अँड नाऊ मिगेल ♥️



काही दिवसांपूर्वी 'अँड नाऊ मिगेल'ही अप्रतिम अशी 159 पृष्ठसंख्या असलेली कादंबरी वाचली.जोसेफ क्रमगोल्ड लिखित व रॉय किणीकर यांनी मराठी अनुवादित केलेली ही कादंबरी खरंच खूप छान आहे,जी वाचत असताना शेवटपर्यंत मी यामध्ये हरवून गेलो होतो.जणू मिगेल आणि त्याच्या कुटुंबाचा एक भाग झालो होतो.कादंबरीतील विविध घटना जणू मला माझ्या डोळ्यासमोर घडताना दिसतं होत्या.मेंढपाळाचं जीवन ,हजारो मेंढ्यांच्या कळपाचं पालनपोषण, तिथली हिरवीगार कुरणं, खळाळणारे झरे,मेंढपाळ कुटुंबातील चालीरीती आणि आसपासच्या निसर्गाचं वर्णन मिगेल या पात्राच्या तोंडून ऐकून मी त्याच्या भावविश्वात विरघळून गेलो.या कादंबरीतुन मेंढपाळाच्या एका वेगळ्याच विश्वाचे दर्शन आपल्याला होतात.
मिगेल शावेज हा मेंढपाळांच्या एका मोठ्या मेंढपाळ कुटुंबातील 12 वर्षाचा मुलगा. जो उत्तर न्यू मेक्सिकोमध्ये, 'सांग्रो द क्रिस्तो' पर्वताच्या पायथ्याशी राहत असतो.लवकरात लवकर मोठा होण्याची घाई झालेल्या छोट्या मिगेलची एक अतृप्त इच्छा आहे.ती ही की त्याला 'सांग्रो द क्रिस्तो'या डोंगरावर जायला मिळावं.पण तो अजून लहान असल्याने त्याचे वडील त्याला बरोबर नेत नाही आणि यामुळेचं त्याला लवकरात लवकर मोठा होण्याची घाई लागलेली आहे.या कारणानेच तो शक्य तितके सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा अतोनात प्रयत्न करत असतो.पण त्याला यात काही यश मिळतं नाही.पण एकेदिवशी 'साई सिद्रोची'प्रार्थना केल्यावर त्याला अनपेक्षितपणे डोंगरावर जाण्याची संधी मिळते.

पण आता तो,

खरंच डोंगरावर जाण्यात यशस्वी होतो का ?
त्याला ही नेमकी संधी कशी मिळते ?
इत्यादी काही महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे या कादंबरीतूनचं मिळतील..♥️

नक्की वाचा✨

©️Moin Humanist✨

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼