नॉट विदाऊट माय डॉटर ❤️
बेट्टी मेहमुदी लिखित 'नॉट विदाऊट माय डॉटर'या इंग्रजी पुस्तकाचा 'लीना सोहोनी'यांनी केलेला मराठी अनुवाद वाचून पूर्ण केलं. मी हे पुस्तक फक्त वाचलं नाही तर जगलो आणि यातून एका आईच्या साहसाला नमन करून आलो. एकंदरीत कमालीचं अस्वस्थ करून जाणारा हा प्रवास होता. "खरंच ! अशी बिकट परिस्थिती नि दुःख कोणाच्याही वाटेला येऊ नये"जे या लेखिकेच्या नशिबी आले होते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकाला गुंतून ठेवणाऱ्या या पुस्तकातून एका आईच्या अफाट शौर्य अन् धाडसाचे दर्शन मला झाले. हा प्रवास वाचताना डोकं सुन्न व्हायला होतं नि कितीतरी वेळा डोळ्यांतून आपसुकच पाणी तरळत.'आजूबाजूचं काही भान राहतं नाही एवढं आपण यात गुंतून जातो.हे सर्वकाही आपल्या डोळ्यासमोर घडतोय असं आपल्याला वाटू लागतं.बेट्टी नि माहतोबचं दुःख आपल्याला आपल्या स्वतःच वाटू लागतं, या मायलेकीच्या दुःखाचे नकळतच आपण वाटेकरी होऊन जातो. हे पुस्तक वाचून पूर्ण केल्यानंतर मीच लेखिकेसोबत हा विलक्षण नि संघर्षपूर्ण प्रवास करून आलोय असं मला वाटतंय.स्वतःच दुःख मला किरकोळ वाटू लागलं आहे. खरंच ना ! आपले दुःख किती क्षुद्र असतात व आपण ...