डियर तुकोबा ♥️

जगतगुरु तुकोबा माझ्यासाठी खरे मोटिवेशनल स्पिकर आहेत.तुकोबाच्या प्रत्येक अभंगात ऊर्जा आणि प्रेरणा असते.म्हणूनच मी वेळोवेळी तुकाराम बावांच्या अभंगाची गाथा व तात्यांनी लिहलेलं विद्रोही तुकाराम चाळत असतो.त्यातून मला कायम जगण्याची आणि परिस्थितीशी लढण्याची प्रेरणा आणि हिम्मत मिळत असते.शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या महान विभूतीचे विचार आज सुद्धा तेवढेच प्रासंगिक आहेत, जेवढे त्याकाळात होते.म्हणूनच "तुका आकाशा एवढा" आणि "तुका आशेचा किरण "म्हणतात ते उगाच नाही. तर हे सर्वकाही सांगायचं कारण हे की, मी काही दिवसांपूर्वी विनायक दादा लिखित "डियर तुकोबा"या एका आगळ्या वेगळ्या आणि शानदार पुस्तकाचा प्रवास पूर्ण करून आलो.आणि नेहमीप्रमाणे या पुस्तकाच्या सुद्धा प्रेमात बुडालो. (यावेळी अपेक्षेप्रमाणे जास्तच.) काहीतरी सुंदर आणि अप्रतिम वाचल्याची प्रचिती हे पुस्तक वाचून मला आली.जणू मी 'तुकोबाच्या' सानिध्यात वावरून आलोय असं मला वाटतंय.यामध्ये रेखाटलेल्या अप्रतिम अश्या चित्रांतून मला तुकोबा डोळ्यांनी बघून आल्यासारखं वाटतंय.पहिल्या 'पृष्ठापासून तर शे...