We Read 100 वाचनीय पुस्तकांचीयादी क्रमांक :- 23 ❤️🌱
We Read 100 वाचनीय पुस्तकांची
यादी क्रमांक :- 23 ❤️🌱
पूर्ण यादी दिसतं नसेल तर ब्लॉगला visit करा...!🌿
http://moinhumanist24.blogspot.com/2023/10/we-read-100-23.html
https://wa.me/7066495828
__________________💝💝__________________
1)आजच्या यादीतील विशेष मुलांना दिवाळीत भेट देण्यासाठी 10 पुस्तकांचा सेट....!
1)मंत्र निसर्गाचा
2)परक्या फुलांची गोष्ट
3)दस नंबरी फोन आणि इतर कथा
4)फेसाळे कुटुंबीय गरगरे कुटुंबीय वरतोंडे
5) सप्तरंगी चित्र
6) जादुई दरवाजे
7)मित्र हरवले
8)वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल
9)कुकरची शिट्टी वाजली आणि
10)इलूचे घरटे.💙🌱
2)आंधळयाच्या गायी ~ मेघना पेठे
#Recommended
175₹घरपोच(शिपिंग फ्री)
'घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी... माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो! जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणा-या या आंधळयाच्या गायी... त्यांना म्हणे देव राखतो...! आणि आंधळा? तो तर फक्त या भोळया विश्वासाची बासरी वाजवत राहतो. '
3)दंशकाल~हृषीकेश गुप्ते
#recommended
मुळ किंमत - 500₹
455₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
'विहिरीत अंधार आहे. डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार. अंधारात काहीही असू शकतं; काहीहीम्हणजे काहीही. पण ते काहीही म्हणजे नेमकं काय? हे आत उतरल्याशिवाय कळणार नाही. आजवर आयुष्यातल्या अप्रिय, असह्य, नको असणाऱ्या गोष्टी मी विहिरीत टाकल्या. अगदी अडगळीत टाकाव्या तश्या टाकल्या. पण विहीर म्हणजे अडगळ नाही. विहिरीत आई आहे, अण्णा आहेत. विहिरीत काकूचं बाळ आहे, नंदाकाका आहे. विहिरीत दमी, तायडी आणि सुपडीही आहे. विहिरीत अनेक उत्तरं आहेत. अशा प्रश्नांची उत्तरं जे प्रश्न मला कधी पडलेच नाहीत; किंवा जे प्रश्न मी स्वत:ला कधीच पाडून घेतले नाहीत; किंवा असे प्रश्न ज्यांची उत्तरं मी कधी शोधलीच नाहीत. विहीर माझ्या आयुष्याचा रहस्यभेद आहे, जो अनेकदा शक्य असूनही मी आजवर कधीही केलेला नाही. विहिरीत उतरणं हे माझं प्राक्तन नाही. विहिरीत उतरणं हा मी राजीखुशी निवडलेला एक पर्याय आहे. बाहेरच्या वास्तवाला तोंड देण्यापेक्षा विहिरीत लपून बसणं कधीही सोपंच. '
4)इन्शाअल्लाह~| अभिराम भडकमकर
मुळ किंमत - 350₹
325₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
'दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली. वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली. जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता. कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का? त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी. इन्शाअल्लाह'
5)विंचवाचं तेल~प्रशांत रुपवते/सुनीता भोसले
295₹घरपोच(शिपिंग फ्री)
‘विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतं.
आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनताच मारून टाकायची… उद्ध्वस्त करायची…
पोलीस डिपार्टमेंटचं हे विंचवाचं तेल या समाजव्यवस्थेने… या संस्कृतीने साऱ्या बहुजन समष्टींसाठी विशेषत: दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना रूपात वापरलंय… तर याच समष्टीतील ही पोर… सुनीता भोसले… पारधी या ‘गुन्हेगार’ असा शिक्का बसलेल्या जमातीत तिचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर… तिने या ‘विंचवावर’ जालीम उपाय शोधला… तो म्हणजे भारतीय संविधानाचा! जयभीमच्या नाऱ्याचा!
समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न वयाच्या अकराव्या वर्षापासून करणाऱ्या या कार्यकर्तीची ही ज्वलंत जिंदगानी… विंचवाचं तेल !
6)काळ्यानिळ्या रेषा~ राजू बाविस्कर
#stronglyrecommended
मुळ किंमत - 550₹
495₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो. प्रफुल्ल शिलेदार.
7) गंगे तुझ्या तीराला ~ चंद्रकला कुलकर्णी / एल. के. कुलकर्णी
#recommend
मुळ किंमत - 600₹
495₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
'भारतीय लोकजीवनाचा अविभाज्य भाग असणारी गंगा नदी. तिचा भौगोलिक विस्तार आणि सांस्कृतिक प्रभाव, तिच्याभोवती गुंफल्या गेलेल्या विविध कथाकविता, तिचे अर्थकारण आणि शुद्धीकरण... या सा-या पैलूंचा लक्षवेधी, नयनरम्य छायाचित्रांसह घेतलेला माहितीपूर्ण रंजक वेध.
8)मध्यरात्रीनंतरचे तास~सलमा (सोनाली नवांगुळ)
(नवीन आवृती)
मुळ किंमत-650₹
595₹घरपोच(शिपिंग फ्री)
स्त्रीचं समाजातलं कार्यक्षेत्र म्हणजे, "फक्त चूल आणि मूल"; हा एकूणच जागतिक समज. प्रबोधनाच्या, समाजसुधारणेच्या ज्या टप्प्यावर एखादा देश, एखादा धार्मिक समाज असेल त्या टप्प्यानुसार या धारणेत कमी-अधिक शिथीलता येते. त्यानुसार मुलींना शिक्षणाचं, व्यवसायाचं, जोडीदार निवडण्याचं, कुठले कपडे घालायचे याचं, काय भाषा बोलायची, कोणाशी भेटायचं याचं स्वातंत्र्य मिळतं किंवा त्यावर नियंत्रण घातलं जातं. मुस्लिम समाज या बाबतीत अजूनही बराच मागासलेला आणि बंदिस्त आहे. या बंदीस्ततेमुळे मुसलमान स्त्रियांची जी कुचंबणा होते आणि त्यातून शारीरिक, मानसिक व लैंगिक भावनांचा जो विस्फोट होतो त्याचं समाजचित्र एक मुस्लीम महिलाच आपल्या समोर उभं करत आहे.
9)अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष-
मुळ किंमत-600₹
495₹घरपोच(शिपिंग फ्री)
या संघर्षातील माझे सर्वोच्च ध्येय ना गुलामी प्रथेला अभय देणे आहे, ना तिचे उच्चाटन करणे आहे; ते आहे देशाची अखंडता अबाधित ठेवणे. जर एकाही गुलामाला मुक्त न करता मी देशाची अखंडता राखू शकलो तर ते मी करेन. जर काही गुलामांची मुक्तता केल्याने आणि काहींना तसेच ठेवून देश अखंड ठेवता आला, तर ते मी करेन. मी गुलामी प्रथेबाबत या काळ्या वंशाच्या लोकांचावत जे करतो, ते देशाची अखंडता कायम राहावी यासाठीच करतो. आणि त्याला विरोध करतो तो यासाठी की, त्यामुळे देश अखंड राहायला साह्य होणार असते.
10)शूद्र पूर्वी कोण होते ?+अस्पृश्य मूळचे कोण
एकूण 2 पुस्तके
मुळ किंमत -250₹
We Read -225₹घरपोच(शिपिंग फ्री)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. या ग्रंथाचे प्रकाशन इ.स.१९४६ मध्ये झाले होते. हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी भारतातील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना अर्पण केला आहे. हा एक शोधग्रंथ आहे ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेलेले आहे.
&
पुस्तकात अस्पृश्य मुळचे कोण, या प्रश्नाचा सर्व बाजुंनी शोध घेण्याचा प्रयत्न तर करण्यात आलेला आहेच, परंतु त्यासोबतच त्या प्रश्नांशी संबंधीत अन्य बाबींचाही सांगोपांग उहापोह झालेला आहे.
11)पर्व -डॉ.एस.एल. भैरप्पा
मुळ किंमत - 550₹
485₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक.
12)जगाला पोखरनारी डावी वाळवी~अभिजित जोग
मुळ किंमत - 400₹
We read- 325₹घरपोच.(शिपिंग फ्री)
बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती अशक्य आहे हे ओळखून डाव्या शक्तींनी जागतिक वर्चस्वाचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवी घातक रणनीती आखली, जिचं उद्दिष्ट होतं पाश्चात्य जगताची कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम यासारखी शक्तिस्थान॔ आतून पोखरून टाकत त्यांचा विध्वंस करणं. यासाठी त्यांनी अतिरेकी व्यक्तिवाद, विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, लैंगिक स्वैराचार, समलैंगिकतेचा प्रसार, इतिहासाचं विकृतीकरण, धर्म आणि संस्कृतीची कुचेष्टा, अनिर्बंध स्थलांतराला प्रोत्साहन… यांचा आधार घेत कुटुंब, समाज, राष्ट्र यांना स्वयंविध्वंसाच्या टोकावर आणून उभं केलं. मार्क्सवादातील श्रीमंत वि. गरीब हा मूळ आर्थिक संघर्ष दूर ठेऊन वंश, लिंग, धर्म या सांस्कृतिक आधारांवर विविध गटांमध्ये सतत संघर्ष भडकत राहील अशी योजना राबवली. विशेष म्हणजे आपला विध्वंसक अजेंडा राबवण्यासाठी सामाजिक न्याय, पर्यावरणवाद, स्त्रीमुक्ती, सर्वसमावेशकता हे आकर्षक मुखवटे धारण केल्यामुळे त्यांना विरोध करणंच अशक्य ठरू लागलं.
13)वसुंधरेचे शोधयात्री- डॉ. अनुराग लव्हेकर
मुळ किंमत - 500₹
We read- 445₹घरपोच.(शिपिंग फ्री)
अज्ञाताबद्दलचे कुतूहल अन् अज्ञाताचा वेध घेण्याची जिज्ञासा यांमुळे अनेक धाडसी प्रवासी वसुंधरेच्या विविध भागांचा शोध घेत राहिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अन् पराकाष्ठेच्या जिद्दीमुळे ज्ञानाची नवनवीन क्षितिजे उदयास आली. निर्मिती, व्यवसाय, वितरण, व्यापार, उद्योग, प्रवास, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, इतिहास, भूगोल अशा मानवी जीवनाच्या अनेक आयामांवर या शोधयात्रांचा अमिट ठसा उमटला. ज्या भागांतून हे प्रवास घडले; त्या त्या भागांत कला, वास्तू, शिल्प, संगीत, साहित्य, धर्म, जीवनमूल्ये आदींची देवाणघेवाण होत राहिली - कधी सहकार्यातून, तर कधी संघर्षातून. ‘भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाट्य सादर होत असते.’ या विधानाची प्रचिती देणार्या - आपल्या शोधयात्रांमधून नवा इतिहास घडवणार्या शोधनायकांची गाथा.
14)भगतसिंहाची जेल डायरी
संपादन -अभिजित भालेराव 🖤
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
ही डायरी म्हणजे एक प्रकारचे कोडे आहे. संदर्भासहित वाचल्यास भगतसिंहांचा संदेश आपण सहज समजून घेऊ शकतो. देशासाठी ते फासावर चढले, त्यांचे आणि साथीदारांचे हे बलिदान अतुलनीय तर आहेच पण त्याशिवाय भगतसिंह एक फार मोठे काम करून गेले. ते स्वतंत्र भारताचे, स्वतंत्र जगाचे एक सुंदर स्वप्न या डायरीमध्ये रंगवून गेले. ते रंग आपल्याला उमजले तर आणि तरच फासावर चढताना भगतसिंहांच्या ओठावर असलेल्या स्मितहास्याचे रहस्य आपल्याला समजेल. फाशीच्या तक्ताला विचारांचे व्यासपीठ बनविणारा असा नरवीर जगात दुसरा झाला नाही. महाकवी पाश म्हणतात, "भगतसिंह फासावर चढण्यापूर्वी क्रांतिकारी लेनिनचे पुस्तक वाचत होते, जाता जाता ते पुस्तकाचे एक पान मुडपून गेले. आजच्या पिढीला तिथून पुढे वाचण्याची गरज आहे."
15)निवडक मुलाखती -भालचंद्र नेमाडे
225₹ घरपोच (शिपिंग फ्री)
आपल्यासारख्यांना वाचकांशी संवाद वगैरे साधण्याचा काय मार्ग उपलब्ध असतो? महाराष्ट्रातली एकजात वर्तमानपत्रादी कोणाच्या हाताशी किंवा हातात किंवा हातची आहेत, एकदा वाचकांशी जवळचे संबंध प्रस्थापित व्हायला लागले, की आपोआप पत्रव्यवहार, भेटीगाठी, चर्चा अपुर्या पडायला लागतात. मग गावोगाव पसरलेले आपले वाचक मनात वेळोवेळी उद्भवणारे वैयक्तिक प्रश्न समाईक करायला उत्सुक असतात. इथे एकाच भाषेतल्या समूहमनातल्य सार्वजनिक चिंता व्यक्त व्हायला लागतात. मुलाखत हा काही वाड:मयप्रकार नाही की समीक्षाही नाही. प्रश्न विचारणार्या मुलाखतकारांच्या भागीदारीनं हा एक रचनाप्रकार होऊ शकतो. मुळात हा एक सांस्कृतिक नाट्यसंवाद असतो.
16)संजीवन’ - भा. द. खेर
मुळ किंमत - 2500₹
We read- 225₹घरपोच.(शिपिंग फ्री)
ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारलेली भावरम्य कादंबरी आहे. वारकरी सांप्रदायाने संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांना ‘माउली’ हे वात्सल्यपूर्ण नामाभिधान दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांवर अनेक विद्वान साहित्यिकांनी विविध प्रकारची ग्रंथनिर्मिती केली आहे. संस्कृत भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानेश्वरी’ प्रत्येक भाविकाच्या श्रद्धेचा विषय आहे. ज्ञानेश्वर हा प्रत्यक्ष विष्णूने लोककल्याणासाठी घेतलेला अवतार आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चिकित्सक संतसाहित्यिकांनी ‘ज्ञानेश्वरी’चा अन्वयार्थ विशद करणारे भाष्यग्रंथ लिहिले आहेत. भा. द. खेर त्यांच्या ‘संजीवन’ कादंबरीत विठ्ठलपंत-रुक्मिणी (ज्ञानेश्वरांचे मातापिता) यांच्या विवाहापासून ते ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीपर्यंतचे घटना-प्रसंग रसाळ भाषेत वर्णिले आहेत. खेर यांची लेखनशैली साधीसोपी पण लालित्यपूर्ण असल्यामुळे आपसूकपणे वाचनात तन्मयता येते. कादंबरीतील भावोत्कट करुण प्रसंगात आपण (वाचक) भारावून जातो. परमेश्वरानं मानवदेह धारण करून अवतारकार्य संपल्यावर आत्मरूपात विलीन व्हावं, तसा ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधिसोहळा तर कादंबरीतील उत्कर्षबिंदूच आहे.
17)माणूस 'असा' का वागतो ?-अंजली चिपलकट्टी
मुळ किंमत-550₹
We Read- 495₹ घरपोच(शिपिंग फ्री)
माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का ? मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे - आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे – माणूस असा का वागतो ?
18)द लास्ट गर्ल ~नादिया मुराद
मुळ किंमत- 460₹
We read - 395₹घरपोच (शिपिंग फ्री)
काही पुस्तके आपल्यावा हसवतात तर काही खुप काही शिकवतात माञ अशीही काही पुस्तके असतात जि आपल्याला मुळापासुन हादरवतात जगण्याचे नवेआयाम दाखवतात जगातील दु:ख वेदना क्षणोक्षनी म्रुत्युशी दिलेली झुंज लढण्याची विजीगुषी व्रत्ती सगळच अचाट अविश्वनीय मानवी जिवनातील कौर्य मानवी हिंसाचार सगळ्यातुन वंचीतांचा आवाज उठवत असतात असेेच "द लास्ट गर्ल " हे नादिया मुराद हिचे आत्मचरीञ आहे .होय हि तिच मुलगी जिला अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षी 2018 साली मानाचा नोबल शांततेचा पुरस्कार मिळाला. असे काय घडले तिच्या आयुष्यात जिला 2014पर्यंत तिच्या गावाच्या वेशीबाहेरचही जग माहीत न्हवते तिला नोबल मिळण्याची रक्तरंजीत कहाणी म्हणजेच हे पुस्तक लास्ट गर्ल..!
19)इंडियाज मोस्ट फिअरलेस
मुळ किंमत -280₹
We Read किंमत -245₹घरपोच (शिपिंग फ्री)
आधुनिक लष्करातील शूरवीरांच्या सत्य कहाण्या, २०१६ मध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्समध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेल्या मेजरच्या कथानावर आधारित कथेसह.
20)द $ 100 स्टार्टअप क्रिस गुलिब्यू
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करायचा ठरवतो तेव्हा भांडवलाचा प्रश्न समोर उभा ठाकतो. व्यवसाय करण्यासाठी मोठं भांडवल गरजेच असतं असा एक समज लोकप्रिय आहे. तो बऱ्याच अंशी खरा आहे पण $१०० स्टार्टअप हे अंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं पुस्तक या लोकप्रिय विचाराला डावलून, “कमी गुंतवणूकीमधून व्यवसाय” हा एक नवा विचार मांडत.
21)गोष्ट पैशापाण्याची -प्रफुल वानखेडे
275₹घरपोच(शिपिंग फ्री)
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे.
22)तेलगी स्कॅम -संजय सिंह
255₹घरपोच.(शिपिंग फ्री)
एका पत्रकाराच्या हाती एक रिपोर्ट लागतो. वरवर कंटाळवाणा वाटणारा हा अहवाल. पण त्याची ब्रेकिंग न्यूज होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. असं काय असतं या अहवालात? हा अहवाल असतो, तेलगीच्या महाघोटाळ्याचा. एका रात्रीत डान्सबारमध्ये कोटभर रुपये उधळणारा तेलगी. त्याच रात्री सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर येतो. आणि तपास यंत्रणेचीही मती गुंग होते. राजकारण आणि प्रशासनातली बडी धेंडं त्याला सामील असल्याची चर्चा सुरू होते.
23)आधुनिक भारताचे विचारस्तंभ~रामचंद्र गुहा
मुळ किंमत-800₹
We Read -700₹घरपोच (शिपिंग फ्री)
‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथ
MAKERS OF MODERN INDIA आता मराठीत
राममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव फुले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ ठाकूर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारं पुस्तक.
24)अर्ली इंडियन्स ~टोनी जोसेफ
मुळ किंमत-399₹
We Read -345₹घरपोच (शिपिंग फ्री)
आपण भारतीय कोण आहोत ?
आपण कुठून आलो आहोत ?
या गहन प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी पत्रकार टोनी जोसेफ आपल्याला ६५,००० वर्ष मागे म्हणजे जेव्हा आधुनिक मानवांचा किंवा बुद्धिमान मानवांचा पहिला समूह आफ्रिकेतून भारतीय उपखंडामध्ये प्रवेशला त्या कालात घेऊन जातात . अगदी अलीकडेच उपलब्ध झालेल्या डीएनएच्या पुराव्यांचे दाखले देत त्यांनी भारतामध्ये झालेल्या आधुनिक मानव समूहांच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या स्थलांतरांचा पाठपुरावा केला आहे . त्यामध्ये इसवी सनपूर्व ७००० ते इसवी सनपूर्व ३००० दरम्यान इराणच्या प्रदेशातले शेतकरी समूह तसेच इसवी सनपूर्व २००० ते इसवी सनपूर्व १००० दरम्यान मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून आलेले पशुपालक आणि इतर स्थलांतरितांचा समावेश आहे . जनुकीय शास्त्रातील आणि याविषयीच्या अन्य संशोधनांतील निष्कर्षांच्या आधारे आपला भूतकाळ उलगडत जाताना जोसेफ भारतीय इतिहासातील काही विवादात्मक आणि खळबळजनक प्रश्नांकडे आपलं लक्ष वेधतात.
25)मन:शक्ती वाढवा~गौर गोपाल दास
235₹घरपोच(शिपिंग फ्री)
हा प्रवास सहज समजण्यासाठी पुस्तकाचे चार विभाग केले आहेत. 'मी आणि माझ मन' या पहिल्या विभागात आपण आपल्या स्वतःच्या भावनांबद्दल बोलणार आहोत. 'इतर आणि माझं मन' या दुसऱ्या विभागात इतरांचा आपल्या भावनांवर कसा परिणाम होऊ शकतो, हे आपण पाहणार आहोत. 'मी आणि इतरांचं मन' या तिसऱ्या विभागात आपल्या कृतिप्रति संवेदनशील होत इतरांच्या मानसिक आरोग्याचं रक्षण आपण कसं करू शकतो, हे जाणून घेता येईल. 'विश्व आणि माझं मन' या चौथ्या विभागातून निसर्गाचे नियम आपल्या मानसिक स्थितीवर कसा परिणाम करतात, आपली मानसिक अवस्था विकसित होण्यासाठी आपण आध्यात्मिक स्तरावर कसा विकास करू शकतो, हे लक्षात येईल.❤️
26)द प्रॉब्लेम ऑफ रुपी~डॉ.बाबासाहेब आंबेडकर❤️
(मराठी अनुवाद)
मुळ किंमत-450₹
We read~385₹घरपोच(शिपिंग फ्री)
रुपयाचे अस्थिर मूल्य, त्याची आवश्यक स्थिरता, सुवर्ण विनिमय पद्धत की सुवर्ण प्रमाण पद्धत, केंद्रीय बँकेची आवश्यकता असा तो मोठा आवाका होता. त्याच वेळेस आंबेडकरांनी या रुपयाच्या प्रश्नाला हात घातला. हाच त्यांचा प्रबंध म्हणजे 'दी प्रॉब्लेम ऑफ रुपी' होय. या पुस्तकामुळे भारतीय अर्थविश्वात आणि त्याची सगळी सूत्रं हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली. त्यातून उभ्या राहिलेल्या चर्चेनं आणि घेतल्या गेलेल्या निर्णयानं आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भक्कमपणे उभी आहे..
27)रिडल्स इन हिंदुइझम -डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मुळ किंमत -300₹
We Read -255₹घरपोच(शिपिंग फ्री)
रिडल्स इन हिंदुइझम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला एक इंग्लिश ग्रंथ आहे. इ.स. १९५६च्या सप्टेंबर महिन्यात आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. त्यांना त्या ग्रंथात काही फेरफार करायचे होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.[१] पहिल्यांदा इ.स. १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे' या श्रृंखलेखालील खंड चौथा म्हणून हा ग्रंथ प्रकाशित केला होता. या ग्रंथात ग्रंथकाराने हिंदू धर्मातील अतार्किक बाबींवर प्रकाश टाकलेला आहे.
28)रफ स्केचस -सुभाष अवचट
मुळ किंमत - 400₹
We read- 355₹घरपोच.(शिपिंग फ्री)
कॅनव्हास रंगवताना अनेक क्षण असे येतात ज्यांचं वर्णन करता येत नाही. त्याचं रियलायझेशन त्या चित्रात दडलेलं असतं. अशा जगण्यात, अशा क्रिएटिव्हिटीमध्येच डोळस निर्वाणाचे आभास दडलेले असतात. त्याची चाहूल खेड्यातल्या तुमच्या बालपणात मिळत जाते. बुद्धाची शिकवण काय आहे हे शोधत गेल्यास तुम्हाला परफेक्ट शांती आणि आनंद मिळतो. खेड्यात पायवाटांवरती शांतता चोहीकडे पसरलेली दिसते. झाडांच्या सावलीला टेकलेले शेतकरी एकही शब्द न बोलता मजेत बसलेले दिसतात. चावडीवर बसलेले गावकरी आनंदाने गप्पा मारताना दिसतात. शेतात रापलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर असाच एकात्मिक आनंद पसरलेला दिसतो..
29)स्वयंघोषित देशभक्ताचे वास्तव -चंद्रकांत झटाले
255₹घरपोच(शिपिंग फ्री)
खऱ्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून स्वयंघोषित देशभक्तांनी आज देशभक्तीची व्याख्याच पूर्णपणे बदलून टोकली आहे. अशा कट्टरवादी स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव पुराव्यांसह मांडण्याचा हा प्रयत्न..
30)माझे सत्याचे प्रयोग-महात्मा गांधी
225₹ घरपोच(शिपिंग फ्री)
माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे. गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत. या पुस्तकात लहानपणापासून १९२१ पर्यंतचे गांधीजींचे आयुष्य रेखाटले गेले आहे.
31)कास्ट मॅटर्स -सूरज एगंडे
Paperback/New
मुळ किंमत - 460₹
We read Price - 385₹घरपोच.(शिपिंग फ्री)
या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेले पहिल्या पिढीचे दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतात. दररोज नरकयातना भोगावा लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरीही यात आढळते. दलितांमधील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात. जोवर दलित सत्ता मिळवण्यासाठीच्या लढ्यात नेतृत्वस्थानी नसतील आणि ब्राह्मणवादाविरोधात ब्राह्मण उभे राहणार नाहीत, तोवर जातीचं अस्तित्व राहणार असल्याची मांडणी एंगडे करतात.
32)भारतातील थोर आदिवासी क्रांतिकारक'
235₹घरपोच(शिपिंग फ्री)
'भारतातील थोर आदिवासी क्रांतिकारक' हे पुस्तक म्हणजे ब्रिटिश आक्रमणाला आव्हान देणाऱ्या अनाम नायकांच्या शौर्याला मानवंदना देण्याचा छोटासा एक प्रयत्न आहे. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आजपर्यंत दुर्लक्षित राहिले. ते सर्वांसमोर आणावे हा या पुस्तकाचा हेतू आहे.
33)पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी
मुळ किंमत -450₹
We Read -395₹घरपोच(शिपिंग फ्री)
पाकिस्तान - भारताचे विभाजन या ग्रंथाचा मराठी अनुवाद Pakistan : Partitation of India अनुक्रमणिका भाग पहिला - पाकिस्तानातील मुस्लिमांची स्थिती (1 )लीगला काय हवंय ? (2) मातृभूमीची ओढ (3) अवनतीपासून मुक्तता भाग दूसरा- पाकिस्तानविरूद्धची हिंदूंची स्थिती (4) ऐक्याचे तुकडे (5) संरक्षण व्यवस्था कमजोर करणे (6) पाकिस्तान व जातीय शांतता भाग तिसरा- जर पाकिस्तान नसेल तर ? (7) पाकिस्तानला हिंदूचा पर्याय (8)पाकिस्तानला मुस्लिमांचा पर्याय (9) परदेशातील धडा भाग चौथा - पाकिस्तान आणि धसमुसळेपणा (10) सामाजिक कोंडी (11)जातीय आक्रमकता (12) राष्ट्रीय निराशा भाग पाचवा - पाकिस्तान आवश्यकच आहे का ? (14) पाकिस्तानची समस्या (15) निर्णय कोण घेणार ?
34)डोंगराएवढा ~शिवराम कारंत
&अर्थाच्या शोधात~ व्हिक्टर फ्रँकल
मुळ किंमत~380₹
We Read -325₹घरपोच(शिपिंग फ्री)
‘डोंगराएवढा’ गोपालय्या आणि त्यांची पत्नी शंकरम्मा या दाम्त्याची कहाणी.उत्तर कर्नाटकात एका आडबाजूच्या खेडेगावात राहणारे हे जोडपे.गावाच्या आजूबाजूला पर्वतराजी,जंगले यांनी वेढलेला परिसर.आजूबाजुला असणारी पडजमीन शेतीखाली आणणे आणि त्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता.हाती घेईल ते काम जिद्दीने पार पाडायचे हाच खाक्या.अशा एका दुर्दम्य इच्छा असणाऱ्या माणसाची ही कथा. तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती मुळे वातावरण कायमच थंड त्यामुळे तिथे ती थंडी नवख्या माणसाला बाधत असे आणि थंडी ताप याचा त्रास होत असे तो सहन न झाल्याने अनेक शेतीवर ठेवलेले कामगार एखादा हंगाम राहत आणि पळून जात.अशामुळे गोपालय्या यांचे प्रसंगी नुकसान ही होत असे मात्र त्याला ही ते खंबीरपणे सामोरे जात.कादंबरीत असणारी गोपालय्या ही व्यक्तिरेखा कादंबरीचा सारा अवकाश व्यापून राहिली आहे हे आपल्याला जाणवत राहते..
&
अर्थाच्या शोधात`🎀 दुःखाने ग्रासलेल्या, मनाने खचलेल्या, रोगाने पीडित अश्या माणसाला मरण्याचे/जीवन संपवण्याचे कित्त्येक कारणं सापडतात, पण जगण्याचा एकही मार्ग, एकही कारण सापडू नये? `अर्थाच्या शोधात` ह्या डॉ.व्हिक्टर फ्रँकल ह्यांच्या आत्मचरित्रातत्यांनी लिहिलेले अनुभव हे एक मनोवैज्ञानिक म्हणून तर आहेच परंतु त्याहीपेक्षा जास्त एक सामान्य कैदी म्हणून आहेत.
35)डेझर्टर -विजय देवधर
मुळ किंमत-425₹
We read -345₹ With शिपिंग घरपोच.
गंथर बान्हमान यांच्या 'आय डेझर्टेड रोमेल' या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे.
हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी
36)द हंग्री टाइड-अमिताव घोष
मुळ किंमत - 550₹
We read Price - 450₹घरपोच.(शिपिंग फ्री)
हंग्री टाइड ही कलकत्ता आणि बंगालच्या उपसागरातील बेटांच्या विशाल द्वीपसमूहातील एक समृद्ध गाथा आहे. बेटांचा हा विशाल द्वीपसमूहच अमिताव घोष यांच्या नवीन कादंबरीची मांडणी करतो. सुंदरबनमध्ये समुद्राच्या भरती १०० मैलांपेक्षा जास्त अंतरापर्यंत पोहोचतात आणि दररोज हजारो हेक्टर जंगल नाहीसे होते आणि काही तासांनंतर पुन्हा उगवते. याच पार्श्वभूमीवर दुर्मीळ डॉल्फिनच्या शोधात आलेली पियाली, तिला डॉल्फिन शोधण्यात सहाय्यक ठरणारा फोकीर, कनाई या प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कादंबरी घडते.खारफुटीच्या जंगलातली समृद्ध जलसंपदा, वाघोबाच्या भीतीनं आदिवासी जीवनात उदयाला आलेल्या लोककथा आणि जंगल भयाचं आव्हान पेलतही निसर्गावर मनमुराद प्रेम करणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. जी सुंदरबनच्या जंगलातून अनहद प्रवास घडवते.
37)डियर तुकोबा~विनायक होगाडे
225₹ घरपोच(शिपिंग फ्री)
'तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन रुपात लेखकांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज ते आपल्या मनात विचारांचे हिंदोळ-कल्लोळ मातविणारे आहे. चारशेंवर वर्षांआधी तुकोबांनी आपल्यात पेरलेली सांस्कृतिक जनुके आजही आपल्यात वाहती असल्याने तुकोबा समकालीनच आहेत, हे ढळढळीत सत्य होय. म्हणूनच होगाडे यांनी काळाची काही मोडतोड, खेचाखेच केली आहे असे अजिबातही वाटत नाही. आज ज्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि मानसिक स्थितीत एक समूह म्हणून आपण जगत आहोत, त्या वर्तमानात तुकोबांची अशी आठवण होणे, करणे आवश्यकच आहे, हे होगाडे यांनी फार प्रत्ययकारी प्रकारे केले आहे. आधीच्या कविता आणि अखेरीचे स्फुट यांच्या बळावर ही 'ट्रायल' फार सामर्थ्याने उभी करून होगाडे यांनी फार वेधक आणि महत्वाचे सांस्कृतिक जागरण मांडले आहे.
38)एका दिशेचा शोध-संदिप वासलेकर
275₹ घरपोच (शिपिंग फ्री)
भारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्त्रायल,-पॅलेस्टाइन असे देशादेशांमधील संघर्ष. सा-या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्या राहणा-या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या. भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत. जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणा-या संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे एका दिशेचा शोध '
39)गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण – मनू एस. पिल्लई
मुळ किंमत-400₹
355₹ घरपोच (शिपिंग फ्री)
जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू
मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत-एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर
गाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्र
संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत – या पुस्तकातले
विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या
खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील
कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून
टाकल्या आहेत.
40)जातक कथासंग्रह+ग्रंथप्रेमी आंबेडकर+स्फूर्ती देवता रमाबाई+देवळाचा धर्म नि धर्माची देवळे
एकूण 4 पुस्तके
मुळ किंमत -300₹
We Read -365₹घरपोच(शिपिंग फ्री)
41)बाईमाणूस - करुणा गोखले
260₹घरपोच(शिपिंग फ्री)
'समान मानव माना स्त्रीला असे कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात. वास्तवात मात्र किमान मानव माना स्त्रीला अशी विनवणी करावी लागते. Man is a rational being. माणूस सुज्ञ, तर्कनिष्ठ असतो असे अँरिस्टॉटलने म्हणून ठेवले आहे. परंतु स्त्रीविषयी विचार करताना, तिच्याशी वागताना मात्र तो तसा राहत नाही. म्हणून तर मानवी हक्कांची सनद लिहिली गेली, तेव्हा त्यात स्त्रीला कुठलेच हक्क दिले गेले नाहीत. कालांतराने स्त्रियांनीच सुज्ञ होऊन, तर्कनिष्ठ राहून आपणसुध्दा आधी मानव आहोत हे सांगण्यास सुरुवात केली. त्यांचे हे सांगणे म्हणजेच स्त्रीमुक्तिवाद. किमान तो तरी सुज्ञपणे आणि तकनिष्ठ राहून समजून घ्यावा यासाठी हा पुस्तक प्रपंच.
42)फुकटचेच सल्ले~डॉ.रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
185₹ घरपोच (शिपिंग फ्री)
वाचाल तर वाचाल, असे आम्हाला शिकवले गेले होते. म्हणून आम्ही वाचत गेलो आणि वाचलेले जे काही होते त्यामुळेच संपन्नपणे वाढलो. अलीकडेही ‘वॉचाल' तर बिघडाल असे पोटतिडकीने सांगूनही वाचनावर बहिष्कार का टाकला जात आहे, याचा उलगडा होऊ शकत नाही. अनुत्तरित प्रश्नांवर खूप चिंतन करून उत्तर शोधायचे असते म्हणून आम्ही त्या शोधात वेळोवेळी जे काही लिहीत गेलो त्यातील काही लिखाण ‘फुकटचे सल्ले' म्हणून या पुस्तकात एकत्रितपणे दिले आहे.हे सल्ले फुकटचे असले तरी त्यांना अनुभवांचा आधार आहे. म्हणून ते महत्त्वाचे ठरतात. तेव्हा सदरचे पुस्तक विकत घेऊन आमचे हे फुकटचे सल्ले आपल्या जीवनात उपयोगात आणाल अशी आशा आहे.
43)साद घालतो कालाहारी -मार्क आणि डेलिया ओवेनस
मुळ किंमत-530₹
475₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली.
44)घोस्ट रायटर -आशिष महाबळ
मुळ किंमत-250₹
We read -215₹ With शिपिंग घरपोच
विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात.
45)लोकांचे संविधान~रोहित डे
मुळ किंमत-500₹
425₹घरपोच (शिपिंग फ्री)
या पुस्तकात चार प्रकरणं आहेत आणि त्यांना त्या-त्या क्षेत्रात प्रबळ ठरलेल्या अग्रगण्य खटल्याचं नाव दिलं आहे. प्रचलित कायदेशीर निवाड्याच्या औपचारिक शिस्तीला आणि लोकाभिमुख कायदाविषयक लेखनाच्या प्रकाराला मानवंदना म्हणून प्रकरणांना अशी शीर्षकं दिली आहेत. अर्ल स्टॅन्ली गार्डनर यांनी पेरी मॅसन या मध्यवर्ती पात्राला घेऊन लिहिलेल्या कायदा क्षेत्रातील रहस्यकथा किंवा जॉन मॉर्टिमर यांनी लिहिलेल्या न्यायालयीन नाट्यांवर आधारित कादंबऱ्या अजूनही भारतात लोकप्रिय आहेत. खालिद लतिफ गौबा व कैलाशनाथ काटजू यांच्यासारख्या वकिलांनी प्रसिद्ध खटल्यांविषयी लिहिलेली विषयाधीनतेकडे कलणारी पुस्तकं खूप विक्री ठरली आहेत.
46)डोंगराएवढा~शिवराम कारंत
175₹घरपोच(शिपिंग फ्री)
रात्रीच्या वेळी एक तरुण 'पंज' गावी जायला निघतो मात्र वाट चुकून गंतव्य स्थळी न जाता एका भलत्याच जंगलातल्या गावात जाऊन पोचतो. तिथे ना कुणी ओळखीचे कुटुंब ना कसला सहारा. आहे ते केवळ भव्य डोंगराची रांग आणि हिंस्र श्वापदांच्या वास्तव्याचं अरण्य. रात्री निवारा नाही मिळाला तर वाघाची भीती. विवंचनेत असताना जंगलाच्या वाटेत भेटलेले खेडूत त्याला वाडीवरल्या एकमेव सुस्थित घराकडे आश्रयाला घेऊन जातात. गोपालय्या आणि त्यांची पत्नी शंकराम्मा यांचं हे कुटुंब आहे. केवळ दोन माणसांचं कुटुंब. जवळचा शेजारही घरापासून कितीतरी दूर. सोबतीला माणसे फार नाहीत. सोबत आहेत ते माणसाच्या कुवतीचा उपहास करणारे डोंगर, जमिनीला दुभंगून मार्ग काढू पाहणारे नवजात ओहोळ, पाच-सहा फुटी माणसाला मुंगीसारखे तुच्छ लेखात उभी असलेली पर्वताशिखरे. अशा स्थितीत राहत असलेले हे वृद्ध जोडपे नव्या पाहुण्याच्या आगमनाने हरखून जाते. साता जन्माचे ऋणानुबंध असल्याप्रमाणे पाहुण्याची काळजी घेते. घरापासून कित्येक वर्षे दूर असलेला पाहुणा या प्रेमाच्या वर्षावाने सुखावून जातो. कडाक्याच्या थंडीत कढत पाण्याची आंघोळ करावी, पोटभर दोसा खावा आणि लोटाभर कॉफी पिऊन जंगलातल्या पायवाटा तुडवाव्यात, रानात शिरू पाहत असलेल्या हत्तींचे कळप पळवून लावावेत, गुडघाभर नदीच्या पाण्यातून वाट काढत पैल गाठावा हे जग त्याने प्रथमच पाहिलेले आहे. ह्या जगाचा आणि तीत राहणाऱ्या माणसांचा हेवा करत एक दिवस अश्रयाला आलेला पाहुण्याचा मुक्काम वाढत जातो आणि ह्या आनंदी आणि सच्छिल जोडप्याच्या मनात काय दुःख आहे तेही त्याला समजते. एका अतर्क्य योगायोगाने ह्या दुःखाची तीव्रता कमी करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे हे त्याला जाणवते आणि गोपालय्या आणि शंकरम्मा यांचा आशीर्वाद घेऊन तो प्रस्थान ठेवतो. मुळातूनच वाचायला हवी अशी ही कन्नड साहित्यातील श्रेष्ठ कादंबरी.
47)त्याने गांधींना का मारलं - अशोक कुमार पांडेय &नास्तिकासोबत गांधी (मराठी)
आस्तिकता आणि नास्तिकता दोन परस्पर विरोधी मताची माणसे एकमेकांशी चर्चा करत आहेत. परस्परांना तपासून बघत आहेत. मात्र या चर्चेत खंडनमंडन किंवा वादावादीचा खणखणाट नाही. चर्चेच्या ओघात दोघेही एकमेकाला समजून घेतात आणि दोघांमधील नाते अधिकाधिक दृढ होत जाते. गांधीजींच्या निधनानंतर तीन वर्षांनी गोरांनी या आठवणी लिहिल्या आणि तत्कालीन गांधीवादी विचारवंत किशोरीलाल मधुबाला यांनी प्रस्तावनेत या आगळ्यावेगळ्या संबंधाची वैचारिक उकल केली.
&
हे पुस्तक स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा
आणि हिंसा या तत्त्वज्ञानांच्या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या
सामाजिक-राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या
हत्येमागची कारणं समोर आणतं. त्याबरोबरच
गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी
जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. हे पुस्तक
गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत
नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या
वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडतो.
मुळ किंमत - 450₹
We read Price - 375₹ घरपोच.
48)आदिवासी बोधकथा -एक पुनकर्थन :-
प्रदीप प्रभू/सिराझ बलसारा
Paperback/New
मुळ किंमत - 250₹
We read Price - 215₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
हे पुस्तक खरंच खूप जबरदस्त आणि अप्रतिम आहे.यातील प्रत्येक कथा उत्कृष्ट असून यामध्ये दिलेली वारली चित्रं तर खूप भन्नाट आहेत..गोष्ट
आदिवासी स्त्रिया वारली चित्र काढत असतं. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपध्दती चित्रित केलेली आढळते.जीवनाचा सह-आनंद लुटलेला दिसतो.आदिवासी समाजातून बहरलेलं तत्वज्ञान यामध्ये सापडतो,त्यांची निसर्गाप्रति असलेली कृतज्ञता आणि प्राणिमात्रांवरचं प्रेम यामध्ये आपल्याला दिसतो.
49)माइन काम्फ ~ हिटलर
255₹घरपोच(शिपिंग फ्री)
1924 मध्ये दोन भागांत लिहिण्यात आलेले 'माइन काम्फ' हे हिटलरचे गाजलेले पुस्तक! समाजवादी जर्मन राज्याच्या निर्माणासाठी हिटलरने प्रचंड मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी त्याला अटक झाली आणि म्युनिक येथील पीपल्स कोर्ट येथे त्याच्यावर खटलाही दाखल करण्यात आला. त्या तेरा महिन्यांच्या तुरुंगवासात हिटलरने या पुस्तकाचा पहिला भाग, तर सुटका झाल्यावर दुसरा भाग लिहिला.हे पुस्तक म्हणजे गेल्या शतकातील अत्यंत हुशार क्रूरकर्मा असलेल्या नेत्याच्या राजकीय विचारसरणीची, त्याच्या श्रद्धा व प्रेरणांची आणि जर्मनीला एक महान राष्ट्र तसेच नाझींना तिसरे राईश बनवण्याच्या त्याच्या संघर्षाची एक चित्तरकथाच होय.
50)पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी ~ विल ड्युरंट ❤️
मुळ किंमत-450₹
We read- 395₹घरपोच(शिपिंग फ्री)
साने गुरुजी 1940-41 व 8 ऑगस्ट 1942 पर्यंत तुरुंगातच होते. या अवधीतच 1941 मे व जून महिन्यात अवघ्या दीड महिन्यामध्ये जवळ जवळ 600 छापील पृष्ठाचा हा अनुवाद त्यांनी केला होता.
अमेरिकन द्रष्टा थोरो म्हणे, "तत्त्वज्ञानी होणे म्हणजे सूक्ष्म विचार जवळ असणे नव्हे, किंवा एखादा पंथ किंवा संप्रदाय स्थापणे नव्हे; तर प्रज्ञानावर अमाप प्रेम करणे व तदनुरूप वागणे. साधे, स्वतंत्र, उदार व श्रद्धेचे जीवन जगणे होय." जर आपणाला एकदा सत्य प्रज्ञान गवसले म्हणजे बाकीच्या वस्तू आपोआप येतील अशी खात्री यायला हरकत नाही. मुख्य गोष्ट म्हणजे परिणतप्रज्ञा, निःशंक ज्ञान, जीवनाचे ज्ञान, बेकन बजावतो की, "प्रथम मनाच्या मंगल गोष्टी शोधा. त्या मिळवल्या म्हणजे उरलेसुरले आपोआप मिळेल किंवा ते न मिळाले तरीही त्याची खंत वाटणार नाही. सत्य आपणांस श्रीमंत नाही करणार, परंतु मुक्त मात्र करील. "
51)मिलिंद प्रश्न
मुळ किंमत -450₹
We Read -395₹घरपोच(शिपिंग फ्री)
मिलिंद पन्ह (मराठी: मिलिंदाचे प्रश्न) हा बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ असून त्याची निर्मिती सुमारे इ.स.पू. १०० मध्ये झाली आहे. या ग्रंथात बौद्ध भिक्खू नागसेन आणि भारतीय-ग्रीक सम्राट मिलिंद यांच्यातील वादविवादात्मक चर्चा आहे. मिलिंदांनी विचारलेल्या बौद्ध धर्माविषयीच्या व इतरही सर्व प्रश्नांचे नागसेन यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली त्यात मिलिंदाचे समाधान झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
52)डॉ.बाबासाहेब आंबेडकर: अनुभव आणि आठवणी
~ नानक चंद रत्तू
250₹ घरपोच(शिपिंग फ्री)
ट्रकभर ग्रंथसंग्रह विकत घेणारा जगातील बाबासाहेब आंबेडकर हा पहिला माणूस असावा . ही खरेदी केलेली पुस्तके आपल्या राजगृहात न नेता आपले अतीजवळचे अपत्य असलेल्या सिध्दार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जमा केली आजही त्या अमृततुल्य ज्ञानरुपी सागरात बरेच विद्यार्थी , अभ्यासक , विचारवंत , ग्रंथप्रेमी मंडळी पोहून त्याचा मनस्वी आनंद व आस्वाद घेत असतील आणि आहे.
53)मंत्र गुंतवणुकीचा~ अरविंद परांजपे
285₹घरपोच.(शिपिंग फ्री)
अर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत वाटचाल करण्याचे बहुविध मार्ग असतात. पैशाची गुंतवणूक आणि त्यासाठीचे विविध पर्याय म्हणजे अशा मार्गांवरची वाटचाल. कोणता पर्याय निवडावा? पीपीएफ? शेअर्स? म्युच्युअल फंड? सोने? स्थावर मालमत्ता? पेन्शन स्कीम? कोणताही पर्याय निवडायचा; तर संशोधन, अभ्यास आणि अनुभव म्हणजे यशस्वी गुतंवणुकीचा पाया. वस्तूचे योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता, इतरांना न दिसलेली गोष्ट हेरणे आणि यथायोग्य विश्लेषण हे यशस्वी गुंतवणू्कदारासाठी आवश्यक गुण. या गुणांच्या आधारे यशस्वी गुंतवणुकीची पायाभरणी कशी करावी, हे सर्वांना उलगडून दाखवणारा || मंत्र गुंतवणुकीचा ||
54)मेळाघाटावरील मोहोर, डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे
मुळ किंमत - 350₹
We Read किंमत -325₹घरपोच (शिपिंग फ्री)
एका आगळ्या समाजपरिवर्तनाच्या प्रयोगाची ही कहाणी मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश. येथे तापी-खापरा-सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव बैरागड. दारिद्रयानं पोखरलेलं, आजारानं ग्रासलेलं, अज्ञानात पिचलेलं हे छोटं गाव . १९९० च्या आसपास डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे येथे आले.
55)अवकाळी पावसाच्या दरम्यान ची गोष्ट
-आनंद विंगकर
मुळ किंमत-200₹
We read -185₹ With शिपिंग घरपोच
कवी आनंद विंगकर यांची 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ही कादंबरी एक अकस्मात घडलेली घटना आणि एक अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होते. अस्मानी संकटामागच्या मानवी हस्तक्षेपांचं भान देत, अकस्मात उद्भवलेल्या घटनांच्या मालिकांची अपरिहार्य शोकात्म परिणती दिग्दर्शित करत त्या वातावरणातील बदलते मानवी भाव, मानवी जीजीविषा, कणखरपणा यांचा गंभीर प्रत्यय देते. रंजकतेच्या पारंपरिक कुप्रथांचा त्याग करूनही ही कादंबरी अत्यंत वेधक उतरली आहे. कारण लेखकाचं वृत्तिगांभीर्य आणि भावनात्मक ताटस्थ्य. आत्महत्या करणारं शेतकरी जोडपं, त्यांची थोरली लेक, तिचा प्रियकर यांची चरित्रं आणि एकूण कथानकाचं वाहतेपण प्रभावी आहेच, खेरीज ग्रामसमाजातील व्यवहार, परस्परसंबंधांचे ताणेबाणे यांच्यातील अस्सलतेमुळे ही कादंबरी अधिक मोठा आवाका धारण करते. कादंबरी वाचून संपवताना आपण ती वाचण्याआधीचे उरत नाही, हे तिचं महत्त्वाचं यश आहे.
56)केदारनाथ 17 जून -डॉ.प्रकाश कोयाडे
355₹घरपोच(शिपिंग फ्री)
जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ
येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत,
म्हणूनच आपण मरायचं नाही..."
"आपल्याला जिवंत रहावंच लागेल!"
एका सत्य घटनेवर आधारीत कादंबरी...केदारनाथ १७ जून !
57)परीघ-सुधा मूर्ती
225₹घरपोच(शिपिंग फ्री)
ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना जवळ पैसा असला काय किंवा नसला काय, काहीच फरक पडत नाही. पैशामुळे ख-याखु-या मानवी संबंधाचे दर्शन घडते. पैशामुळे मानवाच्या स्वभावात, वागण्यात, नाते संबंधात, तसेच राजकिय, सामाजिक विश्वात कसे बदल होतात, त्याचे सविस्तर आणि भयानक वास्तव दाखवणारे चित्रण.
58)पैशाचे मानसशास्त्र ~ मॉर्गन हाऊजेल
225₹घरपोच(शिपिंग फ्री)
पैसा आणि संपत्तीनिर्मिती यांबद्दलचे गैरसमज दूर करत आर्थिक वर्तनातील सुधारणांसाठी सल्ले देणारे हे पुस्तक यशस्वी आणि परिपक्व गुंतवणूकदार कसे बनता येईल, हेही सांगते…
आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीबाबत गाजलेली बहुसंख्य पुस्तके अमेरिकेतील लेखकांची आहेत. सर्वाधिक विक्री होणाऱ्या या पुस्तकांच्या यादीत एका नव्या पुस्तकाची भर पडली आहे. ते पुस्तक म्हणजे- मॉर्गन हाउजेल लिखित ‘द सायकोलॉजी ऑफ मनी : टाइमलेस लेसन्स ऑन वेल्थ, ग्रीड अॅण्ड हॅप्पीनेस’! मॉर्गन हाउजेल हे ‘द कॉलॅबोरेटिव्ह फंड’ या उद्यमशील फंडाचे निधी व्यवस्थापक (भागीदार) आहेत. प्रकाशनानंतर पहिल्या आठवड्यापासूनच ‘बेस्ट सेलर्स’ यादीत असलेले आणि वेगवेगळ्या भाषांत भाषांतरित झालेले त्यांचे हे पुस्तक भारतीय गुंतवणूकदारांना परिपक्व गुंतवणूकदार होण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल.
59)भावनिक प्रथमोपचार घराच्याघरी ~ डॉ. हमीद दाभोलकर
We read - 200₹घरपोच (शिपिंग फ्री)
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी - • टेन्शन येते, अपयशाला सामोरे जावे लागते • कधी रागाचा भडका, तर कधी दु:खाचा पूर भेटतो • नकोशा घटना घडतात • व्याधींचा, वार्धक्याचा सामना करावा लागतो • नाती जुळतात, नाती तुटतात; कौटुंबिक नाती बिनसू लागतात • लैंगिक समस्या उद्भवतात. या सार्याचा सांधा शरीराइतकाच जुळलेला असतो मनाशी. मानसिक व्याधींसाठी डॉक्टरांकडे जाण्याच्या खूप आधी गरजवंत व्यक्तीला आधार मिळू शकतो कुटुंबीयांकडून, नातेवाइकांकडून, सुहृदांकडून, हितचिंतकांकडून, शासनाकडून आणि अवघ्या समाजाकडून. सामाजिक स्वास्थ्याची, मानसिक आरोग्याची जपणूक करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जाणकार बनवणारे -
60)माझी आत्मकथा & WAITING FOR A VISA & बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे
एकूण 3 पुस्तके
मुळ किंमत 250₹
We Read -215₹घरपोच(शिपिंग फ्री)
61)आंबेडकर : जीवन आणि वारसा
~ शशी थरूर
मुळ किंमत-300₹
255₹घरपोच(शिपिंग फ्री)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव आज सर्वांत आदरणीय भारतीयांच्या नामावलीत घेतलं जातं आणि देशभरातील त्यांच्या पुतळ्यांची संख्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांखालोखाल असेल. किंबहुना, आधुनिक काळातील 'सर्वांत थोर भारतीय' ठरवण्यासाठी अलीकडे एक मतचाचणी घेण्यात आली, त्यात दोन कोटींहून अधिक मतं नोंदवली गेली आणि त्यात आंबेडकरांना गांधींपेक्षा जास्त मतं मिळाली होती. आज सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आंबेडकरांवर हक्क सांगण्यासाठी चढाओढ सुरू असते. मुख्यत्वे आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आली आणि दलित समुदायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यामुळे दलित समूहांमध्ये ते एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत.
62)जात समजून घेताना~ Gail Omvedt
मुळ किंमत-250₹
We read -225₹ With शिपिंग घरपोच
हे पुस्तक म्हणजे जात आणि जातिअंताचा संघर्ष या ऐतिहासिक विषयाचा अंतर्दृष्टीने घेतलेला अभ्यासपूर्ण शोध आहे. भारतीय परंपरा म्हणजेच हिंदू परंपरा आणि ब्राम्हणी परंपरा ; ब्राम्हण्यवाद म्हणजेच हिंदू धर्म असे स्वाभाविकपणे गृहीत धरले जाते. अंतर ब्राम्हण्यवाद म्हणजे वेदांवर आधारित भारतीय संस्कृती अशा धारणेवर आधारित आणि भारतीय संस्कृतीचा मूळ वारसा आर्याच्या परंपरेतील आहे अशा समग्र गृहीतकाला ही मांडणी आव्हान देते. भारतातील सेक्युलर भूमिकेचा पुरस्कार करणारेसुद्धा याच ‘ब्राम्हण्यवादी दृष्टिकोनात अडकले आहेत.
63)सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी
~ माधव गाडगीळ
मुळ किंमत~800₹
We Read~695₹घरपोच(शिपिंग फ्री)
पद्मभूषण माधव गाडगीळ म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! निसर्गप्रेम हा माधव गाडगीळांचा श्वास अन् ध्यास. गेल्या पाच तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची अन् जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि सामान्यातल्या सामान्य माणसाप्रति मानत असलेले उत्तरदायित्व या सा-यांचे विलक्षण मिश्रण म्हणजे माधव गाडगीळ. साहित्यिक अंगाने अन् ललित शैलीने नटलेले या निसर्गवैज्ञानिकाचे आत्मवृत्त बनले आहे एक अद्भुत सफर. केवळ निसर्गप्रेमी वा निसर्ग-अभ्यासकांनाच नव्हे, तर भवतालाबद्दल कुतूहल असणार्याृ प्रत्येकाला एका वेगळ्या विविधरंगी जगाचे दर्शन घडवणारी जीवनसफर....!
64)एकलव्य -विजय देवडे
मुळ किंमत - 380₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)
दुमदुमत्या आसमंताला निठेपुढं झुकायला लावणारा, स्वअध्ययनान धनुर्विद्या मिळवणारा, कुळभेदाच्या जाचक भिंतींना तोडून सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणारा निषाधराजा एकलव्य!
महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित बदललं गेलं असतं. एकलव्यानं गुरुदक्षिणेत अंगठा गुरू द्रोणाचार्य यांना दिला, त्याच्या निष्ठेनं सर्वांना भुरळ घातली. अशी गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग, निष्ठा व समर्पणाच्या जोरावर परत पर्वतासारखा उभा राहून एकलव्यानं आदर्श निर्माण केला.
65)सलोख्याचे प्रदेश -सबा नक्वी
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
भारतात अनेक जाती - धर्मांचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा वेगळ्या असतात. तरी 'अनेकतात एकता' म्हणतो त्याप्रमाणे येथील प्रमुख हिंदू व मुस्लीमांच्या परंपरा, सण, उत्सव, एकत्र साजरे होतात.
अशा काही ठिकाणी भेट देऊन तेथील समजाचे चित्रण सवा नक्वी यांनी 'सलोख्याचे प्रदेश' मधून दाखविले आहे.
66)मऱ्हाटा पातशाह -केतन कैलास पुरी
Paperback/New
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
अजिबात कसली अलंकारिक भाषा नाही कि जड शब्दाची सद्दी नाही. सहजसोपी आणि प्रत्येकाला समजेल अशा भाषेनं शिरसवाडी समृद्ध आहे.शिरसवाडी म्हणजे डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या गावाची आणि गावातल्या साध्याभोळ्या लोकांची निर्मळ गोष्ट. प्रत्येकानं वाचावा आणि आपल्या घरातल्या ग्रंथालयात जपून ठेवावा, असा हा ऐवज आहे.
शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या चित्राची निर्मिती ज्या प्रसंगी झाली, त्याचे केलेले वर्णन.. एका उत्कृष्ट चित्रकाराकडून.. एक असा व्यक्ती जो शिवाजी महाराजांना भेटला, त्यांची चित्रे काढली.. पण आजही इतिहासाच्या पानांमध्ये हरवला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे घेतलेला मागोवा म्हणजेच “मन्हाटा पातशाह”….
67)श्रीमानयोगी -रणजित देसाई
मुळ किंमत -570₹
We read- 485₹घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)
श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अतिशय उत्कृष्ट कादंबरी आहे. या कादंबरीचे एकूण अकरा भाग आहेत आणि प्रत्येक भागात अनेक प्रकरणं आहेत. पूर्ण कादंबरीत कुठेही घटनांच्या तारखा आणि साल न दिल्याने वाचणे सुसह्य होते. श्रीमान योगी...हे नक्की चरित्रलेखन आहे की आत्मकथन असा पानोपानी प्रश्र्न पडावा इतक्या मधूर आणि आत्मीय शब्दसंपन्नतेत सखोल मांडणी तेही भावनीक ओल कुठेही हलू न देता.
68)लॉर्ड्स ऑफ द डेक्कन – अनिरुद्ध कणिसेट्टी
मुळ किंमत - 500₹
We Read -425₹घरपोच (शिपिंग फ्री)
भारतीय इतिहास लेखनामध्ये दक्षिण भारताच्या इतिहास लेखनावर अन्याय झाल्याचे अनेक इतिहासकारांनी दाखवून दिले आहे. येथील इतिहास लेखन ‘उत्तरकेंद्री’ असल्याचाही आरोप होतो. वासाहतिक काळातील गरजेतून ब्रिटिशांनी भारतीय ऐतिहासिक वाटचालीवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासकारांनी जो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला त्यातून ‘उत्तरकेंद्री’ मांडणी झालेली दिसते. पुढे भारतीय इतिहास लेखनावर तोच प्रभाव टिकून राहिला. भारतीय इतिहासाच्या अशा मांडणीला काही प्रमाणात दुरुस्त करण्याचा प्रयत्न अलीकडचे इतिहासकार करताना दिसतात. त्यापैकी मनू पिल्लै व अनिरुद्ध कनिसेट्टी यांचे लिखाण महत्त्वाचे आहे. याच मालिकेतील अनिरुद्ध कनिसेट्टी यांचे ‘लॉर्ड्स ऑफ द डेक्कन’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
69)संघर्षाची मशाल हाती -नरसय्या आडम
मुळ किंमत-400₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
नरसय्या आडम म्हणजेच आडम मास्तरांशी माझा दीर्घकाळ परिचय आहे. आधी कामगार कार्यकर्ता, नंतर सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आणि पुढे तीन वेळा आमदार म्हणून मी त्यांना पाहिलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
70) 'Self Help'Special
नेमकी कोणती सेल्फ पुस्तके वाचावी हे कळतं नसेल तर खालील ही पुस्तके नक्की वाचा....!☘️🌱
1)रिच डॅड पूअर डॅड
2)रिवर्क
3)द वन थिंग
4)काम करण्याचे नियम
5)थिंक स्ट्रेट
6)इकिगाई
7)विक्रम वेताळ आणि कला निर्णय घेण्याची
8)सो गुड दे कान्ट इग्नोर यु
एकूण 8 पुस्तके..
मुळ किंमत-1970
We Read -1495₹घरपोच(शिपिंग फ्री)
https://wa.me/7066495828
71)1)इकिगाई ~युकारी मित्सुहाशी &
2)झेन आणि आनंदी राहण्याची कला~क्रिस प्रेन्टिस
395₹घरपोच(शिपिंग फ्री)
इकिगाई म्हणजे आपल्याला जबरदस्तीनं उठायला भाग पाडणारा आपल्या गजराच्या घड्याळाचा गजर असू शकतो का, खरं तर त्यानंतरच्या दिवसभरात आपल्याला मिळणार असलेल्या आनंदाच्या कल्पनेनं आपण उठतो आणि काम करत राहतो. 'ओळख' या आधीच्या प्रकरणात मी स्पष्ट केलं आहे त्याप्रमाणे इकिगाई हा शब्द 'इकिं म्हणजे 'आयुष्य' आणि 'गाई' म्हणजे 'मूल्य' या दोन अर्थांच्या शब्दांनी तयार झाला आहे. त्यामुळे जगण्याला उचित ठरवणारी तुमच्या आयुष्यातील मूल्यं असाही याचा अन्वयार्थ लावता येतो.
72)महामाया निळावंती -सुमेध
मुळ किंमत-350₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
1992 साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का?
73)ब्रेव्ह न्यू वर्ल्ड-अल्डस हक्सले
We read -325₹ With शिपिंग घरपोच
ब्रेव्ह न्यू वर्ल्ड १९३२मध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा हक्सले आणित्याचे वाचक दोघांनाही या कादंबरीतील जग हे भयंकारी डिस्टोपियन जग आहे याची कल्पना होती. पण सांप्रत काळी‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ वाचणाऱ्यांची ही एक युटोपिया आहे अशी चुकीची कल्पना होण्याची शक्यता आहे.
उपभोक्तावादाची वाटचाल अशीच चालू राहिली तर हक्स्लेंच्या कल्पनेतील जग वास्तवात आलेलं पाहण्याचे दिवस दूर नाहीत.आजकाल सुख आणि समाधान हेच सर्वोच्च मूल्य झाले आहे.उपभोक्त्यांचे जास्तीतजास्त समाधान करण्यासाठी जैवतंत्रज्ञान आणि सामाजिक अभियांत्रिकीचा होणारी वाढता वापर
आपल्याला एका भयंकारी विनाशाच्या दिशेने कसा घेऊन चालला आहे हे तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर ब्रेव्ह न्यू वर्ल्डमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान, सुखी समाधानी जीवन आणि आयुष्याचा अर्थ यावरील सखोल ऊहापोह वाचलाच पाहिजे.
74)लैंगिकता शिक्षण -डॉ.विठ्ठल प्रभू
मुळ किंमत - 250₹
WE Read :- 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपणं, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक. '
75)इन्व्हेस्टॉनॉमी ~ प्रांजल कामरा
245₹ घरपोच (शिपिंग फ्री)
तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायला भीती वाटते का?
गुंतवणूक सुरू करण्याआधी आपण त्यात तज्ज्ञ असले पाहिजे असे तुम्हाला वाटते
का?
हा सगळा प्रकार म्हणजे बेटींग, जुगार आणि नशीब यांचा आहे असे वाटते का?
असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे म्हणून समजा
आधुनिक मूल्यात्मक तत्वे काय आहेत एवढेच इन्व्हेस्टॉनॉमी समजावून सांगत नाही
तर ते शेअर बाजारातील बरीच गुपितेही आपल्यासमोर उघड करते. पीके म्हणतात की,
‘एखादा मॅट्रीक पास झालेला माणूसही शेअर मार्केटमध्ये जोरदार गुंतवणूक करत
असतो.’या सगळ्याला तशी मानसिकता लागते. तशी मानसिकता जोपासण्यासाठीच
तर या पुस्तकाचा घाट घालण्यात आला आहे.
जेवढे जेवढे तुम्ही जास्त शिकाल तेवढे तेवढे तुम्ही त्यात चक्रवाढ व्याजाने तरबेज
बनाल हे सांगणे नलगे.
76)आश्वासक -रवींद्र साळवे
185₹घरपोच(शिपिंग फ्री)
'आश्वासक' हा एक आत्मविश्वासी व बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा एक गुणवत्तापूर्ण उल्लेख करणारा शब्द आहे. आपल्या जीवनातील एखादा असंभव वाटणारा निर्धार अत्यंत जिद्दीने, कुशलतेने तसेच अपरंपरागत पध्दतीने यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांना सामान्यपणे 'आश्वासक ' म्हटले जाते. या पुस्तकात मळलेल्या वाटेने न जाता जाणीवपूर्वक व प्रचंड आत्मविश्वासाने नवीन पायवाट निर्माण करणारे पन्नास 'आश्वासक' रवींद्र साळवे यांनी रेखाटलेले आहेत.
77)प्रेरणा द साउंड ऑफ सायलेनस -उज्वला सहाणे
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
आपल्या कर्णबधिर मुलीला घडवताना तिच्या पालकांनी केलेल्या संघर्षाची गाथा आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळते.प्रेरणाच्या कुटुंबाने व गुरूने प्रेरणा सहाणे ला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रेरणा सहाणे दीक्षित बनवण्यापर्यतचा प्रवास या पुस्तकात देण्यात आला आहे.सहाणे कुटुंबाचा इथपर्यंतचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.पावलोपावली त्यांना संघर्ष करावा लागला.समाजाशी,व्यवस्थेशी,परिस्थिशी आणि आयुष्याशी झगडावं लागलं.अनोनात मानसिक,शारीरिक कष्ट करावे लागले.अनेक समस्यांचा सामना करावा लागला.अनेक दुःख सोसावे लागले.पण तरीही हा कुटुंब काही मागे हटला नाही.आलेल्या संकटांना शिंगावर घेत आपल्या वाटेवर मार्गक्रमण करत राहिला.आत्मविश्वास, जिद्द,इच्छा आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते.कोणताही संकट आपल्या जिद्दीसमोर छोटा आहे.हा महत्वपूर्ण संदेश आपल्याला सहाणे कुटुंब आपल्या प्रवासातून नकळतपणे देऊन जातो.
78)इस्राइल : युद्ध, युद्ध आणि युद्ध
~ वि.ग. कानिटकर
मुळ किंमत-500₹
We read -425₹घरपोच(शिपिंग फ्री)
वि. ग. कानिटकरांनी इस्त्रायल: युद्ध, युद्ध आणि युद्धच!' या ग्रंथात सर्व प्रश्नांची क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणी केली आहे. अरब इस्त्रायल प्रश्न हा केवळ काही राष्ट्रांमधील सीमावाद नसून त्याला एक व्यापक अर्थ आहे, असे ते मानतात. हा व्यापक अर्थ आहे ज्यू इतिहास आणि संस्कृतीतून निर्माण होणारी राजकीय-सामाजिक व्यवस्था आणि इस्लामी जागतिक दृष्टिकोनातून निर्माण झालेली अरब राज्यव्यवस्था यामध्ये हा अर्थ समजण्यासाठी इस्रायलच्या भूमिकेचे पूर्ण रूप त्याच्या अस्तित्वाला मान्यता मिळण्यासाठी आहे, हे लक्षात घ्यावे लागते..
79)या जागा राखीव आहेत~ अभिनव चंद्रचूड 🌱❤️
325₹घरपोच(शिपिंग फ्री)
चंद्रचूड यांनी भारतातील आरक्षणाचा तात्त्विक, न्यायक्षेत्रीय व राजकीय पाया स्पष्ट करून सांगितला आहे, इतकंच नव्हे तर या व्यवस्थेचा सखोल वेध घेऊन ती प्रत्यक्षात कशी कार्यरत असते याचंही विवरण त्यांनी केलं आहे. [...] हे पुस्तक अवघड संकल्पना उदाहरणांच्या आधारे उलगडून मांडतं, त्यामुळे क्लिष्ट संज्ञांचं सर्वसामान्य वाचकाला सुलभपणे आकलन याहोतं.
80)अवणी T1 -नवाब शफाअत अली खान
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹घरपोच
ज्यावेळी अवनीचा बंदोबस्त करण्याची बातमी आली त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून याचा निषेध झाला, सोशल मीडियावर तर याचा प्रचंड प्रमाणात विरोध दर्शवला व संताप ही. कारण, अवणीचा बंदोबस्त म्हणजे तिचा अंत होता. याचे कारणही तसेच होते. कारण एक सामान्य वाघीण ज्यावेळी नरभक्षक होते त्यावेळी तीची दहशत अनेकांच्या जीवावर बेतते, त्यामध्ये मुख्य म्हणजे शेतकरी आणि खेड्यापाड्यात राहणारे सामान्य नागरिक. महाराष्ट्रातील अनेकांप्रमाणे मलाही या बातमीचा प्रचंड संताप आला होता, कारण वाघ हा असा प्राणी/ प्रजाती आहे जिचे रक्षण करणे गरजेचे आहे. अगदी विलुप्त होण्याच्या मार्गावर ही प्रजाती आहे. मग अशावेळी एका वाघिणीला मारणे हे कितपत योग्य आहे? हा प्रश्न मलाही अनेकांप्रमाणे पडला होता.
81)खऱ्या शिक्षणाच्या शोधात -डेव्हिड ग्रीबल
We read -325₹ With शिपिंग घरपोच
खऱ्या शिक्षणाच्या शोधात ' या पुस्तकात ब्रिटन, इव्कॅडोर, भारत, इस्त्रायल , जपान, न्यूझीलंड, स्विझरलँड आणि अमेरिका या देशांतील शाळांचे वर्णन आहे. शाळेची पूर्ण फी भरण्यास तयार असलेल्या आणि चोखंदळपणे निवडलेल्या पालकांच्या नात मुलांपासून ते इतर शाळांनी बाद केलेल्या, तसचं दारिद्रयात खितपत पडलेल्या कुटुंबातील मुलांपर्यंत सर्व प्रकारची मुलं या शाळांचे विद्यार्थी आहेत. शाळांचे परिसरदेखील तितकेच वैविध्यपूर्ण आहेत. त्यांत उपेक्षितांची वस्ती असलेली हार्लेम सिटी आहे. दिल्लीतला आश्रम आहे.
82)नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवन राजकारण आणि संघर्ष – कृष्णा बोस
मुळ किंमत-400₹
We read -355₹ With शिपिंग घरपोच
नेताजींवर पायाभूत संशोधन करणाऱ्या बोस कुटुंबातील
नामांकित सदस्य कृष्णा बोस यांच्या लेखणीतून उतरलेला
सुभाषचंद्र बोस यांचा संपूर्ण जीवनेतिहास.
बोस कुटुंबातील सदस्य आणि आदरणीय विदुषी कृष्णा बोस यांनी सहा दशकांच्या
कालावधीत लिहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन, राजकारण आणि संघर्ष या
ग्रंथातून बोस यांच्या लहानपणापासून ते ऑगस्ट १९४५ मध्ये झालेल्या नश्वर अंतापर्यंत
त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. यामध्ये एक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक या
जोडीला ‘एक माणूस’ म्हणून ते कसे होते हे अगदी ठळकपणे दिसून येतं.
83)चिखल घाम आणि अश्रू -बिअर ग्रील्स
मुळ किंमत-400₹
We read -375₹ With शिपिंग घरपोच
बेअर ग्रील्स वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जिवंत राहिला आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाशी कसं जुळवून घेऊन स्वतःला जिवंत ठेवायचं हे देखील तो आपल्या दर्शकांना सांगतो. चिखल घाम आणि अश्रू हे पुस्तक म्हणजे बेअर ग्रील्सची जीवनकथा आहे.
84)मोठी माणसं -नरेंद्र चपळगावकर
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)
पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळात आपल्या समाजजीवनावर अनेक व्यक्तींनी प्रभाव टाकला, त्यातील काहींची ही व्यक्तिचित्रे . त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे राजकीय विचार, त्यांच्या कार्यपद्वती आणि त्यांच्या जीवननिष्ठाही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे. त्यांच्या जीवननिष्टेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी, तर दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेलेला आहे. या संगळ्या व्यक्तीनी काही शाश्वत मूल्ये आपल्या मनाशी घट्ट बाळगली होती, व्यक्तिगत जीवनातील इच्छा-आकांक्षा आणि गरजा यांना बांध घालून समाजाचे ऋण फेडण्यासाठी, त्याच्या वैचारिक उन्नयनासाठी त्यांनी आपले कष्ट आणि बुद्धी वापरली. अशी असंख्य माणसे त्या काळात होऊन गेली, या पुस्तकातील व्यक्तिचित्रांमध्ये त्या सर्वांचे स्मरण अंतर्भूत आहे. आपला देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण करत असताना या मोठ्या माणसांचे स्मरण नक्कीच प्रस्तूत ठरावे.
85)संताजी घोरपडे -रवि मोरे
225₹घरपोच(शिपिंग फ्री)
स्वामींच्या आज्ञेव्यतिरिक्त आम्ही काहीच नव्हतो. विश्वासाची जाती म्हणावी तरी स्वामींची आणी आमची शफत तुळशीबेलाच्या ‘श्री’ वरील आहे. स्वामींचे मांडीवर आम्ही उसे ठेऊन निजावे, आमचे मांडीवर स्वामींनी उसे ठेवावे, शरीर मात्र भिन्न, आत्मा एकच. आम्ही कोणे गोष्टीस अंतर पडलो नाही. आम्ही ऐसे सेवक नव्हे जे स्वामींचे स्मरण न करता आधी आपला बहुमान घेऊ. याचा पर्याय कागदी काय म्हणून लिहावा. स्वामी वडील. हे यश येते ते स्वामींचेच पुण्येकरून येते. आमचा अभिमान सर्व गोष्टीचा स्वामींशी. पूर्वीपासून स्वामींनीच गौरविले; तेथे वस्राचेच काय म्हणून लिहावे. पूर्वीपासून अंगीकार आमचा स्वामींनी केला आणी आम्हास बंधू म्हणविलें. हाच भाव सिद्धी पावला पाहिजे. स्वामीं व्यतिरिक्त आम्ही काही नाही. जैसी पूर्वी आज्ञेप्रमाणे वर्तणूक केली तैसीच करू.
86)अंगुलीमाल -उल्हास निकम
मुळ किंमत -250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)
87)झोंबी -आनंद यादव
मुळ किंमत - 420₹
WE Read :- 365₹घरपोच (शिपिंग फ्री)
आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हेवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच! पु. ल. देशपांडे
88)'डॉ.बाळ फोंडके'सरांची 7 उत्कृष्ट पुस्तके...♥️
775₹घरपोच(शिपिंग फ्री)
https://wa.me/7066495828
आपण का हसतो ? स्त्रियांना दाढी का नसते ? वधूवरांवर अक्षता का टाकतात ? वाहतुकीचे दिवे लाल, पिवळे आणि हिरवेच का असतात? बोटं मोडताना आवाज का होतो? विजेचा धक्का का बसतो ?अनेक प्रश्न. घडणारे.आपल्या ओळखीचे. आपल्या आसपास या नेहमीच्या घटनांमधून उभे राहणारे. तरीही, आपल्याला काय त्याचं, असं म्हणत नजरेआड केलेले. पण त्यांचं निराकरण करण्यासाठी जराशी जरी धडपड केली तरी त्यातून आपल्याला उमगतं ते आपल्या दररोजच्या आयुष्याला व्यापून राहिलेलं विज्ञान. खरं तर 'क-का-की'ची बाराखडी म्हणजेच विज्ञानाचा समृद्ध खजिना आपल्याला उघडून देणाऱ्या या गुरुकिल्ल्याच..
89)भारताची कुळकथा ~डॉ.मधुकर धावलीकर
मुळ किंमत-450₹
400₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'भारताचा इतिहास सुरू कधी होतो? महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे? इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर? साम्राज्यांच्या उभारणीच्या अन् पतनाच्या आधारावर? धार्मिक प्रभावांच्या पायावर? की साहित्यातील वर्णनांच्या कल्पनांवर? पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा '
90)मंडालेचा राजबंदी - अरविंद व्यं. गोखले
285₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'बाळ गंगाधर टिळक... भारतीयांच्या दृष्टीने लोकमान्य, तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने राजद्रोही! टिळकांना नामोहरम करण्यासाठी राजद्रोही ठरवणे आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड! न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले, ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य... आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली - धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला - गीतारहस्य हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी...!'
91)जंगलातील दिवस~व्यंकटेश माडगूळकर 🌱
185₹घरपोच (शिपिंग फ्री)
मराठी साहित्यातील एक तेजस्वी तारा असलेले लेखक *व्यंकटेश माडगूळकर* गावाकडच्या गोष्टी, करुणाष्टक, नागझिरा, बनगरवाडी, सत्तांतर सारख्या छान आणि खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकांचे लेखक... माडगूळकरांनी एकूण आठ कादंबर्या, दोनशे कथा, चाळीस नाटकं आणि काही लोकनाट्य लिहिलीत. *जंगलातील दिवस* या पुस्तकात ते लिहितात की *माती आणि इतर प्राणीजीवन यापासून स्वतःला वेगळं काढून माणसानं स्वतःचं आतोनात नुकसान केलं आहे* तसेच आपल्या जीवनाला फुरसतीचा एक भरजरी लांबलचक पदर असावा असंही त्यांना वाटतं, बऱ्याचदा आपला चरितार्थ चालवण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो. आपण आपल्या आवडीचे बाजूला टाकतो किंवा पुढे कधीतरी करू म्हणून पुढे टाकातो.सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली सतत धावपळ सुरू असते आणि सगळे जीवन या यांत्रिक गतीने व्यापून टाकलं आहे .*कधी अंगावर चांदणं पडत नाही, कधी झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही, कधी ओढ्यात आंघोळ होत नाही किंवा उताणे झोपून चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश पाहता येत नाही* ...असं सुंदर तत्वज्ञान "जंगलातील दिवस" या पुस्तकात आहे.
92)असा झाला पुणे करार +नाही नाचणार आदिवासी आता+मरण स्वस्त होत आहे+महात्म्याची अखेर
एकूण 4 पुस्तके
मुळ किंमत-600₹
We read -495₹ With शिपिंग घरपोच
93)जीव जिथे गुंतलेला -डॉ. अतुल गवांदे
We read -255₹ With शिपिंग घरपोच
जीव जिथे गुंतलेला...’ हे डॉ. अतुल गवांदे यांचे मूळ इंग्रजी अनुभवकथन. त्याचा मराठीत अनुवाद नीला चांदोरकर यांनी केला आहे. वैद्यकीय व्यवसायात तंत्रज्ञानाचा कितीही शिरकाव झाला असला, तरी त्याचा पाया अजूनही अधांतरीच आहे. रुग्णाचा जीव वाचवणेहे डॉक्टरचे कामअसले, तरी तोही माणूस असतो. त्याच्या कडूनही चुका होऊ शकतात किंवा कधी कधी काही विचित्र गोष्टींना डॉक्टरांना सामोरे जावे लागते. अशा वेळी समोर असलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने केलेले प्रयत्न योग्य ठरल्यास रुग्ण आनंदाने घरी जातो किंवा ते प्रयत्न चुकल्यास रुग्णाचा मृत्यू होतो.
94)दुर्दम्य - भारतीय सैन्य नेतृत्त्वाची उत्तुंग शिखरे
मेजर जनरल शशिकान्त पित्रे (निवृत्त)
मुळ किंमत-350₹
We read -305₹ With शिपिंग घरपोच.
दुर्दम्य म्हणजे नेमकं काय? जिगरी दोस्त मन्नू रावतचा फोन आला, ‘‘हाऊ आर युअर लेग्ज, पंकज?'' नेहमीच्या टोलेजंग हास्यानिशी पंकज जोशींनी उत्तर दिले, ‘‘कौनसी टांगें, मन्नू? टांगें तो अब हैंही नहीं!'’ त्यांच्या पोटात, मूत्रपिंडात आणि यकृतात एकूण नऊ गोळ्या घुसल्या होत्या. माणेकशा यातून केवळ जगलेच नाहीत, तर स्वतंत्र भारताचे पहिले फील्डमार्शलही झाले...! ले. जनरल एसपीपी थोरात, अॅृडमिरल भास्करराव सोमण, फील्डमार्शल सॅम माणेकशा, ले. जनरल प्रेम भगत, ले. जनरल सगतसिंग आणि ले. जनरल पंकज जोशी. भारतीय सैन्यदलातील पराक्रमाची सहा उत्तुंग शिखरे! त्यांच्या अमर कर्तृत्वाच्या या स्फूर्तिदायक कहाण्या...
95)भटक्यांचे लग्न +आणि आदिमानव माणूस झाला+लिहित्या लेखकाचे वाचन +बराक ओबामा
एकूण 4 पुस्तके
मुळ किंमत-600₹
We read -495₹ With शिपिंग घरपोच
96)मी गालिब बोलतोय -शब्बीररोमानी
We read -255₹ With शिपिंग घरपोच
मिर्झा गालिब म्हणजे उर्दु शायरीतलं अजरामर नाव. मानवी भावभावनांना शब्दांचं कोंदण देणारा हा खरा युगकवी. त्याच्या कवितेइतकंच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड शायरीच्या चाहत्यांवर शेकडो वर्षे कायम आहे. शब्दांच्या श्रीमंतीसारखीच खानदानी श्रीमंतीही असलेला हा अवलिया, पण त्याच्या आयुष्यानं अशी वळणं घेतली की ती ही त्याच्या कवितेसारखीच भावविभोर ठरली. अशाच त्याच्या जीवनप्रवासातल्या खाचखळग्यांचा हा अनोखा प्रवास. स्वतः गालिबने जसा सांगितला असता, तसाच.
97)मृत्यू कथा' ~आशुतोष भारद्वाज
320₹घरपोच (शिपिंग फ्री)
'मृत्यू कथा' हे वास्तववादी लेखन प्रकारातील एक उल्लेखनीय असेच पुस्तक आहे, असे म्हणावे लागेल. अत्यंत बारकाईने घेतलेली माहिती, चिकित्सकपणे शोधलेले मर्म यामुळे हे वाचन वाचकास समृद्ध करून जाते. या गतिमान, सहानुभूतिपूर्ण, धाडसी आणि कधी कधी तर रक्तच गोठवून टाकेल, अशा पुस्तकातून बस्तरचा प्रत्यक्ष परिसर, कथानकातील पात्रे, तेथील नागरी युद्धाचे सामाजिक परिणाम या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर जिवंत होऊन उठतात.
98)एका रानवेडयाची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे
WE Read :- 275₹घरपोच (शिपिंग फ्री)
मदुमलाईच्या जंगलातला एक तरुणप्रसन्न जीवनानुभव त्यातल्या सा-या चढउतारांसह, रौद्रथरारांसह आणून देणारं हे उत्कट पुस्तक असंच अनुभवण्याजोगं पुस्तक आहे... कृष्णमेघ जेथे रमला त्या मदुमलाईच्या प्रेमात पाडणारं... आणि त्याच्या हातून जे निसटलं त्याबद्दल हुरहूर लावणारं... वाचकांच्या जंगलजाणिवा प्रगल्भ करणारं, सहजसुंदर शैलीतलं... '
99)शिरसवाडी नि कंट्या ~गणेश बर्गे
एकूण 2 पुस्तके
मुळ किंमत-500₹
We read -400₹ With शिपिंग घरपोच
शिरसवाडी म्हणजे लव आणि रुपाली यांच्यातलं अविरत प्रेम, शिरसवाडी म्हणजे लव आणि जयु यांच्यातलं बंधुत्व, शिरसवाडी म्हणजे लव आणि गावकऱ्यांनी केलेल्या एका अनाथ मुलाचा सांभाळ. यातच शिरसवाडीचे कथानक नकळतपणे पकड घेत. वाचण्याचा वेग वाढू लागतो तस आपण शिरसवाडी मध्ये पोहचतो.
100)अवघा देहचि वृक्ष जाहला - वीणा गवाणकर
Binding: पेपरबॅक
मुळ किंमत -250₹
We Read किंमत -250₹घरपोच (शिपिंग फ्री)
"माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनंच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या संजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखलं गेलं पाहिजे... खनिज, वनस्पती, प्राणी, माणूस... सर्वांमध्ये! " हे विचार आहेत रिचर्ड बेकर यांचे. वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चणार्या पर्यावरणरक्षकाची ही प्रेरणादायी चरितकहाणी...
~We Read 🌱🌾❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा