द लास्ट गर्ल....🖤
आपल्याला आपल्याच समस्या फार मोठ्या वाटतं असतात.सर्वकाही पुरेसे असून सुद्धा आपण आपल्याकडे जे नाही ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो नि जोपर्यत ती गोष्ट मिळवत नाही तोपर्यंत दुःखी राहतो.जगात फक्त आपल्यालाच दुःख आहे नि आपलेच दुःख फार मोठे आहे असं आपल्याला वाटतं राहतं.आपण आज आपल्या घरात सुखाने राहतोय,स्वतंत्र पध्दतीने जगतोय तरीही आपल्याला स्वातंत्र्याची विशेष किंमत नसते.पण जेव्हा आपण इतर देशाची स्थिती बघतो,'नादिया मुराद' सारख्या तरुणींची कहाणी बघतो/वाचतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण किती नशीबवान नि सुखी आहोत याची प्रचिती येते.आपले दुःख किती किरकोळ आहेत हे आपल्याला समजतं.'आपल्या जवळ जेवढं आहे त्यातील काही मूलभूत गोष्टी सुद्धा जगात असंख्यांना मिळतं नाही या गोष्टीची जाणीव आपल्याला होते.
तर काही दिवसांपूर्वी मी 2018 चा 'नोबेल शांतता पुरस्कार' विजेती 'नादिया मुराद 'ताई लिखित 'द लास्ट गर्ल' या आत्मकथनाचा 'सुप्रिया वकील'यांनी केलेला मराठी अनुवाद वाचून पूर्ण केला.तेव्हापासूनच याबद्दल माझं अनुभव लिहायचं प्रयत्न करत होतो पण ते काही केल्या जमतंच नव्हतं;कारण की या पुस्तकाचा कथानकच तसा आहे जो वाचकाला आतून हेलावून सोडतो,थरकाप उडवतो नि सुरुवातीला जे काही मांडल त्याची जाणीव करून देतो.
हे सर्वकाही वाचून पूर्ण केल्यानंतर लिहायला,बोलायला वाचकाला काही शब्दचं सुचतं नाही एवढं अस्वस्थ या पुस्तकाचा प्रवास आहे.संपूर्ण पुस्तकं वाचताना माणूस एवढं घाणेरडं नि क्रूर वागू शकतो ? एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो ? इत्यादी प्रश्न आपल्याला सारखे पडतं राहतात.पूर्णपणे थक्क नि सुन्न करून जाणारे हे आत्मकथन वाचताना आपल्या डोळ्याला पाजर फुटतो,घृणा वाटू लागते,राग अन् चीड येते तर यातील कितीतरी भयंकर प्रसंग वाचताना धायमोकळून रडावं वाटतं....
आपण यामध्ये पूर्णपणे गुंतून नि हरवून जातो नि यातील कथानकाचा एक अविभाज्य भाग होऊन जातो.हे सर्वकाही आपल्याला आपल्या समोर घडताना दिसतो नि आपण काहीच करू शकतं हा विचार करून आपल्याला हतबल वाटतं राहतं एवढं नक्की...वाचायला सुरुवात केल्यापासून ते शेवटच्या पृष्ठापर्यत खाली ठेवावं वाटतं नाही एवढ्या चांगल्या पद्धतीने हे पुस्तक लिहलेलं असून अनुवाद सुद्धा तेवढंच सुरेख झाला आहे....!
नादिया ताईने त्याची ही कहाणी ज्यापद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे ती आपल्या हृदयाचा ठाव घेणारी नि मुळापासून हादरून सोडणारी आहे.तिच्या बालपणापासून तर आयसिसच्या कैदेतून सुटण्यापर्यतचा एकंदरीत सर्व प्रवास आपल्या या आत्मकथनात लेखिकेने शब्दबद्ध केला आहे जो वाचताना अंगावर काटा येतो.🌿
कथानकाबद्दल....🌾
'यजिदी धर्मीय नादिया मुराद ही तरुणी आपल्या कुटुंबासोबत इराक देशातील कोचो या छोट्याश्या गावात राहत असते.जेमतेम परिस्थिती असलेलं हे कुटूंब सुखाने -प्रेमाने नांदत असतं.पण 2014 साली या गावांवर आयसिस या दहशतवादी संघटनेची वाईट नजर पडते नि एक भयंकर संकट या गावांवर येऊन कोसळतं.आयसिसचे दहशतवादी या गावातील सर्वांना एका शाळेत जमा करतात नि त्यांना जबरन इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सांगतात.
जेव्हा यापैकी कोणीही धर्मांतर करायचं स्वीकार करत नाही, तेव्हा सर्वप्रथम पुरुषांना वेगळं करून एका ट्रक मध्ये भरून नेल्या जातं नि गोळ्यांनी ठार केल्या जातं.'यामध्ये नादियाचे 6 भाऊ बळी पडतात.यानंतर वृद्ध नि तरुण स्त्रियांना वेगवेगळ करून 'वृद्ध स्त्रियांना' सुद्धा ठार केल्या जातं(यामध्ये नादियाच्या आईचा समावेश असतो) आणि तरुणींना 'सेक्स वर्कर'म्हणून विकल्या जातं.यामध्ये नादिया मुराद, तिच्या बहिणी, तिची वहिनी या सर्वांची लैंगिक गुलाम म्हणून विक्री होते.
येथूनच नादियाच्या खडतर नि भयानक प्रवासाला सुरुवात होते. तिच्यावर आयसिसच्या वेगवेगळ्या नराधमाकडून सतत बलात्कार केल्या जाते,क्रूर अत्याचार केल्या जातात,मारहाण करून तिला भयंकर त्रास दिल्या जातो.तिने वर्णन केलेलं हे सर्व वाचताना गहिवरून येतं,डोकं सुन्न व्हायला होतं,पुढे वाचण्याची हिम्मत होतं नाही एवढं त्रासदायक हा प्रवास आहे.आपल्याला वाचताना कष्ट जाणवतात तर लेखिकेने हे सर्वकाही भोगलं आहे हा विचार करून जीव कासावीस होऊन जातो....
नादिया ताईची खरेदी विक्री नि तिच्यावर सारख्या अत्याचाराची मालिका सुरूच राहते.पण इतकं सगळं सोसूनही लेखिका मोडून पडतं नाही किंवा शरण जातं नाही.आपले पळून जाण्याचे प्रयत्न ती सुरू ठेवते आणि एकेवेळी ती त्यात ती यशस्वी होते.एका सुन्नी मुस्लिम कुटुंबीयांच्या मदतीने ती मोठ्या जोखमीने'कुर्दीस्थानात' पोहोचते.🌿
अवघ्या 21 व्या वर्षी हे सगळं वाट्याला आलेली नादिया मुराद या अत्याचारातून सुटली व आपल्यावर झालेले अन्याय तिनं जगाला सांगितले.आता नादिया ताई मानवाधिकार चळवळीतली एक अग्रगण्य कार्यकर्ती म्हणून ओळखली जाते. यजिदी समाज, त्यांचा धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी ती काम करते.या सर्व लढ्याची व तिच्या संघर्षाची दखल जगाने घेतली नि तिला '2018 चा नोबेल शांतता पुरस्कार'देऊन तिचा सन्मान केला.
द लास्ट गर्ल या आत्मकथनात
' नादिया ताई' म्हणते....🌾
मला माझ्यावर बलात्कार करणाऱ्या माणसांच्या नजरेला नजर द्यायची आहे आणि त्यांना न्यायव्यवस्थेसमोर उभं केलेलं पाहायचं आहे आणि बाकी कशाहीपेक्षा, कुणाचीही कहाणी माझ्यासारखी असू नये, अशी माझी इच्छा आहे... अशी कहाणी
असलेली मी जगातली शेवटचीच मुलगी असावे...
द लास्ट गर्ल...! 💙
नि खरोखरच आपण असं कधीही,कोणासोबतही होऊ नये आणि ताईचे हे शब्द खरे ठरो यासाठी प्रार्थना करूया...! 🌾🌿
नक्की नक्की वाचा...! ❤️
©️Moin Humanist 💙
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा