माझी नांदेड डायरी भाग :- 1 🌿❤️
मागचं सर्वकाही विसरून आता नव्याने Harshal या जिवलग मित्राकडून प्रेरणा-मार्गदर्शन घेऊन आता उच्चशिक्षित होण्याचं ठरवलं आहे.त्यासाठी सर्वकाही मागचं विसरून एखाद्या चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळवून पदव्युत्तर व्हायचं स्वप्न बघितलं आणि तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागलो तयारीला.यावर्षी प्रथमच केंद्रीय विद्यापीठात प्रवेशासाठी NTA कडून CUET म्हणजेच Central University Entrance Test ही एकच परीक्षा विविध अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणार होती.त्यामुळे Cuet देऊन एक नवीन अनुभव घेण्याचं ठरवलं आणि तयारी सुरू केली.म्हटलं पास होऊ किंवा फेल पण अनुभव तर नक्कीच कमालीचा मिळेल जो पुढे आपल्याला कामी येईलच.मग काय आज उद्या करत करत कितीतरी दिवसांनी वाट बघत असलेल्या या परीक्षेचा मुहूर्त अखेर 4 सप्टेंबर (रविवार )ठरला. आणि मला परीक्षा केंद्र नांदेड मिळाला.हा सेंटर मिळताच मुळात फार आनंद झाला कारण जेव्हा पासून गुरू गोविंद सिंहजी यांचा इतिहास अभ्यासलं, वाचलं होतं तेव्हापासून आवर्जून गुरुद्वारा येथे भेट द्यायची व आवडते लेखक मनोज बोरगावकर सर यांना भेटायची इच्छा होती.पण ही इच्छा काही पूर्ण होतं नव्हती ती या परीक्षेमुळे पूर्ण होणार होती.❤️
मग काय केली सुरू तयारी नांदेडकडे कूच करायची.आणि झालो सज्ज एका आगळ्या वेगळया नवीन प्रवासाला म्हणा किंवा आयुष्यातील एका नवीन अनुभवाला.नांदेड सेंटर कळताच फेसबुकवर पोस्ट केली (शास्त्र असतं ते वगैरे😅) आणि या पोस्टवर अपेक्षेपेक्षा जास्त मित्रांनी प्रतिक्रिया देऊन आपले नंबर दिले,मला भेटायची इच्छा दर्शवली.हे बघून तर जाम भारी आणि जबरदस्त वाटलं." अपुन को चाहने वाले भी कम नहीं " अशी फीलिंग येऊन गेली.😁
कारण मला जेवढी उत्सुकता एक्साम देण्याची होती तेवढीच उत्सुकता सर्वांना भेटायची होती.यामध्ये नितीन दादा,सिद्धार्थ सर,केतन दादा,शुभम दादा,रफिक सर,नारायण सर,गणेश सर,अजित सर,अंकुश दादा,संतोष दादा,सतीश दादा,चांदोजी सर आणि कुणाल दादा इत्यादी आयुष्यात आजपर्यंत कधीही न भेटलेल्या मित्रांचा सहभाग होता.कारण मला आजपर्यत सोशल मीडियावर मिळालेली सर्वच माणसं ही भन्नाट,वैचारिक आणि माणुसकी जपणारी आहेत.त्यामुळे मी जरा जास्तच उत्सुक होतो.
कारण जिवाला जीव देणारी,निस्वार्थी आणि माणुसकी जपणारी माणसं मला जोडायला आवडतात आणि ती मी जोडली आहे,जोडत आहेत आणि जोडत राहणार आहे.."जशी दृष्टी तशीच सृष्टी" ही म्हण मला आता प्रचंड आवडत आहे..जगात खूप चांगली,प्रेमळ माणसं आहेत पण त्यासाठी आपल्याला सुद्धा चांगलं आणि प्रेमळ बनावं लागेल..आपण इतरांकडून आपल्याशी ज्याप्रमाणे वागायची अपेक्षा करतो ठीक त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा वागावं लागेल एवढं नक्की..सुखात तर सर्व शामिल होतात आपण एकमेकांच्या दुःखात शामिल होऊया कारण माणसाला गरज तेव्हाच सर्वांत जास्त असते आपुलकी आणि प्रेमाची ❤️
नाही का ?😊
आता एकटंच जावं की इतर कोणाला सोबत घेऊन जावं हे ठरवतं असताना छोट्या भावालाच आवर्जून सोबत घेतलं.कारण त्याला हा अनुभव मिळवून द्यायचा होता.
आणि बसने न जाता प्रवास बाईकने करण्याचा प्लॅन केलं..बाईक मस्त सर्व्हिस वगैरे करून रेडी केली,बॅक पॅक करून,सोबत गुरू गोबिंद सिंह आणि कोकणच्या आख्ख्यायिका हे वाचायला पुस्तक सोबत घेतलं आणि इतर सर्वकाही तयारी करून नांदेड जाण्यासाठी शनिवारी 11.45 निघालो.सकाळी आभाळ दाटून आले होते,थंडगार वारा सुटला होता.एकदम फ्रेश् आणि छान वाटतं होतं. चोहीकडे पूर्ण शेतात फक्त हिरवळचं दिसतं होती.आणि यामध्ये सर्वांत भारी म्हणजे कानातील इयरफोन मध्ये "कुमार सानू दा च्या आवाजात "बरसात के मौसम में, तन्हाई के आलम मे "मै घर से निकल आया,पुस्तक भी उठा लाया " हा आवडता गाणं लावलेलं होतं.. अफलातून अशी फीलिंग होती जी शब्दाच्या पलीकडे आहे.येथेच थांबून मी मनातील दोन शब्द लिहून एक फोटुन काढून fb वर अपलोड केलं.यावरील सर्वांच्या शुभेच्छा बघून तर पुन्हा कितीतरी पटीने ऊर्जा अंगात संचारली.❤️
90'S ची भन्नाट गाणी ऐकत ऐकत कधी रिसोडला आलो कळलंच नाही.रिसोडला आलो आणि एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबलो.आता प्रथमच रिसोडला आलो तर आपल्या हक्काच्या माणसाची आठवण येणं स्वाभाविक होतं. मग काय सरळ धनेश दादाला कॉल केलं.पण दादा त्यावेळी गावी नसल्याने परतीच्या प्रवासात भेटायचं ठरवलं आणि निघालो पुढे.आता पुढील थांबा होता हिंगोली.आता वातावरण बदललं,जाम गरम होतं होतं म्हणून एकेठिकाणी थांबवून तोंड वगैरे धुवून.बाईक भावाला चालवायला दिली आणि मी बॅगेतून"कोकणच्या आख्यायिका"हे पुस्तक काढलं आणि बाईकवर मागे वाचत बसलो आणि त्यामध्ये पूर्ण हरवून गेलो.वाचता वाचता कधी हिंगोली आलं हे समजलंच नाही.
येथे येऊन एका हॉटेलमध्ये थांबून 2 चहा ऑर्डर करून
सरळ कॉल केलं तो विश्वजीत दादांना.काहीच वेळात Vishwajeet Ghodge दादा आणि Gajanan Hake Patil सर तेथे पोहोचले.यांना प्रथमच भेटून,बोलून प्रचंड आनंद झाला.हिंगोलीची फेमस कढी खिचडी घेऊन आम्ही वेगवेगळ्या विषय आणि पुस्तकांवर चर्चा केली.दोघांना प्रथमच भेटून अजिबात असं वाटलंच नाही की आम्ही प्रथमच भेटतोय म्हणून.दादा आणि सरांनी मला दोन पुस्तके भेट म्हणून दिली.फार म्हणजे फारच छान वाटलं.अशी जिवाभावाची माणसं आपण जोडली आहे याचा प्रचंड आनंद झाला.या दोघांची जरी ही धावती भेट असली तरीही भेटून, बोलून खऱ्या अर्थाने आपण या प्रवासात एकटे नाहीत याची प्रचिती आली.दोघांना मिठी मारून आणि पुन्हा लवकरच भेटण्याचा प्रॉमिस केलं आणि रजा घेतली व आम्ही निघालो पुढील प्रवासाला...❤️
आता पुढील थांबा होता परभणी.....❤️🌿
क्रमशः❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा