कहाणी हमारी दोस्ती की...❤️

आज जागतिक मैत्री दिवस ❤️

एक खरा मित्र आपल्या दुसऱ्या मित्राचं आयुष्य कशाप्रकारे बदलू शकतो ?मनातील विझत चाललेली शिक्षणाची,लढण्याची आग एक मित्र कशाप्रकारे पुन्हा नव्याने पेटवू शकतो ?संकटांशी लढण्याची हिम्मत कशाप्रकारे देऊ शकतो ?या बद्दल लिहलेली आतापर्यंतची ही एक छोटीशी आमच्या मैत्रीची जर्णी.

यामध्ये वेगवेगळे नवीन प्रकरण आता पुढे समाविष्ट होतंच जातील.🌱

माझ्या आयुष्यातील हा पहिला वहिला बेस्ट मैत्री दिवस आहे.जो मी आनंदाने आज सेलिब्रेट करू शकतो.यापूर्वी हा दिवस सेलिब्रेट करण्या सारखं माझ्या आयुष्यात कोणीही असं विशेष मित्र नव्हतं.असं नाही की पूर्वी माझ्या आयुष्यात मित्र वगैरे नव्हते.होते असंख्य मित्र होते आणि आहेत पण मला जसा मित्र हवा होता तसा मित्र मात्र माझ्या आयुष्यात आलेला नव्हता."खरा मित्र" म्हणावा असा मित्र तरी कोणीही नव्हतं.एखाद्या साठी वाटेल ते करू वाटण्यासारखं कोणीही नव्हतं.सुरुवातीपासूनच चित्रपट बघून,मैत्रीचे गाणे ऐकून किंवा एखाद्या पुस्तकातील मैत्रीचे वर्णन वाचून असं नेहमी वाटायचं की,यार आपल्या आयुष्यात सुद्धा एक बेस्ट जीवाला जीव देणारा मित्र असायला हवा.त्याच्यासोबत आपण सर्वकाही शेअर करू.एकमेकांच्या सुखादुखात सहभागी होऊ.आपल्या आवडीचे मैत्रीचे गाणे आपण त्याला Dedicate करू.मित्र यायचे जायचे पण माझा बॉंडिंग कोणासोबतही जसा जुडला नव्हता.ज्याला खऱ्या मैत्रीची कदर असेल असा खरा मित्र माझ्या आयुष्यात नव्हताच.

मग अशातच माझ्या आयुष्यात थोडी लेट पण थेट एन्ट्री झाली.ती एक अश्या आगळ्या वेगळ्या मित्राची ज्याच्या शोधातच मी होतो.एक अशा काळात हा मित्र माझ्या आयुष्यात आला ज्या काळात सतत आजारामुळे मी भरकटलो होतो.एकंदरीत एका खऱ्या भन्नाट मित्राची.एक असा मित्र ज्याने माझं दृष्टीकोन बदलून माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण दिलं.ज्याच्या रुपात मला खऱ्या मैत्रीचे दर्शन झाले."वन्यामध्ये गारव्यासारखा "तो मित्र म्हणजेच माझा जीवलग मित्र हर्षल . ❤️आमच्या मैत्रीबद्दल आजपर्यत आम्ही खूप काही लिहलं आहे.लिहीत असतो.हर्षलचं असलेलं माझ्या आयुष्यातील महत्व आजपर्यत खूप जणांना माहिती आहेच. मी लिहलेलं पत्र आणि काही मैत्रीबद्दल विचार अनेकांनी वाचले असतीलच.मला कितीतरी दिवसांनी आमच्या मैत्रीच्या प्रवासाबद्दल लिहायचं होतं.जेणेकरून ते कायम आठवणीत राहणार.म्हणून मी कितीतरी दिवसांनी जमेल तसं हा प्रवास लिहून काढतं होतो.आणि आज सहजच शेअर  करतोय.

हर्षल व माझी ओळख काही फार जुनी नाही.आमच्या मैत्रीला अजूनपर्यंत वर्षपूर्ती सुद्धा व्यवस्थित झाली नाही.आमच्या प्रथम भेटीला जेमतेम 5/7 महिने झाले असतील.पण तरीही आम्ही लहानपणापासून सोबत राहतोय,एकमेकांना सुरुवातीपासून ओळ्खतोय असं आम्हा दोघांना वाटतं असतं.आमचं एकंदरीत जो बॉण्ड जुडल्या गेलं आहे त्याला मी कोणतीही उपमा देऊच शकत नाही.आमची दोस्ती ही फार आगळी वेगळी आहे.न्यारी आहे.जी कोणत्याही साच्यात बसूच शकत नाही.आमची बॉंडिंग ही एक वेगळ्याच लेव्हलची आहे.एकंदरीत आमची मैत्री ही भावनिक व वैचारिकरित्या जुडली आहे जी कधीही कोठेही थोडी सुद्धा कमी होऊ शकत नाही.एकंदरीत हमारा दोस्ती का बॉण्ड फेविकोल से भी ज्यादा मजबूत आहे.जो कभीभी तुटेगा नहीं.गैरसमज,द्वेष,स्वार्थाला आमच्या मैत्रीत अजिबात थारा नाही.आमच्या मैत्रीत फक्त माणुसकी, प्रेम,आपुलकी,काळजी,वाचन, पुस्तक ,शिक्षण आणि खऱ्या मैत्रीला स्थान आहे.

आजपर्यंत खरी मैत्री पुस्तकात वाचली होती,चित्रपटात बघितली होती.पण आजपर्यंत खरी मैत्री कधी अनुभवली,जगली नव्हती.ती मला जगायला आणि अनुभवायला मिळाली माझ्या या मित्रामुळे.
माझ्या मैत्रीची व्याख्याच माझा मित्र आहे.मला कोणी मैत्री विचारलं तर मी हर्षलच नाव घेईन एवढं नक्की.मला खरा मित्र बघायला मिळाला,खरी मैत्री अनुभवायला मिळाली ती हर्षलच्या रुपात.खरंच कुठलाही नातं नसताना एखादं व्यक्ती एवढं हृदयात घर करून कसं जातो हे कळतं नाही.जगातील प्रत्येक नात्याला काहीतरी बंधने किंवा समाजमान्यता असते. पण मैत्रीला कुठलाही बंधन नसतो.मैत्री ही एखाद्या आकाशात उडणाऱ्या पक्षीसारखी स्वतंत्र असते.हा माझा ठाम मत आहे.
या गड्याने खूप काही कळत/नकळतपणे दिलं आहे आणि देत आहे.कितीतरी पुस्तकातून शिकलो नसेल तेवढं मला माझ्या दोस्ताने शिकवलं आहे.अनेक बाबतीत माझा दृष्टीकोन बदललं आहे.मला उच्च शिक्षणाची प्रेरणा दिली आहे.सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर माझ्या आयुष्यात आले त्यांच्यामुळे पुस्तके आली तर पुस्तकामुळे हर्षल सारखा खरा मित्र माझ्या आयुष्यात आला.या तिन्ही मुळे माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं.खूप शिकायची, लढायची आणि अभ्यास करायची प्रेरणा मिळाली.

सुरुवातीला हर्षल व माझी ओळख झाली ती अशीच फेसबुकवर.त्याने मला सहजचं इनबॉक्स मध्ये विवेक रिजन ही डॉक्युमेंटरी बघून त्याबद्दल लिहायचं सुचवलं होतं.पुढे असंच 2020 लॉकडाऊन मध्ये खजिना पुस्तकांचा या उपक्रमातुन त्याने काही पुस्तके मागवली होती.येथून प्रथमच आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टस मध्ये आलो.याच काळात त्याने आपल्या मित्राच्या पायाच्या ऑपरेशन साठी डोनेशन जमा करायला सुरुवात केली.जागोजागी जाऊन त्याने पैसे जमा केले.अशातच त्याने मला याबद्दल कळवलं.ती डोनेशन साठी आव्हान करणारी पोस्ट मी माझ्या संपर्कातील सर्वांना शेअर केली होती.आम्ही त्याकाळात प्रथमच एकदोन वेळा कॉलवर बोललो.बस्स एवढंच.पुढे हर्षलने तब्बल 6 लाख रुपये जमा करून आपल्या मित्राला घेऊन दिल्ली गाठली.तेथे त्या मित्राचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि तो मित्र पुन्हा आपल्या पायांवर चालू शकला.हर्षलने हे आपल्या इच्छाशक्तीने,जिद्दीने करून दाखवलं.पण इकडे याचं काळात आरोग्याने माझं साथ सोडलं होतं. सतत आजारपणामुळे मी एकंदरीत मागे पडलो.चोहीकडून निराशेत बुडालो. याकाळात साथ दिली ती पुस्तकांनी.याकाळात मी सर्वकाही बाजूला ठेऊन फक्त अवांतर वाचन केलं.आणि पुढे येथूनच हर्षल व माझा संपर्क एका वर्षांसाठी तुटून गेला.मी इकडे माझ्या कामात गुंतलो तर तो तिकडे.आतापर्यंत आम्हाला आम्ही cse करतोय यापलीकडे एकमेकांबद्दल विशेष अशी काही आयडिया नव्हती.

One Year Later :-

2021 मध्ये जून महिन्याच्या 26 तारखेला शाहू महाराजांची जयंती होती.IIT,APU,TISS चे Result जाहीर झाले होते.इथपर्यंत हे नेमकं काय असतं हे माझ्या ध्यानी मनी सुद्धा नव्हतं.फक्त IIT बद्दल ऐकलं होतं.आणि एका मित्राच्या स्टेटस वर हर्षलच IIT साठी निवड झाल्याचं नावं दिसलं.हे बघून मला अचानकपणे हर्षलची आठवण आली.मी लगेच त्याचं नंबर चेक केलं.पण नंबर डिलिट झालेलं होतं.म्हणून मला आमच्या इनबॉक्स मध्ये केलेल्या चॅटिंग ची आठवण झाली.त्याने मला तेथेच नंबर दिला होता.मी इनबॉक्स मधून नंबर घेतला आणि हर्षल ची वॉल चेक केली.तेथील काही पोस्ट बघून फार भारी वाटलं मनापासून आनंद झाला.आणि मी लगेच हर्षलला व्हाट्सअप्प ला msg करून शुभेच्छा दिल्या.त्याचं सुद्धा लगेच Msg आला आणि मग कॉल.कॉलवर आम्ही त्यादिवशी बरंच काही बोललो.आणि येथूनच आमची मैत्रीची काही प्रमाणात सुरुवात झाली.एकमेकांचे विचार जुडतं गेले.पुढे आम्ही वेळोवेळी बोलतं होतो.हर्षलच नेहमी कॉल यायचा तो आपुलकीने विचारपूस करायचा,आपल्याबद्दल सांगायचा.विविध विषयांवर बोलायचा.येथूनच मला त्याची समाज,शिक्षण आणि माणुसकी बद्दल असलेली तळमळ समजली.येथून हर्षल खऱ्या अर्थाने मनात घर करून गेला.तो ज्या पद्धतीने ज्या तळमळीने बोलायचा ते फक्त ऐकतच राहावं असं वाटायचं.येथूनच त्याने मला एकलव्य, Tiss/Apu/IIT आणि वेगवेगळ्या Fellowships बद्दल माहिती दिली.

पुढे आम्ही नियमितपणे कॉलवर बोलायचो,गप्पा मारायचो.हर्षलला मला आणि मला हर्षलला भेटायची खूप इच्छा होतीच.अनेक वेळा ठरवून सुद्धा आमच्या भेटीचा योग काही जुडून आला नाही.सप्टेंबर महिन्यात मी सुद्धा अभ्यासाला लागलो आणि व्यवस्थित अभ्यास सुरू केला. तब्येत सतत बिघडायची पण तरीही मला हर्षलने एक नवीन प्रेरणा दिली होती.दुकान सांभाळून मी नव्याने अभ्यासाला सुरुवात केली.असं करत करतच नोव्हेंबर महिना उजाडला आणि बघता बघता 26 नोव्हेंबर संविधान दिवस आला.मला चांगल्या प्रकारे आठवतंय की 26 नोव्हेंबर रोजी मी रात्री दुकानात "वॉल्डन काठी विचार विहार हे नवीन  रिप्रिंट  होऊन आलेलं पुस्तकंच वाचतं बसलो होतो.आणि मला 10.30 च्या सुमारास शरद तांदळे सरांचा कॉल आला.त्यांनी मला या पुरस्काराबद्दल कल्पना दिली आणि शुभेच्छा दिल्या.सरांना बोलून कॉल ठेवलं.मला हे सर्वकाही अनपेक्षित होतं. मी भारावून गेलो होतो.घरी कुटुंबाला कल्पना दिली.मला आभाळ ठेंगणे झाले होते.आता मला ही गुड न्यूज माझ्या जवळच्या मित्राला सांगायची होती. म्हणून मी अश्या एका मित्राबद्दल विचार केला आणि माझ्या नजरेसमोरून चेहरा आला मी त्याला सर्वांत प्रथम कॉल केला तो म्हणजेच हर्षलला.त्याला ही गुड न्यूज दिली.त्याला जो आनंद झाला होता तो त्याच्या आवाजावरून समजतं होता.तो एकंदरीत भावुक झाला होता.

आनंदातच आता डिसेंबर उजाडला हर्षलला मला भेटायला यायचं होतं आणि मला सुद्धा त्याला भेटायची खूप इच्छा होती.पण बसेस बंद असल्याने मी त्याला सुल्तानपूर न बोलवता औरंगाबाद ला बोलावलं.आणि मग आम्ही औरंगाबाद, वेरूळ आणि तेथून नाशिक ला साहित्य संमेलनात जायचं प्लॅंनिंग केलं.मी संध्याकाळी औरंगाबाद ला पोहोचलो तर हर्षल सकाळी हैदराबाद वरून औरंगाबाद ला पोहोचणार होता.माझं मुक्काम राहुल या जवळच्या मित्राच्या घरी होतं. हर्षलला भेटायच्या उत्सुकतेत त्यादिवशी मला झोपचं आली नाही.सकाळी 5.30 वाजता हर्षल औरंगाबाद रेल्वे स्टेशन वर येऊन पोहोचला.मी सकाळीच त्याला घेऊन येण्यासाठी स्टेशनला आलो.आणि येथे माझी आणि हर्षलची आयुष्यातील पहिली भेट झाली.जी कधीही न विसरता येणारी आहे.येथून हर्षल आणि माझं मैत्रीचा एक घट्ट नातं जुडलं.औरंगाबाद,वेरूळ,नाशिक येथे भरपूर एन्जॉय केलं.एकूण दिढ दिवस आम्ही सोबत होतो.या दिढ दिवसांत आमच्या मैत्रीचा एक असा बॉण्ड जुडला जो कधीही केव्हाही तुटणारा नव्हता.पहिल्याच भेटीत हर्षल हृदयात,काळजात घर करून गेला.त्याने दाखवलेली आपुलकी, काळजी आणि विशेष हैदराबाद सारख्या ठिकाणावरून विशेष मला भेटायला येणं या बाबीने हर्षल प्रति असलेली माझी Respect खूपच वाढली.(वेरूळ येथे तर आईसारखं आपल्या मांडीवर डोकं ठेऊन त्याने डोक्याची मालिश केली होती हे आयुष्यभर विसरता येणारं नाही.)
येथे शेवटी एकमेकांची रजा घेताना आम्ही किती भावुक झालो.हे शब्दांत सांगता येणारं नव्हतं. हर्षल गेल्यानंतर घरी परत येईपर्यंत मला काहितरी तुटल्यासारखं वाटतं होतं. आज सुद्धा या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत.

मग जानेवारी महिन्यात आयुष्यात प्रथमच हर्षल मला भेटायला सुल्तानपूर ला घरी स्टडी बंकरमध्ये आला.माझ्यासोबत 4/5 दिवस स्टडी बंकर मध्ये राहिला.हे 4/5 दिवस न विसरता येणारे आहेत कधीही.लोणार,सिंदखेडराजा, मेहकर वगैरे सारख्या ठिकाणी आम्ही प्रचंड फिरलो आणि भरपूर एन्जॉय केलं.या 4/5 दिवसांत आम्ही खुप साऱ्या मेमरीज साठवल्या.एकमेकांना अजिबात कल्पना नसताना हर्षल आणि माझ्या लॅपटॉप वर सेम आई साऊ आणि जोतिबांचा वॉलपेपर होता.यावरूनच आमचे विचार किती जुडतं होते यावरून आमच्या मैत्रीचं किती खोलवर रोवलं गेलं होतं याचं अंदाज येतो.या काही दिवसांत हर्षलने मला खुप काही नवीन शिकवलं,अनेक बाबतीत मार्गदर्शन केलं.आणि खऱ्या अर्थाने उच्चशिक्षणासाठी प्रेरीत केलं.या काही दिवसांत आम्ही पुढे भविष्यात सोबतच खूप काही नवीन आणि भन्नाट  करायचं प्लॅन केलं.स्टार्टअप आणि समाजोपयोगी कार्य करण्याचं निर्धार केलं.आपल्या वाचन,शिक्षणाचा फायदा इतरांना कसा होईल याबद्दल प्लॅंनिंग केली.

 पुढे आमचं पुण्याला पुरस्कारासाठी सोबतच जायचं प्लॅन ठरलं.पण अनपेक्षितपणे त्याला कोविडने गाठलं म्हणून माझ्या या एका आयुष्याच्या आनंदाच्या क्षणात हर्षल शरीराने हजर राहू शकला नाही.हृदयाने तो माझ्या सोबत होताच.पूर्ण समारंभात मला त्याचीच आठवण येत होतं होती,काही तरी कमी वाटतं होती.पण येथून पुढे आम्ही ठरवलंय की सुखात असो अथवा दुःखात काहीही झालं तरी आपण नेहमी सोबत राहू.दुःखात असताना हाक द्यायची सुद्धा आम्हाला गरज पडतं नाही.

इथपर्यंत हर्षलचं बॅकग्राऊंड ,भूतकाळ मला काहीही माहिती नव्हतं.आणि मी सुद्धा त्याला काही विचारलं नव्हतं.पण पुढे एकेदिवशी त्याने मला सर्वकाही व्हिडिओ कॉलवर सांगितलं.इथपर्यंत पोहोचण्यापर्यतचा त्याचा खडतर प्रवास त्याची प्रेरणादायी जर्णी ऐकून डोकं सुन्न झालं होतं.नेहमी नवीन शिकणारा,इतरांना शिकवणारा,मार्गदर्शन करणारा स्मित करत इतरांना आपलासा करणाऱ्या या मुलाने एवढं काही सहन केलं असेल यावर माझा विश्वासच बसतं नव्हता.डोळ्यांतून पाणी कधी आलं हे मलाच कळालं नाही.मी तेव्हा त्याच्या सोबत का नव्हतो याचं मला नेहमी दुःख होतं असतो.कोठेतरी ही गोष्ट मला सतत बोचत असते.पण येथून मी त्याला वचन दिलं होतं.की भाईजान येथून पुढे तुझ्या सुखात नसलो तरी दुःखात कायम सोबत असेल.तुझे सर्व दुःख मी माझ्यावर घेण्याचं प्रयत्न करेन.तुझ्या पाठीशी ढाल बनून कायम उभा राहील.दुनिया इकडची तिकडे होईल पण मी तुझा साथ कधीही, केव्हाही सोडणारं नाही एवढं नक्की.🌱

पुढे एप्रिल मध्ये भविष्यात आम्ही नवीन काहीतरी वेगळं करायचं ठरवलं असल्याने त्याची योग्य ती प्लॅंनिंग करण्यासाठी हर्षल सुलतानपूर ला आला.तब्बल 22 दिवस आम्ही सोबत होतो.या 22 दिवसांत आम्ही पुढची खुप काही नवीन प्लांनिंग केली. या 22 दिवसांत आम्ही नव्याने एकमेकांना समजून घेऊ शकलो.आमच्या प्लॅंनिंग मध्ये काही त्रुट्या बाकी होत्या त्यासाठी योगायोगाने आम्ही 2 दिवस पुण्याला सुद्धा गेलो.विशेष महात्मा फुले वाडा येथे आई साऊ आणि ज्योतिबांना अभिवादन करून आमची पुढील योजना आम्ही आखली.ती पुढे आम्ही योग्य वेळी जाहीर करणार आहोतच.❤️

बाकी,

आम्हाला आता सोबत राहून खूप काही करायचं आहे.ध्येय गाठायचं आहे.अनेकांच्या सुखांचा कारण बनायचं आहे.माणुसकी जपायची आहे आणि असंख्य जिवाभावाचे मित्र जोडायचे आहेत.आतापर्यंत नकारात्मकता , नैराश्य , उदासीनता वगैरे वगैरे सर्वकाही पूर्वीच फेस केलं आहे . आता तरी या शब्दांना माझ्या आयुष्याच्या डिक्शनरीत स्थान नाही आणि नसणारं.आता मी स्वतःला सर्वांत जास्त सकारात्मक युवक समजतो . आजपर्यंत एवढं काही बघितलेलं आहे , अनुभवलं आहे आणि मुळात वाचलेलं आहे की आता सर्व काही सोप्प आणि इजी वाटतं . स्वतःजवळ स्वतःच विशेष काहीही नसताना मी सर्व बाबतीत आनंदी आहे प्रचंड . कोणाला पटो अथवा न पटो सध्यातरी मला कुठलीही लालसा , तृष्णा वगैरे नाही . मला इतरांच्या आनंदाने मनापासून आनंद होतो . कारण वाचनाने आणि माझ्या मित्राने माझं आयुष्याकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टीकोनचं चेंज केला आहे . मी माझ्या ध्येयात यशस्वी होईल याची मला खात्री आहेच . आणि जर झालो नाही तरीही मला दुःख वगैरे काही होणार नाही .कारण आता पूर्वीप्रमाणे माझा ध्येय फक्त एक नाही आणि मुळात मी माझ्या प्रवासात आता एकटा नाही . माझ्या खऱ्या मित्राची मला आणि माझी माझ्या खऱ्या मित्राला कायम खंबीर साथ आहे आणि कायम असेल.

आता शेवटी एवढंच म्हणेल की,

आयुष्यात असंख्य मित्र येतात जातात पण यापैकी कोणी एकच असा असतो, ज्याच्या सारखा इतर कोणीही नसतो.त्याच्यासोबत जो एक बॉंड जुडतो तो इतर कोणासोबतही जुडत नाही.त्याला आपण बेस्ट फ्रेंड म्हणतो.मित्र सर्वंच असतात पण जिग्री मित्र एकच असतो कायम.तुमच्या आजूबाजूला हजारो मित्र असतील पण खरा मित्र तोच ज्याच्या सोबत तुमचं हृदयाचं नात जुडतो.
कोणी असा एकतरी मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवा.असा एखादा मित्र मिळायला खरंतर नशीब लागतं पण एकदा असा मित्र मिळाला तर तुमचं एकंदरीत आयुष्य बदलतो.तो मित्र तुमच्या आयुष्याची दिशा तर बदलतोच पण तुमच्या सोबत जेव्हा कोणीही नसतो तेव्हा तोच तुम्हांला समजून घेऊन काहीही झालं तरी"मै हु ना "म्हणत लगेच प्रेरणा देण्याचं काम करतो.तुमच्या चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन तर देत असतो.पण चुकीच्या गोष्टीला विरोध सुद्धा करतो..असा तो मित्र तुमचं आयुष्य बदलून तुम्हांला नवीन दृष्टिकोन देऊन जातो..

एपीजे अब्दुल कलाम सरांच्या भाषेत म्हणायचं तर...🤘

एखादे चांगले पुस्तक हे चांगल्या मित्रा सारखे असते, पण एक चांगला मित्र हा एखाद्या ग्रंथालया सारखा असतो.

आणि यात मला आता काहीही वाद वाटत नाही..सरांनी म्हटलेलं हे वाक्य मला आता फारच आवडू लागलं आहे.कारण शेकडो पुस्तकांनी जेवढं मला शिकवलं आणि समृद्ध केलं नसेल तेवढं मला माझ्या मित्राने शिकवलं आहे..

अनंत राहुत आपल्या कवितेतील एका कडव्यात म्हणतात..

वाट चुकणार नाही जीवनभर कोणी,
एक तू मित्र कर आरशासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…

हे तंतोतंत खरंय ❤️😇

मला असा माझा जिवलग मित्र मिळाला..
हर्षल च्या रूपातं..आयुष्यात आता पुन्हा काही नकोय..सर्वकाही होतं एक आरश्यासारखा मित्र नव्हता तो मला मिळाला..पुढे मी किती मोठा झालो त्यामध्ये फार मोठा वाटा माझ्या या मित्राचा असेल.पुढे जेथें सुद्धा मोईनच नावं निघेल त्याबरोबर हर्षलच सुद्धा निघेल तर हर्षलच नाव निघल्यावर माझं नाव निघणे आलंच.😅

बाकी एवढं नक्की,

पता कोई पूछे तो कहते हैं हम
के एक दूजे के दिल में रहते हैं हम
रहते हैं हम
नहीं और कोई ठिकाना हमारा
सलामत रहे दोस्ताना हमारा !!🌱❤️

मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा ❤️

©Moin Humanist✍️

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼