कोल्हाट्याचं पोरं 🖤

हे पुस्तक वाचत असताना नेहमी मला एका हिंदी चित्रपटातील गाण्याचे खालील बोल आठवतात. "दुनिया में कितना गम हैं,मेरा गम कितना कम हैं, लोगो का गम देखा तो,मैं अपना गम भूल गया.🥺 ठीक या Lyrics प्रमाणे मी स्वतःच दुःख विसरून जातो.मला माझे दुःख या लेखकासमोर नगण्य वाटायला लागतात.आपले आयुष्य किती सुखद आहे ही भावना मनात निर्माण होते.सर्वकाही असताना आपल्याला अजून काय हवंय ?आपल्याला जे मिळालं आहे ते असंख्य जणांचा स्वप्न आहे या गोष्टीची मला जाणीव हे पुस्तक वाचून झाली. असंख्य वेदना झेलून,समस्यांचा सामना करून लेखक जेव्हा शेवटी डॉक्टर होतो तेव्हा उर भरून तर येतोच.प्रचंड आनंद सुद्धा होतो.पण इथपर्यंत मजल मारण्यासाठी केलेली धडपड आणि मेहनतीचा विसर आपल्याला पडत नाही.त्यांच बालपण एवढ्या खडतर आणि वाईट परिस्थितीत गेलं ह
ी गोष्ट कोठेतरी मनात काट्यासारखी टोचत राहते. काही वर्षांपूर्वी मी हे पुस्तक वाचलं.आणि तेव्हापासून कमीत कमी 4 वेळा वाचून पूर्ण केलं असेल.जेव्हा सुद्धा माझ्या आयुष्यात मला काही अडचणी,दुःख जाणवतात तेव्हा मी हे पुस्तक चाळत असतो.हे पुस्तक वाचून मला ते दुःख,अडचणी खूप शुल्लक वाटायला लागतात..लेखकाच्या संघर्षापुढे आपल्या अडीअडचणी गौण आहेत.असा एक विश्वास मनात निर्माण होतो.व मी पुन्हा ताकदीने अभ्यास,मेहनत करायला सुरुवात करतो एवढं नक्की.लेखकांचा खडतर व संघर्षमय जीवनप्रवास मनाला वेदना देणारा असून असंख्याना प्रेरणा देणारा आहे.. हृदयाला चटके देऊन जाणाऱ्या या पुस्तकांमध्ये लेखकांनी आपला व आपल्या आईचा संघर्षमय आणि दुःखद जीवन प्रवास मांडलेला आहे.आपल्या बापाचा पत्ता नसलेल्या व आईच्या प्रेमासाठी तडपणाऱ्या एका मुलाचे हे प्रांजळ आत्मकथन वाचताना आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.कितीतरी वेळा अश्रूला बांध फुटून वाचकाचे डोळे पाणावतात एवढं वाचक या कादंबरीत हरवून जातो. कोल्हाटी समाजातील बोर्डावर नाचणाऱ्या स्त्रियांचा जीवन त्यांच्या आयुष्यातील समस्या,त्यांचे होत असलेले हाल व आपल्या समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पावलोपावली आपल्याला या पुस्तकामधून जाणवतो. अतिशय गरीब घरात जन्म घेऊन गरिबीचे चटके सोसत डॉक्टर झालेल्या लेखक किशोर काळे सरांचे हे आत्मचरित्र वाचताना अंगावर काटा येतो.लेखक किशोर काळे व त्याची आई शांताबाई काळे यांची ही हृदय पिळवून टाकणारी संघर्षमय कहाणी वाचल्यावर कोणीही आपल्या भावना आवरुच शकतं नाही एवढं नक्की. ता.क :- आजपर्यंत या पुस्तकाबद्दल असंख्य जणांनी लिहलं आहे.याबद्दल बऱ्याच प्रमाणात चर्चा झालेली आहे.असंख्य वाचकांनी हे पुस्तक वाचलं आहे.त्यामुळे जास्त विस्तृत न लिहिता फक्त मनातील भावना लिहल्या आहे.कथेवर विशेष काहीही भाष्य केले नाही.ज्यांनी वाचलेलं नसेल त्यांनी लगेच वाचायला घ्या..🙏 ©Moin Humanist✍️

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼