साद घालतो कालाहारी.....♥️


काही दिवसांपासून मी 'मार्क नि डेलिया'या जोडप्यासोबत कालाहारी वाळवंटात वास्तव्य करत होतो.'अशा ठिकाणी आम्ही राहत होतो जिथे कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता,तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे.'हजारो चौरस मैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हतं..'हा जोडपं आपला प्राणीशास्त्राचा अभ्यास करत होता नि मी त्यांना फक्त बघत अन् अनुभवतं होतो.'हा 'कालाहारी'चा प्रवास खूप काही शिकवणारा नि समृद्ध करणारा होता.

या प्रवासात ब्राउन हायना,कोल्हे,सिंह नि इत्यादी विविध प्राण्यांशी ओळख अन् मैत्री झाली,'त्यांच्याबद्दल मार्क नि डेलियांकडून महत्वपूर्ण अशी माहिती मिळाली.जी फारच रोचक नि हटके होती.'या जोडप्याच्या आयुष्यात पावलोपावली येणारी वेगवेगळी संकटे व त्यांनी या संकटावर केलेली यशस्वी मात हे सर्व जणू डोळ्यांनी बघताना,अनुभवताना मी पूर्णपणे यातच गुंतून गेलो होतो..!

आता हा प्रवास मी कशाप्रकारे करून आलो ?तर मी हा प्रवास 'मार्क&डेलिया ओवेन्स लिखित (Cry Of The Kalahari) म्हणजेच 'साद घालतो कालाहारी'या 416 पृष्ठसंख्या असलेल्या पुस्तकातून करून आलो...!

'प्राणीशास्त्राचा' अभ्यास नि संशोधन करण्यासाठी आफ्रिकेतील 'कालाहारी वाळवंटात'गेलेल्या एका अमेरिकेन जोडप्याने त्यांच अनुभवकथन या अप्रतिम पुस्तकातून वाचकांसमोर आणलं आहे.'आंतराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च खपाच्या या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद'मंदार गोडबोले'यांनी केले असून जे खूपच वाचनीय व उत्तम झाले आहे.'हा अनुवाद वाचताना  आपण काही अनुवादित वाचतोय असं अजिबात वाटतं नाही.

मला हे पुस्तकं फार आवडलं नि भावून गेलं.'अरण्य,प्राणी, पक्षी नि निसर्गाबद्दल वाचणे मला नेहमीच आवडतं व यामुळेच मला हे पुस्तकं जरा जास्तच आवडलं.'खूपच इंटरेस्टिंग नि माहितीपूर्ण असलेलं हे पुस्तकं वाचकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.'जणू आजूबाजूला घडतं असलेलं घटनाक्रम आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय असं आपल्याला वाटतं राहतं.'यांनी वेगवेगळ्या प्राण्यांना दिलेले नाव आपल्या ओठांवर सारखे खेळत असतात.लेखकांनी ज्याप्रकारे आपले अनुभव आपल्यासमोर मांडले आहेत ते वाचतांना आपण पूर्णपणे यात हरवून जातो.आपल्याला आजूबाजूचं भान राहतं नाही एवढं नक्की...!

आपल्याबरोबर एक बदली कपड्याचा जोड आणि एक दुर्बिण वगळता बाकी विशेष काही न घेता हे तरुण अमेरिकन जोडपं,आफ्रिकेचे विमान पकडतात.

''आफ्रिकेतील एखादा मोठा मांसाहारी प्राणी त्यांना अभ्यासायचा होता, तसा अभ्यास करून त्या संशोधनाचा उपयोग, आफ्रिकेतील प्राणिसंवर्धनाचा एखादा कार्यक्रम हाती घेण्यासाठी करायचा त्या दोघांनी निश्चय केला होता. मानवाच्या पदस्पर्शाने प्रदूषित न झालेली एखादी जागा अजूनही शिल्लक आहे, हे आपल्या डोळ्यांनी बघावे, असेही कदाचित त्या दोघांना वाटत होते."

आफ्रिकेत येऊन तिथे एक थर्ड हँड लँड रोव्हर गाडी विकत घेऊन ते कालाहारी वाळवंटात खोलवर मजल मारतात.तिथे ते एकूण सात वर्षे वास्तव्य करतात, अशा ठिकाणी जिथे कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरस मैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्त्रोत नव्हता. या प्रचंड जंगलात ओवेन्स जोडपं आपला प्राणिशास्त्राचा अभ्यास सुरू करतो. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते त्यांनी कधीही माणूस पाहिला नव्हता. यांच्या सिंहांबरोबरील आणि ब्राऊन हायना, कोल्हे, जिराफ आणि त्यांना भेटलेल्या इतर अनेक प्राण्यांबरोबरचे विविध अनुभव या पुस्तकातून आपल्या समोर येतात.'जे खरंच खूपच रोचक नि वाचनीय आहेत..'

मार्क नि डेलियाने तब्बल सात वर्षे नेमकं काय केलं याबद्दल विस्तुत जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तकं आवर्जून वाचा...♥️

©️Moin Humanist ♥️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼