपिंग घरपोच.
गंथर बान्हमान यांच्या 'आय डेझर्टेड रोमेल' या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे.
हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी
झाले आहे. बान्हमान यांचे स्वानुभव आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ असलेले हे कथानक आहे.
58)एकलव्य -विजय देवडे
मुळ किंमत - 380₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)
दुमदुमत्या आसमंताला निठेपुढं झुकायला लावणारा, स्वअध्ययनान धनुर्विद्या मिळवणारा, कुळभेदाच्या जाचक भिंतींना तोडून सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणारा निषाधराजा एकलव्य!
महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित बदललं गेलं असतं. एकलव्यानं गुरुदक्षिणेत अंगठा गुरू द्रोणाचार्य यांना दिला, त्याच्या निष्ठेनं सर्वांना भुरळ घातली. अशी गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग, निष्ठा व समर्पणाच्या जोरावर परत पर्वतासारखा उभा राहून एकलव्यानं आदर्श निर्माण केला.
59)माझे सत्याचे प्रयोग-महात्मा गांधी
225₹ घरपोच(शिपिंग फ्री)
माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे. गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत. या पुस्तकात लहानपणापासून १९२१ पर्यंतचे गांधीजींचे आयुष्य रेखाटले गेले आहे.
60)संघर्षाची मशाल हाती -नरसय्या आडम
मुळ किंमत-400₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
नरसय्या आडम म्हणजेच आडम मास्तरांशी माझा दीर्घकाळ परिचय आहे. आधी कामगार कार्यकर्ता, नंतर सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आणि पुढे तीन वेळा आमदार म्हणून मी त्यांना पाहिलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
61)भगतसिंहाची जेल डायरी
संपादन -अभिजित भालेराव 🖤
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
ही डायरी म्हणजे एक प्रकारचे कोडे आहे. संदर्भासहित वाचल्यास भगतसिंहांचा संदेश आपण सहज समजून घेऊ शकतो. देशासाठी ते फासावर चढले, त्यांचे आणि साथीदारांचे हे बलिदान अतुलनीय तर आहेच पण त्याशिवाय भगतसिंह एक फार मोठे काम करून गेले. ते स्वतंत्र भारताचे, स्वतंत्र जगाचे एक सुंदर स्वप्न या डायरीमध्ये रंगवून गेले. ते रंग आपल्याला उमजले तर आणि तरच फासावर चढताना भगतसिंहांच्या ओठावर असलेल्या स्मितहास्याचे रहस्य आपल्याला समजेल. फाशीच्या तक्ताला विचारांचे व्यासपीठ बनविणारा असा नरवीर जगात दुसरा झाला नाही. महाकवी पाश म्हणतात, "भगतसिंह फासावर चढण्यापूर्वी क्रांतिकारी लेनिनचे पुस्तक वाचत होते, जाता जाता ते पुस्तकाचे एक पान मुडपून गेले. आजच्या पिढीला तिथून पुढे वाचण्याची गरज आहे."
62)द लास्ट गर्ल ~नादिया मुराद
मुळ किंमत- 460₹
We read - 395₹घरपोच (शिपिंग फ्री)
काही पुस्तके आपल्यावा हसवतात तर काही खुप काही शिकवतात माञ अशीही काही पुस्तके असतात जि आपल्याला मुळापासुन हादरवतात जगण्याचे नवेआयाम दाखवतात जगातील दु:ख वेदना क्षणोक्षनी म्रुत्युशी दिलेली झुंज लढण्याची विजीगुषी व्रत्ती सगळच अचाट अविश्वनीय मानवी जिवनातील कौर्य मानवी हिंसाचार सगळ्यातुन वंचीतांचा आवाज उठवत असतात असेेच "द लास्ट गर्ल " हे नादिया मुराद हिचे आत्मचरीञ आहे .होय हि तिच मुलगी जिला अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षी 2018 साली मानाचा नोबल शांततेचा पुरस्कार मिळाला. असे काय घडले तिच्या आयुष्यात जिला 2014पर्यंत तिच्या गावाच्या वेशीबाहेरचही जग माहीत न्हवते तिला नोबल मिळण्याची रक्तरंजीत कहाणी म्हणजेच हे पुस्तक लास्ट गर्ल..!
63)द $ 100 स्टार्टअप क्रिस गुलिब्यू
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करायचा ठरवतो तेव्हा भांडवलाचा प्रश्न समोर उभा ठाकतो. व्यवसाय करण्यासाठी मोठं भांडवल गरजेच असतं असा एक समज लोकप्रिय आहे. तो बऱ्याच अंशी खरा आहे पण $१०० स्टार्टअप हे अंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं पुस्तक या लोकप्रिय विचाराला डावलून, “कमी गुंतवणूकीमधून व्यवसाय” हा एक नवा विचार मांडत.
64)गोष्ट पैशापाण्याची -प्रफुल वानखेडे
275₹घरपोच(शिपिंग फ्री)
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे.
65)■डू इट टुडे ~डारियस फारु◆
■थिंक स्ट्रेट~डारियस फारु◆
■द पावर ऑफ युवर सबकाँन्शस माईंड~डॉ.जोसेफ मर्फी◆
मुळ किंमत-600₹
We Read -535₹घरपोच (शिपिंग फ्री)
तुम्हाला तुमच्या कामातली चालढकल दूर करायची असेल, तुमची उत्पादकता वाढवायची असेल, आणि अधिकाधिक मोबदला मिळवायचा असेल, तर ते कसं साध्य करायचं यासाठी मी माझे ३० सर्वोत्तम लेख निवडले आहेत. आणि हा मार्ग फलदायी आणि अर्थपूर्ण जीवनाकडे घेऊन जातो. जर तुम्ही अशीच चालढकल करत राहिलात, तर तुम्ही चांगले उत्पादक होऊ शकत नाही. आणि जर तुम्ही चांगले उत्पादक नसाल, तर तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही. म्हणूनच मी माझ्या या पुस्तकाची सुरुवात विलंबाच्या संघर्षावर मात कशी करायची असं सांगून केली आहे.
व्यवसाय अथवा वैयक्तिक जीवनातील तोटा, वेदना आणि अर्थपूर्ण जगणे यांतील हा वैयक्तिक प्रवास आहे.
यांतून मी तुम्हाला जास्तीतजास्त उत्पादनक्षमतेच्या मार्गावर नेतो. जेणेकरून आपली 'वेळ' संपण्यापूर्वी आपण आपली क्षमता साध्य करू शकू.
तर तुम्ही हे पुस्तक वाचायला तयार आहात? तुमचा होकार असेल, तर हे काम आजच करा, कारण उद्या कधीच येत नाही.💙
&
तुमच्या आयुष्याची, जीवनकार्याची, नातेसंबंधांतील आणि व्यवसायातील गुणवत्ता सुधारण्यासाठी 'साधा, सोपा विचार' तुमच्या मनावर ताबा मिळविण्याची क्लृप्ती तुमच्यासमोर मांडतो. हे पुस्तक.
तुम्ही वारंवार वाचाल अशा स्वरूपात मी ते तुमच्यासमोर आणले आहे. तुम्हाला स्थैर्य मिळावे, विशेषत: तुमच्या संकटकाळात, असे काही तरी ह्या पुस्तकातून तुमच्या हाती लागेल, अशी आशा मला वाटते.
ह्या जगात मानवी मन हे सर्वांत प्रभावी साधन आहे.. तुमच्या विचारांची दिशा बदला... तुमचे आयुष्यच बदलून जाईल.
मग तुम्हीच तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणाल.🌾
&
हे पुस्तक म्हणजे यशस्वी होण्याचा मूलमंत्र !
काही लोक यशस्वी होतात , तर काही अयशस्वी. काही जण समृद्धीच्या वर्षावात न्हाऊन निघलात, तर काहींना दारिद्रयाचे चटके सहन करावे लागतात. काहींच्या
आयुष्यात नात्यांची मधुरता असते, तर काही जण वादविवादाच्या, अविश्वासाच्या भडानीत होरपळून निघतात. काहींकडे स्वास्थ्याची दौलत आणि मन:शांती असते, तर काही जण आजारांनी बेजार असतात. असं का बरं? या सर्वांची उत्तरं आहेत या पुस्तकात । तुम्हाला शारीरिक, मानसिक, नातेसंबंध, आर्थिक व आध्यात्मिक स्तरावर यशस्वी व्हायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.
66)■या जागा राखीव आहेत~अभिनव चंद्रचूड ◆
■ 'मंडल आयोग'~सत्येंद्र पी. एस ◆
655₹घरपोच(शिपिंग फ्री)
ही दोन्ही पुस्तके आवर्जून सर्वांनी वाचा...
मनातील'कितीतरी Doubts क्लिअर होतील नि महत्वाची माहिती मिळेल जी सध्याच्या काळात फार गरजेची आहे..!
67)श्यामची आई ~साने गुरुजी 🌱
150₹घरपोच(शिपिंग फ्री)
रात्री अखेर 'श्यामची आई'हे पुस्तक पुन्हा एकदा वाचून पूर्ण केलं.'श्यामची आई' वाचताना जणू मीच श्याम झालो होतो..'यशोदा' आई कडून 'बहुमोलाचे संस्कार नि जीवनोपयोगी तत्वज्ञानाची शिदोरी घेऊन परतल्याची भावना माझ्या मनात दाटून आली आहे.'आतापर्यंत हे पुस्तकं मी किमान चार वेळा वाचलं नि प्रत्येक वेळी मला या पुस्तकाने खूप काही नवीन नि चांगलंच दिलं.'प्रत्येक वाचनातून मला काही नवीन समजलं-उमजलं नि दरवेळी मी अधिकच समृद्ध झालो आहे.
68)आंबेडकर : जीवन आणि वारसा
~ शशी थरूर ❤️🌿
मुळ किंमत-300₹
255₹घरपोच(शिपिंग फ्री)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव आज सर्वांत आदरणीय भारतीयांच्या नामावलीत घेतलं जातं आणि देशभरातील त्यांच्या पुतळ्यांची संख्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांखालोखाल असेल. किंबहुना, आधुनिक काळातील 'सर्वांत थोर भारतीय' ठरवण्यासाठी अलीकडे एक मतचाचणी घेण्यात आली, त्यात दोन कोटींहून अधिक मतं नोंदवली गेली आणि त्यात आंबेडकरांना गांधींपेक्षा जास्त मतं मिळाली होती. आज सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आंबेडकरांवर हक्क सांगण्यासाठी चढाओढ सुरू असते. मुख्यत्वे आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आली आणि दलित समुदायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यामुळे दलित समूहांमध्ये ते एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला जातो. व्यक्तीच्या अधिकारांची पाठराखण करणाऱ्या व दडपलेल्यांची उन्नती साधू पाहणाऱ्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, अनेकत्ववादी मूल्यांसह भारत आजपर्यंत लोकशाही म्हणून टिकला, त्याचं मुख्य कारण संविधान हे आहे (पण सध्या ही सर्व मूल्यं संकटात अडकली आहेत).
69)■मन शक्ती वाढवा~गौर गोपाल दास◆
■इकिगाई ~युकारी मित्सुहाशी ◆
मुळ किंमत-450₹
We Read-405₹ घरपोच(शिपिंग फ्री)
सर्वोत्कृष्ट लेखक आणि जीवनशिक्षक असणाऱ्या गौर गोपाल दास यांनी या पुस्तकात मनाचं कार्य उलगडून दाखवलं आहे. लहान-मोठे किस्से सांगत पुढे जाण्याची त्यांची खास शैली इथे पुन्हा दिसून येते. मनाला समजून कसं घ्यायचं आणि आपल्या भल्याकरता त्याला शिस्त कशी लावायची हे ते समजवतात. संपूर्ण पुस्तकात ते अनेक सक्रिय कृती आराखडे आणि ध्यानधारणेची तंत्रं सांगतात, वर्कशीट्स देतात जेणेकरून आपल्या विचार-कृतीवर ताबा ठेवण्याच्या दृष्टीने स्वतःत बदल घडवून आणण्यात आपल्याला मदत होईल.
अधिक चांगल्या आणि अधिक समाधान देणाऱ्या परिपूर्ण अशा भविष्याकडे वाटचाल करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक.
&
इकिगाई हा शब्द दोन जपानी शब्दांपासून तयार झाला आहे. इकि म्हणजे आयुष्य आणि गाई म्हणजे मूल्य किंवा किंमत. त्यामुळे इकिगाई म्हणजे तुमचं जीवनमूल्य किंवा जीवनातील आनंद. सोप्या शब्दांत सांगायचं तर, तुम्हाला ज्या कारणामुळे सकाळी उठावंसं वाटतं, ते कारण म्हणजे इकिगाई.💙
70)इंडियाज मोस्ट फिअरलेस
मुळ किंमत -280₹
We Read किंमत -245₹घरपोच (शिपिंग फ्री)
आधुनिक लष्करातील शूरवीरांच्या सत्य कहाण्या, २०१६ मध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्समध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेल्या मेजरच्या कथानावर आधारित कथेसह.
71)निसर्गायण~ दिलीप कुलकर्णी
पृष्ठसंख्या -200
We Read किंमत -235₹घरपोच(शिपिंग फ्री)
'पर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी झाली आहे. निसर्गाशी ‘लढा’ देऊन त्याच्यावर ‘विजय’ मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली आहे. निसर्गाचं चक्र त्यामुळे भेदलं जात आहे. पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत — आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही ह्या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर ह्या समस्या सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे? तो कशानं शक्य होईल? आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान ह्यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. '
72)अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान- विश्वास पाटील
पृष्ठसंख्या -376
मुळ किंमत -480₹
We Read किंमत -455₹घरपोच(शिपिंग फ्री)
अण्णा भाऊ साठे... गरीब, दलित, शोषित, या सर्वांच्या वेदनेचा उद्गार अन् पिळवणूक झालेल्या स्त्रियांच्या आक्रोशाचा हुंकार... आयुष्यभर काटे-निखारे तुडवत वंचितांच्या जागृतीची मशाल चेतवणारे खंदे लेखक... मायमराठीसाठी डफावर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राची रणलावणी गात दिल्लीपर्यंत धडक मारणारे शाहीर... डॉ. होमी भाभा, नर्गिस, बलराज सहानी, शैलेंद्र, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे अशा राष्ट्रीय दिग्गजांना प्रभावित करणारे कलावंत... अण्णा भाऊंच्या कार्यकर्तृत्वाच्या दशदिशा धुंडाळून, दुर्मीळ कागदपत्रं शोधून, अण्णांचं जीवन व साहित्य समृद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा खास शोध घेऊन; कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेली वाङ्मयीन चरित्रगाथा अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान.
73)विंचवाचं तेल~प्रशांत रुपवते/सुनीता भोसले
295₹घरपोच(शिपिंग फ्री)
‘विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतं.
आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनताच मारून टाकायची… उद्ध्वस्त करायची…
पोलीस डिपार्टमेंटचं हे विंचवाचं तेल या समाजव्यवस्थेने… या संस्कृतीने साऱ्या बहुजन समष्टींसाठी विशेषत: दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना रूपात वापरलंय… तर याच समष्टीतील ही पोर… सुनीता भोसले… पारधी या ‘गुन्हेगार’ असा शिक्का बसलेल्या जमातीत तिचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर… तिने या ‘विंचवावर’ जालीम उपाय शोधला… तो म्हणजे भारतीय संविधानाचा! जयभीमच्या नाऱ्याचा!
समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न वयाच्या अकराव्या वर्षापासून करणाऱ्या या कार्यकर्तीची ही ज्वलंत जिंदगानी… विंचवाचं तेल !
74)साद घालतो कालाहारी -मार्क आणि डेलिया ओवेनस
मुळ किंमत-530₹
475₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली.
75)द प्रॉब्लेम ऑफ रुपी~डॉ.बाबासाहेब आंबेडकर❤️
(मराठी अनुवाद)
मुळ किंमत-450₹
We read~385₹घरपोच(शिपिंग फ्री)
रुपयाचे अस्थिर मूल्य, त्याची आवश्यक स्थिरता, सुवर्ण विनिमय पद्धत की सुवर्ण प्रमाण पद्धत, केंद्रीय बँकेची आवश्यकता असा तो मोठा आवाका होता. त्याच वेळेस आंबेडकरांनी या रुपयाच्या प्रश्नाला हात घातला. हाच त्यांचा प्रबंध म्हणजे 'दी प्रॉब्लेम ऑफ रुपी' होय. या पुस्तकामुळे भारतीय अर्थविश्वात आणि त्याची सगळी सूत्रं हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली. त्यातून उभ्या राहिलेल्या चर्चेनं आणि घेतल्या गेलेल्या निर्णयानं आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भक्कमपणे उभी आहे..
76)स्वयंघोषित देशभक्ताचे वास्तव -चंद्रकांत झटाले
255₹घरपोच(शिपिंग फ्री)
खऱ्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून स्वयंघोषित देशभक्तांनी आज देशभक्तीची व्याख्याच पूर्णपणे बदलून टोकली आहे. अशा कट्टरवादी स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव पुराव्यांसह मांडण्याचा हा प्रयत्न..
77)रिच डॅड पुअर डॅड ~रॉबर्ट कियोसोकी
मुळ किंमत-500₹
We Read -425₹घरपोच(शिपिंग फ्री)
'तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी जास्त पैसे मिळवावे लागतात या समजुतीला छेद देतं विशेषतः अशा जगात जिथे तंत्रज्ञान, रोबोट्स आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे नियम बदलत आहेत.
'हे शिकवतं की, भविष्यासाठी गलेलठ्ठ पगार मिळवण्यापेक्षा मालमत्ता मिळवणं आणि निर्माण करणं का महत्त्वाचं आहे - आणि गुंतवणूकदार आणि व्यावसायिक करांच्या कोणत्या फायद्यांचा लाभ करून घेतात.
78)■माझी आत्मकथा~डॉ.बाबासाहेब आंबेडकर ★
■जात समजून घेताना ~गेलं ओम्व्हेट ★
एकूण 2 पुस्तके....🌱
मुळ किंमत- 400₹
We Read-355₹ घरपोच(शिपिंग फ्री)
आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या, आणि कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील संशोधनासाठीचे एक विद्वान म्हणून प्रतिष्ठित झाले. आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि भारताच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
&
जात समजून घेताना हे पुस्तक म्हणजे जात या विषयाचा अंतर्दृष्टीने घेतलेला अभ्यासपूर्ण शोध आहे. भारतीय परंपरा म्हणजे हिंदू परंपरा आणि ब्राम्हणी परंपरा ब्राम्हण्यवाद म्हणजेच हिंदू धर्म असे स्वाभाविकरणे गृहीत धरले आणि ब्राम्हण्यवाद म्हणजे वेदांवर आधारित भारतीय संस्कृती अशा धारणेवर आधारित आणि भारतीय संस्कृतीचा मूळ वारसा आर्याच्या परंपरेतील आहे अशा समग्र गृहीतकाही आव्हान देते. भारतातील सेक्युलर भूमिकेचा पुरस्कार करणारेसुद्धा याच 'ब्राम्हण्यवादी दृष्टिकोनात' अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा (पारंपरिक) भारतीय समाज आणि भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनाला पर्याय देणाऱ्या, दलित चळवळीतून तयार झालेल्या पर्यायी वैचारिक मांडणीचा शोध या पुस्तकात घेण्यात आला आहे.
79)डियर तुकोबा~विनायक होगाडे 🌿
230₹ घरपोच(शिपिंग फ्री)
'तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन रुपात लेखकांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज ते आपल्या मनात विचारांचे हिंदोळ-कल्लोळ मातविणारे आहे. चारशेंवर वर्षांआधी तुकोबांनी आपल्यात पेरलेली सांस्कृतिक जनुके आजही आपल्यात वाहती असल्याने तुकोबा समकालीनच आहेत, हे ढळढळीत सत्य होय. म्हणूनच होगाडे यांनी काळाची काही मोडतोड, खेचाखेच केली आहे असे अजिबातही वाटत नाही. आज ज्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि मानसिक स्थितीत एक समूह म्हणून आपण जगत आहोत, त्या वर्तमानात तुकोबांची अशी आठवण होणे, करणे आवश्यकच आहे, हे होगाडे यांनी फार प्रत्ययकारी प्रकारे केले आहे. आधीच्या कविता आणि अखेरीचे स्फुट यांच्या बळावर ही 'ट्रायल' फार सामर्थ्याने उभी करून होगाडे यांनी फार वेधक आणि महत्वाचे सांस्कृतिक जागरण मांडले आहे.
80)■मऱ्हाटा पातशाह◆
■संताजी घोरपडे◆
मुळ किंमत-500₹
We Read -445₹घरपोच(शिपिंग फ्री)
शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या चित्राची निर्मिती ज्या प्रसंगी झाली, त्याचे केलेले वर्णन.. एका उत्कृष्ट चित्रकाराकडून..एक असा व्यक्ती जो शिवाजी महाराजांना भेटला, त्यांची चित्रे काढली.... पण आजही इतिहासाच्या पानांमध्ये हरवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे
घेतलेला मागोवा म्हणजेच "मऱ्हाटा पातशाह".....
&
संताजी घोरपडे यांच्या हयातीत तरी बादशहाला मराठ्यांच्या किल्ल्याविषयी काहीही हालचाल न करता स्वस्थ रहावे लागले होते. यातच संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाचा दरारा दिसून येतो. संताजी घोरपडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगिकारले होते. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा होता...सेनापती म्हणजे राज्याचा एक प्रकारे आधार असतो, ज्याच्या निष्ठेने वर्तमान सुरक्षित असतो अन् नसण्याने भविष्यकाळ अंधकारात बुडालेला बघायला मिळतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये. माणकोजी दहातोंडे, तुकाजी चोर, नेताजी पालकर, प्रतापराव हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते, म्हाळोजी घोरपडे, धनाजी जाधवराव इत्यादी एकापेक्षा एक सरस व कर्तृत्ववान सेनापती मराठा साम्राज्याला लाभले.
सभोवताली परकीय व एतदेशीय शत्रूंच्या विळख्यात उभे राहून स्वराज्याचे रक्षणच नव्हे तर त्याचा विस्तार करण्यामागे या सेनापतींचा मोलाचा वाटा होता. मुळात मराठ्यांचा राजा हा कोणी जन्मजात राजपुत्र नसून पित्याच्या स्वप्नाला दिशा देणारा, एका हाताने रक्षण व दुसऱ्या हाताने रिकाम्या हातांना काम देणारा भावी स्वराज्याचा अधिपती होता.
~We Read ❤️💙
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा