झेन:साधं सरळ जीवनजगण्याची कला...! ❤️

काही दिवसांपूर्वी 'शुनम्यो मसुनो'लिखित 'झेन:साधं सरळ जीवन जगण्याची कला'हे सुंदर व अप्रतिम असं पुस्तकं वाचून पूर्ण केलं नि या पुस्तकाच्या जाम प्रेमात बुडालो.'जीवन/आयुष्याला बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलण्याची ताकद असलेले हे पुस्तकं सर्वांनी आवर्जून वाचायला नि संग्रही ठेवायला हवे.यातील प्रत्येक पानांतून साधं सरळ जगण्याची कला या पुस्तकांतून आपल्याला शिकायला मिळते,जी फार मोलाची मदत करते.

हे पुस्तकं मी फक्त वाचलं नाही तर अक्षरशः जगून आलो.यातून आयुष्य जगण्याचे महत्वपूर्ण धडे घेऊन समृध्द झालो.हे पुस्तकं एकदा हातात घ्यावं नि पूर्णपणे यामध्ये हरवून जावं असं हे पुस्तक आहे.यामध्ये दिलेल्या सरावांनी आपल्या आयुष्यात अधिक शांतता येते.'सखोल विचार करायला आपल्याला हे प्रवृत्त करून झेन कृतीचं प्रत्यक्ष मार्गदर्शन करते.

लेखक 'शुनम्यो मसुनो' हे एक बौद्ध संन्यासी नि जपानमधील 450 वर्ष जुन्या झेन बुद्ध मंदिराचे मुख्य अधिपति ते आहेत. त्यांनी कित्येक शतकांपूर्वीच्या ज्ञानाची आधुनिक जीवनासाठी स्पष्ट, व्यावहारिक आणि सहजतेने अवलंबता येतील, अशा 100 नियमात मांडणी या पुस्तकात केली आहे. शंभर दिवसांकरिता प्रतिदिन एक नियम अमलात आणण्याचा ते सल्ला देतात.जे अमलात आणल्यानंतर आपल्याला साधं सरळ जीवन जगण्याची कला गवसते.'आपण हे पुस्तकं वाचनाआधी जसे असतो ते पुस्तक वाचल्यानंतर राहत नाही.'आपलं आजूबाजूला बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून जातो नि आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करतो.

200 पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात खालीलप्रमाणे चार भाग आहेत. पहिल्या नि दुसऱ्या भागात एकूण 30/30 मार्ग सांगितले आहेत.'तर तिसऱ्या व चौथ्या भागात 20/20 मार्ग दिले आहेत.अश्या प्रकारे एकूण विविध 100 मार्ग आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळतात.'जे वाचून आपण या पुस्तकाच्या जाम प्रेमात बुडून जातो.


भाग 1 :-तुमच्या सध्याच्या -'स्व' ला उर्जाभरीत करण्याचें 30 मार्ग.
भाग 2 :- जगताना आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करण्याचे 30 मार्ग.
भाग 3 :-  गोंधळ आणि चिंता दूर सारन्याचे 20 मार्ग .
भाग 4 :- कोणताही दिवस सर्वोत्तम करण्याचे 20 मार्ग .🌱

या प्रत्येक भागात दिलेल्या विविध महत्वपूर्ण झेन मार्गांनी आपले जीवन अधिक समृद्ध होत जाते.आपल्या दैनंदिन जीवनातला गोंधळ शांत करायला,ताण कमी करायला नि इतरांची दखल घ्यायला हे पुस्तक आपल्याला शिकवतं.❤️

नक्की नक्की वाचा नि यामध्ये दिलेले सराव अमलात आणायचं प्रयत्न करा....🌱

शुभेच्छा...!💙

©️Moin Humanist🌱❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼