एकलव्य 🖤

काही दिवसांपूर्वी विजय देवडे सरांनी मला त्यांची नवीकोरी कादंबरी 'एकलव्य' सहिनीशी सप्रेम भेट म्हणून पाठवली,तेव्हापासून ही कादंबरी वाचायची उत्सुकता होतीच.महाभारतातील एकलव्य सारख्या दुर्लक्षित व उपेक्षित पात्रांवर लिहिली गेलेली ही कादंबरी दोन दिवसांपूर्वी वाचून पूर्ण केली आणि पौराणिक कथेत जाऊन एकलव्याचा प्रवास त्याच्याकडूनच जाणून घेऊन आलो.हा प्रवास एक वेगळा आनंद देऊन गेला तर खूप काही शिकवून सुद्धा."इच्छाशक्तीच्या" बळावर माणूस काहीही करू शकतो ही शिकवण मला एकलव्य देऊन गेला.या कादंबरीतुन मला माझ्यातील एकलव्य काही प्रमाणात गवसला. महाभारत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ते कौरव आणि पांडवामध्ये झालेलं युद्ध आणि यासोबतच यातील विविध पात्र ते म्हणजेच भिष्म, धृतराष्ट्र, पांडु, कुंती, गांधारी, युधिष्ठिर, दुर्योधन, भिम, अर्जून, कृष्ण, द्रोण,कर्ण, द्रौपदी आणि इत्यादी.यामध्येच एकलव्य सुद्धा हा एक महत्त्वाचं पात्र आहे.पण, कोठे एकलव्यचा उल्लेख जास्त होताना दिसतं नाही.एकलव्य जरी कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये नसला तरीही यामुळे त्याचे महत्व अजिबात कमी होतं नाही.एकलव्य हा फार मह...