सत्तर दिवस ❤️
'रवींद्र गुर्जर लिखित 'सत्तर दिवस' या 200 पृष्ठसंख्या नि हृदयद्रावक सत्यकथा असलेलं हे पुस्तकं वाचून पूर्ण केलं..मुळात शब्दचं सुचत नाही,याबद्दल काही लिहायला, बोलायला.'हे सर्वकाही आजपासून 51 वर्षाआधीच घडून गेलेलं आहे, इत्यादी सर्वकाही ठाऊक असून सुद्धा पुस्तकातील कथानक काही पिच्छा सोडतं नाही.'हे पुस्तक वाचताना नि वाचल्यानंतर सुद्धा मनाला वेदना नि दुःख होतं राहतो',त्या निष्पाप मृत्यमुखी पडलेल्या माणस व त्यांच्या कुटुंबाबद्दल विचार करून वाईट वाटतं असतं.'त्यांच्याप्रती आपण संवेदना व्यक्त करतो.'एकंदरीत त्यांच्या दुःखात सहभागी होऊन जातो.
हे पुस्तक मी नेहमीप्रमाणे सारखं नि सलग वाचलं नाही,तर अनेक वेळा थांबून वाचलं.'सलग वाचायची हिम्मत काही झाली नाही.काही प्रसंगाच्या पुढे जायची मनस्थितीच होतं नव्हती.'पुढे अजून काय काय वाढून ठेवलं असेल याची पूर्वकल्पना होतीच'कारण आजपर्यंत या 'प्लेन क्रॅश'बद्दल बरंच काही ऐकलं नि बघितलं होतं,पण रवींद्र सरांनी आपल्या लेखणीने ज्यापद्धतीने हे सर्वकाही कथानक रंगवलं आहे तो अक्षरशः डोळ्यासमोर जिवंत उभा राहतो.जणू हे सर्वकाही आपल्यासमोरचं घडतं आहे नि आपण सुद्धा या कथानकाचा एक भाग आहोत असं वाटतं राहतं शेवटपर्यंत...!!
आयुष्यात विश्वास नि इच्छाशक्ती किती महत्वाची भूमिका निभावत असते.आपल्याला हे पुस्तकं वाचून कळते.यातून बरंच काही शिकायला मिळते.'आपल्या जीवावर बेतल्यावर माणूस काय करू शकतो,याची प्रचिती आपल्याला हे पुस्तकं वाचून येते.'संकटात सापडल्यानंतर माणूस आपापसातील सर्व भेद विसरून जातो,खऱ्या अर्थाने संकट त्याला त्याच्या माणूस असण्याची जाणीव करून देतो.'त्या संकटातून बचावल्यानंतर तो पूर्वीपासून पूर्णपणे बदलून जातं असतो.'त्याला पूर्वी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा महत्वपूर्ण वाटत असतात.हा महत्वपूर्ण धडा सुद्धा यातून आपल्याला मिळतो नि आपण तो घेतला पाहिजे.'सर्व भेदभाव विसरून एक माणूस बनून जगण्यासाठी आपण कुठल्या संकटात सापडण्याची वाट बघायला अजिबात नको,यातूनच हा संदेश घेऊन नितळ एक माणूस बनायला हवं असं मला वाटतं.
'किमान मी स्वतःपूर्त तरी हा प्रयत्न नक्कीच करणार...!
कथानकाबद्दल.......💜
1972 साली 'युरुग्वे' देशातील 45 प्रवाशी 'चिली' देशात जाण्यासाठी 'फेअर चाइल्ड एफ 227'ह्या विमानानं प्रवास सुरू करतात.'या विमानात 'रग्बी'खेळाडूंचा संघ असतो.'जो चिली देशात सामन्यासाठी निघालेला असतो.'युरूग्वे ते चिली'कडे प्रस्थान करत असताना मध्ये 'अँडीज'पर्वत लागतो.'अँडीज हा हिमालयाच्या बरोबरीचा पर्वत-समूह ज्याची लांबी जगामध्ये सर्वांत जास्त आहे.'त्यांच्या विमानाला हा पर्वत ओलांडूनच जायचं असतं.'12 ऑक्टोबर 1972 रोजी हा विमान आकाशात झेप घेतो.'त्या दिवशी वातावरण फार बिघडलेलं असतं. हिमवर्षाव सुरू असतो,'दुपारी 3-30 च्या नंतर 'अँडीज'पर्वतावरून जातं असताना 'झंझावती'तुफान वाऱ्याला दोन हादरे देतो नि हा विमान त्या पर्वतावर जाऊन कोसळतो व येथून या विमानाचा जगाशी पुढील तब्बल 'सत्तर दिवसांपर्यंत संपर्क तुटतो.
'70 दिवसांपर्यत या 45 जणांपैकी फक्त 16 जण जिवंत राहतात.त्या निर्मनुष्य असलेल्या नि चोहीकडे बर्फाने माखलेल्या पर्वतावर 'जिवंत राहण्यासाठी यांनी काय केलं ? तेथे काय नि कोणकोणत्या अडचणी आल्या ?हे 16 जण जिवंत कसे राहू शकले ?आपल्याच मित्रांच्या मृत शरीराचं मांस भक्षण करायची पाळी आल्यावर यांना कसं वाटलं असेल ?नि शेवटी हे कशाप्रकारे या भयंकर संकटातून वाचतात ? इत्यादी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकातून मिळतात.
हे पुस्तक वाचताना कधी डोळ्यांत अश्रू येतात हे समजतं सुद्धा नाही.'काही प्रसंग वाचत असताना सिसारी येते.'आपली पुढील पृष्ठ बदलायची लवकर हिंमत होतं नाही.'यातील कितीतरी प्रसंग अंगावर येतात.
आवर्जून वाचा.....🖤
©️Moin Humanist✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा