एकलव्य 🖤



काही दिवसांपूर्वी विजय देवडे सरांनी मला त्यांची नवीकोरी कादंबरी 'एकलव्य' सहिनीशी सप्रेम भेट म्हणून पाठवली,तेव्हापासून ही कादंबरी वाचायची उत्सुकता होतीच.महाभारतातील एकलव्य सारख्या दुर्लक्षित व उपेक्षित पात्रांवर लिहिली गेलेली ही कादंबरी दोन दिवसांपूर्वी वाचून पूर्ण केली आणि पौराणिक कथेत जाऊन एकलव्याचा प्रवास त्याच्याकडूनच जाणून घेऊन आलो.हा प्रवास एक वेगळा आनंद देऊन गेला तर खूप काही शिकवून सुद्धा."इच्छाशक्तीच्या" बळावर माणूस काहीही करू शकतो ही शिकवण मला एकलव्य देऊन गेला.या कादंबरीतुन मला माझ्यातील एकलव्य काही प्रमाणात गवसला.

महाभारत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ते कौरव आणि पांडवामध्ये झालेलं युद्ध आणि यासोबतच यातील विविध पात्र ते म्हणजेच भिष्म, धृतराष्ट्र, पांडु, कुंती, गांधारी, युधिष्ठिर, दुर्योधन, भिम, अर्जून, कृष्ण, द्रोण,कर्ण, द्रौपदी आणि इत्यादी.यामध्येच एकलव्य सुद्धा हा एक महत्त्वाचं पात्र आहे.पण, कोठे एकलव्यचा उल्लेख जास्त होताना दिसतं नाही.एकलव्य जरी कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये नसला तरीही यामुळे त्याचे महत्व अजिबात कमी होतं नाही.एकलव्य हा फार महत्वाचा पात्र आहे.पण,त्याला योग्य तो न्याय मिळालेला दिसतं नाही.पुस्तकात असो किंवा टीव्ही मालिकेत एकलव्य सहजासहजी दिसतं नाही.

फक्त आवाजाच्या दिशेने कुत्र्याच्या तोंडात बाण मारणारा श्रेष्ठ धनुर्धर आणि गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा कापून देणारा निष्ठावंत शिष्य.आजपर्यंत आपण एवढंच वाचत आणि ऐकत आलो आहे, पण एकलव्य खरचं एवढ्यातच मर्यादित होता का? 
'एकलव्य' हा महाभारतातील पांडवांच्या अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर होता असे म्हणतात पण,तरी गुरुदक्षिणा म्हणून आपल्या हाताचा उजवा अंगठा त्याला का द्यावा लागतो ? आणि तो अंगठा कापून देण्यापासून का थांबला नाही ?

गुरू द्रोणांनी नाकारल्यावरही तो त्याचा लाडका शिष्य कसा बनतो ? एकलव्य एक असा राजपुत्र जो शिष्यत्व नाकारल्यावर परत गेला नाही, गुरूंची मूर्ती बनवून शिकत राहिला.
आजही श्रेष्ठ शिष्य कोण होता असा विचार येताच एकच नाव समोर येते , ते म्हणजे ' एकलव्य ♥️

ह्याच एकलव्य राजाची कथा या कादंबरीत खूप सुंदररित्या मांडली आहे.जी आजपर्यंत आपल्या कधीच वाचण्यात,बघण्यात आली नाही.
एकलव्याचे आई - वडील कोण ?एकलव्याचं कुळ नेमकं  कोणतं ? एकलव्य चे सैन्य कोणते होते ?
अर्जुनाच्या धनुष्याचे नाव 'गांडीव', कर्णाच्या धनुष्याचे नाव 'विजय', कृष्णाच्या धनुष्याचे नाव 'सारंग' होते तर याप्रकारे एकलव्यच्या धनुष्याचे नाव काय होते ?
अर्जुनाचे आणि एकलव्य चे युद्ध का आणि कसे झाले ?
एकलव्य आणि श्रीकृष्णाचा काय संबंध ? एकलव्य ने कृष्णाच्या द्वारकेवर हल्ला का केला होता ?आणि श्रीकृष्णाने एकलव्याला ठार का केलं होतं ?

आपल्याला माहित असलेल्या एकलव्य पात्राच्या पलीकडे असणारा एकलव्य आपल्याला ह्या कादंबरीत सापडतो.कितीतरी अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे आपल्याला या कादंबरीत मिळतात.विविध पात्रांच्या दृष्टीकोनातून आपल्यासमोर येणारा कथानक आपल्याला शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो.काही प्रसंग वाचताना जीव कासावीस होतो तर काही प्रसंग वाचताना प्रेरणा सुद्धा मिळते.कादंबरी वाचत असताना कथानक सरळ सरळ अंगावर येतो.युद्धाचे प्रसंग वाचत असताना जणू ते आपल्या डोळ्यासमोर घडतं असल्याचा भास आपल्याला होतो.
वाचकांच्या डोक्यात महाभारत कालीन वातावरण निर्माण करण्यात कादंबरी ही यशस्वी ठरते.इतिहासाच्या अनेक विविध बाजू कादंबरीच्या विषयातून आपल्या नजरेसमोर येतात आणि विचार करायला भाग पाडतात.

नक्की वाचा ♥️

©️Moin Humanist♥️
मी वाचलेली पुस्तके ♥️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼