We Read 'Raksha-bandhan Special16'वी वाचनीय पुस्तकांची यादी..🌱भाग :- 1 ❤️
यादीतील पुस्तकांवर 30% सूट आहे नि शिपिंग चार्ज वेगळे ऍड केले आहे.!
https://wa.me/7066495828
____________________________________________
1)महासम्राट -विश्वास पाटील
एकूण 2 पुस्तके
मुळ किंमत-1250₹
We read -975₹ With शिपिंग घरपोच.
छत्रपती शिवरायांची जीवनगाथा म्हणजे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणारी धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड अर्थात झंझावात. छत्रपती शिवरायांच्या हदयात ज्या घटनांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग जागवलं, त्या घटनांचा विस्तृत परीघ आणि अवकाश सादर करणारं हे पुस्तक आहे. शिवरायांच्या जन्मापूर्वीच्याही आधीच्या अज्ञात इतिहासावर प्रकाशझोत टाकत नवी ऐतिहासिक मांडणी यात आहे. जिजाऊ आणि शिवरायांचा विजापूर दौरा, शहाजीराजांच्या उपस्थितीतली शिवरायांची तालीम, हा इतिहासाचा पैलू मराठी वाचक प्रथमच वाचतील आणि तो वाचकांना भारावून टाकणारा ठरेल, यात शंका नाही.
2)घरट्या पलीकडे +चैत्रपालवी~मारुती चितमपल्ली
एकूण 2 पुस्तके
मुळ किंमत-300₹
We read -240₹ With शिपिंग घरपोच.
3)वॉल्डन -हेन्री डेव्हिड थोरो
मुळ किंमत-350₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच.
वॉल्डन हे अमेरिकन ट्रान्सेंडेंटलिस्ट लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांचे पुस्तक आहे. हा मजकूर लेखकाच्या नैसर्गिक वातावरणातील साध्या राहणीचे प्रतिबिंब आहे. हे काम स्वातंत्र्याची वैयक्तिक घोषणा, सामाजिक प्रयोग, आध्यात्मिक शोधाचा प्रवास, व्यंगचित्र आणि - काही प्रमाणात - स्वावलंबनासाठी एक पुस्तिका आहे.
4)दुर्दम्य - भारतीय सैन्य नेतृत्त्वाची उत्तुंग शिखरे
मेजर जनरल शशिकान्त पित्रे (निवृत्त)
मुळ किंमत-350₹
We read -305₹ With शिपिंग घरपोच.
दुर्दम्य म्हणजे नेमकं काय? जिगरी दोस्त मन्नू रावतचा फोन आला, ‘‘हाऊ आर युअर लेग्ज, पंकज?'' नेहमीच्या टोलेजंग हास्यानिशी पंकज जोशींनी उत्तर दिले, ‘‘कौनसी टांगें, मन्नू? टांगें तो अब हैंही नहीं!'’ त्यांच्या पोटात, मूत्रपिंडात आणि यकृतात एकूण नऊ गोळ्या घुसल्या होत्या. माणेकशा यातून केवळ जगलेच नाहीत, तर स्वतंत्र भारताचे पहिले फील्डमार्शलही झाले...! ले. जनरल एसपीपी थोरात, अॅृडमिरल भास्करराव सोमण, फील्डमार्शल सॅम माणेकशा, ले. जनरल प्रेम भगत, ले. जनरल सगतसिंग आणि ले. जनरल पंकज जोशी. भारतीय सैन्यदलातील पराक्रमाची सहा उत्तुंग शिखरे! त्यांच्या अमर कर्तृत्वाच्या या स्फूर्तिदायक कहाण्या...
5)लोकांचे संविधान- रोहित डे
मुळ किंमत-500₹
We read -400₹ With शिपिंग घरपोच.
रोहित डे यांचं हे पुस्तक संविधानाचा भारतीयांवरील प्रभाव अधोरेखित करणारं
आहे. जनसामान्यांच्या जीवनात संविधानाने घडवलेले बदल आणि त्याचे परिणाम
यांविषयी या पुस्तकात उदाहरणांनिशी केलेलं विवेचन आपल्या संविधानाचं सामर्थ्य
6)डेझर्टर -विजय देवधर
मुळ किंमत-425₹
We read -345₹ With शिपिंग घरपोच.
गंथर बान्हमान यांच्या 'आय डेझर्टेड रोमेल' या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे.
हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी
झाले आहे. बान्हमान यांचे स्वानुभव आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ असलेले हे कथानक आहे.
7)डहाण~ अनिल साबळे
मुळ किंमत-450₹
We read -365₹ With शिपिंग घरपोच.
आश्रमशाळेतल्या निरागस मुलांच्या वाट्याला आलेले वंचनांचे जग अनिल साबळे यांनी या कादंबरीत साकारले आहे. एखाद्या अनाम चित्रकाराने गुहेत रेखाटलेल्या चित्रासारखा गहिरेपणा इथे शब्दांना आला आहे. लैगिक शोषणाच्या विळख्यात अडकणाच्या मुली, आत्महत्येसारखं टोकाच पाऊल उचलणारी मुलं, निकृष्ट प्रतीचे अन्न, अस्वच्छता, असुरक्षितता असं सारं काही निमुटपणे सोसणारे आणि आपलं शोषण होत आहे हेही धड न उमजणारे कोवळे जीव या कारदंबरीत आपल्याला प्रत्येक पानावर आढळतात.
'डहाण' म्हणजे व्रण, जखमेची खूण, ही कादंबरी वाचल्यानंतर आपल्या संवेदनेवरही एक अमीट असा व्रण खोलवर उमटला आहे अशी अनुभूती वाचकाला नक्कीच येईल.
8)केदारनाथ 17 जून -डॉ.प्रकाश कोयाडे
मुळ किंमत-390₹
We read -340₹ With शिपिंग घरपोच.
जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ
येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत,
म्हणूनच आपण मरायचं नाही..."
"आपल्याला जिवंत रहावंच लागेल!"
एका सत्य घटनेवर आधारीत कादंबरी...केदारनाथ १७ जून !
9)भुरा -शरद बाविस्कर (11 वी आवृत्ती)
मुळ किंमत-500₹
We read -400₹ With शिपिंग घरपोच
धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या, भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या, तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या, 'भुरा' ही आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स, अल्थुझर, ग्राम्शी , महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन.
10)रफ स्केचस -सुभाष अवचट
मुळ किंमत-400₹
We read -330₹ With शिपिंग घरपोच
प्रख्यात चित्रकार सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही रफ स्केचेस आपल्याला तीच विरळा संधी देतात. आयुष्यात त्यांना भेटलेली माणसं, त्यांचं वेगळेपण, स्वतःची चित्रं, त्या चित्रांमागचा विचार, त्यामागची प्रोसेस,जगभरातले चित्रकार, त्यांचं म्हणणं, माणसाला व्यापून असलेल्या भाव-भावना अशा नाना गोष्टींना सहजपणे कवेत घेत जाणारं अवचटांचं लिखाण त्यांच्या चित्रांइतकंच उत्स्फूर्त आणि लखाखतं आहे.
11)गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण – मनू एस. पिल्लई
मुळ किंमत-400₹
We read -330₹ With शिपिंग घरपोच
जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू
मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत-एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर
गाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्र
संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत – या पुस्तकातले
विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या
खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील
कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून
टाकल्या आहेत.
12)शिरसवाडी नि कंट्या ~गणेश बर्गे
एकूण 2 पुस्तके
मुळ किंमत-500₹
We read -400₹ With शिपिंग घरपोच
शिरसवाडी म्हणजे लव आणि रुपाली यांच्यातलं अविरत प्रेम, शिरसवाडी म्हणजे लव आणि जयु यांच्यातलं बंधुत्व, शिरसवाडी म्हणजे लव आणि गावकऱ्यांनी केलेल्या एका अनाथ मुलाचा सांभाळ. यातच शिरसवाडीचे कथानक नकळतपणे पकड घेत. वाचण्याचा वेग वाढू लागतो तस आपण शिरसवाडी मध्ये पोहचतो.
13)केशराचा पाऊस + नवेगावबांधचे दिवस ~मारुती चितमपल्ली
एकूण 2 पुस्तके
मुळ किंमत-600₹
We read -495₹ With शिपिंग घरपोच.
14)कास्ट मॅटर्स - सूरज एंगडे
मुळ किंमत-460₹
We read -350₹ With शिपिंग घरपोच
या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेले पहिल्या पिढीचे दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतात. दररोज नरकयातना भोगावा लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरीही यात आढळते. दलितांमधील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात. जोवर दलित सत्ता मिळवण्यासाठीच्या लढ्यात नेतृत्वस्थानी नसतील आणि ब्राह्मणवादाविरोधात ब्राह्मण उभे राहणार नाहीत, तोवर जातीचं अस्तित्व राहणार असल्याची मांडणी एंगडे करतात.
15)अंबालक्ष्मी+खंडोबा+सूर्याची सावली -नितीन थोरात
एकूण 3 पुस्तके
मुळ किंमत-850₹
We read -650₹ With शिपिंग घरपोच
16)घोस्ट रायटर -आशिष महाबळ
मुळ किंमत-250₹
We read -215₹ With शिपिंग घरपोच
विज्ञान संशोधनाची नवनवी क्षेत्रं विकसित होत असताना विज्ञानकथा लेखनानेही नव्या कल्पना धुंडाळाव्यात, अशी अस्सल विज्ञानप्रेमी वाचकांची अपेक्षा असते. या संग्रहातल्या कथा ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतात. विज्ञानकथावाचनाची आपली इयत्ता वाढवतात.
17)युगंधर -शिवाजी सावंत
मुळ किंमत-750₹
We read -625₹ With शिपिंग घरपोच
हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे. भारतीय समाज व संस्कृती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमद्भागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या हजारो वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची आणि अतक्र्य चमत्कारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूसनीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे! त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवनसरोवरातील दाटलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून, सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनातून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती – ‘युगंधर’!
18)संभाजी -विश्वास पाटील
मुळ किंमत-825₹
We read -660₹ With शिपिंग घरपोच
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!
19)झोंबी -आनंद यादव
मुळ किंमत-420₹
We read -340₹ With शिपिंग घरपोच
आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हेवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच! पु. ल. देशपांडे
20)मृत्युंजय-शिवाजी सावंत
मुळ किंमत-640₹
We read -525₹ With शिपिंग घरपोच
असा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’ हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!
21) जात समजून घेताना~ Gail Omvedt
मुळ किंमत-250₹
We read -215₹ With शिपिंग घरपोच
हे पुस्तक म्हणजे जात आणि जातिअंताचा संघर्ष या ऐतिहासिक विषयाचा अंतर्दृष्टीने घेतलेला अभ्यासपूर्ण शोध आहे. भारतीय परंपरा म्हणजेच हिंदू परंपरा आणि ब्राम्हणी परंपरा ; ब्राम्हण्यवाद म्हणजेच हिंदू धर्म असे स्वाभाविकपणे गृहीत धरले जाते. अंतर ब्राम्हण्यवाद म्हणजे वेदांवर आधारित भारतीय संस्कृती अशा धारणेवर आधारित आणि भारतीय संस्कृतीचा मूळ वारसा आर्याच्या परंपरेतील आहे अशा समग्र गृहीतकाला ही मांडणी आव्हान देते. भारतातील सेक्युलर भूमिकेचा पुरस्कार करणारेसुद्धा याच ‘ब्राम्हण्यवादी दृष्टिकोनात अडकले आहेत.
22)साद घालतो कालाहरी
मुळ किंमत-530₹
We read -445₹ With शिपिंग घरपोच
'क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली.
23)गढीवरून -राजा गायकवाड
मुळ किंमत-300₹
We read -250₹ With शिपिंग घरपोच
कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत.
24)भंडारभोग आणि चौंडक' - राजन गवस
मुळ किंमत-420₹
We read -350₹ With शिपिंग घरपोच
रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी... याच रूढीपरंपरांचा आणखी एक बळी म्हणजे जोग्या! ग्रामीण भागात असे देवीला वाहिलेले किती तरी जोगते आढळतात. यांचं जीवन देवदासीपेक्षाही भयावह...! देवदासी झुलवा लावू शकते. एखाद्या पुरुषाची रखेल म्हणून राहू शकते. ती मेली, तर प्रेताला माणसं जमतात. कुणाच्या तरी बांधाला जागा मिळते; पण जोगत्याच्या तिरडीला माणूसच मिळणं कठीण... त्याचा स्पर्शही इंगळीसारखा... त्याच्या नशिबी फक्त अंधार... तोही पुरुषासारखा पुरुष असतो; पण रूढीपरंपरांच्या ओझ्यानं त्याला सगळंच गमवावं लागतं तर,
आपल्या समाजातील देव, धर्म, अनिष्ट रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी. `जोगतीण देवाची, मालकी गावाची` ही आपल्या बोलीतील म्हण तिच्या जगण्याचं सार सांगते. देवाच्या नावावर समाजातील राक्षसी वृत्तींनी निर्माण केलेल्या प्रथेच्या बळी ठरलेल्या देवदासी स्त्रियांची होरपळ `चौंडकं` ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते. स्त्रीदु:खाचा नेमका वेध, बोलीची सर्व सामर्थ्य पचवून राजन गवस यांनी `चौंडकं`मध्ये घेतला आहे. `सुली`च्या व्यक्तिरेखेतून एक ठसठशीत वेदना आपल्यासमोर येते. देवदासीच्या जगण्यातील सर्व दु:ख आणि तिच्या समस्यांचा वेध घेणारी कादंबरी म्हणून `चौंडकं`ची नोंद विशेषत्वानं करावी लागेल.
25)सलोख्याचे प्रदेश -सबा नक्वी
मुळ किंमत-250₹
We read -215₹ With शिपिंग घरपोच
भारतात अनेक जाती - धर्मांचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा वेगळ्या असतात. तरी 'अनेकतात एकता' म्हणतो त्याप्रमाणे येथील प्रमुख हिंदू व मुस्लीमांच्या परंपरा, सण, उत्सव, एकत्र साजरे होतात.
अशा काही ठिकाणी भेट देऊन तेथील समजाचे चित्रण सवा नक्वी यांनी 'सलोख्याचे प्रदेश' मधून दाखविले आहे.
26)नर्मदे हर हर -जगन्नाथ कुंटे
मुळ किंमत-300₹
We read -250₹ With शिपिंग घरपोच
नर्मदा भारतातील एक प्राचीन नदी. तिची परिक्रमा म्हणजे नर्मदेला चालत प्रदक्षिणा घालण्याची परंपराही हजारो वर्षापूर्वीची. आज या परिक्रमेला भक्तीबरोबरच उत्कंठेचेही वलय लाभले आहे. श्रद्धापूर्वक परिक्रमा कशी करावी, याचे सविस्तर वर्णन जगन्नाथ कुंटे यांनी 'नर्मदे हर हर'मध्ये केले आहे. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्राचा सीमा भाग असं विस्तीर्ण प्रदेश या परिक्रमेत येतो. सर्वाधिक परिक्रमा मध्य प्रदेशातून होते.
27)द कृष्णा की -अश्विन सांघी
मुळ किंमत-650₹
We read -540₹ With शिपिंग घरपोच
चार मुद्रा आणि एक तबकडी, ज्यांचं ऐतिहासिक महत्त्व आहे, ज्यांना पौराणिक पार्श्वभूमी आहे, अशी प्रत्येकी एक मुद्रा चार चार मित्रांकडे आहे – प्रा. रवी मोहन सैनी, संशोधक निखिल भोजराज, अणुसंशोधक प्रा. राजाराम कुरकुडे, आनुवंशशास्त्रज्ञ देवेंद्र छेदी. त्या मुद्रांसाठी अनिल वर्षनेचा होतो खून. आळ येतो सैनीवर. सैनी आणि त्याची विद्यार्थिनी प्रिया पोलिसांपासून पळत राहतात. दरम्यान, निखिल भोजराज आणि कुरकुडेंचाही खून होतो. तारक वकील हे खून करत असतो माताजींच्या सांगण्यावरून. एका धक्कादायक क्षणी प्रियाही तारकला सामील असल्याचं सत्य सैनीसमोर येतं. तारक आणि प्रिया इन्स्पेक्टर राधिकाला ओलीस ठेवतात. काय विशेष असतं त्या मुद्रांमध्ये? त्या शेवटी कुणाला मिळतात? राधिका, तारक आणि प्रियाच्या तावडीतून सुटते का? महाभारत आणि कृष्णचरित्रातील प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर अनेकानेक नाट्यमय वळणांनी पुढे सरकत राहणारी आणि श्वास रोधून ठेवायला लावणारी उत्कंठावर्धक कादंबरी.
28)अखेरचे शिलेदार -पी साईनाथ
मुळ किंमत-350₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
अखेरचे शिलेदार' या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय,
मुस्लीम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतांतली, विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पाश्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत; तर काही नास्तिक. काही डावे, काही गांधीवादी; तर काही आंबेडकरवादी.
29)स्वामी-रणजित देसाई
मुळ किंमत-350₹
We read -320₹ With शिपिंग घरपोच
महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली `भैरव` या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक.
30)कर हर मैदान फतेह -विश्वास नांगरे पाटील
मुळ किंमत-300₹
We read -225₹ With शिपिंग घरपोच
सबंध महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत आणि उत्तुंग मनोबल व धैर्यानं दहशतवाद्यांशी दोन हात करणारं पराक्रमी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री.विश्वास नांगरे पाटील. त्यांचा आजवरचा प्रवास, पोलीस अधिकारी म्हणून जडणघडण होत असतानाचे टक्केटोणपे आणि गुन्हेगारी जगतावर त्यांनी बसवलेला चाप, या सर्वाची दमदार यशोगाथा म्हणजे श्री. विश्वास नांगरे पाटील यांचं ‘कर हर मैदान फ़तेह’ हे पुस्तक. एका ग्रामीण युवकाचं एका अधिकाऱ्यात रूपांतर होत असतानाचे विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवांच्या आधारे घडलेली यशस्वी कारकीर्द यांचा सांगोपांग आढावा म्हणजे हे पुस्तक.
31)श्रीमान योगी -रणजीत देसाई
मुळ किंमत-675₹
We read -555₹ With शिपिंग घरपोच
रणजीत देसाई शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसिध्द ऐतिहासिक कादंबरी
32)द लास्ट गर्ल -नादिया मुराद
मुळ किंमत - 460₹
We read Price - 375₹घरपोच.(शिपिंग फ्री)
नोबेल शांतता पुरस्कार विजेतीची कहाणी़...नादिया मुराद ही अत्यंत धाडसी यजिदी तरुणी आहे. तिनं इसिसची लैंगिक गुलामगिरी सोसली आहे. तिनं कल्पनातीत यातना आणि अपमान भोगला आहे. नादियाच्या सहा भावांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यानंतर काही काळातच, तिच्या आईलाही ठार मारण्यात आलं. त्यांचे मृतदेह सामूहिक कबरींत लोटण्यात आले...पण तिनं लढा दिला...इराकमधील तिचे बालपणीचे शांततामय दिवस... घरच्यांचा कायमचा वियोग आणि अमानुषतेचा सामना... ते जर्मनीत लाभलेली सुरक्षितता यादरम्यानचा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.
33)पर्व -डॉ.एस.एल. भैरप्पा
मुळ किंमत - 550₹
We read Price -455₹घरपोच.(शिपिंग फ्री)
व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक. कर्नाटकमधील अग्रगण्य कादंबरीकार तत्त्वचिंतक डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी या चमत्कारांच्या, शापांच्या आणि वरदानांच्या भरभक्कम पडद्याआड लपलेल्या माणसांचा शोध घेतला.
34)कॉसमॉस - अनुवाद (प्रणव सखदेव)
मुळ किंमत - 450₹
We read Price -375₹घरपोच.(शिपिंग फ्री)
35)मी फुलनदेवी -मारी तेरेज क्यूनी
मुळ किंमत - 450₹
We read Price -375₹घरपोच.(शिपिंग फ्री)
रॉबिनहूडचा स्त्री अवतार म्हणजे फूलनदेवी. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या डाकूराणी फूलनदेवीचं हे खरंखुर आत्मकथन आहे. खालच्या जातीच्या गरीब घरात जन्मलेल्या फूलनने दारिद्र्य आणि अपमानाचं जीणं यांचा सामना केला. अशा समाजात ती टिकून राहिली की जिथे पोटात आणि भिंतींमध्ये माती लिंपावी लागते, अशा समाजात की जिथे भटक्या म्हशीला एखाद्या मुलीपेक्षा जास्त मान दिला जातो. आपल्यापेक्षा तिप्पट वयाच्या विधुराशी लग्न लागल्यावर अवघ्या अकराव्या वर्षी तिला मारहाण, अपमान आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं. समाजानं तिची वेश्या म्हणून संभावना केली.
36)झांबळ -समीर गायकवाड
मुळ किंमत-280₹
We read -245₹ With शिपिंग घरपोच
भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत.
काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत
आहे. याच तोलामोलाची माणसं या कथांत
भेटतील, ही माणसं अनेकाथांनी घनदाट होती.
त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी
जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता,
त्यांची नाती अतुट मायेची होती आणि मुख्य
म्हणजे अंधाराच्या उंबऱ्यावरच्या प्रकाशखुणा
त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या
अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातल
वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं.
37)दस्तावेज -आनंद विंगकर
मुळ किंमत-650₹
We read -555₹ With शिपिंग घरपोच
आनंद विंगकर या मराठीतील प्रथितयश कवी आणि लेखकाची 'दस्तावेज' ही कादंबरी म्हणजे आत्मचरित्र आणि सर्जनशील कथन या दोन वाङ्मयप्रकारांचा हृद्य आणि प्रभावी असा मेळ आहे. परिवर्तनवादी राजकीय चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या आत्मशोधाचा हा प्रदीर्घ प्रवास आपल्याला अतिशय गुंतागुंतीच्या व्यवस्थांच्या गाभ्याचे दर्शन घडवतो.
38)लॉर्ड्स ऑफ द डेक्कन – अनिरुद्ध कणिसेट्टी
मुळ किंमत-500₹
We read -400₹ With शिपिंग घरपोच
सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून गेल्याचं दिसतं मात्र उर्वरित उपखंडाचा इतिहास हा अत्यल्प प्रमाणात आणि सहसा फक्त तळटीपांच्या स्वरूपात दिला जातो. कनिसेट्टी यांच्या या विद्वत्तापूर्ण आणि निःपक्षपातीपणे लिहिल्या गेलेल्या पहिल्याच पुस्तकाचं गंभीरपणे स्वागत झालं आहे.
39)महामाया निळावंती -सुमेध
मुळ किंमत-350₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
1992 साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का?
40)असा झाला पुणे करार +नाही नाचणार आदिवासी आता+मरण स्वस्त होत आहे+महात्म्याची अखेर
एकूण 4 पुस्तके
मुळ किंमत-600₹
We read -495₹ With शिपिंग घरपोच
41)भटक्यांचे लग्न +आणि आदिमानव माणूस झाला+लिहित्या लेखकाचे वाचन +बराक ओबामा
एकूण 4 पुस्तके
मुळ किंमत-600₹
We read -495₹ With शिपिंग घरपोच
42)मूकद्दर -स्वप्निल कोलते पाटील
मुळ किंमत-300₹
We read -250₹ With शिपिंग घरपोच
औरंगजेब माहीत झाला की मराठ्यांच्या कर्तृत्वाचा व शौर्याचा इतिहास आणखीन ठळकपणे दिसून येतो. हे पुस्तक वाचताना जाणवते की कावेबाज, धुर्त, प्रचंड बुद्धिमान असलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी कशी धूळ चारली असेल? औरंगजेब स्वतःला नियती म्हणजे मुकद्दर समजायचा. एकंदरीत औरंगजेबाचे वर्णन या कादंबरीत केलेले आहे.
43)संघर्षाची मशाल हाती -नरसय्या आडम
मुळ किंमत-400₹
We read -325₹ With शिपिंग घरपोच
नरसय्या आडम म्हणजेच आडम मास्तरांशी माझा दीर्घकाळ परिचय आहे. आधी कामगार कार्यकर्ता, नंतर सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आणि पुढे तीन वेळा आमदार म्हणून मी त्यांना पाहिलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
44)वोल्गा ते गंगा -राहुल सांकुत्यान
मुळ किंमत-350₹
We read -320₹ With शिपिंग घरपोच
45)न्याय – मायकल सॅंडेल
मुळ किंमत-400₹
We read -330₹ With शिपिंग घरपोच
खोट बोलण हे नेहमीच वाईट असतं का?
व्यक्तिस्वातंत्र्याला काही मर्यादा असली पाहिजे का?
अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याचा खून करावा लागल्याचं समर्थन करता येऊ शकेल का?
मुक्त बाजरपेठ खरंच मुक्त आहे का?
विषमता कमी करण्यासाठी ठरावीक लोकांवर कर आकारणं न्याय्य आहे का?
46)एकलव्य -विजय देवडे
मुळ किंमत-390₹
We read -340₹ With शिपिंग घरपोच.
महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित बदललं गेलं असतं. एकलव्यानं गुरुदक्षिणेत अंगठा गुरू द्रोणाचार्य यांना दिला, त्याच्या निष्ठेनं सर्वांना भुरळ घातली. अशी गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग, निष्ठा व समर्पणाच्या जोरावर परत पर्वतासारखा उभा राहून एकलव्यानं आदर्श निर्माण केला.
भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात फक्त आवाजाच्या दिशेनं बाण मारून लक्ष्यवेध करणारा एकलव्य बाणावर इतकं नियंत्रण असणारा महाभारतातला एकमेव धनुर्धर म्हणजे एकलव्य! तो एक बुद्धिमंत हुशार राजा होता, त्यांनीही अनेक युद्ध लढली. युद्धात कृष्णालाही नमायला लावणारा तो एक शक्तिशाली धनुर्धर आणि योद्धा होता.
एकलव्य ही कादंबरी वाचल्यावर आपल्या मनाजवळ असलेला राजा.
एकलव्य आपल्याला निश्चित सापडेल.
47)मारुती चितमपल्ली व्यष्टी आणि सृष्टी
मुळ किंमत-180
We read -160₹ With शिपिंग घरपोच.
48)आदिवासी बोधकथा -एक पुनकर्थन
मुळ किंमत-250₹
We read -215₹ With शिपिंग घरपोच
हे पुस्तक खरंच खूप जबरदस्त आणि अप्रतिम आहे.यातील प्रत्येक कथा उत्कृष्ट असून यामध्ये दिलेली वारली चित्रं तर खूप भन्नाट आहेत..गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया वारली चित्र काढत असतं. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपध्दती चित्रित केलेली आढळते.जीवनाचा सह-आनंद लुटलेला दिसतो.आदिवासी समाजातून बहरलेलं तत्वज्ञान यामध्ये सापडतो,त्यांची निसर्गाप्रति असलेली कृतज्ञता आणि प्राणिमात्रांवरचं प्रेम यामध्ये आपल्याला दिसतो.
49)अंगुलीमाल -उल्हास निकम
We read - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
50)सेपियन्स -युवाल नोवा हरारी
Paperback/New
मुळ किंमत - 500
We read Price - 400 घरपोच.(शिपिंग फ्री)
१ लाख वर्षांपूर्वी माणसाच्या कमीत कमी
६ जाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे.आपण होमो सेपिअन्स
आपण पृथ्वीवर अधिसत्ता कशी स्थापन केली?
आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरं आणि
राज्य कशी स्थापन केली?
देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा
विश्वास ठेवायला लागलो?
आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपलं जग कसं असेल?
माणसाची विचारपद्धती, त्याचं वर्तन, त्याची बलस्थानं आणि त्याचा
भविष्यकाळ यांबद्दलच्या आपल्या सगळ्या समजुतींना आव्हान देणारं
विचारप्रवर्तक पुस्तक... सेपिअन्स!
51)रातवा +पक्षी जाय दिगंतरा+सुवर्णगरुड+पाखरमाया ~मारुती चितमपल्ली
एकूण 4 पुस्तके
मुळ किंमत - 700
We read Price - 580? घरपोच.(शिपिंग फ्री)
52)पाखरमाया+रानवाटा -मारुती चितमपल्ली
मुळ किंमत - 500₹
We read Price - 400₹ घरपोच.(शिपिंग फ्री)
53)मऱ्हाटा पातशाह -केतन कैलास पुरी
मुळ किंमत-300₹
We read -250₹ With शिपिंग घरपोच
54)डोंगरी ते दुबई -हुसेन जैदी
मुळ किंमत-495₹
We read -395₹ With शिपिंग घरपोच
मुंबईवर ६० वर्षे आपला प्रभाव पाडणारे गुंडाच्या टोळ्यांचे डॉन होते. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम हे होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांची तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे.
55)अवकाळी पावसाच्या दरम्यान ची गोष्ट
-आनंद विंगकर
मुळ किंमत-200₹
We read -185₹ With शिपिंग घरपोच
कवी आनंद विंगकर यांची 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ही कादंबरी एक अकस्मात घडलेली घटना आणि एक अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होते. अस्मानी संकटामागच्या मानवी हस्तक्षेपांचं भान देत, अकस्मात उद्भवलेल्या घटनांच्या मालिकांची अपरिहार्य शोकात्म परिणती दिग्दर्शित करत त्या वातावरणातील बदलते मानवी भाव, मानवी जीजीविषा, कणखरपणा यांचा गंभीर प्रत्यय देते. रंजकतेच्या पारंपरिक कुप्रथांचा त्याग करूनही ही कादंबरी अत्यंत वेधक उतरली आहे. कारण लेखकाचं वृत्तिगांभीर्य आणि भावनात्मक ताटस्थ्य. आत्महत्या करणारं शेतकरी जोडपं, त्यांची थोरली लेक, तिचा प्रियकर यांची चरित्रं आणि एकूण कथानकाचं वाहतेपण प्रभावी आहेच, खेरीज ग्रामसमाजातील व्यवहार, परस्परसंबंधांचे ताणेबाणे यांच्यातील अस्सलतेमुळे ही कादंबरी अधिक मोठा आवाका धारण करते. कादंबरी वाचून संपवताना आपण ती वाचण्याआधीचे उरत नाही, हे तिचं महत्त्वाचं यश आहे.
~We Read ❤️♥️
https://wa.me/7066495828
https://chat.whatsapp.com/J58KV2PCm97CRz4L8K7v8o
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा